Submitted by pintee on 22 June, 2018 - 12:45
माझ्या ताईविषयी मला इथे बोलायचं आहे.माझे आईवडील दोघेही वारले आहेत.आम्ही दोघीच एकमेकींना आहोत. तिला 18 व 11 वर्ष वयाची 2 मुले.आहेत.ताई स्वतःच्या पायावर.उभी आहे हे सगळं सांगायचं कारण माझ्या जिजाजींगेली काही वर्षे दुसर्या मुलींकडे पैसे देऊन जात होते.नुकतेच त्यांनी हे ताईला सांगितले.परत जाणार नाही अशी शपथ घेतली.माझी ताई या प्रकरणाने पूर्णपणे खचली आहे.20 वर्षाच्या.संसाराचे हेच फळ का म्हणून रडते आहे मी तिला कशी सावरू??ती घटस्फोटाला तयार नाही.जिजु ने प्रामाणिक पणे सांगितले ही जमेची बाजू.ती त्यांना माफही करू शकत नाहीये. तिला काय सांगू??
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जरा नव्हे, अतिशय हलकट
जरा नव्हे, अतिशय हलकट प्रतिसाद वाटेल, पण सर्वात आधी HIV टेस्ट करून घ्या.
बाहेरून पैसे देऊन काय विकत घेतले असेल ते आधी क्लिअर करा. नंतर इमोशनल बोलू.
The stupid neither forgive
The stupid neither forgive nor forget; the naive forgive and forget; the wise forgive but do not forget. - Thomas Szasz
आ.रा.रा. यांच्याशी सहमत.
का तयार नाही घटस्फोटाला? अशा
का तयार नाही घटस्फोटाला? अशा माणसाबरोबर अजून कशाला राहायचंय? स्वतःच्या पायावर उभी आहे, मुलं पण मोठी आहेत. मग काय गरज? रडत बसण्यात काही अर्थ नाही. त्यांना जे करायचंय करून झालेलं आहे.
"सर्वात आधी HIV टेस्ट करून
"सर्वात आधी HIV टेस्ट करून घ्या"
==> सहमत.
अजून एक गोष्ट सांगू इच्छितो कि अशा परिस्थितीत आपल्या ताईंना मानसिक आधाराची अत्यंत गरज आहे. त्याला प्रथम प्राधान्य द्या. त्यांना एकट्या सोडू नका. नेहमी संपर्कात राहा. काही काळ हा विषय डोक्यातून काढणे हिताचे ठरेल. नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असणे घटस्फोटासाठीचा भक्कम पुरावा असू शकतो असे खालील बातमीत म्हटले आहे:
https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/adultery-by-itself-is...
आ. रा. रा. + ११११११११११११११११
आ. रा. रा. + ११११११११११११११११
बाकी सर्व नंतर निस्तरता येइल
सगळ्यात आधी hiv टेस्ट,
सगळ्यात आधी hiv टेस्ट, आरारांशी सहमत.
बाकी त्यांना आधाराची गरज वगैरे काही नाही. त्यांना निर्णय स्वातंत्र्य द्या, आणि त्यांच्या निर्णयाला साथ द्या इतकंच म्हणेन.
या प्रकरणात पर्याय केवळ दोन:
१. नवऱ्याचं बाहेरख्याली असणं मान्य करून संसार सुरू ठेवणे. जर हा निर्णय घ्यायचा असेल तर स्वतःचं मन मारून, मुलांकडे पाहून वगैरे स्वतःची समजूत करावी लागेल.
२.नवऱ्याला फाट्यावर मारून, मजबूत पोटगी घेऊन घटस्फोट घेणे.
निर्णय घेताना, त्यांनी स्वतःच्या आणि मुलांच्या गरजा एकटीने पेलवल्या जातील का असं बघावं, जर तेवढी आर्थिक आणि मानसिक क्षमता असेल तर एक घाव दोन तुकडे करण्यास काहीच हरकत नाही.
परत जाणार नाही अशी शपथ घेतली
परत जाणार नाही अशी शपथ घेतली आहे. मला वाटते एक संधी द्यावी.हेमावैम.
आता एक जनरीक मुद्दा -
अशा वयात जर घरी भूक शांत होत नसेल तर बाहेर जाऊन भूक मिटवणे याचे समर्थन नाही पण सेक्स लाईफ चांगली ठेवणे नवरा आणि बायको दोघांनी पाहिलं पाहिजे.
बऱ्याच बायका इंटरेस्ट दाखवत नाहीत. मग असे बाहेरख्याली प्रकार सुरू होताट.
"बाकी त्यांना आधाराची गरज
"बाकी त्यांना आधाराची गरज वगैरे काही नाही. "
==> मी दिलेली बातमी वाचा
प्रॅक्टीकल विचार करता त्यांनी
प्रॅक्टीकल विचार करता त्यांनी बाहेर अफेअर केले नाही. भावनिक गुंतवणूक केली नाही. पैसे देऊन सेक्स विकत घेतला आहे. शरीराची गरज भागवली आहे. मुलं झाल्यावर एखाद्या स्त्रीचा सेक्समधील ईण्टरेस्ट संपू शकतो. पण नवरयाचा शिल्लक राहू शकतो. अश्यात त्याला ईच्छा होऊ शकते. पण हे बाहेरख्याली करणे सर्वांनाच ईच्छा असूनही जमत नाही. जमते त्याचे कौतुक नाही पण अशी ईच्छा ठेवणारे बरेच जण असू शकतात. या सर्वात त्यांनी काही कारणास्तव, कदाचित मन खात असल्याने, प्रामाणिकपणे कबूल केले आहे. तर क्षमा करून पॅच अप करावा. आपल्या बायकोची क्षमाशीलता पाहता नवरयाचे आपल्या बायकोवरचे प्रेम आणखी वाढू शकते.
आणि हो, त्याने आता कबूल करायचे कारण असेही असेल की आता त्याचाही सेक्स मधील ईण्टरेस्ट संपला असेल. त्यामुळे पुन्हा हे घडणार नाही.
आणि कसंय, एकदा पन्नाशी आली की जोडीदार एक चांगला मित्र असावा लागतो. एवढ्या वर्षांच्या संसारात ती मैत्री कमावली जाते. अशीच सहजी तोडू नका..
वाईट झाले जे काही झाले ते
वाईट झाले जे काही झाले ते सर्व.
दोघांचे संबंध आज कसे आहे हे तिस-या माणसाला कळायला मार्ग नाही. कदाचित तुम्हाला सगळे सांगितले असेल ताईने. इथे तुम्ही सल्ला मागताय पण या गोष्टी समजलेल्या नाहीत. त्यामुळे एकंदर परिस्थितीचा विचार करता तुमच्या ताईला तुम्ही, आईवडील यांनीच निर्णय घेण्यासाठी आधार द्यायचा आहे. निर्णय तिलाच घेऊ द्यावा. जबाबदारी तिची तिलाच घेऊ द्यात. फार तर अचूक निर्णयावर येण्यासाठी तिला मदत करा.
ती घटस्फोटाला तयार नाही याचा अर्थ तिला संसार टिकवायचा आहे. या परिस्थितीत वेळ जाऊ द्यावा आणि तिच्या मनाचा कल जाणून घ्यावा. सारासारविचार करून आणि मुलांच्या भवितव्याचा विचार करून पुढे काय पावलं टाकायची हे पाहीलं जावं.
धन्यवाद सगळ्यांना.इथे बोलले
धन्यवाद सगळ्यांना.इथे बोलले गेले त्याप्रमाणे दुसर्या मुलाममधे अडकल्याने तिचे काही काळ दुर्लक्ष झाले.त्यावेळी त्यांची भांडण पण होत होती.त्यांना पश्चात्ताप होत आहे व.प्रामाणिक पणे सांगितलं यासाठी माफ करावं.असं ताआईचं म्हणणं जे मला मान्य नाही.तिने घटस्फोट घेऊन.त्यांचा सूड घ्यावा. आज माफ केलं तर उद्या परत हेच घडणार नाही आहे कशावरून
His test Zali aahe 3
His test Zali aahe 3 mahinyani punha negative aahe
तुम्हाला तुमचं म्हणणं तुमच्या
तुम्हाला तुमचं म्हणणं तुमच्या ताईवर लादायचंय का? असे असेल तर धागा तरी कश्याला काढला?
तुम्हाला तुमचं म्हणणं तुमच्या
तुम्हाला तुमचं म्हणणं तुमच्या ताईवर लादायचंय का? असे असेल तर धागा तरी कश्याला काढला? >> आधीच त्रस्त असलेल्या एखाद्याला इतके कठोरपणे दिलेले सल्ले वाचायलाही नको वाटतात. त्या व्यक्तीला कसे वाटत असेल ?
Test negative ahe he changle
Test negative ahe he changle ahe pan sud ghyayacha mhanun ghatasfot dene chukiche ahe. Te jar kharokhar sudharale nasatil tar ghatasfot hi tyanchyasathi sutaka ani tumchya bahinisathi tras tharu shakato
दुसर्या मुलाममधे अडकल्याने
दुसर्या मुलाममधे अडकल्याने तिचे काही काळ दुर्लक्ष झाले.त्यावेळी त्यांची भांडण पण होत होती.
>> हे नक्की आहे का कि नवऱ्याच्या 'चुका(?)'वर पांघरून घालायला काहीतरी self blaming कारण शोधत आहेे ताई?
नवर्याला शरीरसूख देणे हे बायकोचे कर्तव्य आहे, घरातच पोट भरल्यावर बाहेर कशाला हादडायल जातील वगैरे 'संस्कारात' वाढलेले असतो आपण.
अरे नाही करायचंय तिला सेक्स तुझ्यासोबत! for whatever reasons.
आणि तू तुझ्या गरजा बाहेरून पुरवून घ्यायला मोकळा आहेसच की.
पण याचा अर्थ असा नाही कि एकत्र राहणे, मुलं वाढवणे, so called संसार करणे हे 'तुझ्यासोबत' करायचं नाहीय!
एकमेकांना शरीरसुख देणे आणि एकव्रती राहणे हे काही लग्न, संसाराचे MUST भाग होऊ शकत नाहीत सगळ्यांसाठीच.
So परत एकदा चेक करायला सांगा. ताईला आणि भावजीना एकत्र काय हवंय आणि सेप्रेटली काय मिळवू देण्याची मुभा एकमेकांना देणं शक्य आहे.
निर्णय त्या दोघानाच घेऊ द्या.
HIV टेस्ट करून घेतलीच आहे.
आता यापुढे मित्रांसारखे किंवा फ्लॅटमेटसारखे एकत्र राहू शकता का? कि दुसऱ्याच थोबाड बघितलं/ आवाज ऐकलं कि डोक्यात तिडीक जातेय?
एकमेकांसोबत सेक्स करणार आहात कि नाही?
मुलांचं काय?
वगैरे....
उत्तरं शोधा म्हणावं त्यांना....
आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्यात मी तुझ्या पाठीशी आहे असे तुम्ही तिला सांगा.
Swanubhava varun sangte
Swanubhava varun sangte
20 warsha saunsar kelat na... ata mulanna tumchi garaj ahe
tumhala hi ekmekanchi garaj ahe. Navra baherkhyali ahe manya karte pan ata adjust karnya wachun paryay nahi
Ekte pan ani ritepan khup bhayanak asta.
ratri jaag alyawar shejari navra nai bahun khup ratri dhadki bharun uthal... radal.
Ekta radnya peksha tyachya sobat rada. Baki apla khara manus kon he 5 10 warshyat tyanna kalunch chukel.
Shevti kay tar aplyala jagaych asta.... ani ekhadyala maaf karun aplasa karnyat alagh samadhan ahe.
fakt 1 ch request karen....... Mulanmadhe man ramwa swata che plus points note down kara, awadti kala jopasa, try to live ur life for urself.
TYACHYA CHUKAN CHI SHIKSHA SWATALA DEU NAKA.
जेम्स वांड माझे मत तिच्यावर
जेम्स वांड माझे मत तिच्यावर नक्कीच लादत नाही पण मला स्वतंत्र विचार असू शकतो की तो सांगितला इतकेच.
बाकी गोल्डफिश अँमी व ग्लोरिया यांच्या प्रतिसादयावरून. इतर मुद्देही लक्षात.आले आभार.
- लोक सल्ले देताना
- लोक सल्ले देताना चिडल्यासारखे का देत आहेत ? कुठून सल्ला मागितला असे नको ना वाटायला.
- काही गोष्टी चर्चेत छान वाटतात. आपण जिथे राहतो, ज्या संस्कारात वाढलो त्यामुळे आपली एक कम्फर्ट लेव्हल ठरलेली असते. असे बरेचसे फॅक्टर्स असतात. ज्याचा बेस्ट जज्ज ती व्यक्ती स्वतः असते. लग्न करायचे आणि सेक्स साठी बाहेर अवलंबून रहायचे हे सगळ्यांना चालण्यासारखे नसते. तसेच सर्वांनाच सेक्स खूप महत्वाची बाब असते असेही मुळीच नाही. ज्यांना खूप महत्वाचे आहे ते पाहतील डिव्होर्स घ्यायचा किंवा कसे ते....
त्यामुळे अशा बाबी सूचना म्हणून ठीक. ते त्या व्यक्तीसाठी योग्यच असेल असे नाही.
अरे नाही करायचंय तिला सेक्स
अरे नाही करायचंय तिला सेक्स तुझ्यासोबत! for whatever reasons.
आणि तू तुझ्या गरजा बाहेरून पुरवून घ्यायला मोकळा आहेसच की.
>>> तेच तर केलंय त्याने. चूक इतकच की घरी कबूल केले.
20 वर्षाच्या.संसाराचे हेच फळ
20 वर्षाच्या.संसाराचे हेच फळ का म्हणून रडते आहे
>>> झालं? संपलं सगळं? म्हणजे वीस वर्षाच्या काळात त्यानं ज्या गोष्टी पत्नीसाठी केल्या त्याची केवळ एका कबुलीमुळे राख झाली? शरीराची नैसर्गिक भूक आहे. घरी ती भागत नाही म्हणून एकदोन वेळा बाहेर काय भागवली तर ती कायमची प्रतारणा? त्याची शिक्षा म्हणून लगेच घटस्फोट पोटगी पर्यंत मजल? न सांगता दुसरे लग्न तर केले नाही ना त्याने? दुसरीच्या प्रेमात तर पडला नव्हता ना तो? ह्रदय तर देऊन नाही बसला ना तो कुणाला? त्याने सांगितले म्हणून कळले हेच खूप काही सांगून जाते. न सांगता त्याच्या बदललेल्या वागण्या बोलण्यातून कळणे फार भयंकर झाले असते याचा विचार केलाय का? ती खरी प्रतारणा ठरली असती हे माहित आहे का? प्रेम आणि सेक्स वेगळ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्याच राहूद्यात. याचा अर्थ रोज उठून बाहेर सेक्स करावा अशा वृत्तीचे समर्थन मुळीच नव्हे. पण क्वचित कधी त्याच्या/तिच्या कडून असे काही घडले तर ती फक्त तात्कालिक तडजोड असते. केवळ आणि केवळ शारीरिक भूक भागवण्यासाठी. त्याच्या अर्थ त्याचे/तिचे वैवाहिक जोडीदारावरचे प्रेम कमी झाले असा मुळीच नव्हे. कित्येकजण/जणी सांगत नाहीत. फक्त जे काही केले जाते ते जबाबदारीने व सुरक्षित केले जावे. एसटीडी एड्स हे सगळे प्रकार भयंकर आहेत. घरी पत्नी मुले आपल्यावर अवलंबून आहेत याची जाणीव ठेवावी. (म्हणूनच व्यक्तिश: मला पैसे देऊन वगैरे प्रकार अत्यंत चीप वाटतात पण हे माझे वैयक्तिक मत)
अरे नाही करायचंय तिला सेक्स
अरे नाही करायचंय तिला सेक्स तुझ्यासोबत! for whatever reasons.
<<
This is valid reason for HIM to get divorce, without paying alimony.
And him being promiscuous is again a valid reason for HER to get divorce.
But in both instances proof is a must. So it will be amicable separation at best, and its generally a mess, and destroys mental peace and balance of all concerned parties, including the kids.
Basically in my opinion, it is a verrrrrrrrrry personal matter between him and her. And you should NOT interfere, or even presume advise them, let alone put it on a public forum like this.
My sincere request to you is to take the thread down, by asking the website admin.
आरारांशी कचकून सहमत. हा धागा
आरारांशी कचकून सहमत. हा धागा काढुन टाकणे श्रेयस्कर. लोक केवळ पिंका टाकत 'शांतता कोर्ट चालू आहे' खेळतील....
My sincere request to you is
My sincere request to you is to take the thread down, by asking the website admin.>>+११११ अगदी अगदी
आरारांशी अंशत:सहमत.मोबाईल
आरारांशी पूर्णपणे:सहमत.मोबाईल वरुन तंकता एत नसल्याने तूर्तास इतकेच.
<< Basically in my opinion,
<< Basically in my opinion, it is a verrrrrrrrrry personal matter between him and her. And you should NOT interfere, or even presume advise them, let alone put it on a public forum like this.
My sincere request to you is to take the thread down, by asking the website admin. >>
------------- सहमत....
तुमच्या बहिणीला, जिजाजी यान्ना यातुन बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा.
आ.रा.रा. अतिशय उत्कृष्ट
आ.रा.रा. अतिशय उत्कृष्ट सल्ला !!
मुळात हे दळण आंजावर दळायलाच नको होते.
My sincere request to you is
My sincere request to you is to take the thread down
>>> मी सहमत नाही. पूर्वीपासून अगदी आजतागायत अनेक नियतकालिकातून अशा प्रकारच्या समस्यांवर सल्ले दिले जात होते व आहेत. तिथे ते सल्ले देणारी व्यक्ती कोणी एकच असे इथे अनेक आहेत इतकाच फरक आहे. हि समस्या प्रातिनिधिक सुद्धा असू शकते. धागाकर्तीने कोणाचे व्यक्तिगत तपशील दिलेले नाहीत. त्यामुळे कोणाची बदनामी अथवा आक्षेपार्ह असे काहीच नाही. सल्ल्यामुळे नुकसान झाले असेही असू शकत नाही. कारण सल्ला स्वीकारावा असे बंधन नाही. मला तरी धागा उतरवण्याचे कोणतेही कारण दिसत नाही.
तेच तर केलंय त्याने. चूक इतकच
तेच तर केलंय त्याने. चूक इतकच की घरी कबूल केले.
>> कबूल करण्यात चूक कसली? आधीच सांगून परवानगी घेऊन बाहेर जाण्याचा पर्यायदेखील होता. एकदा बोलून बघू शकला असत की माझ्या शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीयत, तू बदलतेयस की बाहेर जाऊ कि घटस्फोट घ्यायचाय?
लग्नात राहायचे असेल तर:
पुरुषांना दोन पर्याय आहेत. परवानगी घेऊन बाहेर जाणे किंवा आपले मन/इच्छा मारत राहणे.
आणि स्त्रियांकडेदेखील दोन पर्याय आहेत. आपली इच्छा नसताना नवऱ्याच्या गरजा पूर्ण करणे किंवा त्याला बाहेर जाऊ देणे.
झेपेल ते करावं ज्यानेत्याने...
===
This is valid reason for HIM to get divorce, without paying alimony.
>> without paying alimony नक्की का?
तसेही नोकरी करणाऱ्या स्त्रिला पोटगी बहुतेक मिळत नाही. पण मुलांचा खर्चतरी त्याला उचलायला लावता आलंया असता का?
===
धागा डिलिट करू नये असे मला वाटते.
Submitted by Parichit on 23 June, 2018 - 21:58 >> +१
===
https://www.maayboli.com/node/64265 हा धागा आठवला. तिथले प्रतिसाद रोचक आहेत.
आणि स्त्रियांकडेदेखील दोन
आणि स्त्रियांकडेदेखील दोन पर्याय आहेत. आपली इच्छा नसताना नवऱ्याच्या गरजा पूर्ण करणे किंवा त्याला बाहेर जाऊ देणे.
>>> आणि स्त्री ने बाहेर जाऊन गरज पूर्ण करणे. हा मुद्दा देखील हवा मग.
आणि स्त्री ने बाहेर जाऊन गरज
आणि स्त्री ने बाहेर जाऊन गरज पूर्ण करणे. हा मुद्दा देखील हवा मग. >> तो मुद्दा मी याआधीच्या प्रतिसादात लिंक दिलीय त्या धाग्यावर येईल.
सल्ले देणं, सल्ले देण्याचा
सल्ले देणं, सल्ले देण्याचा आजार असणे आणि सल्ल्याच्या नावाखाली लोकांच्या अतिवैयक्तिक बाबीत नाक खुपसणे यातल्या सीमा पुसट आहेत. इथे माझी बहीण असती तर माझी सुद्धा घालमेल झाली असती. कुणाला तरी विचारावेसे वाटले असते. या मनःस्थितीत असलेल्या व्यक्तीला झापल्याप्रमाणे सल्ले मिळताहेत, ज्यात सहानुभूतीचा जराही ओलावा नाही.
कार्यालयीन कामात चूक झाल्यावर शिस्तीचा बडगा उचलावा अशा पद्धतीने काही लोक सल्ले देताहेत. आंजावर काहीही ओळख पाळख नसताना समोरच्याला अपमानित करण्यासारखी भाषा वापरण्याचा अधिकार कोण देत असतं बरं ?
>>>शरीराची नैसर्गिक भूक आहे.
>>>शरीराची नैसर्गिक भूक आहे. घरी ती भागत नाही म्हणून एकदोन वेळा बाहेर काय भागवली तर ती कायमची प्रतारणा?<<<
हे इतकं सोपं झालय का स्त्री साठी सुद्धा?
किंवा आपलं लिहायचं म्हणून लिहलय? का दुसर्याचा प्रॉबलेम आहे तर द्या काहीतरी ठोकून. असे सल्ले वाचले की वाटतं , तुम्ही कोणी ह्या ठिकाणी विक्टीम असता तर?
म्हणजे लोकं करतही असतील आणि चोरी छुपे करणारे/री असतीलही पण त्याचे पडसाद ( मानसिक, भावनिक वगैरे) इतके सहज पेलले जातात ? शारीरीक्/मानसिक रोगांचे काय?
नुसता एचायवी नाही पण सिफीलीस, गोनोरीया इतक्या भयाण रोगांचे काय? इतर मानसिक आघात?
मुलांना काय मेसेज जाणार?
मग जर जोडप्यांना एकमेकांपासून शारीरीक सुख नाहिये तर करा एखाद वेळेस बाहेर त्यात काय?
प्रश्ण मोरल वॅल्युज नसून, इतका प्रॉबलेम आहे तर लग्नात रहाच कशाला? असाही युक्तीवाद होवु शकतो. नाहितर ओपन सेक्स कन्सेप्ट ठेवून राहुया. उगाच नाही स्वॅपिंग आणि डबल पार्ट्नर्स प्रकार आहेत... तर मुद्दा हा की, बरेच मार्ग आहेत की गरजा भागवायला पण नॉट एट दी कॉस्ट ओफ अदर्स फीलिंग्स एंड व्यु. स्पेशली विथ लीगल पार्टनर.
घरी मराठी जेवण आवडत नाही म्हणून बिर्यानी खाल्ली पण बिर्यानी रोज पचत नाही वर घरचे फुकट मिळणारे वरण भात कशाला सोडा जे सोयीचे आहे आणि फायद्याचे तर सॉरी म्हणोइन मोकळे व्हा...
>>>आधीच सांगून परवानगी घेऊन बाहेर जाण्याचा पर्यायदेखील होता. एकदा बोलून बघू शकला असत की माझ्या शारीरिक गरजा पूर्ण होत नाहीयत, तू बदलतेयस की बाहेर जाऊ कि घटस्फोट घ्यायचाय?<<<< हे केले नाहिये. आणी केले असते तरी असे विचार दुसर्या लीगल पार्ट्नरचे नसतील तर ते लादले का जावे? म्हणजे दोष हा दुसर्याचाच की, तुझ्याच मुळे मी बाहेर गेलो/गेली. ..
विथ लीगल पार्ट्नर इतकं सोपं आहे?
बॉटम लाईन, हे कुठलेही सल्ले देण्यापेक्षा, लेट दी कन्सर्न्ड परसन डिसाईड.
आपण काय डोंबल्याचे सल्ले देणार.. एकाला प्रतारणा वाटेल, दुसर्याला नाही वाटणार..
पण जो त्या बोटीत आहे त्याला ठरवू दे पाण्यात उडी मारायची की फाटके लाईफ जॅकेट घालून तरंगायाचे...
>>Basically in my opinion, it
>>Basically in my opinion, it is a verrrrrrrrrry personal matter between him and her. And you should NOT interfere, or even presume advise them, let alone put it on a public forum like this.
My sincere request to you is to take the thread down, by asking the website admin>> ++++++
व्हाट दि हेक! "कोणाशी तरी
व्हाट दि हेक! "कोणाशी तरी बोलायचंय" ह्या गृपची निर्मिती अशाच खाजगी समस्यां/प्रश्नांकरता आहे ना? आता असा धागा विणताना किती अनानिमस र्हायचं ते प्रत्येक धागाकर्त्याची जबाबदारी आहे; पुढे होणार्या, न होणार्या परिणामांसकट. तर मग असं असताना, पब्लिक धागा बंद करण्याचा सल्ला देउन बेगाने शादीमे अब्दुल्ला बनके दिवाने क्यु हो रेले है....
प्रतिसाद अजून वाचले नाहीत पण
प्रतिसाद अजून वाचले नाहीत पण नवरा पैसे देऊन बाहेर जातोय हे 20 वर्षांनी कळले व ते कळल्यावर हेच फळ काय संसाराला म्हणून रडतेय याचे आश्चर्य वाटले. भारतात देहविक्रीचा जोरदार व्यवसाय चालतो तो फक्त अविवाहित पुरुषांच्या जीवावरच का? विवाहित पुरुष या वाटेला जातच नाहीत? बाकी 20 वर्षांच्या संसाराचे फळ काय असणार हयाचा अंदाज सुरवातीच्या काही महिन्यात/वर्षात लागत जातो, जसजशी वर्षे जातात तसतसा तो अंदाज खात्रीत बदलत जातो.
या बाबतीत काय करायचे हे संबंधित स्त्रीने ठरवायचे तर तिने आधी ते स्वातंत्र्य कमवलेले असायला हवे. ते तिच्यापाशी आज असेल तरच ती निर्णय घेऊ शकते. स्त्री अर्थार्जन करत असेल तर ती स्वतःच्या पायावर उभी आहे असे म्हणायची पद्धत आहे. पण स्वतःच्या पायावर उभे राहायला अर्थार्जनासोबत मानसिक बळही लागते. ते सगळ्यांतच असते असे नाही.
Submitted by राज on 24 June,
Submitted by राज on 24 June, 2018 - 05:29 >> +१ फारच स्कॅंडलाईझ झालयं प्रुड पब्लिक अशा घटना कधीच ऐकल्या, बघितल्या, सल्ले दिल्या नसल्यागत!
आईवडील नाहीयत या दोन्ही बहिणींना, नातेवाईक आहेत कि नाही माहित नाही, इथे अनुभवाने-वयाने मोठे लोक असतील म्हणून विचारतायत त्या सल्ला. जमलं तर द्या नाहीतर दुर्लक्ष करा धाग्याकडे
त्यांना पश्चात्ताप होत आहे व
त्यांना पश्चात्ताप होत आहे व.प्रामाणिक पणे सांगितलं यासाठी माफ करावं.असं ताआईचं म्हणणं जे मला मान्य नाही.तिने घटस्फोट घेऊन.त्यांचा सूड घ्यावा.>>>>>
हे जरा जास्तच होतंय... ज्यांचा संसार आहे त्यांना ठरवू द्या. ज्यांनी एकत्र मुले जन्माला घातलीत त्यांच्यात सूड घेणे वगैरे प्रकरण संबंधित मुलांना किती तापदायक ठरते याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? दुसऱ्याचा सूड घेणारा कधीही शांती मिळवू शकत नाही.
आ रा रांचा इंग्रजीतला
आ रा रांचा इंग्रजीतला प्रतिसाद काहींना कळला नसावा .
हा त्या दोघांचा (धागाकर्तीची बहीण आणि बहिणीचा नवरा) अत्यंत खाजगी प्रश्न आहे. त्यात तुम्हीही हस्तक्षेप करू नये, असं म्हणताहेत ते.
सुडाची शिक्षा मिलान्ना पण
सुडाची शिक्षा मुलाना पण होणारच.... सुड घ्यायचा हे मनातुन काढा, त्याचा फायदा कुणालाही होणार नाही.
सुड घेणे हे रागाच्या, मोठी फसगत झाल्याचे कळल्यावर पहिली प्रतिक्रिया असेल तर समजतो...
हा त्या दोघांचा (धागाकर्तीची
हा त्या दोघांचा (धागाकर्तीची बहीण आणि बहिणीचा नवरा) अत्यंत खाजगी प्रश्न आहे. त्यात तुम्हीही हस्तक्षेप करू नये, असं म्हणताहेत ते.>>>>
तिसऱ्याच असंबंधीत व्यक्तीने धागा काढलाय व बहिणीला काय सांगू हा सल्ला विचारलाय.
खाजगी प्रश्न आहे तर सार्वजनिक
खाजगी प्रश्न आहे तर सार्वजनिक फोरम वर कशाला टाकलाय? एखाद्या कोन्सलर कडे जायचे.
इथे टाकलाय प्रश्न, लोक आपली मते सांगणारच ना??
च्रप्स, तेच करणं योग्य आहे,
च्रप्स, तेच करणं योग्य आहे, कौन्सेलरकडे जाणं. इकडे वाकडे तिकडे सल्ले मिळणार. म्हणून इथे विचारुन चर्चा करण्यात पॉईंट दिसत नाही पर्सनली.
सायो .. मी पण सहमत आहे.
सायो .. मी पण सहमत आहे.
ओह, आईवडील नाहीत हे वाचलेच
ओह, आईवडील नाहीत हे वाचलेच नव्हते. असे असेल तर सैरभैर होणे स्वाभाविक आहे बहीणीसाठी. प्रेमाने देखील सांगता येते. सल्ले देऊ नका असे कुणी म्हणत नाहीये...
<बहिणीला काय सांगू हा सल्ला
<बहिणीला काय सांगू हा सल्ला विचारलाय>
तुम्ही नाक खुपसू नका, असा त्या बहिणीलाच आ रा रांचा सल्ला आहे.
भरत यांचा विषयाला धरून
भरत यांचा विषयाला धरून प्रतिसाद पाहून गहीवरून आलं. कोण कुणाचा ड्युआय याच विषयावर ते प्रतिसाद देतात असा माझ समज झालेला होता. असो.
का दुसर्याचा प्रॉबलेम आहे तर
का दुसर्याचा प्रॉबलेम आहे तर द्या काहीतरी ठोकून
>>> मी असं करत नाही. कुणी कसे अर्थ काढावेत यावर माझे नियंत्रण नाही.
बरेच मार्ग आहेत की गरजा भागवायला पण नॉट एट दी कॉस्ट ओफ अदर्स फीलिंग्स एंड व्यु.
>>> सहमत. पण घरात जेवण मिळत नाही. आणि भूक तर नैसर्गिक. बाहेर खाल्ले म्हणून सांगितले तर भावना दुखावतात. मग काय करावे? पर्याय एकच उरतो. बाहेर खायचे पण सांगायचे नाही. गणित इतके सोपे आहे. तात्पर्य: या माणसाची चूक एकच म्हणजे घरी सांगितले. नसते सांगितले तर भावना दुखावल्या नसत्या. संसार सुरळीत सुरूच राहिला असता. धागा निघाला नसता.
एक जुना किस्सा आठवला. थोडा बदल करून इथे लागू पडतो. एका बस मध्ये एक माणूस चढला. पाहतो तर पुढच्या सीटवर एक माणूस सिगारेट ओढत बसला होता. याला पण इच्छा झाली. कंडक्टर खाली मान घालून हिशेब लिहित बसला होता. त्याने कंडक्टरला विचारले,
"सिगारेट ओढू का?"
"नाही ते बेकायदा आहे" कंडक्टर.
"मग तो माणूस कसा ओढतो?"
"त्याने मला विचारले नाही" कंडक्टर.
इतका वेळ तो सिगारेट ओढत होता. कंडक्टरला सांगितले नाही. बसला आग लागली नाही.
बरेच संसार असे सुरु असतील. सांगणे गुन्हा असतो. आणि बेजबाबदारपणे आणि अनियंत्रित काही केले तर संसाराची राखरांगोळी होण्याची पण भीती असते. मग ते दारू पिणे असो, सिगारेट असो, असे संबंध असोत वा अन्य कोणतीही गोष्ट. बाबा महाराजांच्या वगैरे अतिनादाला लागून सुद्धा संसार विस्कटलेले पाहिलेत. शेवटी सामंजस्य आणि परिपक्वताच खूप महत्वाचा रोल प्ले करत असते. अन्यथा भाजीत मीठ जास्त पडले यावरून सुद्धा काडीमोड मागण्या पर्यंत मजल जाते.
सल्ला मागितला आहे म्हणून दिला आहे. बुडणारा माणूस धडपडतोय वाचवा म्हणतोय तेंव्हा हाताची घडी घालून उभे राहून "तुझा जीव कसा वाचवायचा हि तुझी अतिव्यक्तिगत समस्या आहे. तुझा तू निर्णय घे" म्हणणे योग्य नाही.
या माणसाची चूक एकच म्हणजे घरी
या माणसाची चूक एकच म्हणजे घरी सांगितले. नसते सांगितले तर भावना दुखावल्या नसत्या. संसार सुरळीत सुरूच राहिला असता. धागा निघाला नसता. >>>> आपण ज्याला सल्ला देत आहोत त्याला याने बरे वाटेल का ? जेवण आणि शारीरीक भूक एकसारखेच आहेत का ? माणूस जेवणाशिवाय राहू शकत नाही. तरीही लोक चोरी करून (शक्यतो) आपली पोटाची भूक भागवत नाहीत. उद्या तुमच्या घरी चोरी झाली तर त्याच्या पोटाची भूक भागवण्यासाठी काय करेल बिचारा असाच दृष्टीकोण ठेवा की...
चूक झालेली सांगितली म्हणजे माफ केलीच पाहीजे असे काही बंधन नाही. आपल्या पार्टनरने तीच चूक केली तर किती जणांना सहन होईल हा प्रश्न आहे ? विनाकारण आपल्याला जे झेपणार नाही असे सल्ले देण्याचे आवरते घेतले तर माणुसकीच्या दृष्टीने योग्य होईल. मनाला जखमा झालेल्या असतात. त्यावर तिखटमीठ चोळण्यापेक्षा गप्प बसा की.
धागाकर्ती चा प्रश्न आणि
धागाकर्ती चा प्रश्न आणि त्याचं सोल्युशन आर्थिक परावलंबित्व/स्वातंत्र्य,नवऱ्याशी असलेलं भावनिक बॉंडिंग,त्याने स्पष्ट मागणी केली का स्वतःच 'आता हे घरी नाही मिळणार' म्हणून गृहीत धरून बाहेर जायला चालू केलं यावर आहे.त्यावर मला सल्ला द्यायचा नाही.
पण 'होते चूक एकदा, प्रामाणिक पणे सांगितलं ना, सोडा आता' विचार करणारे बायकोने 'तू बिझी असायचास.म्हणून मी टिण्डर वरून भेटून काही वेळा शारीरिक जवळीक केली' अशी कबुली दिल्यावर तिला ऍक्सेप्ट करतील?यातले काही जण बायकोच्या एक कानाखाली या पहिल्या रिऍक्शन वर उतरतील.(आठवा फरहान विद्या चा शादी के साईड इफेक्टस)
शारीरिक संबंध ही 'घरी खाणं नव्हतं म्हणून बाहेर जाऊन जेवून आलो' इतकी सुपरफिशियल गोष्ट नसावी.त्यात भावनाही असतात.त्याच्या आज मागे काही प्रिटेक्स्ट असतो.मानसिक गुंतवणूक असते.
Pages