पालक चिरलेला - २-३ वाट्या
चिरलेली मेथी मूठभर किंवा मेथी दाणे/डाळ कुटून अर्धा चमचा - किंवा कसुरी मेथी अर्धा चमचा
लाल मिरच्या ४
आले लसूण पेस्ट अर्धा - ते १ चमचा
कढिपत्ता - ५-६ पाने
दही किंवा आंबट ताक दीड वाटी
बेसन २-३ चमचे
तेल, फोडणीचे साहित्य.
मी ही भाजी खूप वेळा करते. अगदी नेहमीचीच रेसिपी असल्याने कधी लिहायचे डोक्यात आले नव्हते, पण डीजे ने परवा विचारले तेव्हा वाटले की माबो वर ही रेसिपी नाहीये आणि मी इतक्या वर्षात थोडे व्हेरिएशन्स ही केले आहेत ज्यामुळे भाजी जरा वेगळी लागते चवीला. म्हटले चला इथेच लिहावी.
पालक आणि मेथी चिरून घ्यावी. पालकची भाजी असली तरी मेथीचा स्वाद ताकातल्या भाजीला वेगळीच खुमारी आणतो हे गुजराती कढी वगैरे वरून लक्षात आले होते. ताजी मेथी नसेल तर मी कसुरी मेथी किंवा मग इथे बारीक केलेली मेथीची डाळ मिळते तीही वापरते.
(अॅक्चुअली कधी मेथी नाही म्हणुन किंवा कधी चिरायचा कंटाळा आला म्हणून उलट तीच जास्त वापरली जाते) पण तिन्हीपैकी एक काहीतरी नक्की वापरा मात्र . त्याने चवीत फरक पडतो. एकीकडे ताक आणि बेसन नीट हलवून किंवा ब्लेंड करून एकत्र करावे.
मोहरी , भरपूर जिरं, कढिपत्ता आणि लाल मिर्च्या घालून फोडणी करावी. त्यात आले लसूण, पालक आणि मेथी/ मेथीची डाळ घालून जरासेच परतावे. आले लसणाचा कच्चट वास गेला की लगेच ताक आणि बसनाचे मिश्रण त्यात घालावे. नीट हलवून लागेल त्याप्रमाणे पाणी घालावे आणि उकळी आणावी. ताज्या मेथीऐवजी कसुरी मेथी वापरणार असाल तर तीही या स्टेज ला घालावी. मीठ आणि साखर घालावे. ( बिना साखरेची चांगली लागणार नाही ) ! भाजी तय्यार!
भाजीची कसिस्टन्सी पिठल्यापेक्षा जराशी पातळ अशी असते. आंबट-गोड -तिखट अशी थोडी कढीच्या जवळ ची चव असते. पोळी किंवा गरम भातासोबत मस्त लागते.
फोटो नसल्याने निम्मे मार्क जाणार याची नम्र कल्पना आहे. पण पुन्हा केली की टाकेन नक्की!
ता.क. : ७/१७/१८ - फायनली आज केली गेली ही भाजी, नशीब फोटो काढायचा लक्षात राहिला.
आजचं लंच
माझी आई ताकातली चाकवताची भाजी करते, ती मला आवडायची खूप. इथे चाकवत नाही मिळत म्हणून मी पालक वापरून तशी करायला प्रयत्न केला. पण आई हिरवी मिरची घालते त्या ऐवजी मी लाल मिर्च्यांची फोडणी वापरली, त्याने खमंगपणाआला. नंतर मेथी तर गेम चेन्जर म्हणतात तशी ठरली तर सांगायचा मुद्दा हाच की करणार असाल तर आधी अशी च्या अशी करून पहा. मग ते लाल ऐवजी हिरवी मिरची, नो- मेथी, पालकाऐवजी बटाटे, ताकाऐवजी वरण, दगडा ऐवजी धोंडे वगैरे व्हेरिएशन्स करा
वा! मस्तच लागेल.
वा! मस्तच लागेल.
मस्त ! सोपी रेसिपी आहे .
मस्त ! सोपी रेसिपी आहे . डॉकमेंटेशन केल्याबद्दल धन्स
मस्त, सासरी करतात अशी आल-लसुन
मस्त, सासरी करतात अशी पण आल-लसुन पेस्ट, मेथि ही अॅडिशन्स नसतात त्यामुले ही चव वेगळी लागत असणार नक्किच ,लगे हाथ गुजराथी कढीची रेसिपी पण येवु दे.
मी ह्या रेसिपीने करत नाही पण
मी ह्या रेसिपीने करत नाही पण पुढच्या वेळी नक्की ट्राय करेन.
(माझ्या रेसिपीत पालक कुकरला शिजवायचा आहे आणि शिजवताना त्यात शेंगदाणे, चणा डाळ घालायची आहे)
ओह कुकर ला? पण पालक तर अगदी १
ओह कुकर ला? पण पालक तर अगदी १ मिनिटात शिजतो ना. तुझीही रेसिपी टाक की सायो.
इथेच लिहिते. मुद्दाम बीबी
इथेच लिहिते. मुद्दाम बीबी काढत नाही.
चणाडाळ आणि शेंगदाणे थोडा वेळ भिजवून ठेवायचे. पालक धुवून बारीक चिरायचा. कुकरच्या डब्यात चिरलेला पालक, शेंगदाणे, चणाडाळ, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेऊन कुकरला वाफवायचं. दोन शिट्ट्या. शिट्टी पडली की बाहेर काढून हे शिजवलेलं पाणी बाजूला काढून घ्यायचं. तोवर दही फेटून त्याचं ताक करायचं. त्याला डाळीचं पीठ लावून घ्यायचं आणि वरची शिजलेली भाजी त्यात घालून नीट मिक्स करुन अंदाजाने मीठ घालायचं. कढी जशी सतत ढवळावी लागते तसंच हे ही ढवळावं लागतं. उकळी आली की वरुन मोहरी, जिरं, हिंग, हळद फोडणी. हवी असल्यास एखादी लाल मिरचीही चालेल. हा ताकातला पालक आमटीवजा करायचा आहे.
छान वाटतेय ही पण. आईची
छान वाटतेय ही पण. आईची चाकवताच्या भाजी ची रेसिपी अशीच आहे साधारण.
मस्तच. आवडते आमच्याकडे अशी.
मस्तच.
आवडते आमच्याकडे अशी. मेथीदाणे घालते आणि शेंगदाणे, चणाडाळ भिजवते थोडावेळ. फोडणी मात्र तुपाची मग कधी गाईचे किंवा कधी साजूक.
मी साधारण या पद्धतीने करते पण
मी साधारण या पद्धतीने करते पण मेथी घालत नाही. पुढल्या वेळी मेथी घालून करून बघते.
एक भा प्र. यात पालक मेथीऐवजी चिकन वगैरे चालेल का?
वत्सला चिकन ना, हो चालेल की
वत्सला चिकन ना, हो चालेल की, फक्त त्यात ताकाऐवजी कांदे कोबर्याचे वाटण घालावे लागेल आणि बेसनाऐवजी गरम मसाला
करुन बघते तसे
करुन बघते तसे
मस्त. नुसती भाजी दोन वाट्या
मस्त. नुसती भाजी दोन वाट्या खाल्ली तर लो कार्ब ग्लुटेन फ्री होईल. असे वाट्ते.
मी सायोने लिहिले आहे त्या
मी सायोने लिहिले आहे त्या पद्धतीने करते.
आता एकदा या पद्धतीने करुन बघेन.
प्राची+1
प्राची+1
फोटोही टाका लवकर कुणीतरी.
फोटोही टाका लवकर कुणीतरी.
छान।
लसूण आणि मेथी न घालता अशीच
लसूण आणि मेथी न घालता अशीच करते. घालून बघेन आता.
~साक्षी
पालकाची भाजी आवडत नाही. केलं
पालकाची भाजी आवडत नाही. केलं तर पालक पनीर किंवा पराठा. अशी करून पाहेन.
मुसत्या मेथीचीही करावीशी वाटतेय.
मस्त.
मस्त.
कसूरी मेथी चा सुवास नाकाशी लगट करून गेला एकदम. करके देखूंगा जरूर...
मी ताकातला पालक आणि ताकातली
मी ताकातला पालक आणि ताकातली मेथी दोन्ही करते. फक्त पालक मेथी एकत्र कधी केली नाही. डाळ दाणे कुकरमधे वाफवते. वरुन लसणाची चरचरीत फोडणी.
रेसिपीपेक्षा अधिक टीपा अधिक
रेसिपीपेक्षा अधिक टीपा अधिक आवडल्या
छान.
छान.
मी सायोच्या पद्धतीने करते
मी सायोच्या पद्धतीने करते नेहमी. आता या पद्धतीने करेन.
सायो +१
सायो +१
ताकातल्या भाजीत डाळ, शेंगदाणे आवडते घटक.
(तसंच सासुबाई सहसा लोण्याखालचं ताक असतं त्याची करतात हमखास. आणि ते ताक असूनही अतिशय चविष्ट लागते त्यांची भाजी).
पालकाबरोबर मेथी घालायची आयडिया मात्र प्रचंड आवडलेली आहे. ती नक्कीच ट्राय करून बघेन.
ताकातला पालक - पालक धुवून
ताकातला पालक - पालक धुवून चिरून शिजवून घेणे. कूकरमध्ये पालकाच्या डब्यावर ताटलीत दाण्यांची वाटी. तूप, जिरं, मोहरी, हिरवी मिरची, हळद, भरपूर कढिलिंब घालून फोडणी. त्यात थोडं आलं किसून. त्यावर शिजलेला पालक घोटून व दाणे. थोडं परतून त्यावर थोडं बेसन लावून भाजी पळीवाढी होण्याइतपत ताक. चवीपुरती साखर. उकळी आल्यावर गॅस बंद. जेवायला वाढताना चवीपुरते मीठ घालून ढवळणे. ही भाजी जेवायला बसायच्या जराच आधी करायची. परत परत गरम करावी लागू नये. त्यातलं ताक फुटतं.
thanks मैत्रेयी. बरेच
thanks मैत्रेयी. बरेच महिन्यांत ताकातला पालक केला नव्हता. डाळपालकच केला जातो जास्त.
मी पण सायोने लिहिलेल्या
मी पण सायोने लिहिलेल्या पद्धतीने करते नेहमी, आता अशी करुन पाहेन
आमच्या घरी ताकातला पालक
आमच्या घरी ताकातला पालक अतिशय आवडता आहे, तिकडे ही रेसिपी देइन भारतात गेले की. पण मला अजिबात आवडत नाही. अजिबात म्हणजे कुरडईची भाजी आवडत नाही त्यापेक्षा जास्त.
फोटो टाकला आहे आता. पूर्वी
फोटो टाकला आहे आता. पूर्वी कापलेले अर्धे मार्क मिळावेत अशी आशा
छान दिसतेय भाजी. पुढच्या वेळी
छान दिसतेय भाजी. पुढच्या वेळी ह्या रेसिपीने करुन बघेन.
मस्त दिसतोय लंचबॉक्स. सात्विक
मस्त दिसतोय लंचबॉक्स. सात्विक भाजी आणि रैस जस्ट द वे आय लैक - मोकळा, दाणा दाणा वेगळा तरीही टेंडर कुक्ड आणि शुभ्र!
मला आलंलसणाचं सात्विक पळतं, हे राह्यलं
Pages