बिग बॉस - मराठी २

Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02

बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे

1523851709_bigg-boss-marathi-contestants_6.jpgsharmishtha-raut_0.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुशांतला भूषण जिंकावा फायनल असं वाटतंय म्हणाला. कासव आहे तो म्हणाला. मी जिंकलो असतो असं म्हणाला सुशांत Lol

स्मिताबद्दल चांगलं बोलला की ती खूप चांगली आहे. रेशम प्रामाणिक आहे. या तिघांपैकी जिंकावे म्हणे. आस्तादचं नाव नाही घेतलं Lol

काल आऊच्या मुलगा, आस्ताद जिंकू शकतो असं काहीतरी म्हणाला त्याला, फायनलला असशील असं. smart खेळतोय असं.

सुशांतला भूषण जिंकावा फायनल असं वाटतंय म्हणाला. कासव आहे तो म्हणाला. मी जिंकलो असतो असं म्हणाला सुशांत Lol >>> Biggrin दोन्ही मजेशीर आहे. मला वाटते फायनलला टॉप ३ मध्ये रेशम, सई अन मेघा असतील. पुश्की अन आस्ताद कदाचित टॉप ५ मध्ये असतील पण शेवटच्या ३ मध्ये नाही.

शनिवारचा एपी आज पाहिला वुटवर. तो नंद्या खरेच खुप चिप आहे. मुलींकडे कसा अधाश्यासारखा बघतो, खासकरुन स्मिताकडे जेव्हा ती ड्रेस बदलुन येते पूलवर. खरतरं तोच जायला हवा होता Angry

मी आजही स्मिताला दिले मत , मला ती शेवटच्या आठवड्यापर्यंत असलेली आवडेल. हिंदी बिबॉ पाहता शेवटच्या आठवड्यात २ - ३ जण बाहेर पडतात, त्यात गेली बाहेर तर ठिक, त्याआधी नको.

प्रत्येक दिवशी एक मत हे चूक आहे ते ग्राह्य धरले जात नाही terms and conditions मध्ये स्पष्ट दिले आहे एका ईमेल id ने एक ch मत ग्राह्य़ धरले जाईल

Strong asane hi kaahee kharab gosht nahiye..
Sai aani tichi aai mala okch watalya.. aani sai chya aai pramanech sagale kahitari sangayach pohachawaych he tharwunch aale hote.. agadee smitaa chi aai suddha.. tichi confused aahe hee image kamee karanyaasathi badbadat hotee.. ulat tyaa jaast hetu baLagun bolat hotya.. tich marathi kharab aahe mhanun ti ashi bolate pan ti nit aahe asa ..
Khar baghataa tichya achievements asatil but she is dumb..
Resham pan lagolag tichi aai geli ki tila mhanat hoti kee tuzi aai group shee loyal raha asa mhanali.. ti pan lagech tichya ghoLat yete..
Smitachya aaine waravvar bikini ghal sangaN agadi cheap watal..

Bikini ghalaNyat waaiT kaahich naahee.. pan ti danger madhe jatiye.. aataa pudhe problem yeu shaktat mhanun ghaal.. asa asel tar cheap..

Dusara karaN kadachit tiche bikiniche pan sponsorers asatil .. tar ekawel thik

कालचा एपी आवडला. मला असे इमोशनल ड्रामे बघायला आवडतात Wink
स्मिता काल खरचं बावळट वाटली उनांचा मुलगा आला होता तेव्हा. रिलिज केल्यावर येडचापसारखी कॕमेराशी बोलत बसली पण जो कुणी आलेला तो आहे का घरात, त्याला जाऊन भेटावे वैगरे काही सुचले नाही तिला Lol
हिंदीमध्ये तर लगेच लोक शोधत जायचे कोण आलेलं ते बघायला. इव्हन मी जर २ महिन्यांनी बाहेरील जगातील मनुष्य बघितला तर नक्कीच धावत जाईल तो आहे का गेला ते बघायला.

किचौ व शराच्या घरचे कुणी येणार नाहीत हे नक्की. आज पुष्की, आस्ताद, भूषण व मेघाचा नंबर दिसतो.

morpankhis , तुम्ही सईकडे बघत वेळ काढा.

बादवे, तुमची पार्टी बाकी आहे हं. सई कॅप्टन झाली त्याची.

morpankhis , तुम्ही सईकडे बघत वेळ काढा.
बादवे, तुमची पार्टी बाकी आहे हं. सई कॅप्टन झाली त्याची.
नवीन Submitted by मामी on 13 June, 2018
>>>>>

मामी, नक्किच पार्टी देऊ की Happy

अरे हो विसरलोच, सई साठी डोळ्यात बदाम..

योग दादा तुम्ही पण लिहा न अपडेट्स...मी एकही एपिसोड पाहिला नाही पण तुमच्या पोस्टीं वाचायला येथे येते... Happy

स्मिताची आई तुफान बोअर झाली... थांब की गं बयो म्हणावंसं वाटलं...
रेशमची मुलगी लहान आहे म्हणून असेल पण तिला कोणाशी काही बोलताच येत नव्हतं...
आऊंचा मुलगा आधी आऊंकडे न जाता सगळ्या जनतेला भेटुन आला त्यावरुन मला जरास गडबडायला झालं Uhoh
बरं तो आऊंचा मुलगा आहे हे सांगायचं की बाकिच्यांना...काय स्वप्न पडलंय का? बोलतच बसलेला...

रेशम मुलीला बघुन मान वगैरे हलवत होती... मेघा फक्त डोळ्यांनी बोलत होती सगळ्यांशीच.. कसली स्ट्राँग आहे ही मुलगी...

स्मिताची आई सांगत होती ना तिने काय काय सहन केलंय आणि ऑल तेंव्हा सांगावंस वाटलेलं मेघाचा संघर्ष बघ, कमी नाहीये तो तरी पण ती काय खेळतीये, तुझ्या मुलीला काय सोनं लागलंय एवढं Uhoh स्मिता अतिच डंब वाटायला लागलीये आता

स्मिताची आई कधी घराबाहेर जातेय असं झालेलं मला Proud सगळ्यांच्या पोझिशन बदलवल्या तिने Lol नंतर बिबॉ ने जायला सांगितल्यावर पण येउन सगळ्यांशी गप्पा मारत बसलेली..

सईची आई थोडीशी ओव्हर वाटली मला पण ती स्मिताच्या आईपुढे सुसाह्य वाटली... सईच्या आईने मेघाची पप्पी घेतली ते फार आवडलं...

सई मेघा पुढे एमोशनली फार फिकी वाटतेय, स्मिताची आई बोलून गेल्यावर हिला लगेच वाटलं आपण कसं बोलतो यांना आणि यांच्या घरातले कसे बोलतात वगैरे Uhoh येडी, तुझ्या पण आईने रेशमला सांगितलं ना की तुझ्यासाठी पिक्चर दोनदा पाहिला, आता काय लगेच ती तुला पाठिंबा देणारेय का Uhoh सई फार लवकर बाहीर पडली असती मेघा नसती तर...

मेघासाठी मला कधी कधी फार वाईट वाटतं, तिची टिम पण वेळ आली तर तिला हेल्प नाही करणार... तरी पण तीच व्हावी विनर Happy

सईने शराचं नाव नाही लिहिलं ते बघुन मला शरा साठी पण वाईट वाटलं... फार गोड आहे ती Happy

मेघाच्या प्रत्येक कृतीवर का आक्षेप घेतात हे लोक. तीलाही सईच्या आईशी काहीतरी वैयक्तीक बोलायचं असेल ना. ती चांगलंच बोलली की आतमध्ये जाऊन.

मेघा खरच एक कणखर मुलगी आहे. ती विनर व्हाव असे वाटणे साहजीक आहे.
ति बरीच मॅच्युअर पण आहे.
फायनल मध्ये मेघा, शरा कदाचीत सई इ. पहायला आवडेल..

शरा साठी वोट करा रे....

उद्या आस्ताद चे बाबा सगळ्यांचा मराठीचा क्लास घेणारेत !

yes,माझे सर शाळेतले..ऊद्या शाळा घेणार सगळ्यांची.. Lol

रे ने कधी भुषणला सपोर्ट केला!!? त्याची बायकोला कधी,कुठे दिसलं हे?

उद्या आस्ताद चे बाबा सगळ्यांचा मराठीचा क्लास घेणारेत ! >> बाप रे म्हणजे उद्याही हाच ड्रामा ? कॅप्टनशिप चे टास्क कधी मग?
स्मिताची आई बोलून गेल्यावर हिला लगेच वाटलं आपण कसं बोलतो यांना आणि यांच्या घरातले कसे बोलतात वगैरे >>> हो सई थोडी वीक पडली होती. मेघाने बरोबर समजवले तिला.

Pages