Submitted by कटप्पा on 7 July, 2018 - 00:24
Long वीकएंड साठी फ्लोरिडा आलो आहे. मी 2 अशा गोष्टी ट्राय केल्या ज्या परत कधीच नाही करणार.
१. ऑक्टोपस - हो मी ऑक्टोपस खाल्ला. मजेत खाल्ला आणि खाऊन १ तासात उलटी केली. सगळी रात्र पोट दुखत होते.
२. सिगारेट -पहिल्यांदा सुट्टा ओढला- 4 तास गुंगीत होतो. कानावर खडा आता. नेव्हर अगेन !!!
तुमच्या पण असे अनुभव असतील जे एकदा ट्राय केले पण परत कधीच नाही करणार?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा आपल्या त्या ह्यांचा तो हा
हा आपल्या त्या ह्यांचा तो हा तर नव्हे? नसल्यास घेणेचे करावे सप्रेमे
मी शाहरुख चा रा वन पहिला, आणि
मी शाहरुख चा रा वन पहिला, आणि इतका भयाण असह्य अभिनय पाहून परत काही त्याच्या एकही चित्रपटाच्या वाट्याला गेलो नाही.
मी मित्रांच्या आग्रहामुळे ग्रूपबरोबर 'रामजाने' नामक छळवाद भोगून ....
>>>>>>>>>>>
सिरीअसली?
तुम्ही हे शाहरूखचे पाहिलेले पहिले आणि शेवटचे चित्रपट होते?
हेटस ऑफ २ यू गाईज _/\_
मोहावर विजय मिळवलात !
सीवीड स्नॅक. :यक्क:
सीवीड स्नॅक. :यक्क:
सावर पॅच कँडी. :/
आय लव्ह सीविड स्नॅक
आय लव्ह सीविड स्नॅक
हो? माझ्या नवर्याला पण आवडले
हो? माझ्या नवर्याला पण आवडले. मी आयुष्यात परत खाणार नाही. मी एरवी खाल्लंही नसते. नवर्याने कॉस्कोतले सँपल आणून दिले मी काय आहे न बघता खाल्ले! कॉस्कोत असल्याने फार रिअॅक्ट नाही करता आले. सावर पॅच कँडी नायगाराला खाल्ली! तिथे किंचाळायचा बेत होता.. :/
सावर पॅच आवडली नाही?
सावर पॅच आवडली नाही?
रिव्हर्स स्वीप- सहमत. खरंच डब्बा आणि मेंटल अॅक्टर्स(?) वर पैसे खर्च करण्यात अर्थ नाही.
मिस्टर या मिस पाहणे.
मिस्टर या मिस पाहणे.
अती भयंकर अनुभव.परत कोणी पैसे दिले तरी पाहणार नाही.
या पिक्चर वर फारएन्ड चा किंवा कोणाचा तरी एक रंजक धागा मायबोलीवर आहे.
आ.रा.रा
आसा जी
चपटी म्हणजे ९० च्या पिटुकल्या बाटल्या मिळत अगोदर त्या. हल्ली लोकांची क्रयशक्ती वाढल्यापासून त्या बंद झाल्या असाव्यात, त्यांना (आम्ही मित्रांत) चपटी म्हणत असू, क्वार्टर म्हणजे पावटी,
चपटी - पावटी - अध्दा - बंपर म्हणायचं असं एका मित्रानं शिकवलं होतं. असो, तर अशी एक चपटी निवांत सिप सिप करत चालवायची अन सोबत सलाद, पपई-सफरचंद-पेरू वगैरे जे मिळेल ते फळ थोडा चाट मसाला सोडून शिवाय नको तंदुरी चिकन, मासळी, अंडी असतच. च्यायला अश्याप्रकारे जवळपास आठ महिने रम प्यायलो, पण तरीही लिव्हर पालपेट होत नसे, ह्याचं कारण हेल्दी चकना असावं का डॉक्टर साहेब?
########
धागा संबंधित,
भन्नाट भास्कर उर्फ ऋन्मेष बाळाशी "नीट लॉजिकल विचारपूर्वक" बोलायचा प्रयत्न केला होता. भयानक धसका घेतलाय, मी तासाला पंधरा बंझी जंप करून, म्हशीच्या शेपटाच्या वेण्या घालायला तयार आहे पण आता आयुष्यात कधी "इकडून" काही "चर्चा" आली तर "लॉजिकल" बोलता येणार नाहीये.
निम्म्यापेक्षा जास्त प्रतिसाद
निम्म्यापेक्षा जास्त प्रतिसाद दारू आणि तत्सम व्यसनांवरच का आहेत? लाईफमध्ये याव्यक्तिरीक्तही वाईट गोष्टी आणि थ्रिल्स असतात गाईज...
<<
अमुक गोष्ट पुन्हा करणार नाही असा विषय आहे ना?
मग व्यसन करणार नाही अशा पोस्ट्स मेजॉरिटी प्रतिसाद दात्यांनी लिहिल्या, तर त्यात नक्की काय वाईट आहे? भांभाजीराव, उघडा डोळे, बघा नीट.
वांड्राव,
वांड्राव,
चपटी बद्दल आसा यांनी विचारले आहे, मी नाही.
चपटी उर्फ मिनिएचर मिळतात अजूनही. विमानात मिळणाऱ्या मिनिएचर्स चा संग्रह होता आमच्या एका मित्राकडे.
आरारा सॉरी बरंका डॉक्टर, करतो
आरारा सॉरी बरंका डॉक्टर, करतो प्रतिसाद संपादित. आजकाल वाईनशॉप वर पण मिळत नाहीत राव, तुरळक ठिकाणी सापडतात चपट्या फक्त.
ऍडलॅब इमॅजिका च्या nitro ride
ऍडलॅब इमॅजिका च्या nitro ride मध्ये बसणे.
भयानक अनुभव.
परत कुठल्याच रोलर कोस्टर मध्ये बसायची हिम्मत नाही आता.
वांडा , तरी २ क्वार्टर
वांडा , तरी २ क्वार्टर झाल्याच कि
_/\_ स्वीकारा माझा
हो, दोन क्वार्टर झाल्याच
हो, दोन क्वार्टर झाल्याच आसाजी, पण ते जवानीतली मस्ती सदरात मोडले. आता जुना वांडो चचला, आता निवांत एकच ९० ऑन द रॉक्स घालून शिस्तीत एकाच तंगडी सोबत खातो, नंतर शिस्तीत मटण भाकरी खाऊन पडी मारतो. मज्जानी लाईफ.
मुंबईच्या लोकांना या
मुंबईच्या लोकांना या किस्स्याची सुसंगती लागेल आणि गांभिर्य समजेल .. ...
एकदाच असं नाही म्हणता येणार , अनेकदा केलाय विरार ट्रेन मधून प्रवास .
पण एक्दा संध्याकाळी चुकुन विरारची लेडीज स्पेशल पकडली अंधेरीवरून . तेन्व्हा गर्दी नव्हती पण नंतर पॅक झाली .
बोरिवलीच्या ऐवजी मीरारोडला उतराव लागलं आणि वरून त्या बायकांची बोलणी आणि जळजळीत कटाक्ष .
त्यानंतर ईतका धसका घेतलाय मी की दूपारच्या वेळीही बोरिवलीला उतरायचे असल्यास विरार ट्रेन ने प्रवास करत नाही .
बस्के.. मी टू लव्ह सीविड
बस्के.. मी टू लव्ह सीविड स्नॅक
१) आईचा चुलत मामा तंबाखूची
१) आईचा चुलत मामा तंबाखूची त्यावेळी मिळणारी टूथपेस्ट लावयचा. मी एक ७-८ वर्षांची आसेन. एकदा वाटलं, लावूनच पहावी.
कोणाचं लक्ष नाही पाहून लावली. पण ती नेमकी पटकन गिळली. नेमक्या दुसर्या मिनिटाला डोकं गरगरायला लागलं , उलटी आली.
त्यात मी घाबरले की आजी भरपूर मारणार. भारीच कडक होती. मागल्या दारी उलटी केली. तरी डोकं , मळमळ थांबेना. मागच्या परसात नारळाच्या पाशी बसायला गेले आणि पडलेच. शुद्धीवर आले तेव्हा अख्खी वाडी घरात उभी. .. शेवटपर्यंत सांगितलेच नाही कोणाला. डॉक्टरला समजेच ना की काय झाले...
२) ऑफीसमध्ये भावनिक होवु नये. डोक्यावर बसतात ज्याला शिकवले तोच मारक होतो.
आणि बरेच .. नंतर लिहिते.
ऑफीसमध्ये भावनिक होवु नये.
ऑफीसमध्ये भावनिक होवु नये. डोक्यावर बसतात ज्याला शिकवले तोच मारक होतो.+१११११
अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा
अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार?>>>>> इंजिनीरिंग (अभियांत्रिकी )
<<< XXXचं इंजेक्शन घेतलं होतं
<<< XXXचं इंजेक्शन घेतलं होतं एकदा "ट्राय" करायचं म्हणून.
Submitted by जेम्स वांड on 8 July, 2018 - 15:21 >>>
मा. एडमीन, हि प्रतिक्रिया मायबोलीवरून काढणे गरजेचे आहे. नकळत ड्रग्जची जाहिरात केली गेली आहे.
नकळत ड्रग्जची जाहिरात केली
नकळत ड्रग्जची जाहिरात केली गेली आहे.
>>>
पण नंतर कधी नाही म्हणजे ते वाईट आहे हेच वाचकांच्या मनावर बिंबवले आहे ना..
लहानपणी एकदाच पहिल्यांदाच
लहानपणी एकदाच पहिल्यांदाच आलूबुखार (मराठी शब्द, बटाटाताप?) खाल्ले होते.
सडकून ओकलो होतो.
त्यानंतर ना आईने कधी मला पुन्हा ते दिले ना मी कधी त्याच्या वाटेला गेलो. कारण आंबट खाऊन जी ओकी होते ती अशक्य असते. आजही त्याची आंबट चव पुसटशी आठवते.
मायबोलीला कमीपणा येणारी
मायबोलीला कमीपणा येणारी वाटल्यास माननीय वेमांनी आमची प्रतिक्रिया तडक काढून टाकावी, त्याला आमची काहीही हरकत नाहीये. आम्हाला वाटलं धागा कॅण्डीड कन्फेशन्सचा असावा म्हणून फक्त जी चूक (घोडचूकच) ,केली होती नकळत्या वयात (पक्षी गद्धे पंचिशीत) ती नमूद केलीये, तरीही वेमा समर्थ आहेत.
सिरीअसली?
सिरीअसली?
तुम्ही हे शाहरूखचे पाहिलेले पहिले आणि शेवटचे चित्रपट होते?
हेटस ऑफ २ यू गाईज _/\_
मोहावर विजय मिळवलात !
हे हॅट्स ऑफ असे असावे असे गृहीत धरतो कारण भाभु मराठी काय कुठलीच भाषा नीट वापरत नाही.
तर हे अभिनंदन स्वाकमाईचे कष्टाचे पैसे मातीमोल करण्यास जे गट्स दाखवले त्याबद्दल असलेलं जास्त सयुक्तिक वाटेल.
शाहरुख चे चित्रपट न पाहणे हा मोहावर विजय हे वाचून तर धन्य धन्य झालो. पूर्वीच्या काळी राजाची स्तुती करणारे भाट असत, ते कसेही करून राजा कसा श्रेष्ठ हे सदानकदा बडबड करत, त्याची एकदम आठवण झाली.
<<< पूर्वीच्या काळी राजाची
<<< पूर्वीच्या काळी राजाची स्तुती करणारे भाट असत, ते कसेही करून राजा कसा श्रेष्ठ हे सदानकदा बडबड करत, त्याची एकदम आठवण झाली.>>> एकदम चपलख बोललात तुम्हि.
शाहरुखचे सिनेमे पाहणे म्हणजे
शाहरुखचे सिनेमे पाहणे म्हणजे हे आपलं ते हॅ हॅ हॅ हॅ जाऊ द्या, ऋन्मेष जसा आहे तसा जर शाहरुखचे सिनेमे पाहून झाला असेल तर न बघितलेलेच बरे, हॅ हॅ हॅ हॅ
बिजिंग डक्स फार प्रसिद्ध
बिजिंग डक्स फार प्रसिद्ध म्हणुन बिजिंग मध्ये एकदा खायला गेलो, पण बाजुच्या टेबलकडे वेट्रेस तेच सर्व्ह करायला गेली तेव्हा वासानेच भणभणायला होईल हे लक्षात आले, आणि लागलीच विचार बदलला, झेपेल ते ऑर्डर केले.
होस्पेट (हंपी) ला हॉटेलमध्ये
होस्पेट (हंपी) ला हॉटेलमध्ये ग्रिल्ड सॅन्डविच मागवलं होतं. त्यात ऑलिव्ह होते. ते खाऊन इतकं कसंतरीच झालं.. परत कधी चुकूनही ऑलिव्ह असलेलं काहीही घेतलं नाही.
एका बुटीकमधे शिवायला टाकलेला ड्रेस इतका बिघडवला होता तिने, की परत कुठल्याच बुटीकमधे गेले नाही
एकदा एक बाई रस्तात भेटली.
एकदा एक बाई रस्तात भेटली. तिच्याबरोबर तिचा नवरा आणि तिचे लहान मूल होते. ती बोलली कि तुम्ही मराठी आहेत का? आम्ही रस्ता चुकलोय आणि आमच्याकडचे पैसे संपलेत. माझ्या लहान मुलाला फक्त एक वडापाव घेऊन द्या. मी एकदम इमोशनल होऊन आणि कॉलेजमध्ये परीक्षा द्यायला जात होतो म्हणून एक सत्कार्य करावे असे वाटून १० रुपये तिला दिले. २ दिवसांनंतर परत तोच प्रसंग. व्यक्ती वेगळ्या पण डायलॉग सेम तेव्हा आपण फसवले गेलेय हे समजले. असे प्रसंग त्यानंतर बरेचदा आले पण मराठी येते का असे विचारल्यावर नाही येत असे सांगून निघून जातो.
आम्हालाही एक कुटुंब भेटलं
आम्हालाही एक कुटुंब भेटलं होतं असंच. बंगळूरहून धुळ्याला की कुठे जायचे आहे, कॉन्ट्रॅक्टरने फसवले आहे, पैसे देता का, वगैरे. हजार रूपये दिले होते. खरं खोटं त्यांनाच माहीत. परत तसं कुणी भेटलं नाही, त्यामुळे ते खरं बोलत असावेत असं आम्ही आमच्या मनाचं समाधान करून घेतले
Pages