चाळीतील गमती-जमती(१०)

Submitted by राजेश्री on 10 May, 2018 - 22:24

चाळीतल्या गमती_जमती(१०)

घरी गेल्यावर मम्मी पटकी म्हणजे काय?या माझ्या प्रश्नावर मम्मी कडून खाडकन थोबाडीत खाऊन रड थांबल्यावर स्फुंदत असताना मम्मीचा प्रश्न का विचारलंस अस तिन्ही सांजेच नाव काढतात का घरात? पण मला काय ते माहीत नाही म्हणून विचारतेय तर अस काहीस मी पुटपुटल्यावर..मम्मीच्या डोक्यात उजेड पडणार की तो जैनाच्या म्हातारीचा काय तर मॅटर असणार आज काय खोड काढलीस म्हातारीची मग मी म्हणाले लगोरीसाठी फरशी आणली होती त्यांच्या दारातून.पुन्हा एक मुस्काड पद्धतशीर गालावर बसणार पण मी पायाला मच्छर चावल्याचे निम्मित करून खाली वाकणार कारण मम्मी आणि पप्पा या दोघांनाही ते आम्हाला मारताना मागे सरल्याच, मार चुकवल्याच आजिबात आवडायचं नाही.पप्पा तर त्यांना राग आल्यावर मला मारावे या मतावर आले की सरळ सरळ म्हणायचे, राजा इकडं ये आणि एक कांपाड(म्हणजे कानफाड)खाऊन जा..मी जाग्यावरच घाबराघुबरा चेहेरा करून थिजल्यासारखी उभा राहायचे.मम्मीने मध्ये पडावं अस वाटायचं.बाहेरून कुणी आपल्या घरी यावं,अचानक पाहुणे यावेत,पाणी सुटाव अस काहीबाही वाटून जायचं.मी कानफाड खायला,Baccho दाया पैर आगे करो बाया पैर पिछे आयेगा फिर मजा...या गाण्याच्या तालात एक पाऊल पुढं घेतल्यासारखं करायचे आणि दोन पावलं मागे.पप्पांच मतपरिवर्तन व्हावं अस वाटायचं.९९% वेळा अस काही मतपरिवर्तन न होता मला मार खावा लागल्यामुळे माझे गाल लाल चे लालच राहिलेत अस माझं ठाम मत आहे आणि लहान मुलांना हिंदीत मेरे लाल अस का म्हणतात याचाही उलगडा मला झाला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा:! मस्तं लिहिलंय. पंचेसही भारी आहेत. Lol

कोल्हापूरात स्त्रियासुद्धा स्वतःला मी येतो, मी जातो वगैरे पुल्लिंगी शब्द वापरतात. तसे तुमच्या लिखाणातसुद्धा डोकावते. तिथे जरा लक्ष ठेवलं तर बरं होईल.

घरी गेल्यावर, "मम्मी, पटकी म्हणजे काय?" या माझ्या प्रश्नावर मम्मी कडून खाडकन थोबाडीत खाऊन, रडं थांबल्यावर स्फुंदत असताना, मम्मीचा प्रश्न. "का विचारलंस असं? तिन्ही सांजेच नाव काढतात का घरात?"

मम्मी कडून - मम्मीकडून
खाडकन - खाड्कन
रडं  - रडणं
सांजेच - सांजेचं
नाव - नांव

हे फक्त वरील परिच्छेदातील आहे.

तुम्ही तुमच्याच बोलीभाषेत लिहा, निम्नमध्यमवर्गीय वस्तीतल्या रांगड्या भाषेतल्या किश्श्यांमुळेच तुमचे लिखाण वाचायला मजा येते आहे.
मायबोलीवर 'शुद्ध'लेखनवाल्यांकडे जरा दुर्लक्ष करायचं असतं.