Submitted by दत्तात्रय साळुंके on 27 June, 2018 - 06:06
असोशी विठूची
देव नाही गाभाऱ्यात
ओस झाले मंदिरही
सुनी सुनी पायरीही
दैन्य आले कळसाही
दिंडी घेऊनीया विठू
प्रगटला भिमातीरी
टाळ मृदंग गजरी
विठू झाला वारकरी
चंद्रभागेच्या जळात
भक्ती तरंग उठतो
नाथ तीथे अनाथांचा
वारकऱ्यासंगे न्हातो
युगे युगे ताटातूट
जीव नाही की थाऱ्याला
भाग गेला शीण गेला
कृष्ण सुदामा भेटला
विठू देहात भरला
विठू अष्टगंध टिळा
विठू तुळशीची माळ
विठू सर्वांग सोहळा
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अहाहा..... केवळ सुंदर,
अहाहा..... केवळ सुंदर, भक्तिपूर्ण रचना....
____/\____
भक्तीभाव आहे कवितेत.
भक्तीभाव आहे कवितेत. शीर्षकावरून जपानी काव्य वाटले होते..
शशांकजी खूप धन्यवाद
शशांकजी खूप धन्यवाद
मधुरांबे खूप धन्यवाद
छानच दत्तात्रयजी.
छानच दत्तात्रयजी.
वाह! अप्रतिम.
वाह! अप्रतिम.
वाह! सुरेखच! आवडली.
वाह! सुरेखच! आवडली.
भास्कराचार्यजी , अक्षयजी,
भास्कराचार्यजी , अक्षयजी, शालीजी खूप धन्यवाद