बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ती स्मिता गालातल्या गालात हसत होती म मां रागवत असताना.
मी मारल्यासारखे करतो, तुम्ही लागल्यासारखे करा असे तर नाहीये ना?

मी मारल्यासारखे करतो, तुम्ही लागल्यासारखे करा असे तर नाहीये ना?>>>हेच लिहीलं मी त्यादिवशी चॅनलच्या फेबुवर पेजवर न राहावून.

आज म मां नी मस्त झापलं, मला आवडलं.

मी पण दोन दिवसांपूर्वी लिहून आलेले रे आ बसल्याबसल्या कामधाम न करता कुचाळक्या करतात आणि विषय असतो जास्त करुन मेघा. स्मिताच्या काही गोष्टी आवडल्या नव्हत्या, ते मीपण पेजवर लिहून आलेले, इथेही लिहिलेलं, त्याबद्दल बोलले बरं झालं. फक्त पुष्करला कसे नाही बोलले की तूही मेघाने bb चं ऐकलं नाही हे मला नाही पटले असं बोललास ते.

आ रे ला बोलले ते बरंच झालं. त्या चौगुलेला झापलं ते उत्तम. अति बायस्ड होता आणि तो कॅमेऱ्यासमोर बडबडला तेही नव्हतं आवडलं.

स्मिताला पण आस्ताद व्हिलन वाटतो हे भारी वाटलं, उगाच confused नाही झाली तिथे, दिलं पटकन उत्तर. पण तिला चौगुले का आवडतो, आणि बाकीच्यांना पण काय माहिती.

नाही, ह्यावेळी voting lines बंद होत्या आणि सईतर नॉमिनेट पण नाहीये.

आज सई, मेघा, शर्मिष्ठा, स्मिता छान दिसत होत्या.

ती स्मिता गालातल्या गालात हसत होती म मां रागवत असताना.
मी मारल्यासारखे करतो, तुम्ही लागल्यासारखे करा असे तर नाहीये ना? >>> मला उलट तिच्या डोळ्यात पाणी दिसलं.

Marathi typing mobilewarun karanyasathi kay karawe?
Megha irritating asel.. study karun aaleli pan asel.. pan khadus nahiye..
Astad aani resham atishay khadus aahet..
Smita pan baryachada swata:ha la far hushar samajun megha group la lecture deun yete..
Meghala charity lecture dene tar maha khadus..

Megha kharachach tichya group shi pahilya pasun khari loyal ahe..

स्मिता काही वेळा चुकीचं बोलते मान्य पण सतत नाही बोलत. दोनतीनदा सई बद्दल बोलली आणि परवा मेघाला पण चुकीचा सल्ला दिला ते मला आवडलं नाही पण आ रे सतत कुचाळक्या करतात आणि सई सतत स्मिताला बोलते अति.

Megha kharachach tichya group shi pahilya pasun khari loyal ahe.. >>> अगदी मान्य. पण तिच्याशी सई किंवा पुष्कर तेवढे लॉयल नाहीत.

रेशमने स्केटींग टास्क मधे सई चे बूट उचकटले. त्यावरून म मा आस्ताद ला बोलत होते, कि तू संचालक होतास तर या कृती विरूद्ध बोलला का नाहीस.
रेशमने टास्क नीट केले नाही तर व्यवस्थित चीटींन्ग केली. आणि मेघावर ओरडणारे आस्ताद बाळ मात्र रेशमताईचे कौशल्य कौतुकाने बघत होते. तिने सई चा बूट उचकटला. त्यामुळे तोल जाऊन सई खाली पडली आणि तिच्या पाठीला आधीच इन्जुरी झालेली असल्याने पाठ परत दुखायला लागली. तरीही सई टास्क सुरु ठेवायचा प्रयत्न करत होती, पण बूटच निघाल्याने तिला चालता येत नव्हते. रेशम नी बूट उचकटला हे सईला कळलेच नाही. अआणि तिचा ग्रूपपमधील कोणीही हे बघितले नसल्याने त्यांनाही कळले नाही.
मी सईचा बूट उचकटला असे रेशम स्मिताला नंतर स्वतःहुन खुशीनी सांगत होती. सई ला आधीच पाठीची इन्जुरी झालेली असूनही तिने परत सईला आपटवले आणि तिची दुखापत वाढवली. तरी बयेला आपण सईला दुखापत पोचवल्याचे काहीही वाईट / गिल्ट वाटत नव्हते. रेशम टीम सुरवातीपासूनच विरोधी टीम मेम्बर्ना आपल्या कृतीने किती गंभीर शारीरिक दुखापत होऊ शकेल याचा जराही विचार करताना दिसत नाही. आणि दुखापत झाल्यावर सुद्धा या हलकटांना त्याचे वाईट वाट्त नाही. मेघाला सुद्धा चौकटीच्या टास्क मधे असेच पाडले होते. नशिबाने तिला काही लागले नाही. जुई ने फेकलेली वीट आउंना लागल्यावर त्या रडत असताना सुद्धा रेशम त्यांच्या अंगावर खेकसत होती. रेशम हलकटच नाही तर अतिशय हिंसक आणि खुनशी बाई आहे , असे तिच्या वागण्यावरून दिसते आहे.
बूट उचकटल्यावर सई खाली पडणार आणि अचानक पडल्यामुळे लागणार हे साहजिक होते. याचा अंदाज येऊनही किन्वा हे लक्षात न घेता जरी रेशमने सई ला शारीरिक इजा पोहोचवली असली , तरी सईला शारीरिक दुखापत करण्यास रेशम जबाबदार आहे, जे बिग बॉस मधे अलाउड नाहीये. म्हणुन रेशमला याबद्दल शिक्षा व्हायलाच पाहिजे.

ममांचं नंदकिशोर, अस्ताद आणि रेशमला रागावणं अगदी फुसकं होतं आज. रेशमला तर काहीच विशेष रागावले नाहीत. शिवाय या तीन माजोरड्यांना काही फरकही पडला नाही. ते तितकेच निलाजरेपणे काउंटर आर्ग्युमेंटस करत राहिले.

ममांनी यावेळी क्लिपा का दाखवल्या नाहीत? आणि या तिघांना सॉरी का म्हणायला लावलं नाही? मागच्यावेळी मेघाला तर किती वेळा तिनं सॉरी म्हटलं नाही म्हणून टोचून बोलत होते?

मी जो मुद्दा मांडला होता की रेशमला जसं सईचे बूट उखडायला संधी होती , मागून धक्का मारायला संधी होती तशी सईला नसल्यानं ते करणं बरोबर नव्हतं तो मुद्दा ममांनी देखिल सांगितला.

अस्तादला मेघाबद्दल सतत बोलतो म्हणून, स्मिताला मेघाला चॅरिटी वरून बोलल्याबद्दल आणि नंकीला इतरांना पर्सनल गोष्टींवरून बोलल्याबद्दल बरंच झापलं ते समाधानकारक होतं पण दगडात पाणी कितपत झिरपलंय याबद्दल मी साशंक आहे.

बाकी आज मेघानं पहिल्यांदाच साडी नेसली होती. ती खूपच सुरेख दिसत होती. शराची साडी नेहमीप्रमाणेच सुंदर होती. शरा नेहमीच खूप प्रसन्न दिसते. मला आवडते. रेशम नेहमीप्रमाणेच ' दे दान सुटे गिरान' स्टाईलमध्ये अवतारात बसली होती. नंकी आपली गुर्मी पांघरून बसला होता. स्मिताचे कपडे आताशा फारच विचित्र होत आहेत. स्पॉन्सरशिप आटली की आता स्पॉन्सरच्या ट्रंकेच्या तळाशी असलेले कपडे ती पाठवायला लागलेय. इतके कॉम्प्लिकेटेड आणि चित्रविचित्र कॉस्च्युम्स मी फक्त मिस वर्ल्ड सारख्या स्पर्धेत 'नॅशनल ड्रेस' च्या कॉन्टेस्टमध्ये पाहिलेत. आता एकदा स्मिता पिसांचा मुकुट घालून आली की मी सुडोमि.

मी सईचा बूट उचकटला असे रेशम स्मिताला नंतर स्वतःहुन खुशीनी सांगत होती. सई ला आधीच पाठीची इन्जुरी झालेली असूनही तिने परत सईला आपटवले आणि तिची दुखापत वाढवली. तरी बयेला आपण सईला दुखापत पोचवल्याचे काहीही वाईट / गिल्ट वाटत नव्हते. रेशम टीम सुरवातीपासूनच विरोधी टीम मेम्बर्ना आपल्या कृतीने किती गंभीर शारीरिक दुखापत होऊ शकेल याचा जराही विचार करताना दिसत नाही. आणि दुखापत झाल्यावर सुद्धा या हलकटांना त्याचे वाईट वाट्त नाही. मेघाला सुद्धा चौकटीच्या टास्क मधे असेच पाडले होते. नशिबाने तिला काही लागले नाही. जुई ने फेकलेली वीट आउंना लागल्यावर त्या रडत असताना सुद्धा रेशम त्यांच्या अंगावर खेकसत होती. रेशम हलकटच नाही तर अतिशय हिंसक आणि खुनशी बाई आहे , असे तिच्या वागण्यावरून दिसते आहे.
बूट उचकटल्यावर सई खाली पडणार आणि अचानक पडल्यामुळे लागणार हे साहजिक होते. याचा अंदाज येऊनही किन्वा हे लक्षात न घेता जरी रेशमने सई ला शारीरिक इजा पोहोचवली असली , तरी सईला शारीरिक दुखापत करण्यास रेशम जबाबदार आहे, जे बिग बॉस मधे अलाउड नाहीये. म्हणुन रेशमला याबद्दल शिक्षा व्हायलाच पाहिजे.

>> डेलिया +१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

हाकलून लावा तिला. डोक्यावर पडल्यागत वागते ती आणि तिचा तो बगलबच्चा अस्ताद.

मी जो मुद्दा मांडला होता की रेशमला जसं सईचे बूट उखडायला संधी होती , मागून धक्का मारायला संधी होती तशी सईला नसल्यानं ते करणं बरोबर नव्हतं तो मुद्दा ममांनी देखिल सांगितला. >> बरोबर , पण ती क्लिप दाकहवायला हवी होती, जिथे रेशमनी सई चा बूट उखडला आणि त्यामुळे सई जोरात खाली पडली.

पण ती क्लिप दाकहवायला हवी होती, जिथे रेशमनी सई चा बूट उखडला आणि त्यामुळे सई जोरात खाली पडली. >>> मम.

मला पण तो शॉट बघायचा आहे. बघितला असता.

अग मामी येता जाता बघते ना, ते काल तिघं चालताना मध्ये मध्ये माझी किचनमध्ये ये जा सुरु होती. बघेन आज जाऊन voot वर. सईची कंबर धरली, आस्ताद समजवायला आला ते बघितलं. सईने पण तेव्हा objection किंवा तिला मागचे दिसत नाही म्हटल्यावर पुष्करने पण काही objection घेतलं नाही. बिग बॉस ने point out केलं नाही. हे सर्व चूक आहेना. का धक्का देणे नियमाविरुद्ध नव्हतं.

धाग्यावरील दक्षिणा, अन्जू यांच्या कमेंट्स आवडतात >>> thank u, मी फार साधे लिहिते आणि स्वतःचं खरं म्हणजे confused असते स्मितासारखी Wink .

स्मिताला बोलले म मां हेअरकलर खर्चावरून अगदी योग्य होतं पण त्यांनी मेघाला म्हणायला हवं होतं की तू शर्मिष्ठाकडे जाऊन जे बोललीस ते सरळ स्मिताला तिथल्यातिथे तोंडावर बोलायला हवं होतं.

मेघा नंतर म्हणाली की ती रागात शर्मिष्ठाकडे बोलली पण नंतर स्मिताशी बोलली पण हे स्वतः हून सांगितलं. आपल्याला पण दाखवायला हवं होतं.

पण म मां स्मिताला चौगुलेची पट्टराणी म्हणाले हे आवडलं नाही मला पर्सनली, पट्टदासी म्हणाले असते तर चाललं असते. हे वाक्य फार चुकीचं वाटलं मला.

सईची कंबर धरली, आस्ताद समजवायला आला ते बघितलं. सईने पण तेव्हा objection किंवा तिला मागचे दिसत नाही म्हटल्यावर पुष्करने पण काही objection घेतलं नाही. >> पुष्कर कधीच दुसर्यासाठी प्रथम पुढाकार घेत नाही. त्यानी रेशमला सईचा बूट खेचताना बघितलं, त्याचा चेहरावर्चे भाव बघणार सारखे होते..चक्क त्याची टरकली होती. पण तेव्हा तो काही बोलला नाही आणि नंतरही त्याला ओरडतील म्हणून त्याने तो विषय काढला नाही. रेशमला फक्त आणि फक्त मेघाच आवाज देऊ शकते. बाकी सगळे शेळपट आहेत.

मग आता पुष्करची जास्त मोठी चूक आहेना यात आस्तादबरोबरचं. पण सई पुष्कीला काही बोलणार नाही. मेघाला पहीले बोलणार, ती जीव तोडत असली तरी. पुष्की काही सईडेच्या बाजूने ठामपणे उभा राहिला नाही म्हणजे काल तरी.

किती abruptly एडिट केलेला आजचा एपिसोड. कोण काय बोलतंय , मधेच काटून छाटून टाकलेलं. मांजरेकर तर आल्या आल्याच धडाधडा बोलून टाकतात सगळं . मग नंतर परत आरामात चर्चा होते.
पण आस्ताद चमचाच होता टास्क मध्ये.

आजचा ममांचा अवतार खरा होता का स्क्रीप्टेड काही अंदाज आला नाही. ते एक चांगले अभिनेते आहेत.

आज एकट्या मेघाला त्यांनी स्पेअर केलं, बाकी आउसकट कोणीही त्यांच्या तावडीतून सुटलं नाही. पण रेशम चीटींगकरुन टास्क जिंकली याबद्दल अवाक्षरही नाही काढलं.

आता नॉमिनेशन च्या वेळेला मे गृपच्या पाचही जणांनी एकमुखानी आस्ताद, रेशम आणि स्मिता यांना नॉमिनेट करायला हवं. नंकिच्या वाटेलाही जायची गरज नाही. तो काही ह्यांना धोका नाहीये.

बघितला शॉट voot वर. रेशमने बुट मागून उखडला, त्यामुळे ती पुढे पडली. नंतर आस्तादने सईला क्विट करू नकोस सांगितलं पण पुष्कर म्हणाला बघ विचार कर. रेशम म्हणाली सई मी परत असं करणार, ठरव तू. तरी आस्ताद किंवा पुष्कर किंवा सईही हे चीटींग आहे, बूट का उखडलास असं चुकूनही म्हणाले नाहीत. सर्वजण आत आल्यावर रेशमने स्वतः सांगितलं की मी बुट मागून उखडला आणि ती पडली आणि तिची कंबर दुखायला लागली सांगितलं तरी कोणीही हे चूक म्हणाले नाहीत. त्यामुळे सर्वांना हे मान्य होतं असं दिसलं एकंदरीत. सईला परत एकदा hats off पण, ती मला आवडत नसली तरी जिद्दीने खेळली बरं नसताना, फक्त पायाला लागलं असताना हट्ट का केला, शर्मिष्ठा होती की असं नक्कीच वाटलं.

वुटवर हवा तो सीन काढून पटकन बघता येतो. पण एक सीन बघायला १७६० add बघायला लागतात Lol तेही including साउथ इंडिअन भाषा. बरं झालं सीन परत बघितला कारण काल आस्ताद तिला cheer up करायला आलेला तेव्हापासून बघितला तरी इतके लक्षात आलं नाही जे सीन परत बघताना समजलं.

ह्यात सईची चूक अशी की तिने यायला खूप वेळ लावला. ती मध्ये असावी यासाठी मेघा प्रयत्न करत होती पण ती तयार होऊन आलीच नाही. मधल्या माणसाला जास्त फायदा होता बहुतेक task मध्ये.

मी सईचा बूट उचकटला असे रेशम स्मिताला नंतर स्वतःहुन खुशीनी सांगत होती. >>> हे रेशमने on the spot पण सर्वांसमोर सांगितलं, मी आत्ताच सीन बघितला. कोणी म्हणजे कोणीही objection घेतलं नाही. मेघा काहीतरी बोलणार होती बहुतेक पण सईला त्रास होत होता म्हणून तो विषय राहीला mostly. कोणाला task कधी कळत नाही बहुतेक. स्पष्ट नसतं तेवढं, सर्वच आपापल्या सोयीने अर्थ काढतात आणि बिग बॉस पण काही म्हणत नाहीत लवकर. म मां आस्तादला म्हणाले की तू रेशमने बुट उखडला तरी काहीच बोलला नाहीस, तर त्याने सांगितलं बुट उखडू नये असा नियम नव्हता लिहिलेला. त्यावर कोणी काहीच बोललं नाही तिथे.

मी जो मुद्दा मांडला होता की रेशमला जसं सईचे बूट उखडायला संधी होती , मागून धक्का मारायला संधी होती तशी सईला नसल्यानं ते करणं बरोबर नव्हतं तो मुद्दा ममांनी देखिल सांगितला. >>> हो बरोबर. म्हणूनच मेघा धडपडत होती बहुतेक सईने मध्ये राहावं. पुढच्याला काहीच जास्त कुठला चान्स नाही.

ममा नुसतेच तार स्वरात झापत सुटतात, त्यानाही कळ्त नाही कस हॅन्डल करायचा, आय मिस सलमान .
आस्ताद्,रे आणि स्मिता यान्ची ऑफिशियली पालथे घडे गॅन्ग म्हणून घोषणा करावी ,ममानी विकेन्डला कितिही झापाझापी केली तरी येरे माझ्या मागल्या चालुच! ममा चक्क अन्नुलेखाने मारा म्हटले? मायबोली वाचतात नक्किच!
स्मिता नसलेले लुटुपुटुचे एक्स्प्लेनेशन का द्यायला जाते? आजपर्यत तिला एकदाही ममाना तिचा मुद्दा पटवता आलेला नाही, बाकी एकुण एक मुद्दे घेवुन ममा आख्या सोमी ला मी कुणालाही फेवर करत नाही हेच पटवुन देत होते.
आज आस्ताद म्हणाला की रेशमने झेन्डे लपवल्ञाच माहित नव्हत तर झटकन क्लिप दाखवायची की.

Lol

ते झापाझापी सुरुवातीला उरकून घेतात. सो मि वर पण दोन grp झालेत. मेघा टीमला झापलं की ती लोकं खवळतात, रे टीमला झापलं की ते लोक डाफरतात.

Pages