वटपौर्णिमा: contract renewal (शतशब्दकथा) (version 1 & 2 हे लिखाणातले प्रयोग आहेत)

Submitted by कविन on 28 June, 2018 - 01:31

(Version 1)

हॅलो! पोहोचलीस का ऑफीसला? गर्दी होती का?

हो, मगाशीच पोहोचले आणि गर्दीही नव्हती फारशी आज. चक्कं बसायलाही मिळालं.

नशीब म्हणायच. पण काय अडलं होतं का इतक्या गर्दीत साडी नेसून जायच?

अरे! वटपोर्णिमा आहे आज.

ते मलाही माहिती आहे. पण पुजा आणि उपवास दोन्ही तू बंद केल होतस ना?

हो रे, केव्हाच बंद केलय.

मग? हे साडीच काय खूळ उगाच?

हे असच नटायला निमित्त रे काहीतरी

ह्म्म! मग ठिक आहे. पण आपला पॅक्ट लक्षात आहे ना?

येस बॉस! तो नाही विसरले

विसरू पण नकोस. आपापल्या जोडीदारांसोबत हा शेवटचा जन्म. पुढचे सगळे जन्म तू माझी आणि मी तुझा! पॅक्ट आहे हा आपला.
---------------------------------- -------------------------

(Version 2)

हॅलो! पोहोचलीस का ऑफीसला? गर्दी होती का?

हो, मगाशीच पोहोचले आणि गर्दीही नव्हती फारशी आज. चक्कं बसायलाही मिळालं.

नशीब म्हणायच. पण काय अडलं होतं का इतक्या गर्दीत साडी नेसून जायच?

ओय! वटपोर्णिमा आहे आज.

ते मलाही माहिती आहे. पण पुजा आणि उपवास दोन्ही तू बंद केल होतस ना?

हो ते फार पूर्वीच बंद केलय.

मग? वटपोर्णिमेनिमित्त म्हणत साडीच काय खूळ उगाच?

हे असच नटायला निमित्त नको का?

ह्म्म! मग ठिक आहे. पण आपला पॅक्ट लक्षात आहे ना?

येस! तो नाही विसरले.

विसरू पण नकोस. आपापल्या जोडीदारांसोबत हा शेवटचा जन्म. पुढचे सगळे जन्म तू माझी आणि मी तुझी असा पॅक्ट आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
शेवटचा ट्विस्ट आवडला.

यमराज म्हणेल- "येक पे रहना जी..." Wink

धन्यवाद मंडळी Happy

शेवटचा ट्विस्ट आवडला.>>> वोईच तो. नाल मिळाला म्हणून घोडा खरेदी केला असं झालय ते Lol

मग
सौ बार जनम लेंगे, सौ बार फना होंगे ....हम तुम न जुदा होंगे
वगैरे याचे काय झाले?
बाकी फना होण्यासाठी पुनः पुन: जन्म घेण्यापेक्षा एकदा फना झाल्यास दुसर्‍यावेळी दुसरीकडे चान्स घेणे शहाणपणाचेच.

मस्त आहे Happy

आमच्याकडे रात्री बायकोने माझ्या पाया पडल्या तसे उलट मी सुद्धा तिच्या लोटांगण घातले आणि म्हणालो बस की आता, सात जन्माला मागते का मला..
एकतर ईथे एकाच जोडीदारासोबत अखंड 40-50 वर्षांचे आयुष्य काढावे लागते असं आपले कल्चर आहे. निदान दुसरया जन्मात तरी वेगळा चॉईस मिळू दे..

धन्यवाद माबोकर्स Happy

आज अजून एक वर्जन प्रयोग म्हणून लिहून काढलय. नंदिनीच्या व्हॉट्स ॲप मेसेजमुळे हे वर्जन लिहील गेल. नंदे तुझे आभार Happy