सॉरी बॉस! हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही!
जालावर एक मननीय ब्लॉगपोस्ट वाचण्यात आली :
हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम.
खेरीज 'हिंदू'मधील एक झकास माहितीपूर्ण लेखही वाचण्यात आला :
(इंग्लिश लेख) Hindi chauvinism
आज हे दोन लेख टाकण्यामागचं सूत्र म्हणजे - मो.क. गांधी! भारतीय प्रजासत्ताकाच्या शासनमान्य राष्ट्रपित्याचे हिंदुस्तानी (हिंदी+उर्दू मिसळ) स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा असावी असे एके काळी मत होते. काळाच्या ओघात (सुदैवाने) प्रजासत्ताकाची ती राष्ट्रभाषा झाली नाही (*१). पण हे वास्तव दडपून हिंदी प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा असल्याचा खोटारडा प्रचार चालवला जातो. या बुद्धिभेदाचे, फसव्या प्रचारतंत्राचे दुष्परिणाम महाराष्ट्रात - विशेषकरून मुंबईत - आपण बघतच आहोत (खुद्द हिंदी भाषेचं आंतरराष्ट्रीय विश्वविद्यालय (*२) हिंदीभाषिक प्रदेशांत नसून, महाराष्ट्रात - वर्ध्यात - आहे. आता बोला!).
मो.क. गांधी यांची जयंती आज भारतीय प्रजासत्ताकात साजरी केली जात आहे. त्याचं औचित्य साधून 'हिंदी ही भारतीय प्रजासत्ताकाची राष्ट्रभाषा नाही' (असा वस्तुनिष्ठ प्रचार) ठसवणारी ही रंगीबेरंगी पोस्ट!
तळटीप :
*१. भारतीय राज्यघटनेतील कलम ३४३ अनुसार (अधिकृत इंग्लिश दुवा) हिंदी भारताच्या संघराज्याची अधिकृत भाषा आहे. ३४३ व्या कलमातील अधिकृत नोंद असे म्हणते :
(इंग्लिश : ) The official language of the Union shall be Hindi in Devanagari script.
(मराठी भाषांतर : ) देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची अधिकृत भाषा असेल.
घटनेत कुठेही 'राष्ट्रभाषा' किंवा 'राष्ट्रीय भाषा' असा उल्लेख नाही. किंबहुना नेमकेपणा अनुसरत हिंदीला 'official language of the Union' म्हटले असून, 'official language of the India' अशी संदिग्ध वाक्ययोजना नाही हे लक्षात घ्यायला हवे. भारतीय घटनेनुसार मराठीसह २२ भाषा भारताच्या मान्यताप्राप्त भाषा आहेत. त्यांची यादी आठव्या अनुसूचीत नोंदवली आहे.
'अधिकृत भाषा (Official language)' व 'राष्ट्रीय भाषा/राष्ट्रभाषा (National language)' यांमध्ये भेद असल्यास निस्संदिग्धपणे तसे-तसे उल्लेख त्या-त्या देशांच्या घटनांमध्ये नोंदवलेले असतात. याचं एक उदाहरण म्हणून सिंगापूरच्या प्रजासत्ताकाच्या घटनेतील कलम '१५३ अ' पाहता येईल. हे कलम म्हणते (इंग्लिश मजकूर):
Official languages and national language
153A. —(1) Malay, Mandarin, Tamil and English shall be the 4 official languages in Singapore.
(2) The national language shall be the Malay language and shall be in the Roman script:
Provided that —
(a) no person shall be prohibited or prevented from using or from teaching or learning any other language; and
(b) nothing in this Article shall prejudice the right of the Government to preserve and sustain the use and study of the language of any other community in Singapore.
यात सिंगापूरच्या प्रजासत्ताकाची 'मलय' ही 'राष्ट्रीय भाषा' आहे असा उल्लेख असून 'मलय, मँडरिन चिनी, तमिळ व इंग्लिश या चार अधिकृत भाषा आहेत' (यातील 'अधिकृत भाषा' / 'official language' असा उल्लेख भारतीय राज्यघटनेतील याच उल्लेखाच्या संदर्भात विशेष चिंतनीय आहे.) असा स्पष्ट उल्लेख आहे.
दुसरं उदाहरण पाकिस्तानाचं. पाकिस्तानी राज्यघटनेच्या २५१ व्या कलमानुसार 'उर्दू' ही पाकिस्तानाची 'राष्ट्रीय भाषा' आहे असे निस्संदिग्ध रित्या नोंदवले गेले आहे. इंग्लिश मजकूर :
(1) The National language of Pakistan is Urdu, and arrangements shall be made for its being used for official and other purposes within fifteen years from the commencing day.
(2) Subject to clause (1), the English language may be used for official purposes until arrangements are made for its replacement by Urdu.
(3) Without prejudice to the status of the National language, a Provincial Assembly may by law prescribe measures for the leaching, promotion and use of a Provincial language in addition to the National language.
यावरून एखाद्या देशाच्या राज्यघटनेत 'राष्ट्रीय भाषा (national language)' म्हणून उल्लेख असला, तर एखादी भाषा त्या देशाची राष्ट्रभाषा ठरते हे ध्यानी येईल. या निकषानुसार हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही, हे लक्षात येते.
*२. 'महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा' संस्थेचे अधिकृत संस्थळ (इंग्लिश व हिंदी भाषेतच उपलब्ध.)
ना मि झों ? म्हणजे काय ?
ना मि झों ? म्हणजे काय ? जनसामान्यांना समज कमजोर आहे...
हिंदी कानाला किती मिठ्ठास वाटते. हिंदी गाणी तर आपल्या ओठांवरच असतात. मला तर खुप आवडते. पण ते आवडणे मराठी प्रेमाच्या आड येते असेही नाही. आई, मावशी सारख्याच वाटतात.
जरी भारतातील बहुतांश लोकं हिंदी बोलत असतील, भारतात लोकांची शाही आहे, पण तरिही हिंदी राष्ट्रभाषा होणे आता शक्य वाटत नाही. तामीळ, केरळ मधे किती अस्तित्व आहे? बंगलोर, कर्नाटकात ? १९६० पर्यंत तामिळनाडू मधे हिंदीला प्रखर असा विरोध नव्हता, पण जेव्हा बळजबरीने राष्ट्रभाषा म्हणुन गळी उतरवणे सुरु झाले त्यावेळी मग द्वेष वाढला...
ना मि झों ? नाकाला मिरच्या (
ना मि झों ? नाकाला मिरच्या ( कोल्हापुरी जास्त / पुणेरी कमी ) झोंबणे
हे अमृतयात्री , तीस
हे अमृतयात्री , तीस वर्षापुर्वी त्याना समजलेली गोष्ट , उकरुन काढली . पण त्याना खडगपूर आय०आय०टी० मध्ये कितीतरी चांगल्या गोष्टीपण शिकवल्या असतील त्यातलं त्यांनी काय काय पडताळुन पाहीलं ?
पाकिस्तानात ४५% पंजाबी आणि
पाकिस्तानात ४५% पंजाबी आणि फक्त ८% उर्दू वापरली जाते. तिथे प्रचलित असणार्या आणखी चार भाषांची टक्केवारी उर्दू पेक्षा जास्त आहे. पण तरीही पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू आहे कारण त्यांच्या घटनेत तसे नमूद केले आहे.
सिंगापूरची राष्ट्र्भाषा मलाय आहे, जी तिथले मूळ राहिवासी मलाय लोकांची मातृभाषा होती. सध्या सिंगापुरात ही मलाय लोक अल्पसंख्यांक म्हणजे केवळ १४% आहे. परंतू सरकार संमत कायद्यांनुसार राष्ट्रीय भाषा मलायच आहे.
माझ्या मते फ यांचा मुद्दा केवळ 'भारतीय घटनेत हिंदी (किंवा कोणतीही भाषा) राष्ट्र्भाषा आहे असे नमूद केलेले नाही म्हणून तसा प्रचार करणे चूक आहे' ह्या वास्तवाचा उहापोह करणे एवढाच होता.
राष्ट्रीय संपत्ती असलेल्या बसगाड्या, रेल्वे इ पैकी कितींवर केरळ, तामिळ प्रांतात हिंदीमध्ये लिहिले असते जिथे राष्ट्रीय भाषा म्हणून मला हिंदीचा उपयोग व्हावा?
राष्ट्रभाषा (असल्यास) आहे म्हणजे नेमके काय आहे?
कुठल्या संदर्भाने ती राष्ट्राची भाषा आहे किंवा असावी असे ठरले?
माझे राष्ट्रगीत माझ्या राष्ट्रभाषेत का नाही? नसावे?
गांधींना कुठले संबोधन वापरावे हा ज्याच्या त्याच्या विचारधारणेचा प्रश्न आहे. त्याबद्दल इथे मतप्रदर्शन करणे बरोबर नाही.
vaibhavayare123...>> "राज
vaibhavayare123...>> "राज ठाकरेंनी एका सभेत म्हटले होते की जेव्हा राष्ट्रभाषेचा ठराव करण्यासाठी विचार झाला त्या वेळी मरठी एका मताने मागे राहीली म्हणून हिंदी राष्ट्रभाषा झाली">>
या विषयीची माहिती प्रस्तुत लेखातच उपलब्ध आहे. वाचा. <<स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी जेव्हा हिंदुस्थानी लोकांना थोडेफार प्रशासकीय स्वरूपाचे (अराजकीय) अधिकार देण्यास सुरुवात केली त्या दरम्यान जेव्हा (नंतर जन्माला येणार्या पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानासकट - आताच्या बांगला देशासह) अखंड हिंदुस्थानची राष्ट्रभाषा निवडायची वेळ आली तेव्हा खडी बोली (उर्दू आणि फारसीचा बराच प्रभाव असलेली बोली) आणि हिंदी (मुख्यतः संस्कृत भाषेवर आधारित असलेली बोली) यांच्या मध्ये खरी चुरस होती. मग त्या दोघांपैकी एक भाषा अंतिमतः निवडण्यासाठी एक समिती गठित केली गेली. त्या समितीमध्ये बरीच चर्चा झाल्यावर जेव्हा मतदान घेतले गेले तेव्हा एका मताच्या आधिक्याने संस्कृताधारित हिंदी (देवनागरी लिपीसह) ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यासाठी निवडली गेली. पण स्वातंत्र्योत्तर भारताची घटना लिहिताना घटनाकारांनी कुठलीही एक भाषा ही स्वतंत्र भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित केलेली नाही आहे, हे सत्य आम्हा सामान्यांच्या दृष्टीस स्पष्टपणे कधीही आणून दिले जात नाही.>>
robeenhood >>आणि एके काळी या मो.क. गांधी यानी हिन्दी राष्त्रभाषा व्हावी असे मत व्यक्त केले होते हा त्याचा गुन्हा तर.!>>
महात्मा गांधी ज्या हिंदीभाषेचा पाठपुरावा करीत होते ती उर्दू मिश्रित हिंदी - खडी बोली. याला कारण म्हणजे त्यांना मुस्लिमांना संतुष्ट करून शांत करण्याचा प्रयत्न करायचा होता. पण (सुदैवाने !!) एका मताच्या फरकाने संस्कृताधारित हिंदी तेव्हा निवडली गेली. पण स्वातंत्र्यानंतर भारत सरकारची हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा म्हणून जाहीर करण्याची छाती झाली नाही. कारण हिंदी ही बहुसंख्यांची भाषा नाही. आपल्या निवडणुकीत १५% मते मिळवणारा जसा १०० टक्क्यांचा प्रतिनिधी ठरतो तसाच प्रकार झाला असता.
हे सुद्धा वाचा. <<वरील विवेचनावरून असेही लक्षात येते की केंद्र सरकाराचा कारभार, संसद आणि उच्च व सर्वोच्च न्यायालये सोडून इतर सर्व क्षेत्रात, विशेषतः राज्यांच्या पातळीवर, हिंदीला स्थानिक राज्यभाषेपेक्षा एक कणभरही अधिक महत्त्व नाही. उलटपक्षी कुठल्याही हिंदीतर राज्यात राज्यभाषाच सर्वात अव्वल क्रमांकाची असून घटनेनुसार हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेचे स्थान हे त्यानंतरचेच मानले गेले आहे. (इंग्रजी ही भाषा तर अनुसूची-८ मध्येही अंतर्भूत केली गेली नसल्यामुळे तिचे स्थान तर त्याहूनही खालचे आहे.) ह्याच कारणामुळे केंद्र शासन हे तमिळनाडू, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्येच नव्हे तर आसाम, ओरिसा यासारख्या अप्रगत राज्यांमध्येसुद्धा हिंदीची जराही जबरदस्ती करू शकत नाही. आपल्या महाराष्ट्रात मात्र “हिंदी ही राष्ट्रभाषा आहे” असा खोडसाळ प्रचार करून आपल्यावर हिंदीचे दडपण आणतात आणि मराठीला दुय्यम (खरं म्हणजे तिय्यम – हिंदी आणि इंग्रजी यांच्या खालची) वागणूक देतात.>>
सामान्य माणसाचा केंद्र सरकारच्या अंतर्गत व्यवहाराशी, संसदेशी व उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांशी संबंध येत नाही तोपर्यंत त्याचा आणि हिंदीचाही कायदेशीर रित्या काहीही संबंध नाही. (वरील संस्थातसुद्धा अजुनही इंग्रजीच अधिक चालते.) माझ्या राज्यात माझी भाषा सर्वोच्च आहह, हिंदीपेक्षासुद्धा. आणि हे तत्त्व महाराष्ट्र वगळता सर्वत्र लागू केलं जातं. आपल्या राज्यात मात्र मराठीला फाटा देऊन हिंदी आपल्या बोडक्यावर मारली जाते. पण आपल्याला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. स्वभाषेविषयी, स्वसंस्कृतिविषयी अभिमान हे शब्द आम्ही आमच्या शब्दकोशातून केव्हाच काढून टाकले आहेत. इतर राज्यांत तशी परिस्थिती नाही. म्हणून तिथे स्थानिक भाषेला मान मिळतो. स्वाभिमानी माणसाचा मान ठेवला जातो, न्यूनगंडग्रस्त, निरभिमानी मानसाचा नव्हे. ज्याला स्वतःबद्दलच स्वाबिमान नाही त्याला इतर कोण मान देणार?
pha>> आणि समजा, काही वर्षांत मराठी भाषिकांची प्रजा भरपूर झाली, तर मग मराठी ही राष्ट्रभाषा करायची का? >>
सुदैवाने (किंवा दुर्दैवाने) मराठी संस्थानिकांनी, सरदारांनी जरी ग्वाल्हेर, इंदूर, देवास, बडोदे, झाशी, उत्तर कर्नाटक अशा अनेक भागांमध्ये राज्यकारभार केला तरी स्थानिक प्रजेवर मराठी लादली नाही. एकेकाळी दिल्लीच्या तख्तावरील मुघल बादशहा बहादूरशाह जफर हा मराठ्यांच्याच सल्ल्याने राज्यकारभार करीत होता.मराठे बलाढ्य होते. पानिपतची लढाई जिंकली असती तर कदाचित हिंदी (त्या काळी हिंदी भाषा जन्माला सुद्धा आलेली नव्हती) ऐवजी मराठी ही अधिक व्यापकपणे बोलली जाणारी भाषा ठरू शकली असती. मुघलांनी उत्तर हिंदुस्थानात फारसी (व नंतर उर्दू) लादली. धर्मांतरे केली. हैदराबाद संस्थानात फारसी-उर्दू या भाषा लादल्या गेल्या. त्या सर्वातूनच हिंदीला बळ मिळाले. नाहीतर हिंदीचा एवढा प्रसार झालाच नसता. असो. आत्याबाईला मिशा असत्या तर... असा हा प्रकार आहे.
प्रस्तुत लेखाखालील प्रतिसाद व उत्तरे वाचा. भारतातील राजकारणी हे हिंदी भाषक राज्ये, अहिंदी पण स्वाभिमानी राज्ये व अहिंदी पण पुचाट राज्ये (म्हणजेच महाराष्ट्र) यांच्याशी कसे वेगवेगळे खेळ खेळतात ते कळून चुकेल.
माझ्या मते दहावी पर्यंत
माझ्या मते दहावी पर्यंत सगळ्याच राज्यात हिंदी अनिवार्य आहे. व यामुळेच सर्वाना (मला सुद्धा आतापर्यंत हेच वाटत होते की) हिंदी ही राष्ट्रभाषा आहे.
कायद्याने (संविधाना प्रमाणे ) हिंदी जरी राष्ट्रभाषा नसली तरी एवढ्या वर्षाच्या प्रचाराने व प्रसाराने आज हिंदी भाषा भारतभर बोलली जाते. १५-२० मुख्य शहरं सोडलात तर बाकी/इतर भारत हा आजही लहान शहरं, मोठे गाव व लहान खेड्यांचा देश आहे. वर कुणितरी लिहलं होतं की भारतात इंग्रजी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. अहो दिली-मुंबई-बंगलोर्-चेन्नई व इतर मोठ्या शहरांच्या पलिकडेही हा देश प्रंचड मोठा (आकाराने व लोकसंखेने )आहे. आजही लहान शहरातिल लोकं घरी आपली मात्रुभाषा व बाहेर हिंदीच बोलतात.
राहीला प्रश्न इंग्रजीचा लहान शहरांत जाउन बघा केवढा तो इंग्रजीचा धाक, परिक्षेत हा पेपर सुटला तरी लाखो पाये वालि अवस्था आसते, बोलने तर फार दुरची गोष्ट आहे. त्याच्याही पलीकडे जाउन बोलाचे तर इंग्रजीचे मास्तर स्वतः इंग्रजी हा विषय मराठीत शिकवितात, इंग्रजीत कमी मार्क्स पडले तर ते Taken for granted असते. म्हणुन इंग्रजी ही राष्ट्रभाषा होण्याची कण भर ही शक्याता नाही. वरील चार शहरांच्या निकषावरुन इंग्रजी लादने शक्य नाही.
दक्षिणेतिल सगळी राजकारनी दिल्लीत सुद्धा इंग्रजीत भाषणे देतात. ते फक्त हिंदीचा अस्विकार दर्शविण्यासाठीच असतो. नाहितर जो माणूस दहावी पर्यंत हिंदी विषय (कसबसं का होईना) शिकतो त्याला हिंदि ( सोनिया गांधी सारखी तरी) येउ नये, हे कितपत पटण्यासरखं आहे. याचा अर्थ सरळ आहे की हे दक्षिणात्य लोक जानुन बुजुन हिंदीची टाळाटाळ करतात. तामीळ भाषा राष्ट्रभाषा व्हावी म्हणून यानी कमी प्रयत्न केलेत का ? तसेच बंगाली सुद्धा राष्ट्रभाषेचा मुकुट मिळविण्यासाठी (मिरवीन्यासाठी) धडपडलीच की. पण आजची बंगाली व दक्षिणेतील तरुन (आन्ना ) पिढी सुद्धा ब-यापैकी हिंदी बोलते.
या सगळया वादळी परिस्थीत सुद्धा हिंदि वाढता,वाढता वाढतच आहे, याचे खरेच आश्चर्य वाटते. आता सवयच झाली या हिंदिची, कायद्याने ती राष्ट्रभाषा असो वा नसो पण जनमानसात तीच रुजली आहे राष्ट्रभाषा म्हणुन. हे ही तेवढेच खरे आहे.
अहिंदी पण पुचाट राज्ये
अहिंदी पण पुचाट राज्ये (म्हणजेच महाराष्ट्र) >>> अमृतयात्री काय लिहिताय कळतय का तुम्हाला
वर कुणितरी लिहलं होतं की
वर कुणितरी लिहलं होतं की भारतात इंग्रजी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. अहो दिली-मुंबई-बंगलोर्-चेन्नई व इतर मोठ्या शहरांच्या पलिकडेही हा देश प्रंचड मोठा (आकाराने व लोकसंखेने )आहे.>>>
वरच्या चर्चेच्ता संदर्भात नाही पण मधुकर ७७ याच्या या वाक्याला तूफान अनुमोदन,,,
'
बाकी चालू द्या!!!
<<दिली-मुंबई-बंगलोर्-चेन्नई व
<<दिली-मुंबई-बंगलोर्-चेन्नई व इतर मोठ्या शहरांच्या पलिकडेही हा देश प्रंचड मोठा (आकाराने व लोकसंखेने )आहे>>
पण काम कुठे होते? फक्त त्या मोठ्या शहरातूनच ना? तिथे काय बोलतात? इंग्रजीच ना? कायदेशीरपणे काहीहि केले तरी लोक त्यांना वाटेल तसेच बोलणार, नि सध्या इंग्रजी सोयीची आहे लोकांना.
नि भारतात काय, कायदा मोडला तरी लाच दिली की झाले! तेंव्हा कायदा काय हा प्रश्न केवळ औपचारिक आहे.
गांधींना कुठले संबोधन वापरावे
गांधींना कुठले संबोधन वापरावे हा ज्याच्या त्याच्या विचारधारणेचा प्रश्न आहे. त्याबद्दल इथे मतप्रदर्शन करणे बरोबर नाही.
>>> भविष्य बीबी वरच्या चर्चेची आठवण झाली .. तिथे जयंत नारळीकरांचा उल्लेख आदरार्थी न केल्यामुळे बर्याच जणांनी नाराजी व्यक्त केली होती ..
कोणी कुठले संबोधन वापरावे हा जर ज्याच्या त्याच्या विचारधारणेचा प्रश्न असला तरी गांधींजींसारख्या व्यक्तिमत्वाचा उल्लेख आणि बीबीचा विषय, प्रस्तावनेतली भाषा ह्याच्या संदर्भात आलेला उल्लेख नक्कीच खटकला .. विषय कुठलाही असो जनसामान्यांमध्ये "गांधीजी" हे गांधीजी च असतील ना? मग इतरांच्या विचारधारणेचा आदर करून मतप्रदर्शन करण्यात काय चूक आहे?
.
मी स्वतःची सहीदेखील 'सं.वि. द्रविड' म्हणून करतो. ज्या-त्या व्यक्तीचे अधिकृत नाव वापरण्यात काहीही गैर नाही. मी 'मो.क. गांधी', 'बा.गं. टिळक' असं म्हटलं, लिहिलं, वापरलं, तर ते अजिबात गैर नसून, अधिक वस्तुनिष्ठ आहे..
>>> वस्तुनिष्ठ असलं तरी prudent (उचित) खचितच नाही ..
इथे कोण कशाला वस्तुनिष्ठ
इथे कोण कशाला वस्तुनिष्ठ म्हणेल काही सांगता येत नाही . आदरणीय / वंदनीय व्यक्तीना कोणी असं एकेरी बोलत नसतं . अर्थात हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन .
अमृतयात्री तुम्ही महाराष्ट्राविषयी जी खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे ते कशाच्या आधारावर जरा स्पष्ट कराल का ?
माझा पण हिंदी ही भारताची
माझा पण हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे असा समज होता. .. एकदा तर चक्क मी काही तेलगु लोकांना "तुम्हा लोकांना भारतीय असुन हिंदी ... आपली राष्ट्रभाषा येत नाही!!! " अस एकवल होत
>>या सगळया वादळी परिस्थीत
>>या सगळया वादळी परिस्थीत सुद्धा हिंदि वाढता,वाढता वाढतच आहे, याचे खरेच आश्चर्य वाटते. आता सवयच झाली या हिंदिची, कायद्याने ती राष्ट्रभाषा असो वा नसो पण जनमानसात तीच रुजली आहे राष्ट्रभाषा म्हणुन. हे ही तेवढेच खरे आहे.<<
ही विधाने फारच सरलीकरण केलेली वाटतात. आता आकडेवारी पाहिल्यास, ईशान्येकडील राज्ये (अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा) येथील ४ कोटी लोक, बंगाली (८.३ कोटी), तेलुगू (७.४ कोटी), मराठी (७.१ कोटी), तमिळ (६.१ कोटी), कन्नड (३.८ कोटी), मल्याळम (३.४ कोटी), उडिया (३.३ कोटी) आणि ईशान्य भारताखेरीज उर्वरित भारतात व बेटांवर राहणारे २-२.५ कोटी अहिंदीभाषिक आदिवासी लोक यांचा अहिंदीभाषिक (आणि हिंदीपासून जास्त निराळ्या ढंगाच्या भाषा असलेल्या) भारतीय लोकसंख्या आहे. यांख्रेरीज गुजराती, पंजाबी या उत्तर भारतात गणल्या जाणार्या सर्व अहिंदी भाषिकांची संख्या गणल्यास, अहिंदी भाषिकांची संख्या बहुमतात (जवळपास ६० %) आहे. ६० % भारतीय लोकसंख्येला स्वभाषांमध्ये आपला सामूहिक पातळीवरील शैक्षणिक - पर्यायाने बौद्धिक, राहणीमानाचा स्तर - उंचावत जाणे अधिक सोपे आहे (आणि कदाचित अमेरिकादी इंग्लिशभाषिक पाश्चात्य देशांमध्ये व बर्याच अंशी भारतात विकासाच्या वाटा चोखाळायला इंग्लिश भाषा पुरेशी आहे.). त्यासाठी हिंदी ही राष्ट्रभाषा बनवण्याची तर मुळीच आवश्यकता नाही.
तूर्तास, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे वास्तव स्वीकारण्यात आपल्या सर्वांचं भलं आहे :).
>>आदरणीय / वंदनीय व्यक्तीना कोणी असं एकेरी बोलत नसतं . अर्थात हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन .<<
श्री १ २ ३, आपण आता जरा बाळबोधपणा सोडूया का? मी व्यक्तीचं अधिकृत नाव (जे मो.क. गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत, ब्रिटनात जाताना पासपोर्टावरही वापरलं असेल, ते) वापरतोय, त्यात परत आदरार्थी अनेकवचनात वापरतोय; तर ते एकेरी कसं होईल? एवढं सर्व धडधडीत डोळ्यांदेखत वाचता येत असताना, तुम्ही उगाच खोटे आरोप करत सुटला आहात. तुमचं कुभांड लोकांसमोर जगजाहीर होतंय... वेळीच आवरा स्वतःला.
>>एकदा तर चक्क मी काही तेलगु लोकांना "तुम्हा लोकांना भारतीय असुन हिंदी ... आपली राष्ट्रभाषा येत नाही!!! " अस एकवल होत<<
:)) .. आता त्यांनाही सांगून ये, की गैरसमजामुळे गोंधळ घडला.
भारत सरकारच्या अधिकृत
भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाच्या "India at a glance" या पानावर खालील मजकूर आहे:
22 languages have been recognized by the Constitution of India, of which Hindi is the official national language. Besides these, there are 844 different dialects that are practiced in various parts of the Country.
भाषांतर : भारतीय संविधानाने २२ भाषांना मान्यता दिली आहे. पैकी, हिंदी ही अधिकृत राष्ट्रभाषा आहे. याशिवाय, ८४४ वेगवेगळ्या प्रकारच्या बोलीभाषा देशात इतरत्र वापरात आहेत.
राज्यघटनेत मात्र 'नॅशनल
राज्यघटनेत मात्र 'नॅशनल लँग्वेज' असा अजिबात उल्लेख नाही. कलम ३४३ (अधिकृत इंग्लिश दुवा) म्हणते :
(इंग्लिश : ) The official language of the Union shall be Hindi in Devanagari script.
(मराठी भाषांतर : ) देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची अधिकृत भाषा असेल.
घटनेत 'राष्ट्रभाषा' किंवा 'राष्ट्रीय भाषा' असा उल्लेख नाही. किंबहुना हिंदीला नेमकेपणा अनुसरत 'official language of the Union' म्हटले असून, 'official language of the India' अशी संदिग्ध वाक्ययोजना नाही हे लक्षात घ्यायला हवे.
घटनेत वापरल्या जाणार्या शब्दयोजना, वाक्ययोजनांमध्ये निस्संदिग्धता आणि अचूकपणा कसोशीने पाळण्याची रीत असते. भारतीय घटनेत हिंदी व इंग्लिश यांना राष्ट्रीय भाषा म्हणायचे असते, तर 'national languages' म्हटले असते. पण त्यांनी तसे न म्हणता 'official language of the Union' म्हटले आहे.
याचं उदाहरण स्पष्ट करण्यासाठी सिंगापूरच्या प्रजासत्ताकाच्या घटनेतील कलम '१५३ अ' पाहता येईल. हे कलम म्हणते (इंग्लिश मजकूर):
Official languages and national language
153A. —(1) Malay, Mandarin, Tamil and English shall be the 4 official languages in Singapore.
(2) The national language shall be the Malay language and shall be in the Roman script:
Provided that —
(a) no person shall be prohibited or prevented from using or from teaching or learning any other language; and
(b) nothing in this Article shall prejudice the right of the Government to preserve and sustain the use and study of the language of any other community in Singapore.
यात सिंगापूरच्या प्रजासत्ताकाची 'मलय' ही 'राष्ट्रीय भाषा' आहे असा उल्लेख असून 'मलय, मँडरिन चिनी, तमिळ व इंग्लिश या चार अधिकृत भाषा आहेत' (यातील 'अधिकृत भाषा' / 'official language' असा उल्लेख भारतीय राज्यघटनेतील याच उल्लेखाच्या संदर्भात विशेष चिंतनीय आहे.) असा स्पष्ट उल्लेख आहे.
दुसरं उदाहरण शेजारी देशाचं. पाकिस्तानी राज्यघटनेच्या २५१ व्या कलमानुसार 'उर्दू' ही पाकिस्तानाची 'राष्ट्रीय भाषा' आहे असे निस्संदिग्ध रित्या नोंदवले गेले आहे. इंग्लिश मजकूर :
(1) The National language of Pakistan is Urdu, and arrangements shall be made for its being used for official and other purposes within fifteen years from the commencing day.
(2) Subject to clause (1), the English language may be used for official purposes until arrangements are made for its replacement by Urdu.
(3) Without prejudice to the status of the National language, a Provincial Assembly may by law prescribe measures for the leaching, promotion and use of a Provincial language in addition to the National language.
गांधींना कुठले संबोधन वापरावे
गांधींना कुठले संबोधन वापरावे हा ज्याच्या त्याच्या विचारधारणेचा प्रश्न आहे. त्याबद्दल इथे मतप्रदर्शन करणे बरोबर नाही.
>>>
ह्या माझ्याच दोन वाक्यातल्या दुसर्या वाक्याचा संदर्भ, ह्या बीबीचा विषय "गांधींच्या नावापुढे, महात्मा गांधी की गांधीजी अशी उपाधी लावणे/न लावणे हे आदरार्थी आहे की वस्तूनिष्ठ" ह्याचा परिपाठ देणे हा नसून हिंदीच्या राष्ट्रभाषा असल्याच्या प्रचाराबद्दलच्या योग्यायोग्यतेचा उहापोह करणे असा आहे. म्हणून मूळ विषयाला सोडून, त्याबद्दल इथे (या बीबीवर) मतप्रदर्शन करून चर्चेला वेगळे वळण देणे बरोबर नाही असे मी म्हणालो.
(पण आता तसे वळण पाडण्याशिवाय पर्याय नाही.)
गांधींना कुठले संबोधन वापरावे हा ज्याच्या त्याच्या विचारधारणेचा प्रश्न आहे. >> बरोबरच आहे ना. कुठल्याही माणसाला त्याच्या वैचारिक कुवतीनुसार एखाद्या व्यक्तीच्या आणि त्याच्या कार्याची जशी ओळख पटेल, आपल्या संस्कारीत स्वभावानुसार त्या कार्याची किती महती वाटेल, यावरून त्याच्या मनात निर्माण झालेल्या प्रतिमेनुसारच तो त्या व्यक्तीबद्दल स्वतःची मते बनवणार नाही का?
ह्या विचारांच्या जडणघडणीत कुठल्या मतप्रवाहातील व्यक्तींच्या, पुस्तकांच्या आणि इतर इतीहासाशी संबंधित गोष्टींच्या संपर्कात तो येतो ते घटकही त्याची त्या व्यक्तीमत्वाबद्दलची धारणा घडवण्यात महत्वाचे आहेतच ना.
गांधीजींना राष्ट्रपिता उपाधी बहाल करतांनाही नेताजींचे आणि फॉरवर्ड ब्लॉकचे त्यांच्याशी प्रचंड वैचारिक मतभेद होतेच, पुन्हा हिंदू महासभेचेही उदाहरण देताच येईल. मग हा तर गांधीजींचा केवढा अवमान म्हणावा.
वैचारिक मतभिन्नता असली तरीही ऐतिहासिक आणि राष्ट्रीय व्यक्तीमत्वांचा अनादर, अवमान करणे कोणासही क्षम्य नाही आणि इतीहास उगाळण्याचाही हेतू नाही पण सांगण्याचा मुद्दा एवढाच की "इतरांच्या विचारधारणेचा आदर करून मतप्रदर्शन करण्यात काय चूक आहे?" हे खरे असले तरी अनादर ही एवढी सापेक्ष गोष्ट आहे की त्याची सर्वमान्य सीमारेषा आखण्याचे कूटकर्म कोणी करावे.
nandini2911, तुम्ही mansmi18
nandini2911,
तुम्ही mansmi18 यांचा प्रतिसाद नीट वाचुन घ्या एकदा.
<<मी हिंदी ही भारताची (हिंदुस्तानची भाषा) या अर्थी राष्ट्रभाषा मानतो. भारतातील सर्व प्रदेशात समजली जाणारी भारतीय भाषा ही मला वाटते हिंदीच आहे (इंग्लीश आहेच अर्थातच!). >>
हे वाचलात का तुम्ही? की याचा अर्थच कळला नाही तुम्हाला ? उगिच पचकु नका वाट्टेल ते. वरिल वाक्यचा अर्थ कळत नसेल तर, किमान अर्थ तरी समजावुन घ्या, जानकारांकडुन.
mansmi18 यांच्या प्रतिसादाला धरुन मी
<<वर कुणितरी लिहलं होतं की भारतात इंग्रजी मोठ्या प्रमाणात बोलली जाते. अहो दिली-मुंबई-बंगलोर्-चेन्नई व इतर मोठ्या शहरांच्या पलिकडेही हा देश प्रंचड मोठा (आकाराने व लोकसंखेने )आहे.>>
हे वाक्य लिहलं होतं, नको तिथे कावा करायचा नाही.
मधुकर्..डोके ठिकाणावर आहे का
मधुकर्..डोके ठिकाणावर आहे का तुमचे?? भाषा काय वापरताय तुम्ही?? आणि तीपण कशा संदर्भात?? परत एकदा माझा प्रतिसाद नीट वाचा. आणि मग बोला.
मी काहीही कावा केलेला नाही.
मी फक्त तुमच्या एका वाक्याला अनुमोदन दिले होते कारण ते मला पटले होते. आणि त्याला जर तुम्ही "कावा" वगैरे शब्द वापरत असाल तर धन्य आहात. आणि मी कुठे लिहाय्चे आणि कुठे नाही हे तुम्ही सांगण्याचा आवश्यकता नाही.
अॅडमिन, जरा लक्ष द्याल का इकडे?? या माणसाला काही चांगले म्हटले तरी समजत नाही.
shree123 >> अमृतयात्री तुम्ही
shree123 >> अमृतयात्री तुम्ही महाराष्ट्राविषयी जी खालच्या दर्जाची भाषा वापरली आहे ते कशाच्या आधारावर जरा स्पष्ट कराल का ?
>>श्रीसाहेब, आपण सुशिक्षित व मराठी अभिमानी आहात. आपला अभिमान तसाच नेहमी जागृत ठेऊन महाराष्ट्रात फिरा आणि मग तमिळनाडू, बंगाल, कर्नाटक, पंजाब, गुजरात किंवा भारतातील इतर कुठल्याही भागात फिरताना काय वेगळेपण जाणवतं ते पहा. सर्व ठिकाणच्या रेल-वे फॉर्ममध्ये, टपाल खात्याच्या प्रपत्रांत, बॅंका व इतर केंद्र सरकारी कार्यालयांतील पाट्या व फॉर्म्सवर, रस्त्यांतील पाट्यांवर, इत्यादी बाबतीत इतर सर्व राज्यांत स्थानिक भाषा असतेच असते, बर्याचदा हिंदी नसली तरीही. पण मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वत्रच आमच्या भाषेची हेळसांड केली जाते. अनुल्लेखाने तिचा अपमान केला जातो. गावोगावी जिथे सामान्य जनतेला मराठीशिवाय इतर भाषा लिहिणे-वाचणे (कधीकधी बोलणे-समजणे देखिल) माहित नसते, अशा गावातही रेल-वे, टपाल खाते, बॅंका इत्यादी स्थानिक माणसावर मराठीला फाटा देऊन हिंदीच लादतात? आमच्यावरच का म्हणून? तर फक्त आम्हीच चालवून घेतो म्हणून. आणि मराठी माणसाच्या या न्यूनगंडाला इतर काही (मानसिक) कारणांबरोबरच "हिंदी ही राष्ट्रभाषा आहे व मराठी तिच्या खालच्या पातळीची केवळ राज्यभाषा आहे" हा जाणूनबुजून (फक्त महाराष्ट्रातच) पसरवलेला गैरसमज कारणीभूत आहे. "माझ्या राज्यात माझी भाषाच सर्वश्रेष्ठ" हा घटनेने दिलेला अधिकार आपल्याला माहित नसतो आणि माहित झाला तरी तो वापरायची आपल्याला भीती वाटते.
महाराष्ट्राला आपण प्रगत राज्य म्हणवतो. पण ओरिसा, आसाम, हिमाचल यासारख्या अप्रगत (कमी प्रगत) राज्यांतही स्थानिक माणसाच्या भाषेला जे महत्त्वाचे आणि आदराचे स्थान दिले जाते ते आपल्या राज्यात आपल्या भाषेला का मिळत नाही? आमची भाषा कुठल्या दृष्टीने कमअस्सल आहे, की आमचा स्वाभिमानच कमकुवत आहे?
आपल्या मनातील बर्याच प्रश्नांची उत्तरे या लेखात आहेत. अमृतमंथनवरील "हिंदी ही राष्ट्रभाषा..." लेखातील व लेखाखालील प्रश्नोत्तरातील खालील परिच्छेद मुद्दाम पुरेसा वेळ काढून पहा.
<<दुर्दैवाने लहानपणापासून सतत पाजल्या जाणार्या ......... संवेनशील राखले पाहिजे.>>
<<मराठीचा अभिमान बाळगताना ....... हे आपले आद्य कर्तव्य आहे.>>
<<म्हणूनच सर्व मराठी भाषाबंधुंच्या ....... तो म्हणजे आपले महान महाराष्ट्र राज्य !!>>
<<धन्यवाद. हे सत्य महाराष्ट्रात नेहमीच लपवलं ......... या मानसिकतेतून बाहेर काढायलाच हवे.>>
All these legal complications ..... naive politician either.
Pandit Nehru, during the debate ............. game that the politicians played.
Some time back, I had also read somewhere .......... game of the politicians continues.
With so much background, let us ............ have developed numbness all over.
Recently, we carried out a study .......... What do you have to say about this?
I hope, I have been able to make the legal position ......... our beloved mother tongue rightfully deserves in our state.
(Part-2) Further, regarding your point ........... self confidence and pride for our own language and culture to some extent. Thanks.
Now Part-3 of my reply. Your sentence ............. which is the main purpose of this blog. Thanks a lot.
शिवाय अमृतमंथन’वरील ’पन्हाळा: एक अनुभव. मराठी माणसाची अधोगती – स्वाभिमान ते निरभिमान’ हा लेख देखिल अवश्य वाचा.
http://amrutmanthan.wordpress.com/2009/09/18/पन्हाळा-एक-अनुभव-मराठी-मा/
वरील सर्व भाग मुद्दाम वेळ काढून काळजीपूर्वक वाचलेत तर आपल्या बहुतेक शंकांचे निरसन होईल अशी आशा वाटते. याहून अधिक काय सांगणार?
माझ्या लिहिण्याचा गैरसमज करून घेऊ नये. 'तुम्ही विरुद्ध मी' अशी ही लढाई नाही. तुम्ही व मी एका बाजूस आणि मराठीची गळचेपी करणारे सर्वच विरुद्ध बाजूस अशी ही लढाई आहे. कायद्याचा पाठिंबा असूनही, दहा कोटी जनता मराठी असूनही आपण सर्वच आघाड्यांवर नेहमी हरतो कारण आपल्यात एकी नाही, जागृती नाही आणि आपण दैनंदिन व्यावहारिक जीवनात उंदीर-स्पर्धेमध्ये (rat-raceचे अडाणी भाषांतर) धावण्याच्या भरात स्वाभिमान विसरलो आहोत, हेच एकमेव दुःख.
माझ्या लिहिण्याचा गैरसमज करून
माझ्या लिहिण्याचा गैरसमज करून घेऊ नये. 'तुम्ही विरुद्ध मी' अशी ही लढाई नाही. तुम्ही व मी एका बाजूस आणि मराठीची गळचेपी करणारे सर्वच विरुद्ध बाजूस अशी ही लढाई आहे. कायद्याचा पाठिंबा असूनही, दहा कोटी जनता मराठी असूनही आपण सर्वच आघाड्यांवर नेहमी हरतो कारण आपल्यात एकी नाही, जागृती नाही आणि आपण दैनंदिन व्यावहारिक जीवनात उंदीर-स्पर्धेमध्ये (rat-raceचे अडाणी भाषांतर) धावण्याच्या भरात स्वाभिमान विसरलो आहोत, हेच एकमेव दुःख.>>
मग त्यात हिन्दी भाषेचा काय दोष? तुम्ही बोला ना मराठीत. काम करा मराठीत. मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व इंडस्ट्री मधे संपूर्ण मराठीत काम केले आहे.
हिन्दी राज्य सरकारी पातळीवर नको असेल तर आन्दोलन करावे लागेल तुम्हालाच. रेल्वे व पोस्ट या भारत सरकारच्या सेवा आहेत. त्याना वापरूदे त्यान्ची भाषा. दोन्ही भाषांचे स्क्रिप्ट( लीपी) एकच आहे यामुळेही तसे होत असेल. सोयी साठी. बाकी भारतीय भाषांची लीपी वेगळी वेगळी आहे. त्यामुळे जे सगळी कडे चालते ते वापरायचे असे होत असेल. प्रत्येक राज्यात १८ - २० भाषांतून कारभार कसा करणार. मग उधळपट्टीचा नवा बीबी तयारच आहे.
समाजात एकी नसणे, स्वाभिमान विसरणे, जाग्रुती नसणे यात एका असलेल्या भाषेचा काय दोष? रिडी़क्युलस.
>>मग त्यात हिन्दी भाषेचा काय
>>मग त्यात हिन्दी भाषेचा काय दोष?
असं कोणी म्हटलंय मामी? 'हिंदी राष्ट्रभाषा आहे' असं ठसवत मराठीवर अधिक्रमण करणार्यांबद्दल अमृतयात्री वरील पोस्टीत बोलले आहेत. उगाच सुतावरून स्वर्ग न गाठता, अन्वयार्थ पुन्हा एकदा तपासून बघाल का?
>. प्रत्येक राज्यात १८ - २० भाषांतून कारभार कसा करणार.
कहर आहे! पुन्हा, असं कोण म्हणतंय, मामी? जरा नीट विश्लेषून बघाल का?
>> रिडी़क्युलस.
बरं, ठीके. आतातरी ढेकर येईल ना?
वर संदर्भा सहितच लिहिले आहे.
वर संदर्भा सहितच लिहिले आहे. तुम्हीच काय ते विश्लेशा. : P
चला. आता लोक वैयक्तिक टीका
चला. आता लोक वैयक्तिक टीका करणे, एकमेकांची अक्कल काढणे असे लिहू लागले. म्हणजे लवकरच ही चर्चा बंद पडणार. पुनः निष्पन्न काही नाही.
अमेरिकेत कायद्याने अजूनहि इंग्रजीच राष्ट्रभाषा आहे. पण मायामी ला जाऊन पहा, स्पॅनिश येत नसेल तर परदेशात गेल्यासारखे वाटते! तेंव्हा कायद्याने असो वा नसो, लोक त्यांना जे सोयीचे वाटते तेच बोलणार.
पण मायामी ला जाऊन पहा,
पण मायामी ला जाऊन पहा, स्पॅनिश येत नसेल तर परदेशात गेल्यासारखे वाटते! >>>> ऐ.ते.न.!! मी ३ वेळा गेलो.. स्पॅनिश येत नसून काही अडचण आली नाही... बाकी चालू द्या.
आपल्याकडे असलेल्या असंख्य
आपल्याकडे असलेल्या असंख्य प्रश्णांपैकी एक आपणच कारण नसताना निर्माण केलेला हा एक प्रश्ण. भाषेचा.
खर म्हणजे भांडायच असेल तरच भाषेचा प्रश्ण येतो. सामोपचाराने काही करायचे असेल तर कुठलिही भाषा वापरली जाते आणि तरी चालते. अगदी मौन सुद्धा.
मला इथे इंडोनेशियाचे उदाहरण देणे उचित वाटते. जेंव्हा इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा त्यांनी मलायू भाषेची निवड केली. जावानीज बोलणारी लोकसंख्या खूप जास्ती असून सुद्धा. कारण मलायू भाषा शिकायला खूप सोपी आहे. त्यात व्याकरण फारस नाहीच. काळ नाही, लिंग नाही. त्यामूळे क्रियापदाची वेगवेगळी रुपेही नाहीत. ३००० बेटांमधे वसती असलेल्या देशाला जोडणारी भाषा निवडण्यात सुकार्नोनी फार मोठा द्रष्टेपणा दाखवला होता.
आपल्याला राष्ट्रभाषा पाहिजे का. माझ्या मते पाहिजेच. आता अशी कुठली नविन भाषा शोधण्यापेक्षा हिंदीलाच हा अधिक्रुत दर्जा द्यावा. भाषा सोपी करावी की सगळ्यांना सहज समजेल. भाषा धर्म, जाती-पाती याकडे येती ५० वर्षे आपण दुर्लक्ष करायचे ठरवले तर विकासाकडे लक्ष देता येउन सामाजिक असमतेतून निर्माण होणारे हे प्रष्ण आपोआपच दूर होतिल.
नाहीतर सध्याचे राज्-कारण बघता पुण्याहून बंगलोरला जाण्यासाठी व्हिसा लागण्याची वेळ लवकरच येइल. आणि त्यानंतर अगदी नागपूरला जायला सुद्धा.
ह्यात बाळबोधपणा , आरोप ,
ह्यात बाळबोधपणा , आरोप , कुंभाड म्हणण्यासारखं मी काय बोललोय . मी फक्त म्हंटलय " हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन " .
फ तुम्हाला तुमचाच दृष्टीकोन बाळबोध , कुंभाड वाटतोय का ???
अमृतयात्री >> >मुंबई व काही शहर सोडली तर संपुर्ण महाराष्ट्रात मराठीच बोलली जाते . त्यामुळे मराठीची हेळसांड होण्याचा प्रश्न्च नाही . आमच्या लोकांना हिंदी येते /समजते कारण हिंदी सिनेमा व हिंदी आणि मराठी समान स्क्रिप्ट . आणि पोष्टाच्या बोर्डावर मराठी सोबत हिंदी वाक्य लावल्याने मराठी माणुस कमकुवत होईल असं मला तरी वाटत नाही .
मराठीवर बाहेरचा कोणीही अधिक्रमण करु शकत नाही . एखाद वेळेस आमच्यातलेच सुर्याजी पिसाळ तसा प्रयत्न करतील .
श्री अनुमोदन. ते त्यान्चा
श्री अनुमोदन. ते त्यान्चा पॉइंट विसरलेत. जाने दो.
>>फ तुम्हाला तुमचाच दृष्टीकोन
>>फ तुम्हाला तुमचाच दृष्टीकोन बाळबोध , कुंभाड वाटतोय का ???<<
श्री, तुमची भाषाविषयक कौशल्ये मला (किंबहुना, समस्तांस) तोंडात बोटे घालायला लावणारी आहेत!
अश्विनीमामी, चालू दे तुमचा थयथयाट!
असो. या धाग्यावरील तुमच्या लीळांवर माझी ही शेवटची टिप्पणी. ('मर्यादेऽयं विराजते' म्हणतात तसं.. नाहीतर, तुमच्या टिप्पण्यांमुळे असाच वाहवत लिहीत राहिलो, तर 'गुण' लागल्यासारख्या माझ्या टिप्पण्याही मनोरंजक वाटू लागतील.)
दोन फाटे फुटले आहेत पोष्ट्ला
दोन फाटे फुटले आहेत पोष्ट्ला १. हिन्दी भाषा २. म. गान्धी.
१.हिन्दी भाषा > तुम्ही सान्गितलेले वास्तव जरी असले तरी त्याने आमच्या आयुष्यात फार फरक पडत नाही त्यामुळे एव्हडा वाद का आणि कशासाठी?
२. म. गान्धीचा अपमान करण्याचा तुमचा छुपा हेतु असेल तर निषेध नसेल तर तुम्हाला अधिकार आहे त्याना मो.क्.गान्धी सम्बोधायचा.
पुण्यातल्या काही घरान्मधे त्याना "थेरडा, म्हातारा"असे सम्बोधले जाते ते मात्र खरेच अपमानास्पद असते.त्याचा मात्र तीव्र निषेध.
......
मुळ मुद्दा काय तर हिंदी ही
मुळ मुद्दा काय तर हिंदी ही राष्त्रभाशा ( संविदानाप्रमाने) नाही.
यात मराठीचा -हास घुसवु नका.
बाकी या ठीकाणि बरचं ज्ञान मिळालं मला.
त्या बद्दल धन्यवाद.
Ashwinimami आणी pha
गांधी मुद्दा जास्त न ताणता सोडल्याबद्दल आभार.
कारण तो खुम सेनसिटीव मुद्दा आहे.
या बीबीचा खरच फायदा झाला हे परत एकदा सांगतो.
धन्यवाद.
Pages