नमस्कार मंडळी
मैत्रीची सुरुवात मेळघाटातल्या कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य विषयक कामांपासून झाली असली तरी गेली काही वर्षे आपण मेळघाटातल्या शाळा आणि मुलांचे शिक्षण सातत्य या मुलभूत बाबींकडे आवर्जून लक्ष पुरवत आहोत.
मैत्रीचे एक कार्यकर्ते जोडपे श्री. रवींद्र व सरिता गोडबोले यांनी गेल्या शैक्षणिक वर्षात म्हणजे जानेवारी २०१८ मध्ये, ‘विज्ञानातील गंमत’ ही तीन दिवसांची एक कार्यशाळा मेळघाटातल्या एका आश्रमशाळेतल्या मुलांकरता घेतली. त्याच्या समारोपाच्या वेळी असे ठरवले गेले की केवळ एखाद्या कार्यशाळेवर न थांबता वर्षभर विज्ञान व गणित यासाठी एक उपक्रम तयार व्हावा आणि ‘मैत्री’ च्या शिरस्त्याप्रमाणे स्वयंसेवकांच्या मदतीने तो राबवावा.
तर त्या ठरावाबरहुकुम या वर्षी प्रत्येक महिन्यात मेळघाटात जाणार्या स्वयंसेवकांमार्फत असा उपक्रम राबवण्याचे योजिले आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट्य अगदी साधे आहे, ते म्हणजे - मुलांच्या मनातील गणित आणि विज्ञान या विषयांविषयीची भीती काढून टाकावी आणि त्यांच्यातील कुतूहल जागे करून हे विषय शिकायला त्यांना उद्युक्त करावे.
कसे असेल या उपक्रमाचे स्वरूप?
• मेळघाटातील 'जारीदा' या गावच्या आश्रमशाळेमध्ये हा उपक्रम आपण करणार आहोत.
• इयत्ता ६ वी च्या विद्यार्थ्यांना वर्षभर गणित, पदार्थविज्ञान (भौतिकशास्त्र), जीवशास्त्र आणि पर्यावरण या विषयामधील काही संकल्पना आपण शिकवणार आहोत.
• सोपे प्रयोग, तिथे उपलब्ध होतील अशी साधने वापरून आपण मुलांना करायला देणार आहोत, काही विज्ञान खेळ शिकवणार आहोत, काही कूट प्रश्न/कोडी सोडवायला देणार आहोत.
• दर महिन्याला किमान ४/५ स्वयंसेवक मेळघाटात जावून व आश्रमशाळेत राहून तिथल्या मुलांना शिकवणार आहेत.
• तिथल्या शाळेतील शिक्षकाना पण आपण यामध्ये सहभागी करून घेणार आहोत.
तुम्ही कशा प्रकारे सहभागी होवू शकता?
• स्वयंसेवक म्हणून ५ दिवस (प्रवासासहित) मेळघाटात प्रत्यक्ष शिकवण्याकरता जावून
• यासाठी स्वयंसेवक मिळवून देवून
• आपल्या माहितीतील कॉलेजचे गट किंवा इतर गट यांना याविषयी माहिती सांगून
• ‘गणित विज्ञान गंमती’ अशा प्रकारचे काही साहित्य वा साधने आम्हाला देवून
• या उपक्रमासाठी आर्थिक मदत करून
चारजणांचा एक गट मार्च २०१८ मध्ये जावून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवून आला आहे आणि आता तोच गट जुलै मध्ये जाणार आहे. इतर सर्व महिन्यांसाठी स्वयंसेवकांची गरज आहे.
सर्व साधारण वेळापत्रक खालील प्रमाणे
जुलै २०१८, १८ ते २१ - स्वयंसेवक मिळाले आहेत
ऑगस्ट २०१८, ८ ते ११
सप्टेंबर २०१८, ५ ते ८
ऑक्टोबर २०१८, ३ ते ६
नोव्हेंबर २०१८, २८ ते १
डिसेंबर २०१८ , २६ ते २९
जानेवारी २०१९, २५ ते २८
फेब्रुवारी २०१९, महाशिवरात्रीच्या आधी
मार्च २०१९, होळीच्या आधी
तरी आपणा सर्वांस विनंती आहे की या संधीचा लाभा घ्यावा.
अधिक माहिती करता संपर्क साधा:
मैत्री कार्यालय - ०२० २५४५०८८२ (लीनता),
अश्विनी धर्माधिकारी ९४२२० २५४३१,
ओंकार भोपळे : ९८२३३ ०३०६५
धन्यवाद
छान ऊपक्रम! मी ऑक्टोबरमध्ये
छान ऊपक्रम! मी ऑक्टोबरमध्ये आठ दिवस या ऊपक्रमासाठी देवू शकतो. पुण्यात कोठे संपर्क साधता येईल 'मैत्री' बरोबर?
शाली, वर दिलेल्या तिघांपैकी
शाली, वर दिलेल्या तिघांपैकी कुणालाही फोन केला तरी चालेल पण ओंकारला केलात तर चांगले यावेळी तो पुढाकार घेतोय.
पुण्यात असाल तर मैत्रीच्या वार्षिक कार्यक्रमाकरता जरूर या.
https://www.maayboli.com/node/66666
सुंदर उपक्रम!
सुंदर उपक्रम!
हर्पेन फेसबुक ह्याची लिंक दिली तर चालेल का?
शोभा १ - हो जरूर, त्यामुळे
शोभा १ - हो जरूर, त्यामुळे नक्कीच मदत होईल.
दिली. धन्यवाद!
दिली. धन्यवाद!
त्यामुळे नक्कीच मदत होईल.>>>>>>>> हो ना. बर्याच जणांना असं काही करायची इच्छा असते. पण माहिती नसते. सगळेच मायबोलीवर पण नाहीत.
वार्षिक कार्यक्रमाला नक्कीच
वार्षिक कार्यक्रमाला नक्कीच येईन.
धन्यवाद शोभा१
धन्यवाद शोभा१
शाली, भेटूया तर मग
स्वयंसेवक म्हणून
स्वयंसेवक म्हणून शिकवण्याकरिता जाण्याची इच्छा आहे. पण मी हैद्राबादला असतो. Syllabus इमेल द्वारे मिळवून तयारी करून परस्पर मेळघाटात सामील होणे, असे शक्य आहे का, चालेल का?
मानव अशा प्रकारची तजवीज
मानव अशा प्रकारची तजवीज नक्कीच करता येईल असे वाटते. तरीही ह्या बद्दल खात्री करून घेऊन मग तुम्हाला काय ते कळवतो.
शाली आपली भेट झाली नाही,
शाली आपली भेट झाली नाही, तुम्ही आला होतात का?
छान उपक्रम , आर्थिक मदत करु
छान उपक्रम , आर्थिक मदत करु शकतो.
तुमच्या ओळखीच्या, माहितीतल्या
तुमच्या ओळखीच्या, माहितीतल्या डॉक्टर्सना वरील मेसेज पाठवावा व त्यांच्याशी यासंदर्भात संवाद साधून त्यांची नावं मैत्री कार्यालयात कळवावीत.