विरह - X शब्दकथा

Submitted by कटप्पा on 31 May, 2018 - 02:52

रात्रीचे तीन वाजले होते, तिच्या डोळ्यात झोप मात्र काही केल्या येत नव्हती.
नवऱ्याची फ्लाईट 2 वाजता पोचणार होती अमेरिकेला, अजून का बरे फोन नाही आला. नक्कीच फ्लाईट डिले असणार कारण आपला नवरा आपल्यावर किती जास्त प्रेम करतो हे तिला माहीत होते.
किती काळजी करतो आपण, काही नाही येईल नक्की फोन.तिने स्वतःलाच समजावले.
विचार करत करत किती वेळ गेला तिलाही कळले नाही.
अचानक 4 वाजता अलार्म वाजू लागला.
बेडवरून उजव्या साईडला ती वळली तेवढ्यात तो कपडे घालत घालत म्हणाला-
बाईसाहेब निघतो आता मी, दूध घालायला जायचा वखत झाला. आज रातच्याला फोन करा परत मूड असला तर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

{{{ दुदवाल्याबरोबर अफेर?
Submitted by च्रप्स on 31 May, 2018 - 14:46 }}}

का बरं दूधवाला माणूस नसतो का? यापूर्वी त्यांच्यासोबत कोणी अफेअर करायचा विचारच केला नसेल का?

https://www.maayboli.com/node/21646

तो फोन नाही काही...

हा दुसरा फोन आला का?

{{{ आज रातच्याला फोन करा परत मूड असला तर. }}}

ते मी सांगू शकत नाही. वाचकांनी आपल्या कल्पनाविस्ताराने कथा पुढे न्यावी.

"बाईसाहेब निघतो आता मी, दूध घालायला जायचा वखत झाला. आज रातच्याला फोन करा परत मूड असला तर."

सावधान इंडियाचे रिपीट टेलिकास्ट संपत आले होते. रात्री दोन वाजता कधी तिचा डोळा लागला तिलाच कळले नाही अन टीव्ही मात्र दोन तास तसाच सुरु होता.