बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कालचा एपिसोड प्रचंड चीड आणणारा आणि कंटाळवाणा झाला.

मेघा खोटारडी आहे असं म्हणणारे किती जण १००% खरंच बोलतात? स्वतः आस्तादनेही कित्ती वेळेला खेळाचे नियम स्वतःला हवे तसे लावून घेतले आहेत. मिळालाय चान्स तिला बोलायचा की लागले सगळे ओरडायला.

काल मला राग ह्या गोष्टीचा आला की सई आणि पुष्कर आता आस्ताद आणि रेशम कडे जाऊन मेघाविरुद्ध बोलायला लागले आहेत. मेघाने पुष्करची लायकी काढली तशीच सईची पण हवी होती काढायला. इतके दिवस तिच्या भरवशावर राहून खेळले आणि आता नखं काढतायत.

मला आता नंदकिशोर राहिला तरी चालणार आहे पण सई किंवा पुष्करपैकी कोणीतरी जायला हवंय.

एक मेघा नसती तर हा संपूर्ण शो खूपच चांगला झाला असता, आधी ग्रुप करण्यात ही, गॉसिप करून करून भांडणे लावण्यात ही, खेळात घाणेरडे चाळे करणार ही >>>> +११११११११

हो आता नक्कीच असे वाटतेय

मेघा वि एंटायर हाउस बघून बिग बॉस बहुदा तृप्तं झाले.
फारच खालच्या लेव्हलला गेले, आज राजेश -सुशान्तलाही काँप्लेक्स आलं असेल यांची दादागिरी पाहून, त्यांच्या पर्सनॅलिटीला निदान सुट तरी होतो निगेटीव रोल, पुष्किलातर अस्तादशिवाय हिंमतही होत नव्हती मेघाशी बोलायची.
‘आयॅम एंटरटेन्ड ‘ म्हणत मी नाही घाबरलो सांगताना चळचळा कापत होता.
बिग बॉसला राडा थांबवता आला असता , पण बहुदा तेच प्रमोट करायचे होते , दादागिरी प्रमोट करायची होती तर मग राजेशला का काढले ? रेशमला काढायचे होते ना , ती तसाही काही कन्टेन्ट देत नाहीये.
अ‍ॅडल्ट कन्टेन्ट +दादागिरी सगळं पॅकेज दिलं असतं राजेशनी Wink
सई सांगते पुष्करला गो स्क्रु हर आणि पुष्करला म्ह्स्णे मेघाला लँग्वेज सांभाळायला सांग.
वीणाताई लोकुर युट्युब रिव्ह्युअर्सच्या भाषेवर ऑब्जेक्शन घेत वॉर्निंग देत होत्या, आता मुलीची भाषा ऐकून तृप्त झाल्या असतील Happy
आस्ताद रेशम बद्दल तर बोलायलाच नको.
आस्ताद तिला म्हणे मी तुला कॅप्टन होउ देणार नाही, झालीस तर अ‍ॅक्स्पेटच करणार नाही टाइप्स, #नॉट्माय्प्रेसिडन्ट वरून सुचलय त्याला Biggrin
टु मच निगेटीव्हिटी आणि आजन्म इन्सिक्युरिटीमुळे डोक्यावर पडल्यासारखा बडबडतो.
स्मिताने एकटीने तोल जाऊ नाही दिला या राड्यात , शनिवारी तिने स्वतःला याबद्दल प्रमोट्करून फुटेज खाल्ल्लं पाहिजे,
जाउद्या, उद्या वीएंडचा डावही नाहीच होणार बहुदा कॅप्टनशिप टास्क लांबल्यामुळे.

मेघाला क्विट करायचा ऑप्शन होता , हे तिला आणि तिच्या समर्थकांना मान्य नाही. मेघाने फक्त सिपंथीसाठी ओकायचे नाटक केले.

मला आता नंदकिशोर राहिला तरी चालणार आहे पण सई किंवा पुष्करपैकी कोणीतरी जायला हवंय.
<<
+११११११
शक्यता मात्रं आहे कि सई पुष्किपैकीच कोणीतरी पुन्हा कॅप्टन बनणार Sad

मेघाने उलट्या केल्या हे तुम्हा लोकांना खरं वाटतंय का?
अगदी काविळ डायरिया ऍलर्जी सारखा आजार असताना reflux यायला वेळ लागतो किमान २० मिनिट तरी! या बाई नुसतं दूध पिऊन ओकाऱ्या काढत होत्या आणि भक्तमंडळींना पुळका ही येतोय! ५-६ ग्लास पाणी पिऊन वाकून उभं केलेलं पुष्करला त्याबद्दल काहीच नाही? मेघाने नेहमीप्रमाणे खोटे वागून वेळ काढण्यासाठी आणि सिम्पथीसाठी काहीही प्रकार केला आहे.. असो

बाथरुमला न जाउ देणे , दूधात पाणी दोन्ही चूक होते , मेघा आवडत असली तरी याचे समर्थन कोणी करत नाहीये.
कालच्या टास्क मधे स्मिता बेस्ट होती निर्विवादपणे.
वर लिहिलय ते आजच्या राड्याबद्दल.

मामी, दिप्स.. छान पोष्ट..
आहे बाकी जिगरा मेघाकडे.. मानलं तिला..बेस्टच आहे ती.
ते लोक दुसरीकडुन ऐकतच होते त्यांचं बोलणं अन स्मिताने तिकडुन पुष्कीला खर खोटं काय विचारल अन त्या लोकांना भांडण करायला या सांगुन आमंत्रणच दिलं.. बेस्ट आहे न स्मिता..
बाकी सई पुष्की... दगाबाज रे.. काल होते तिथे अन आज नाहि साथ रे..

वा! शेवटी मेघा-स्मिता जोडी काय करू शकते हे कळणार!!
मेघा स्मितासाठी जीव तोडून खेळणार. स्मितुली कॅप्टन झाली की फायनल पाचमध्ये नक्की येणार..
कालच्या राड्यात आपला सपोर्ट मेघाला. कारण पुढचे सगळे असले कृतघ्न, लूझर मेन्टॅलिटीचे आणि खुनशी लोक आहेत, त्या सगळ्यांना पुरून उरायला जिगरा लागतो..
मेघा- स्मिता आर द बेस्ट जोडी..
दोघींपैकी कुणीही जिंकावं..

मेघा एकदम नीच (व्रुत्तीने) वाटली.पुष्करला पाणी पाजताना तिला काही वाटले नाही पण स्वतःवर आल्यावर मात्र कांगावा. पण तिने सगळे तिच्यावर तुटून पडले असताना चांगले तोंड दिले. उगाच रडत बसली नाही. ह्या सगळ्याचा फायदा रेशमला होणार आहे.
पण मला स्मिताच जिंकावी असेच वाटते.

सकाळी चायनीज बनवताना कात्री नव्हती तर मेघाने दातात धरून मसाल्याची पिशवी फाडली. एकदम चीप वाटले ते.

मेघा हा प्राणी हपापलेला आहे. पराकोटीची स्वार्थी ! तिने जाणून बुजून आस्तादला समर्थन देऊन एकटे पडायचा डाव केलाय. वोट विभागणी होऊ नये. सहानुभूती मिळावी . आणि एक विरोधात सर्व असा हिरॉईजम मिळाला

मेघा हा प्राणी हपापलेला आहे. पराकोटीची स्वार्थी ! तिने जाणून बुजून आस्तादला समर्थन देऊन एकटे पडायचा डाव केलाय. वोट विभागणी होऊ नये. सहानुभूती मिळावी . आणि एक विरोधात सर्व असा हिरॉईजम मिळाला>>>>हो खरंच, मेघा जितकी स्वार्थी आहे तितकं घरात कोणीच नसेल. एकाने नुसतं म्हटलं तर लग्गेच मिळणारी एम्युनिटी सोडून नॉमिनेशनसाठी तयार होतील.

काल एकटीच किती नुसते कांगावे करत होती. बाकीचे सगळे तिच्याशी इतक्या व्यवस्थित शांतपणे बोलत होते, पण हीच एकटी त्यांच्या अंगावर ओरडत बसली होती. बाकीचे सगळे म्हणजे आस्ताद, रेशम, प्रेमळ जोडगोळी राहून हीच बाहेर गेली पाहिजे आता.

काल एकटीच किती नुसते कांगावे करत होती. बाकीचे सगळे तिच्याशी इतक्या व्यवस्थित शांतपणे बोलत होते, पण हीच एकटी त्यांच्या अंगावर ओरडत बसली होती. बाकीचे सगळे म्हणजे आस्ताद, रेशम, प्रेमळ जोडगोळी राहून हीच बाहेर गेली पाहिजे आता.>>>> Rofl
पुष्करच्या वागण्याचं समर्थन करणार्यांना सलामच ठोकला पाहिजे.

एकट्या मेघाला बाकी सगळे किती घाबरतात हे काल दिसलं बरं. ती जिंकेलच हे आता सगळ्याना पटलंय. पण तिला बाहेर काढून मग उरलेल्या लोकांची जिंकण्याची probability त्यांनी चेक केली का? मेघा बाहेर गेली आणि नंतर बिबाॅच्या कृपेने रेशम नेक्स्ट पाॅसिबल विनर असेल तर तिलाही असेच खायला उठतील का सगळे??? Uhoh

मेघा कशीही असुदे.... फक्त गट्स साठी मानले तिला.... एकावेळी चारचार पाचपाच जण तुटुन पडलेले असताना सगळ्यांना पुरुन उरली ती.... भलेभले गळपटले असते तिथे.... मान गये बॉस!

आता ती एकटी का पडली इकडे येउया:
मुळात त्या कॅप्टन्सी नॉमिनेशनमध्ये ४ मते आस्तादला होती, मेघाला ३ पडली असती आणि सईला दोन.... त्यामुळे सईने जो आरडाओरडा केलाय की तू मला चान्स असताना दगा दिलास त्यात काही अर्थ नाहीये.... मेघाने बॅकआउट केले नसते तर ती लढत तिच्यात आणि
पुष्कीत झाली असती.... त्यामुळे सईने माझा चान्स काढून आस्तादला दिला म्हणण्यात फारसे तथ्य नाही.... मेघाने स्वताचा चान्स आस्तादला दिला!
तिने त्याबद्दल बाकीच्यांशी चर्चा करणे आवश्यक होते आणि शक्यही होते पण ते तिने केले नाही हे तिचे चुकलेच पण मग काही का असेना खेळताना तिला पुष्कीलाच मदत केली.... तिने जर दगा दिला असेल तर आस्तादला दिला (जो की आस्तादने स्वता बऱ्याच जणांना दिलाय..... अगदी सईलाही दिलाय)..... त्यामुळे त्याला त्याबद्द्ल मेघाला बोलायचा अधिकार नाही!
मेघा जे काही खेळली त्याने पुष्की कॅप्टन व्हायला मदतच झाली.... पण हे सगळे कळण्याइतका शहाणपणा पुष्कीजवळ नसल्यामुळे म्हणा किंवा मेघावर वार करण्याची संधी तो शोधतच असल्यामुळे म्हणा, त्याने वीकेंड का वार मध्ये मोका साधला!
त्यामुळे "डीसीव्ह" हा एकच शब्द माहित असल्यासारखा तो जो मेघाच्या मागे लागला आहे तो खरतर त्यालाच लागू होतो!

बर आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या आस्तादला समर्थन दिले म्हणून हे मेघावर चिडले आहेत ते आता जवळजवळ आस्तादच्या मांडीवर बसूनच खेळतायत.... तो पढवेल तसे बोलतायत.... हा मोठ्ठाच विनोद आहे!

आता सासुसुनेच्या टास्ककडे येउया:
मेघा आणि पुष्कीने जे केले एकमेकांविषयी ते चुकीचे होते आणि त्याबद्दल एकदुसऱ्याला बोलायचा दोघांनाही अधिकार नाहीये... पण त्यांनी एकदुसऱ्याला छळले तरी (काही का हेतुने असेना किंवा कश्या का प्रकारे असेना).... खाष्ट सासूच्या भुमिकेत बाकी लोक शिरुच शकले नाहीत.... रेशम आणि आस्ताद फेअर खेळले असे जे म्हणतायत त्यांनी हे लक्षात घ्या की समोर स्मिता आणि चौगुले होते तेच जर मेघा किंवा शरा असते तर त्यांनी असेच/इतकेच सोप्पे टास्क देउन हिरे मिळू देण्याचा उदारपणा दाखवला असता का हे स्वतालाच विचारुन पहावे आणि मग आस्ताद आणि रेशमच्या फेअर खेळाचे गुणगान गावे!
मुळात या टीमला कॅप्टन्सी चा चान्स मिळाला कारण मेघाने कसेही करुन का होइना वेळ काढला, वाद घातले (भलेही त्या प्रयन्तान समोरच्या टीमकडे जास्त हिरे गेले पण त्याचा काही उपयोगच नव्हता).... मेघाने लवकर क्वीट केले असते तर बाकीच्या विकेट्स पटापट पडल्या असत्या आणि हे मेघाला कदाचित माहित असल्यामुळेच तिने इतक्या नेटाने टास्क केला त्यामुळे कॅप्टन्सीची निसंशय दावेदार होती.... शराने उगाचच अडवणूम केली.... स्मिताने उदार मनाने स्वताचे मतही चौगुलेला देउन टाकले.... अश्यावेळी शराने शहाणपणा करुन मेघाला पाठिंबा द्यायला पाहिजे होता पण ती आधीच मेघाची फॉलोअर या टॅगच्या ट्रॅपमध्ये अडकली होती त्यामुळे तिने मेघाला सपोर्ट केलाच नाही!
पण या दोघींनीही संगनमत करुन आपल्यातला उमेदवार निवडून आणण्यापेक्षा स्मिताला सपोर्ट केला पण त्याला कुणी फेअर खेळल्या म्हणायचे कष्ट घेणार नाही.... तसेही मेघा आणि शरामधले कुणीही कॅप्टन्सीचे उमेदवार झाले असते तरी बाकीच्यांनी त्यांना टास्कमध्ये कितपत सपोर्ट केला असता यात शंकाच आहे!
त्यामुळे झाले ते एका दृष्टीने चांगलेच झाले.... यानिमित्ताने मेघा स्मिता जोडी जमली तर चांगलेच आहे.... (तश्याही दोघीही एकमेकींच्या सिक्रेट ॲडमायरर आहेतच)

पण या सगळ्यात टास्क झाल्यावर आमची टीम जिंकण्यासाठी नाहीच खेळली... आम्हीतर हिरे जमवण्यासाठी खेळलो असे कोल्ह्याला द्राक्षे आंबट टाइप्स भुमिका घेणाऱ्या आस्तादचा बिग बॉसने चांगलाच पोपट केला.... कारण कॅप्टन्सीचे उमेदवार जिंकलेल्या टीममधून निवडायचे होते त्यामुळी हरलेल्या टीमच्या हिऱ्यांची किम्मत शून्यच!
मग बसले सगळे लूझर काड्या करत!

बाकी महेश मांजरेकरांचा एकंदर पॅटर्न बघितला तर मागच्या वेळेस मेघाला बॅश केल्यामुळे यंदा बाकीच्यांचा नंबर लागेल!
मांजरेकर जर खरच अनबाय्सड असतील तर त्यांनी आज मेघाला खोटारडी म्हणून हिणवऱ्यांच्या खोटारडेपणाच्या क्लिप्स दाखवाव्यात!

परत एकदा झालेल्या ड्राम्याचा मेघाला फायदाच होणार आहे आणि बाकी स्पर्धक कळत न कळत तिला पब्लीकची सहानुभूती मिळवून देण्यात मोलाची भुमिका बजावतायत Wink

शर्मिष्ठा अजिबात दावेदार नवह्ती खरं तर, तिचे सगळेच टास्क चुकले ज्यामुळे सईला ५ हिरे मिळाले.
अस्तादचं भुंकून महाभांडण झाल्यावर रेशमकडे जाऊन आतानपुन्हा मेघाला सिंपथी मिळतेका यामुळे चिन्ता पाहिली का Proud

Girls are selfish Happy .पुजो म्हणत होता आणि स्त्रीदाक्षिण्याच्या गप्पा मारतो.

इथल्या काही id चे इथले जुने प्रतिसाद वाचून वाटत नाही की त्या न्युट्रल असाव्यात पण त्या रोजच्या ep नंतर इथे सुरुवात करताना 'आधी आम्ही न्युट्रलच होतो पण आता ही व्यक्ती आवडत नाही'.म्हंजे सांगायची गोष्ट की आज ती वाईट वागली. :') भारी हां :*)

हो खरंच, मेघा जितकी स्वार्थी आहे तितकं घरात कोणीच नसेल. एकाने नुसतं म्हटलं तर लग्गेच मिळणारी एम्युनिटी सोडून नॉमिनेशनसाठी तयार होतील.

काल एकटीच किती नुसते कांगावे करत होती. बाकीचे सगळे तिच्याशी इतक्या व्यवस्थित शांतपणे बोलत होते, पण हीच एकटी त्यांच्या अंगावर ओरडत बसली होती. बाकीचे सगळे म्हणजे आस्ताद, रेशम, प्रेमळ जोडगोळी राहून हीच बाहेर गेली पाहिजे आता. >>>>> LOL... आडो.

कोणी नोटीस केलंय का, जेव्हा पुष्कर आणि सई एकमेकांना थँक्यू म्हणत असतात किंवा एकमेकांच्या बद्दल स्तुतीसुमने उधळत असतात, तेव्हा सई ते सगळं खरंच मनापासून बोलत असते. पुष्कर तिच्याबद्दल बोलायला लागला की तिच्या डोळ्यात एक चमक असते आणि एक विशिष्ट विश्वास असतो. पण पुष्करची बाॅडी लँग्वेजच काही वेगळी असते. सतत इकडे तिकडे बघणे, स्थिर न राहणे, सतत अडखळणे आणि सतत तिला जस्टिफीकेशन देत राहणे की तू माझी चांगली मैत्रिण आहेस. त्याचे शब्द आणि हावभाव मॅच होत नाहीत. तो तिला सतत 'मी कसा great, selfless' आहे हेच सांगत असतो. तो फक्त सईला use करत आला आहे आणि शेवटपर्यंत करणार आहे. काल हे जास्त प्रकर्षाने जाणवलंय.

स्मिता सोडून सगळे स्वार्थाने बरबटलेली लोक आहेत..
एकमेकांच्या लावालाव्या करणे, दुसऱ्याला कमी लेखणे एवढच जमते त्यांना.
टास्क चांगला खेळतात म्हणे.. हा गेम काय फक्त टास्कचा आहे का ?
मग मैदानात घेतला असता ना, घर कशाला घेतल असत ?
समूहाने राहताना माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे पण तितकेच महत्वाचे आहे.
मेघा, सई तर एक न. भंगार .. स्मिता जिंकावी असेच वाटते

Pages