Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पालचोर सापडलं म्हणजे दुध भात
पालचोर सापडलं म्हणजे दुध भात जेवलो/खाल्ला का ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्याचा बायको !!! >>>> हा हा
त्याचा बायको !!! >>>> हा हा हा हा!
ह्यात काय शॉक आहे ते कळलं नाही. आपल्या कडेही शीतल, किरण आशी नावं आहेतच ना. >>>> शीतल हे विशेषण असल्याने मुलगा/मुलगी कुणालाही चालते. किरण मराठीत पुल्लिंगी (प्रकाशाचा एक किरण आत आला... वगैरे) आणि हिंदीत स्त्रीलिंगी (सूरज की पहली किरण... वगैरे) आहे. त्यामुळे तो घोळ आहे. शन्तनु हे मुळात विशेषण असले (शमयति तनुम् इति - कदाचित कर्मधारय तत्पुरुष), तरी ते विशेषण म्हणून कुणी वापरल्याचे ऐकिवात नाही. उलट महाभारतातल्या शन्तनु राजा वरून शंतनु/शंतनू/शांतनू वगैरे (पुल्लिंगी) नावे आपल्याकडे आहेत. म्हणून ते स्त्रीलिंगी नाव ऐकून शॉक बसला.
आमच्या ऑफिस मध्ये आदित्य
आमच्या ऑफिस मध्ये आदित्य नावाची पंजाबी आर्मी मॅन ची मुलगी आहे.
)
(तिचे नाव 'आदित्य' च आहे पण लोकांनी 'आदित्य' नाव बाईसाठी म्हणताना ठसका लागायला लागला म्हणून तिला 'आदित्या' म्हणायला चालू केलं.
त्या जब वी मेट मध्ये ती करीना
त्या जब वी मेट मध्ये ती करीना शाहिद ला "आदित्या" च म्हणते ना?
अदित्य च्या स्पेलिंग ला नुसतं
अदित्य च्या स्पेलिंग ला नुसतं टी वाय लिहून अधांतरी पाय मोडून सोडता येत नाही त्यामुळे शेवटी ए असतोच.तो आहे म्हणून कोणी पाहिजे तसा वापरला तर चालतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विदर्भात उडी मारण्याला कुदी
विदर्भात उडी मारण्याला कुदी मारणे म्हणतात ... लहानपणी वाचले होते कि किशोरकुमार ने हा शब्द वापरला (मै इधरसे कुदी मारके उधर जाउंगा) तेव्हा तिथे उभ्या असलेल्या कोण्यातरी सौथच्या हिर्विनला कल्चरल शॉक बसला म्हणून ... त्याचा अर्थ ... कुदी म्हणजे पार्श्वभाग
कल्चरल शॉक आहे कि नाही माहित
कल्चरल शॉक आहे कि नाही माहित नाही .. पण ऐकून आणि बघून अवाक नक्कीच झाले ..
१३ हा आकडा इथे अशुभ मानतात .. (आपल्याकडे पण मानतात मला वाटतंय )
त्याउपर १३ तारीख जर शुक्रवारी आली तर आणखीनच अशुभ असते म्हणे ! मानण्यापर्यंत ठीक होतं पण मी जिथे काम करते तिथे
तर माझ्या डिपार्टमेंट मधले ७०/८०% लोकं सरळ रजा घेऊन घरी बसतात !! अगदी सगळे उच्च शिक्षित.. डॉक्टरेट वगैरे मिळवलेले /मॅनेजर किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावरचे सुद्धा !
उद्याच १३ तारखेचा शुक्रवार आहे आणि निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी सुट्टी टाकलीय !!
काही काही हॉटेल्स मधे १३ नंबर
काही काही हॉटेल्स मधे १३ नंबर ची रूम नसते !!
१३ हा आकडा इथे अशुभ मानतात>>
१३ हा आकडा इथे अशुभ मानतात>>
इथे म्हण्जे कोठे? अमरिका का?
इथे म्हण्जे कोठे?>> जर्मनी त
इथे म्हण्जे कोठे?>> जर्मनी त .. सॉरी ते लिहायचं राहिलंच का ?
जर्मनी त .. सॉरी ते लिहायचं
जर्मनी त .. सॉरी ते लिहायचं राहिलंच का ?>> अहो ते फ्रायडे १३ चे नुसते निमित्त वीकांत वाढवून कुठेतरी पळायचा प्लॅन असतो तो. जर्मन्स काय घाबरतात कशाला. शूर बिन्धास्त लोक्स
माझा हि आधी हा समज होता ..
माझा हि आधी हा समज होता .. पण तो गैर ठरला .. शूर वीर आणि विकांत वगैरे ते सगळं झालंच ..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काही जण खरंच याच कारणासाठी सुट्टी घेतात ..
जर्मनी त .. सॉरी ते लिहायचं
जर्मनी त .. सॉरी ते लिहायचं राहिलंच का ?>> अहो ते फ्रायडे १३ चे नुसते निमित्त वीकांत वाढवून कुठेतरी पळायचा प्लॅन असतो तो. जर्मन्स काय घाबरतात कशाला. शूर बिन्धास्त लोक्स>>>![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अशिच काहीतरी टूम मंडे साठीही काढायला पाहिजे, म्हणजे मंडे ब्लुज का काय म्हणतात तेही मार्गी लागेल.
ज्यांना मंडे आवडत नाही त्या
ज्यांना मंडे आवडत नाही त्या लोकांचे नेमके काय सायको प्रॉब्लेम्स आहेत मी कधीच समजू शकत नाही ...
उद्या आहे की 13, आणि शुक्रवार
उद्या आहे की 13, आणि शुक्रवार पण आहे.
उद्या आहे की 13, आणि शुक्रवार
उद्या आहे की 13, आणि शुक्रवार पण आहे.>> म तेच .. म्हणूनच आठवले आणि लिहिले
वर अमुशा हाय आणि गिराण बी.
वर अमुशा हाय आणि गिराण बी.
जपानमध्ये बाळाच्या डिलिवरी
जपानमध्ये बाळाच्या डिलिवरी नंतर आलेल्या पहिल्या जेवणात, फिश, सूप, सलाड, सिवीड, भात आणि फ्रुट्स असं सगळ आलेलं बघून आणि मी मिटक्या मारत खालेल्ल बघून माझ्या आईला डबल कॅल्चरल शॉक बसला होता.
टोरांटोच्या सबर्ब मध्ये
टोरांटोच्या सबर्ब मध्ये सिटीने घराचा नंबर बदललेला. तो कुठला नंबर ज्याचा उच्चार डेथ सारखा असतो चायनीजमध्ये तो नंबर.
आता मुंबई वडोदरा जेटच्या
आता मुंबई वडोदरा जेटच्या फ्लाईटला 13 नंबर सीट नव्हतं, 12 आणि मग एकदम 14 ☺️ एव्हीएशनमध्ये बरेच असते ना हे नंबरचे.
माझ्या ऑफिस बिल्डिंगला १३ वा
माझ्या ऑफिस बिल्डिंगला १३ वा मजला नाहीये.
मेकरच्या सगळ्याच बहुतेक बिल्डिंग्जना १३ वा मजला नाहीये.
इथे(जर्मनी त ) एका
इथे(जर्मनी त ) एका मैत्रिणीच्या डिलिव्हरी नंतर तिला भेटायला हॉस्पिटल मध्ये गेलेले .. तर तिच्या शेजारची नुकतीच (१ दिवस वगैरे )बाळंत झालेली बाई बाहेर जाऊन सिगारेट ओढून आली !! (ती अर्थातच बाळाला स्तनपान करणार नव्हती .. इथे बरेच जण करत नाहीत आणि तसे डॉक्टर हि विचारतात म्हणे !) हे सगळे ऐकून होते मी पण प्रत्यक्ष पाहिल्यावर शॉक बसला चांगलाच !!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
असे बऱ्याचदा बघण्यात आले कि अगदी लहान बाळांचे म्हणजे काही दिवसांच्या बाळांचे आई बाबा सुद्धा बाळाला अगदी हातात/ कडेवर घेतले असेल तरी सिगारेट ओढत असतात.. प्रेग्नन्ट असणाऱ्या हि ओढतात तर तिथे बाळाच्या बाबांची काय कथा ..
कार मध्ये हि मागे लहान मुलं असतात आणि आई बाबा मस्स्त पैकी झुरके मारत असतात ..
आता हे सगळं बघायची इतकी सवय झालीये कि कोणी सोबत बाळ असून सिगारेट ओढत नसेल तर आश्चर्य वाटतं
बापरे अंजली....आई च जाऊदे पण
बापरे अंजली....आई च जाऊदे पण त्या बाळाच्या हेल्थ वर किती परिणाम होत असेल....
आता हे सगळं बघायची इतकी सवय
आता हे सगळं बघायची इतकी सवय झालीये कि कोणी सोबत बाळ असून सिगारेट ओढत नसेल तर आश्चर्य वाटतं Wink>> जर्मनीची केमिकल हिस्टरी भयानक आहे निकोटीन ने त्यांना काही भीती वाटत नसेल.
अरे हो ! इथे हि जिकडे तिकडे
अरे हो ! इथे हि जिकडे तिकडे भिकारी लोकं म्हणजे खरोखर भीक मागणारे लोकं बघितल्यावर हि शॉक च बसला होता ! अरे इथे हि भिकारी आहेत तर!!! असं झालं होतं
बरं काही जण निमूट गप्प बसून मागतात ;किंवा काही जण अगदी जवळ येतात आणि अदबीनं (जर्मन भाषेत ) विचारतात " माफ करा मी तुम्हाला थोडा त्रास देतोय .. पण मला खायला प्यायला मिळावं म्हणून तुम्ही मला थोडे पैसे देऊ शकाल का ?" !! एकेकाच्या तऱ्हा बघून मी शॉक्ड !
सिंगापोरमध्ये असताना कळले कि
सिंगापोरमध्ये असताना कळले कि तिकडील देशांत ड्युरिअनला (फणसासारखे दिसणारे तिकडचे एक फळ) फळांचा राजा मानतात. माझ्यासाठी हा कल्चरल शॉक होता. कारण तोपर्यंत माझी अशी समजूत होती कि आंब्याला सगळ्या जगात फळांचा राजा म्हणतात.
{{{ आंब्याला सगळ्या जगात
{{{ आंब्याला सगळ्या जगात फळांचा राजा म्हणतात. }}}
असं कसं? प्रत्येक देशात हापूस थोडीच पिकतो? बाकीचे आंबे काही फळांचा राजा व्हायच्या चवीचे नसतात.
तोपर्यंत माझी अशी समजूत होती
तोपर्यंत माझी अशी समजूत होती कि आंब्याला सगळ्या जगात फळांचा राजा म्हणतात. >> अतुल
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
माझीही समजूत होती की
माझीही समजूत होती की वांग्याला भाज्यांचा राजा म्हणतात.
>>>टोरांटोच्या सबर्ब मध्ये
>>>टोरांटोच्या सबर्ब मध्ये सिटीने घराचा नंबर बदललेला. तो कुठला नंबर ज्याचा उच्चार डेथ सारखा असतो चायनीजमध्ये तो नंबर
अमितव, कॅनडात आम्ही ज्या क्म्युनिटीत राहायचो त्यामध्ये ४ था नंबर चा मजला नव्हता. त्यावेळेस कळले की ती कम्युनिटी चायनीज कंपनीने बांधली होती आणी चायनीज लोकं ४ आकडा शुभ मानत नाहीत
Pages