पालक आणि मेथीची भाजी -ताक घालून

Submitted by maitreyee on 8 July, 2018 - 11:34
palak methi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पालक चिरलेला - २-३ वाट्या
चिरलेली मेथी मूठभर किंवा मेथी दाणे/डाळ कुटून अर्धा चमचा - किंवा कसुरी मेथी अर्धा चमचा
लाल मिरच्या ४
आले लसूण पेस्ट अर्धा - ते १ चमचा
कढिपत्ता - ५-६ पाने
दही किंवा आंबट ताक दीड वाटी
बेसन २-३ चमचे
तेल, फोडणीचे साहित्य.

क्रमवार पाककृती: 

मी ही भाजी खूप वेळा करते. अगदी नेहमीचीच रेसिपी असल्याने कधी लिहायचे डोक्यात आले नव्हते, पण डीजे ने परवा विचारले तेव्हा वाटले की माबो वर ही रेसिपी नाहीये आणि मी इतक्या वर्षात थोडे व्हेरिएशन्स ही केले आहेत ज्यामुळे भाजी जरा वेगळी लागते चवीला. म्हटले चला इथेच लिहावी.
पालक आणि मेथी चिरून घ्यावी. पालकची भाजी असली तरी मेथीचा स्वाद ताकातल्या भाजीला वेगळीच खुमारी आणतो हे गुजराती कढी वगैरे वरून लक्षात आले होते. ताजी मेथी नसेल तर मी कसुरी मेथी किंवा मग इथे बारीक केलेली मेथीची डाळ मिळते तीही वापरते.
p2.JPG
(अ‍ॅक्चुअली कधी मेथी नाही म्हणुन किंवा कधी चिरायचा कंटाळा आला म्हणून उलट तीच जास्त वापरली जाते) पण तिन्हीपैकी एक काहीतरी नक्की वापरा मात्र . त्याने चवीत फरक पडतो. एकीकडे ताक आणि बेसन नीट हलवून किंवा ब्लेंड करून एकत्र करावे.
मोहरी , भरपूर जिरं, कढिपत्ता आणि लाल मिर्च्या घालून फोडणी करावी. त्यात आले लसूण, पालक आणि मेथी/ मेथीची डाळ घालून जरासेच परतावे. आले लसणाचा कच्चट वास गेला की लगेच ताक आणि बसनाचे मिश्रण त्यात घालावे. नीट हलवून लागेल त्याप्रमाणे पाणी घालावे आणि उकळी आणावी. ताज्या मेथीऐवजी कसुरी मेथी वापरणार असाल तर तीही या स्टेज ला घालावी. मीठ आणि साखर घालावे. ( बिना साखरेची चांगली लागणार नाही ) ! भाजी तय्यार!
भाजीची कसिस्टन्सी पिठल्यापेक्षा जराशी पातळ अशी असते. आंबट-गोड -तिखट अशी थोडी कढीच्या जवळ ची चव असते. पोळी किंवा गरम भातासोबत मस्त लागते.
फोटो नसल्याने निम्मे मार्क जाणार याची नम्र कल्पना आहे. पण पुन्हा केली की टाकेन नक्की! Happy

ता.क. : ७/१७/१८ - फायनली आज केली गेली ही भाजी, नशीब फोटो काढायचा लक्षात राहिला.
आजचं लंच Happy
IMG_7989.JPG

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांकरता ही वरच्या प्रमाणातील भाजी पुरावी.
अधिक टिपा: 

माझी आई ताकातली चाकवताची भाजी करते, ती मला आवडायची खूप. इथे चाकवत नाही मिळत म्हणून मी पालक वापरून तशी करायला प्रयत्न केला. पण आई हिरवी मिरची घालते त्या ऐवजी मी लाल मिर्च्यांची फोडणी वापरली, त्याने खमंगपणाआला. नंतर मेथी तर गेम चेन्जर म्हणतात तशी ठरली Happy तर सांगायचा मुद्दा हाच की करणार असाल तर आधी अशी च्या अशी करून पहा. मग ते लाल ऐवजी हिरवी मिरची, नो- मेथी, पालकाऐवजी बटाटे, ताकाऐवजी वरण, दगडा ऐवजी धोंडे वगैरे व्हेरिएशन्स करा Happy

माहितीचा स्रोत: 
आई आणि मी :)
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त, सासरी करतात अशी पण आल-लसुन पेस्ट, मेथि ही अ‍ॅडिशन्स नसतात त्यामुले ही चव वेगळी लागत असणार नक्किच ,लगे हाथ गुजराथी कढीची रेसिपी पण येवु दे.

मी ह्या रेसिपीने करत नाही पण पुढच्या वेळी नक्की ट्राय करेन.
(माझ्या रेसिपीत पालक कुकरला शिजवायचा आहे आणि शिजवताना त्यात शेंगदाणे, चणा डाळ घालायची आहे)

इथेच लिहिते. मुद्दाम बीबी काढत नाही.
चणाडाळ आणि शेंगदाणे थोडा वेळ भिजवून ठेवायचे. पालक धुवून बारीक चिरायचा. कुकरच्या डब्यात चिरलेला पालक, शेंगदाणे, चणाडाळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेऊन कुकरला वाफवायचं. दोन शिट्ट्या. शिट्टी पडली की बाहेर काढून हे शिजवलेलं पाणी बाजूला काढून घ्यायचं. तोवर दही फेटून त्याचं ताक करायचं. त्याला डाळीचं पीठ लावून घ्यायचं आणि वरची शिजलेली भाजी त्यात घालून नीट मिक्स करुन अंदाजाने मीठ घालायचं. कढी जशी सतत ढवळावी लागते तसंच हे ही ढवळावं लागतं. उकळी आली की वरुन मोहरी, जिरं, हिंग, हळद फोडणी. हवी असल्यास एखादी लाल मिरचीही चालेल. हा ताकातला पालक आमटीवजा करायचा आहे.

मस्तच.

आवडते आमच्याकडे अशी. मेथीदाणे घालते आणि शेंगदाणे, चणाडाळ भिजवते थोडावेळ. फोडणी मात्र तुपाची मग कधी गाईचे किंवा कधी साजूक.

मी साधारण या पद्धतीने करते पण मेथी घालत नाही. पुढल्या वेळी मेथी घालून करून बघते.

एक भा प्र. यात पालक मेथीऐवजी चिकन वगैरे चालेल का?

वत्सला Happy चिकन ना, हो चालेल की, फक्त त्यात ताकाऐवजी कांदे कोबर्‍याचे वाटण घालावे लागेल आणि बेसनाऐवजी गरम मसाला Lol

मस्त. Happy
कसूरी मेथी चा सुवास नाकाशी लगट करून गेला एकदम. करके देखूंगा जरूर...

मी ताकातला पालक आणि ताकातली मेथी दोन्ही करते. फक्त पालक मेथी एकत्र कधी केली नाही. डाळ दाणे कुकरमधे वाफवते. वरुन लसणाची चरचरीत फोडणी. Happy

छान.

सायो +१

ताकातल्या भाजीत डाळ, शेंगदाणे आवडते घटक.
(तसंच सासुबाई सहसा लोण्याखालचं ताक असतं त्याची करतात हमखास. आणि ते ताक असूनही अतिशय चविष्ट लागते त्यांची भाजी).

पालकाबरोबर मेथी घालायची आयडिया मात्र प्रचंड आवडलेली आहे. ती नक्कीच ट्राय करून बघेन.

ताकातला पालक - पालक धुवून चिरून शिजवून घेणे. कूकरमध्ये पालकाच्या डब्यावर ताटलीत दाण्यांची वाटी. तूप, जिरं, मोहरी, हिरवी मिरची, हळद, भरपूर कढिलिंब घालून फोडणी. त्यात थोडं आलं किसून. त्यावर शिजलेला पालक घोटून व दाणे. थोडं परतून त्यावर थोडं बेसन लावून भाजी पळीवाढी होण्याइतपत ताक. चवीपुरती साखर. उकळी आल्यावर गॅस बंद. जेवायला वाढताना चवीपुरते मीठ घालून ढवळणे. ही भाजी जेवायला बसायच्या जराच आधी करायची. परत परत गरम करावी लागू नये. त्यातलं ताक फुटतं.

thanks मैत्रेयी. बरेच महिन्यांत ताकातला पालक केला नव्हता. डाळपालकच केला जातो जास्त.

आमच्या घरी ताकातला पालक अतिशय आवडता आहे, तिकडे ही रेसिपी देइन भारतात गेले की. पण मला अजिबात आवडत नाही. अजिबात म्हणजे कुरडईची भाजी आवडत नाही त्यापेक्षा जास्त.

मस्त दिसतोय लंचबॉक्स. सात्विक भाजी आणि रैस जस्ट द वे आय लैक - मोकळा, दाणा दाणा वेगळा तरीही टेंडर कुक्ड आणि शुभ्र!

मला आलंलसणाचं सात्विक पळतं, हे राह्यलं Wink

Pages