ताम्हीणी-२०१७

Submitted by हरिहर. on 27 May, 2018 - 07:29

पावसाळा येतोय. पावसाळी खरेदी अगोदर माझं पहिले काम असते 'गणपती' आणि 'पावसाळी सहलीचे' फोटो सॉर्ट करुन नको ते डिलीट करणे, बाकीचे वेगळ्या फोल्डरमध्ये सेव्ह करणे. आज तेच काम करुन घेतले. त्यातलेच चार-पाच आपल्यासाठी येथे देतो आहे. या वेळेस नविन लेन्स घेतो आहे त्यामुळे पावसाची जरा जास्तच वाट पहातो आहे.
(कॅमेरा- Canon EOS 60D, लेन्स- 18-200mm.)

प्रचि-१
1Tamhinee.jpg
प्रचि-२
2Tamhinee.jpg
प्रचि-३
3Tamhinee.JPG
प्रचि-४
4Tamhinee.JPG
प्रचि-५
5Tamhinee.JPG
प्रचि-६
6Tamhinee.JPG
प्रचि-७
7Tamhinee.JPG
प्रचि-८
8Tamhinee.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाहुन जळायला झालं. घरच्यांना न्यायला सांगा की दारच्यांना सांगा, माझा ताम्हिणी काय वरंधा घाट पण पहाण्याचा योग नाहीये. Sad

बाकी फोटो मस्त!

सगळ्यांचे धन्यवाद!
@रश्मी, या पावसाळ्यात गाडीत मोजके सामान टाका, आणि निघा बिनधास्त. गाडीच्या काचा खाली करून, भन्नाट वारा अनुभवत उतरा ताम्हिणी किंवा वरंध्यात. स्किल्ड ड्रायव्हर सोबत असेल तर शिवथरला जा. "धबाबा तोय आदळे" म्हणजे नक्की काय ते अनुभवाच या पावसाळ्यात.

हा असा दुधाळी फोटो कसा काढायचा शिकवा की, ट्रायपाॅड लागतो का, पाण्या एवजी सायच दिसते

सगळ्यांचे आभार!
@बन्या
ट्रायपॉड हवाच. कॅमेरा मॅन्यूअल मधून शटर स्पीड प्रायोरेटीमध्ये घ्या. TV/S. शटर स्पीड 1/5s ठेऊन एक फोटो काढा. मग तुम्हाला अंदाज येईल शटर स्पीड किती हवे ते. शटर स्पीड जितके स्लो ठेवाल, फोटो तितका स्मुथ येईल.

खुप छान फोटो.. वॉटर मार्क नाहि टाकला का फोटोवर? आता सगळीकडे गेलेहि असतील
धबधबा फोटो अगदि वॉलपेपर सारखा वाटतोय.. Happy

@रश्मी, या पावसाळ्यात गाडीत मोजके सामान टाका, आणि निघा बिनधास्त. गाडीच्या काचा खाली करून, भन्नाट वारा अनुभवत उतरा ताम्हिणी किंवा वरंध्यात. स्किल्ड ड्रायव्हर सोबत असेल तर शिवथरला जा. "धबाबा तोय आदळे" म्हणजे नक्की काय ते अनुभवाच या पावसाळ्यात.>>>> हो खरच हो. या वेळी घरच्यांचे डोके नक्कीच फिरवणार आहे मी. घरातल्या व्यापामुळे मोठा प्रवास शक्य नाही, पण निदान पुण्या जवळ तरी १ दिवसाची ट्रिप मारणार हे नक्की.

तुमचे कोकण व बाकी फोटो असतील तर टाका की.