फार फार वर्षां नंतर
अचानक
तिला तिची मैत्रीण दिसते
जुनी जिव्हाळ्याची
बसमध्ये
समोरच्या सीट वर बसलेली
दोघींनाही खूप खूप आनंद होतो
विचारपूस होते
एकमेकींची
देवाणघेवाण होते
नवीन नाव, गाव, पत्त्यांची
जुन्या आठवणीत रमून जातात
काळ किती भुर्रकन उडून जातो की नाही
ह्यावर एकमत होतं
तिचा स्टॉप येतो
पुन्हा भेटण्याच्या आश्वासनाची देव घेव करून ती उतरते
पण राहूनच जातं
भेटणं निवांत
कुठल्यान कुठल्या कारणामुळे...
ही झाली फार वर्षापूर्वीची गोष्टं
फार फार वर्षानंतर
अगदी अलीकडेच
काही वर्षांपूर्वी
तिची भेट होते
तशाच जुन्या जिव्हाळ्याच्या
अजुन एकीशी
दोघीही खूप कडकडून भेटतात
भारावतात
उजाळा देतात
पुसट होत जाणा-या
जुन्या आठवणींना
घट्ट हातात हात धरून दोघीही ठरवतात
काहीही करून
एकदातरी भेटायचं
मनसोक्त
सर्वजणी मिळून
लवकरच
तसंच आश्वासन देतात
एकदुसरीला
पण
पुन्हा तेच होतं
शक्य होतच नाही
नेहमी प्रमाणे
पुन्हा एकदा
आयुष्य अडकून जातं
संसाराच्या मर्यादित परिघात
तसं बरच काही घडून जातं
फक्त एकच राहून जातं
मनातल्या मनातच
जगणं
थोडंफार तरी
स्वत:सारखं...
(समाप्त)
छान
छान
हे जे काही लिखाण आहे ते
हे जे काही लिखाण आहे ते गुलमोहर - कथा/कादंबरी, गुलमोहर - कविता, गुलमोहर - ललितलेखन ह्या तीनही ग्रूप्स मध्ये का घातलंय?
खुप सुन्दर
खुप सुन्दर