Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आस्त्या चा जोकर झालाय. पक्षी
आस्त्या चा जोकर झालाय. डावा मेंदू उजवा मेंदू काय, टेंगूळ काय, ठिबक सिंचन काय, असल्या फ्लॉप आयडिया कुठून येतात याच्या मेंदूत?!!
रेशम्ताई इतकी उदार होऊन आस्ताद किम्वा स्मिता ला कॅप्टनशिप मिळावे म्हणून दुआ करत आहे. अगदी पुष्कीला पण सपोर्ट करतेय ती. पण स्वतः हिरे का नाही जमवले ? या क्रुशिअल स्टेज ला तिने स्वत:च्या इम्युनिटीसाठी, फायनल ला जाण्यासाठी का प्रयत्न करु नये हे झेपत नाही.. अनलेस.. .. ... .. ...
Resham doesn't have to
Resham doesn't have to perform task to get on finale
माझ्याकडून खूप सारी मते मेघा
माझ्याकडून खूप सारी मते मेघा आणि स्मिताला . मामी ऐकते आहेस ना ..!
स्मिता कित्ती गोड आहे ना ..आज खूप छान पण दिसत होती . रेशम चे काल किती कौतुक केले सुकन्या ताई ने .. उगाचच .. मग बाकीच्यांचे का नाही .. स्पेशल ट्रीटमेंट ! संस्कार तर रेशम ताई कडूनच शिकायला हवे आता ! खरंच राडा होईल चॅनेल ने चुकीचा विनर घोषित केला तर ..
सई किती कनिंग आहे ना , कसे टास्क दिले होते शर्मिष्ठाला ..! अगदी लक्षात ठेवून खुन्नस काढत होती ती ..अगदी बिग बॉस ला पण मध्ये पडावे लागले !पुष्कर पण तसाच .. आस्ताद ला म्हणावेसे वाटत आहे तूच मेंदू काढून ठेवतोस म्हणून असे प्रश्न पडतात तुला ..! आस्ताद तर हिसकावल्यासारखे हिरे मागत होता .. मेघा टीम जिंकल्यावर दुसऱ्या टीम चे चेहेरे पाहण्यासारखे होते
भाग्यश्री आवडली काल.
मला वाटत स्मिता अश्या वर्गच
मला वाटत स्मिता अश्या वर्गच प्रतिनिधित्व करते जे लोक सर्व नियम फॉलो करतात ,दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास होऊ नये घेतात,
स्वतः केलेल्या कामच श्रेय स्वतः घ्यायला लाजतात अर्थात चांगल्या कामाचच :)आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण दुसऱ्याला तसदी देत नाहीत,
ग्रुप फोटोमध्ये सर्वात पाठीमागे उभे राहतात,स्वतःच्या टिफिनमधला चांगलंचुंगलं याना स्वतःलाच खायला मिळत नाही ,नेहमी वक्तशीर असतात पण बॉस कधी बघत नाही,ज्या दिवशी लेट होतो त्यादिवशी बॉस लिफ्ट मध्ये भेटतो ,घरी आलेल्या इलेकट्रिशिअनला पण काम सांगताना घाबरत घाबरत सांगतात,मित्रांना दिलेले उधार पैसे परत मागता नाही येत,डिलिव्हरी बोयस वर डाफरत नाहीत,चुकून कधी जोक करायला गेलेलं तर समोरचा ऑफ़ेन्ड होतो .
टॅलेंट असून योग्य वेळी योग्य माणसासमोर योग्य ते बोलता न आल्यामुळे नेहमी अल्सो रन कॅटेगरी मधेच राहतात.
आणि मी स्वतः थोडासा या कॅटेगरी मधला असल्यामुळे असेल स्मितया बद्दल सहानुभूती आहे. पण मत मात्र मेघालाच. कारण ती ते करते ते जाम हेरॉईक वाटत. स्टँडिंग अंगिंस्ट ऑल टाईप.
काल पहिल्यां
काल पहिल्यांदाच स्मिताला रडतांना पाहून वाईट वाटले. कुणाच्या अध्यात ना मध्यात! आस्त्यांला लाज नाही, महिलांशी बोलायची पध्दत नाही मूर्खाला
शर्मिष्ठाशी पण कसा बोलत होता.....शू शू हळू बोल! आधी स्वतः हळू बोलायला शीक रेड्या!
दोन ठेवून द्याव्याश्या वाटलेल्या तेव्हा!
स्मिता खरंच स्डँडआउट करतेय
स्मिता खरंच स्डँडआउट करतेय सगळ्यांमधे. सतत fair खेळायला जाते बिचारी. बाकी सगळे तेवढ्यात कितीतरी गेमप्लॅन्स बनवून मोकळे होतात. मेघाने कंबर कसलेली आहे आता. सई तिच्या आणि पुष्कीच्या खांद्यावर हात ठेऊन चाल्लेय. पुष्की तर भिरभिरल्यासारखाच दिसतो. अधाशी. सगळं मला हवं मला हवं. रेशम आता चांगली वागणारच. आस्ताद तर आता घरात राहण्यासाठी नाही तर बाहेरच्या लोकांसाठी खेळतोय. उत्तरं द्यायचेत नं त्याला. परवा म्हणत होता तसं.
आस्तादची मेंटॅलिटी भिकार आहे.
आस्तादची मेंटॅलिटी भिकार आहे. हरल्यावर तोंड वर करून म्हणतो, आम्ही जिंकण्यासाठी खेळतच नव्हतो! मेघाला खोटारडी म्हणतो, आणि हा काय करतोय? मेघाला दूध-पाणी द्यायची कल्पना पण याचीच. पुष्की लगेच हो-ला-हो. अरे पण मेघाने त्याला काम तरी दिलं होतं करायला, हा नुसताच सूडबुद्धीने वागला. आणि ती अनफेअर खेळली, तर तूही खेळायचं हे कसलं जस्टिफिकेशन आहे? तू मूर्ख दिसत नाहीस का त्यातून? जरा म्हणून किएटिव्हिटी नाही. आस्तादने सांगितलं तसं केलं, सईने सांगितलं म्हणून मान डोलावली आणि किल्ली दिलेलं खेळणं म्हटलं तर राग येतो याला
सई पुष्करकरता किती लाचार असल्यासारखी दिसते! बघतानाही कसंतरीच वाटतं. काल सई-पुष्की प्लॅन्टॉनिक लव्हपर्यंत जाऊनच आले होते ऑलमोस्ट! कशी आपली मतं जुळतात, कशी आपली मैत्री आहे, कसे आपण भारी आहोत... पण बोलणं एकदम सेफ डिस्टन्सवर बसून!
स्मिता एकदम गोड तिचं गाणं, 'हिरवी गोळी' सगळंच मस्त. दिसतही होती एकदम गोड. पण ती लास्ट ५ मध्ये आली तरी जिंकणार नाही बहुतेक कारण ती एकटी एकटी खेळते. टीम, समूह यात फिट नाही बसत. कोणी नसेल बरोबर ती एकटीच स्वतःला एन्टरटेनही करते
I just hope Sai doesn't get
I just hope Sai doesn't get captionship followed by immunity and Smita gets it!
काल एक नोटीस केल का? स्मिता
काल एक नोटीस केल का? स्मिता टास्क झाल्यावर तो जाडजूड पाटा उचलून आहे त्या जागेवर ठेवत होती. काळेबाई तिच्याशी काहीतरी बोलत होत्या पण एका शब्दाने बोलला नाही की थांब मी ठेवतो. टास्क फक्त गोळीचा होता. उचलला असता पाटा तर हा झिजला असता का? एकदम चीप आहे तो.
कशी आपली मतं जुळतात,...>>>
कशी आपली मतं जुळतात,...>>> म्हणजे सैड्याला कॉफी प्यावीशी तेव्हा पुष्कीला ती तिच्यासाठी आणून द्यावीशी वाटते तिच्यासाठी असं ????
काल एकदम लाडातच आलेले .
काळे चुगलखोर अंटीला माहितेय
काळे चुगलखोर अंटीला माहितेय कि स्मिता पाटा वरवंटा + काळे अंटी दोन्हीला एकत्रं उचलून पट्कू शकते
:
:
उचलला असता पाटा तर हा झिजला
उचलला असता पाटा तर हा झिजला असता का? >> काळेकाका फक्त मुलींना उचलतात
काळेकाका फक्त मुलींना उचलतात
काळेकाका फक्त मुलींना उचलतात >> आणि 'ऑगंतडी' म्हणून मुलींना लाँऽऽऽऽग हग्जही देतात! काळेकाकू बोअर आहेत.
गेल्या आठवड्यापासून मेघाचं
गेल्या आठवड्यापासून मेघाचं वेगळंच रूप पहायला मिळतंय. ग्रुपला चिकटून राहणारी, सै, पुष्करसाठी सगळ्यांशी पंगे घेणारी मेघा आता दोन आठवडे दिसणार नाही. उलट ती असा प्रयत्न करेल की जास्तीत जास्त लोकांशी जे आतापर्यंत तिच्यासोबत होते, त्यांच्याशी पंगे घेईल. त्यामुळे तिला मिळणारी मते तिच्या मित्रांत विभागली जाणार नाहीत, विरोधातली मते मात्र विभागणार, जास्त फुटेज मिळणार ते आहेच शिवाय सहानुभुती पण. मेघा अतीप्रचंड चलाख व फोकस्ड आहे, तिच्याइतका गंभिरपणे ह्या शोचा विचार कुणीच केला नसेल, करत नसेल. प्रत्येक वेळी आपले म्हणणे ती अतिशय स्पष्टपणे मांडते लोकांपुढे. बरं, जेव्हा गरज असते तेव्हा आधाराचा खांदा द्यायला सगळ्यात पुढे, स्मिता, सुशांत, आस्ताद, रेशम या सगळ्यांचीच किती तरी वेळा न लाजता माफी मागितलीये तिने, हा जरा कधी कधी जरा जास्त बोलून जाते पण सिनियॉरिटी, पैसा, स्टेटस याचा माज कधी दिसत नाही फारसा. कदाचित ४ वर्षे घरी बसून असल्यामुळे करीअरच्या दृष्टीने करो या मरो अशी परिस्थिती तिला वाटत असेल. नवऱ्याच्या जीवावर राहणे तिच्यासारख्या पोरीला किती रुचत असेल काय माहित? त्यामुळे माझ्यामते तरी मेघा आणि जास्तीत जास्त स्मिता या दोन्हीपैकी कुणी तरी एक हा शो जिंकणे डिजर्व्ह करते. स्मिता दुर्दैवाने डंब, कन्फ्युज्ड असल्या विशेषणांच्या सापळ्यात अडकली आहे नाही तर ती उत्कृष्टपणे खेळू शकली असती.
बाकी, आस्त्या पेक्षा रेशम हजार पटींने बरी म्हणायची पाळी येत आहे आजकाल.
सै- पुष्कर ला वाटतंय मेघाच फॉलोविंग कमी करण्यात त्या दोघांना यश आलेय. येडे कुठचे!
शर्मिष्ठाला कसलेही स्वतंत्र व्यक्तिमत्व मिळालेले नाही, ति राहिली/ गेली तरी काहीही फरक पडणार नाही.
काल एक नोटीस केल का? स्मिता
काल एक नोटीस केल का? स्मिता टास्क झाल्यावर तो जाडजूड पाटा उचलून आहे त्या जागेवर ठेवत होती. काळेबाई तिच्याशी काहीतरी बोलत होत्या पण एका शब्दाने बोलला नाही की थांब मी ठेवतो. टास्क फक्त गोळीचा होता. उचलला असता पाटा तर हा झिजला असता का? एकदम चीप आहे तो.>>>वर तिची नक्कल पण करत होता.
पुंबा, पोस्ट इंटरेस्टींग !
पुंबा,
पोस्ट इंटरेस्टींग !
आणि 'ऑगंतडी' म्हणून मुलींना
आणि 'ऑगंतडी' म्हणून मुलींना लाँऽऽऽऽग हग्जही देतात! Uhoh काळेकाकू बोअर आहेत.>>>
अगदी अगदी!
आज मेघा विरुद्ध सगळे घर असा
आज मेघा विरुद्ध सगळे घर असा सामना दिसतोय!
फारच एकटी पडलीय ती!
लढेल तरीपण.... इतक्या सहजासहजी हरणारी नाहीये ती!
पुष्की मोठमोठ्याने ओरडून तिला "खोटारडी" वगैरे म्हणताना दिसतोय!
ऐसा कौन है उस घरमे जिसने झूट नही बोला?
या लोकांना कळत नाहीये की असे एकट्या पडलेल्या लोकांना प्रेक्षकांची जास्त सहानुभूती मिळते... मते मिळतात!
कमीतकमी पुष्कीला आणि सईला हे कळायला हवेय.... तुम्ही तिघे नेहमी minority त होतात, व्हिलन गॅंगकडून तुमच्यावर वेळोवेळी अन्याय होत होता आणि तरीही तुम्ही फेअर खेळत होतात म्हणून तुम्हाला आजपर्यंत लोकांचा इतका पाठिंबा मिळाला
आता तोच पाठिंबा एकट्या पडलेल्या मेघाला मिळायची जास्त शक्यता आहे!
सई आणि पुष्कर मागचे सगळे दिवस
सई आणि पुष्कर मागचे सगळे दिवस विसरलेले आहेत. ज्या गोष्टी त्यांच्यासाठी आधी अनफेयर होत्या त्या सगळ्या गोष्टी ते आता सर्रास करतायत. रे-आ गृपला जणू काॅम्पिटिशनच देतायत. मेघा आधीपण डोकं लावून खेळायची, चिटिंग करायची. पण ती फक्त स्वतःसाठी कधीच खेळली नाही. कायम सई आणि पुष्करला झुकतं माप देत आली. त्यांच्यासाठी किती वेळा स्वतः मागे राहीलीय. आता तिला होता काॅन्फिडन्स स्वतःवर. ह्यांच्यासारखी गळे काढत नाही बसली.
पुष्कर या घराच्या बाहेर गेला की सईचं तोंडही बघणार नाही. त्याची बायको बघुनच देणार नाही. मग मोजा किती मतं जुळतायंत ती.
स्मिताची दृष्ट काढायला हवी,
स्मिताची दृष्ट काढायला हवी, खूप लोकांना आवडायला लागली आहे. अशीच राहो. God bless her. ती फायनलला तरी जाऊदे ही किमान इच्छा आहे. तीन जणात असली तर आनंदचं होईल. रे आ पेक्षा तीच डिझर्व करते जाणे.
बाकी मेघा किंवा ती जिंकली तर आवडेल. स्मिता मनापासून आवडायला लागली इथेच. बाकी पारू बिरू गाणे कधी बघावंस पण वाटलं नाही.
http://www.newsbugz.com/bigg
http://www.newsbugz.com/bigg-boss-marathi-vote-contestants-list-eliminat...
इथे पण online voting करू शकतो.
इथे मेघा एक नं वर, स्मिता
इथे मेघा एक नं वर, स्मिता दोन, सई तीन, श रा चार आणि चौगुले पाच वर दाखवतायेत.
I just hope Sai doesn't get
I just hope Sai doesn't get captionship followed by immunity and Smita gets it! >>> same pinch.
अन्जू या लिंकसाठी धन्यवाद.
अन्जू या लिंकसाठी धन्यवाद. सध्या मला वोट करता येत नाहीये त्यामुळे वाईट वाटत होतं. या लिंकवर मेघाला वोट केलं.
अर्थात, ही वोट्स ग्राह्य धरली जाणार नसतील.
एनी वे, आपली मतं मेघा किंवा स्मिताला द्या.
अर्थात, ही वोट्स ग्राह्य धरली
अर्थात, ही वोट्स ग्राह्य धरली जाणार नसतील. >>> काय माहिती. voot वर दिलं मी स्मिताला. इथेही दिलं. मलाही झोल वाटतोय इथे का voot चीच असतील तर एका आयडीने एक वोट धरणार. रोज एक वोट नाही देऊ शकत.
अरे हा असत्या हरामखोर काय
अरे हा असत्या हरामखोर काय समजतो स्वतः ला काय ती बोलायची पद्धत. कधीही समोर आला na दोन थोबाडीत द्यायच्यात मला त्याला भले त्यासाठी मला पोलीस कोठडी मध्ये ही जायला लागेल. Sick mentality. Disgusting
आता घरातली परिस्थिती बघता
आता घरातली परिस्थिती बघता हितेन तेजवानी केस घडण्याचे चान्सेस दिसतायत. रेशम बिबाॅ ची लाडकी असेल वा नसेल पण बाकी घरातील लोकांना मेघा डोळ्यासमोर नकोशी झालेय. मेघा vs बाकी सगळे. तसा चान्स दिला तर मेघाला लगेच बाहेर काढतील हे सगळे. आणि आ रे आता पुष्करच्या बाजूने भांडायला आलेत. व्वा. असे प्रकार झाले की जगबुडी जवळ येते असं ऐकलंय लहानपणी.
रेशम बिबाॅ ची लाडकी असेल वा
रेशम बिबाॅ ची लाडकी असेल वा नसेल पण बाकी घरातील लोकांना मेघा डोळ्यासमोर नकोशी झालेय. मेघा vs बाकी सगळे. >>
खरय..
रे आ पु सै सगळ्यांनाच नको आहे ती.....शमा , नंकी ला पण मनातुन ती गेली तर आनंदच होईल....ती सगळ्यात स्ट्रॉग आहे..स्मिता काय कायम आस्ताद म्हणेल तसं स्वतः चं मत वळवते..
पण ती अशी बाहेर आली तर ती स्वतः आणि बाहेर पब्लीक पण राडे करेल...सो तिला नाही काढणार..
सोमी वर कालचं वाचलं की लोकं मोर्चा वगैरे काढायच्या गोष्टी करत आहेत लोणावळ्यात...आणि मेघा ची ऐपत असेल तर एखादा मोर्च काढणं अवघड नाही तिला....
सई खुप खोटं वागतेय आता मेघा शी..वरवर पॅच अप केल्यासारखं करतेय पण आतुन अजुन चिडुनच आहे अजुन....पु ला सगळं जाउन सांगतेय...
तिला कळत नाहिये आता की तिला शेवटी मेघा वाचवेल की पु..सो ती कंफ्युज आहे असं दिसतय...
आ आणी रे आगीत तेल ओतत आहेत..ईतके दिवस सै आणी पु त्यांच्यासाठी कोणीच नव्हते आणी आता अचानक पुळका आलाय...सै न पु ला जुनं काही आठवत नाही का...कोण कसं वागलं होतं वगैरे...की आता चान्स मिळालाय तर घालवु मेघा ला अशी आहे आहे त्यांची खेळी...एहेसानफरामोश...
>>सोमी वर कालचं वाचलं की लोकं
>>सोमी वर कालचं वाचलं की लोकं मोर्चा वगैरे काढायच्या गोष्टी करत आहेत लोणावळ्यात
कैच्याकै!
पण आहेत बरेच नोटबंदीचे बेरोजगार जे पोटासाठी कुठल्याही मोर्चात जातील.. पूर्वी नाही का ट्रक भरून मतदार पाठवले जायचे तसेच. त्यांना बिग बॉस काय हे सुध्दा माहित नसेल. पण त्यांचा 'बहूमूल्य' वेळ ते थोडीच वाया घालवतील? शिवाय टीआरपी मिळतोच चॅनल ला.
थोडक्यात प्राण कंठाशी नाही तरी पाणी गळ्याशी आलेले दिसते.
या विकांताचा डाव सगळ्यात जास्त रंगणार बहुतेक.
रच्याकने: सर्वच स्पर्धकांनी मात्र स्वताच्या महान क्रियेटीव्ह खेळाने, बि बॉ च्या क्रियेटीव्ह टीम च्या हुशारी बद्दल लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर केले ते बरे झाले.
Pages