बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चैतन्यकांडी ...
>>>>>>>>>>

जाम हसलो ... Happy अगोदर कळल नाही, पण लक्षात आल लगेच.. Lol

बाकी मला नाही वाटत मेघा समर्थकांना आउ बद्दल प्रेम आहे म्हणून, त्या असून नसल्यासारख्या आह्र्त त्या गृप मधे.
Submitted by दीपांजली on 25 June, 2018
>>>>>
कस असेल... आउ पण फुल लावालावी करतात...
काल रेशमला आउनेच सांगीतल की सई ने कपड्यावरुन जे बोलली ते मेघाच्या सांगण्यावरुन होत.

मेघा तस काही सईला बोलताना दिसलीच नाही, उलट मेघालाही ते सईच वागण नव्हात आवडल..
मला वाटत आता आउ ला शाल व श्रीफळ देण्याची वेळ आलेली आहे.. Happy

त्या कानाच्या टास्क मध्ये खरच मानल राव मेघाला...
- विचारा मध्ये पुर्ण स्पष्टता असते..
- मुद्दे सुद मांडणी.
- प्रत्येक आरोपाची योग्य हाताळणी व उत्तर ( उगाच त्या रेशम सारखा अक्रश्थाळेपणा नाही )
- मीत्रांची जरी चुक असली तर ती न लवपता योग्या पध्दतीने कान उघडणी.

तिने फक्त पुष्कर पासुन खुप सावध रहायला हव, तो तिला खुप मोठा दगा करनार..

आज सगळेच जरा सोबर खेळले टास्क.... सई जरा आगाऊपणा करत होती पण मजा आली तिच्यामुळे नाहीतर फारच सपक झाला असता टास्क!
रेशमने पण चांगली केली संचालकगिरी!

सईच्या त्या एका सॉरीने (त्याची गरज नव्हती तरी ) घरातले वातावरण क्षणार्धात पालटले.... आणि तरीही तिलाच निगेटीव्हीटी स्प्रेड करते वगैरे म्हणत असतात सगळे!

माझे आवडते दोघेजण सेफ असल्याने (पुष्कर, मेघा), माझी जबाबदारी म्हणजे voting स्मिताला करण्याची. मी तसं करणार.

शरा कदाचित Top 5 मध्ये नसेलच..... कारण अधेमध्ये येऊन शेवट पर्यंत जाता येतं याचा विचार पुढील सिझन मधील स्पर्धक नक्कीच करतील....
त्यामुळे आऊ... नं कि.... शरा.... तीन आठवडे.... तीन elimination...

आज मेघा आणि सईची स्मिता target होती. तेव्हा रेशमचं काही लक्ष नव्हतं. नंतर काही नियम परत वाचून दाखवताना, संगनमत करायचं नाही ते ऐकून पुष्कर म्हणाला सईला आणि मेघाला मी task फेअरली खेळणार, तुमचं ऐकणार नाही, स्मिताला target करा असं. आधी ऐकलं त्याने आणि आस्तादने पण नंतर समहाऊ पुष्करला पटलं नाही.

रेशमने कॅप्टन म्हणून task मध्ये तरी खुन्नस नाही काढली, फेअर वाटली. तिने स्मिता सई केसमध्ये दोघींची चूक होती म्हणाली. तसच चौगुले सारखी पुष्करची तक्रार करत होता तिथेही तिने त्याची बाजू घेऊन उगाच पुष्करला दटावले असं नाही केलं. जिथे सईची चूक होती तिथेच बोलली. खरं म्हणजे स्मिताला धक्का दिलेला सईने पण ते जाणूनबुजून नव्हतं, पण स्मिताला लागलं असते खूप. उलट असते तर सईने कांगावा केला असता मात्र. पुष्करच्या नाकाला पण स्मितामुळे नकळत लागलं, त्यानेही कांगावा नाही केला.

रेशमला आता वास्तवाचे भान आले आहे. शेवटचे काहीच दिवस उरलेत ते नीट वागुन घालवु आणि चांगली इमेज बनवु असे तिला वाटत असावे. महेश हिंट्सही देतो की तिला. ती बरोबर घेते त्या. इमेज बिल्डिंग जोरात आहे.

channel चा सपोर्ट पण आहे असं म्हणतात ते खरं वाटायला लागलंय. त्यांच्या grp मध्ये खरी स्मिता गुणी आहे पण तिला जाऊ देणार नाहीत फायनलला.

स्मिता डंब आहे.. ती बिग बॉस मधे आहे हे लक्षात घ्या.. टास्क नुसतं चांगलं करुन काय उपयोग? तिचा काहीच स्टॅण्ड नसतो कशाच बाबत...
तिला स्वतःचं मतच नाहीये...

पुष्की मेघाला दगा तर देणारच आहे पण सईचा पण वापर करुन घरातून बाहेर पडल्यावर तिला लाथ मारणार आहे

सई मुर्ख आहे.... मेघा अति बोलते, पुढे पुढे करते ब्ला ब्ला ब्ला... जे असेल त्यातही तीच जिंकतेय टास्क हे लक्शात नाही येत का सईच्या?
आज अस्ताद आणि मेघाचे एजोडी असती तरी मेघाच जिंकली असती, सई आणि पुष्कर असता तर पुष्कर हरला असता..
डोळे उघडून बघा म्हणावं..

मेघाने आता कोणालाही काही सल्ले देणं बंद करावं.. तुझी तू खेळ.. नंतर आले ना ते म्हणत की मला का नाही सांगितलं की शांतपणे तुम्हालाच क्रेडिट हवं होतं आणि स्वतःच्या डोक्याने खेळायचं होतं तेंव्हा खेळू दिलं मी... मग अक्कल ठिकाणावर येईल यांची..

मेघाला पुष्कर दगा देणार आहेच पण सई पण दगा देणार आहे... त्यापेक्षा तीने शराला जवळ करावं आता

मेघाला पुष्कर दगा देणार आहेच पण सई पण दगा देणार आहे... >>> हे मनातलं बोललीस बघ. परवाच किती स्वार्थीपणा केला दोघांनी, मेघाला बाजूला केलंचं पण जर सईच्या पायाला लागलेलं आणि कंबर दुखत होती तर शर्मिष्ठाला पुढे करायचं ना, तर नाही. बरं मेघा तिने मध्ये उभे राहावे म्हणून प्रयत्न करत होती तर बाईसाहेब उशिरा आल्या. वरून मेघाला उलटसुलट बोलल्या.

मला पुष्कर आवडतो तरी हे लिहिलं.

आता जर मेघा फार फ्रेंडशिप फ्रेंडशिप करत बस्स्ली तर चूक तिची , त्या दोघांची नाही !
आता गेम इंडीव्हिज्युअल झालाय आणि प्रत्येकानीच स्वतःपुरत पहाय्ला हवय, प्रत्येक मेंबर तयार आहे आता दुसर्याला ढकलून पुढे जायला,
एव्हरीथिंग इज फेअर नाउ , नथिंग राँग !
सई मेघा दोघींनी आता नवरा बायको सारखे रुस्स्वे फुगवे बन्द करायला हवेत, नाहीतर पुष्कर कधी दोघींच्या पुढे जाईल समजणार नाही त्यांना.
तो या दोघींइतका मैत्रीत इमोशनली इन्व्हॉल्व्हड नाहीये !
अन्जु,
स्मिता जाणार नाही, तिचं पी.आर मस्तं काम करतय , येइल ती फिनालेला टॉप ६ मधे.

अन्जु,
स्मिता जाणार नाही, तिचं पी.आर मस्तं काम करतय , येइल ती फिनालेला टॉप ६ मधे. >>> होऊ दे ग तसं पण channel ला रे आ हवे असतील तर स्मिताला धोका आहे असं वाटतं मला.

रे आ पण येतील, स्मिताही येइल.
रे, आ, स्मिता, मेघा , सई, पुष्कर असे ६ लोक असणार बहुदा फिनालेला कारण आता ३ च आठ्वडे उरलेत, दोन्ही गृपचे ३ म्हणजे बॅलन्सही झाला !
नंकि, आउ, शर्मिष्ठा एलिमिनेट होतील कदाचित.

सहा असतात का पाच. मगाशी you tubeवर दिपाली सय्यद wild card entry घेऊन येईल असा एक व्हिडीओ बघितला मग तो गायब झाला. आता कशाला अशी एन्ट्री.

>>आता जर मेघा फार फ्रेंडशिप फ्रेंडशिप करत बस्स्ली तर चूक तिची , त्या दोघांची नाही !

अगदी अगदी!
मेघाने आता खरच सल्ले देउ नयेत!

स्मिता खरच भलत्याच विश्वात असते.... कालपण रेशम आणि आस्ताद जेंव्हा चौगुलेबद्दल बोलत होते की त्याला वाईट वाटत असणार, तो actually खुप चांगला आहे वगैरे तेंव्हासुद्धा स्मिता म्हणत होती की तो कंफ्यूज झाला असणार, त्याला टास्क नीट कळलाच नसणार वगैरे वगैरे तेंव्हा आस्तादने टास्क नाही तर ते वोट अपीलबद्दल बोलतायत असे सांगून तिची गाडी परत रुळावर आणायचा प्रयत्न केला!
बिच्चारी!..... चुकीच्या ग्रूपमध्ये पडलीय!

कालचा भाग बराच एंटरटेनिंग वाटला. सई थोडी इरिटेट झाली, पण ‘एक चुटकी रांगोळी‘ वगैरे टीपी करत तिने मजा आणली. रेशम पण संचालक म्हणून एकदम परफेक्ट ! साॅरी म्हणून सई आणि माफ करुन व संचालक म्हणून योग्य स्टॅन्ड घेऊन रेशम दोघींनी पब्लिक सपोर्ट कालच्या भागात कमवला असणार.
पुष्की ने नंकी ला संधी मिळेल तसं आणि तेव्हा झोडलं.
आजच्या भागाची झलक दिसली त्यात उना लिपस्टिक लावून माॅड्रन कपड्यात शराशी भांडताना आणि शेवटी थोबाडीत मारताना दिसली. एखादा टास्कच असायची शक्यता वाटतीये.

क्रेडिट काय मागत होते सगळे मेघाला. सई /आस्ताद चिडीचं खेळत होते, पण आस्ताद असल्यामुळे कदाचित रेशमाने माती नाही काढली . चौगुले आज खूप गरीब बिचारे वाटले, बोलले तरी प्रॉब्लेम नाही बोलले तरी प्रॉब्लेम.त्यांची सिक्रेट कार्य सांगितली नाहीत 'बिग बॉस ने. काहीतरी गोची आहे नक्की. खेळात स्टॉप प्रकरण काही कळले नाही मला. पुष्कर अंडर प्रेशर अतिशय गडबडतो. त्या मानाने मेघा कंपोज्ड वाटते. त्याचं सतत मी माझ्या मनानं खेळणार प्रेक्षकांना सांगितल्यासारख वाटत. असो. यावेळेस आऊ बाहेर जायला पाहिजेत . काड्या लावत बसतात बाकी काही नाही.

यावेळी कोणाला मत द्यावं याचा संभ्रम आहे. सई की स्मिता?

जाणार तर तशीही आउ आहे. किंवा शरा फारतर.

सई : टास्कस चांगली करते, मेघाच्या गृपमध्ये आहे पण हल्ली चिडचिड फार करते. आणि जरी आता प्रत्येकानं आपापलं खेळायचं ठरवलं आहे तरी जर मत देण्याची वेळ आली तर सई अजूनही गृपच्या हिताचा विचार करेल. सई आणि मेघा जोडी इतक्यात तरी एलिमिनेशनमुळे फुटायला नको आहे.
स्मिता: टास्कस चांगली करते पण अजूनही काही ठाम स्टँड घेऊ शकत नाही. शिवाय व्हिलन गँगमध्ये आहे.

सई राहिली तर मेघा गृपमधील नंबर्स तरी योग्य राहतील. आउ गेल्यानं काही फरक पडणार नाहीये. शरा गेली तर एक मात्र फरक पडेल. ती एक चांगला सपोर्ट होती मेघागृप करता.

ठीक आहे, माझं मत सईलाच.

:प्रचार मोड ऑनः तुम्हीही तुमचं बहुमोल मत सईलाच द्या. :प्रचार मोड ऑफः

खेळात स्टॉप प्रकरण काही कळले नाही मला. >>>>> सै आ चा कंटेनर पडल्यावर त्या सगळ्यांनी ठरवलं होत बहुतेक कि तस काही पुन्हा घडायची शक्यता वाटली कि स्टॉप स्टॉप म्हणायचं.

काल सईच जरा एन्टरटेनिंग होती. रेशम फरफेक्ट संचालक, रेशम सुधारतेय Happy

चला आवडत्या शरा ला वोट देतो Happy

काल शरा एकटी असुन छान खेळली.. तिही खरच छान खेळते..एकंदरीत छानच आहे ती.. सईने मज्जा आणली खेळामध्ये.. थोडी नौटंकी का होईना केली पण तो खेळ त्यामुळे सुसह्य झाला.. ते दोघेच खरं जिंकले असते पण त्यांची ती रांगोळी सगळी सांडली.. कधी नव्हे ते रेशम यावेळी संचालक म्हणुन बरी वाटली. बोलण्याचा टोन बदलावा तिने टगी वाटते बोलण्याने. :)..
मत मात्र सईलाच Happy

कालच्या खेळात सईनी मजा आणली. खेळात गोडी हवी तशीच थोडी खोडी पण हवी. हे सईला बरोबर समजले आहे. टास्क हरले तरी करमणूक केली सईनी!

शरा एकटी खेळत असूनही छान झुंजत होती.

रेशमही संचालक म्हणून काल प्रथमच आवडली.

मेघा सपोर्टर असाल तर आता तिच्या स्ट्रॉंग काँपिटीशनला अजिबात व्होट देउ नका Happy
मेघाची मैत्रीण/ तिचा गृप वाचला पाहिजे वगैरे इमोशनल विचार आता करु नका !

Pages