नमस्कार मायबोलीकर,
हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आपले प्रतिसाद मला पुढील लेखनास प्रवृत्त करतील.
आभारी आहे,
संकुल
----------------------------------------------------------------------
-- सुटका भाग ३ ( अंतिम ) --
"असे कसे वागू शकतात लोक. जग कोठे चाललय आणि हे" कुमार चिडून बोलत होता.
"ताई, बोल मी काही करू शकतो का ?" कुमार त्या धुरकट आकृतीकडे बघत बोलला.
"जो पर्यंत, माझ्यावरचा आत्महत्येचा कलंक मिटत नाही तोपर्यंत मला सुटका मिळणार नाही. तू माझी मदत करशील असे वाटले म्हणून मी बोलायला आले तुझ्याशी "
"नक्कीच, जेवढे मला शक्य आहे तेवढे मी करेन. "
आणि ती धुरकट आकृती विरळ होत गेली... तेवढ्यात कुमारच्या खांद्यावर हात पडला.
"अरे सकाळ होत आली, बाहेर काय करतोयस आणि कोणाशी बोलतोयस ? " श्रीकांत बोलला
"काही नाही, सांगतो सविस्तर नंतर " मनाशी काहीतरी ठरवत कुमार बोलला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
"सदा, अरे मला सांग त्या निशाताईचे मिस्टर राजेंद्र कोठे असतात"
"नक्की माहिती नाही पण निशाताईच्या आत्महत्येनंतर ते हे गाव सोडून निघून गेले" सदा उद्गारला
"ठीक आहे, त्यांचा मोबाईल नंबर वैगरे काही आहे का ?" कुमारने विचारले
"नाही रे, पण तू का विचारतोय हे सर्व" सदाने विचारले
"आणि इंस्पेक्टर जाधव इथेच आहेत ना ? त्यांनीच तपास केला होता ना सगळा "
" हो " सदा
"आणि डॉक्टर सुरेखाचा दवाखाना कोठे आहे "
"नक्की काय झालंय ते सांग कुमार, तुला काहीतरी समजलंय " सदाने विचारले
"रूमवर चल, सांगतो सविस्तर. पण जाताना मला डॉक्टर सुरेखाचा दवाखाना दाखव " कुमारने सांगितले
"हा बघ, डॉक्टर सुरेखाचा दवाखाना" सदाने एका बिल्डिंगकडे बोट करत सांगितले
"बरं, कोणी ओळखीचे आहे तिथे ", कुमारने विचारले
"आपला भाऊ म्हणजे चड्डीदोस्त आहे त्याचे मेडिकल शॉप आहे दवाखान्यासमोर. का रे ? "
"सांगतो, चल रूमवर"
-------------------------------------------------------------------------------------------------------------
"नाही, किती सोसलंय निशाताईने. त्या भाडंखाऊ ना जाळले पाहिजे " सगळे ऐकून सदा चिडून बोलत होता.
"हे बघ, असे करून नाही चालणार. आपल्याला सर्व गोष्टी सिद्ध करून जधावसाहेबांना सांगाव्या लागतील. त्याची मदत लागेल आपल्याला" कुमारने समजावलं "आणि सावधपणे सगळी पावले उचलावी लागतील. यात भरपूर मोठी माणसे सामिल आहेत हे ध्यानात ठेव"
"हम्म, आता काय करायचे ते सांग ? "
"पहिला, तुझ्या मित्राला विश्वात घेऊन हे जाणून घ्यावे लागेल की त्या रात्री नक्की काय झाले होते "
"ते माझ्याकडे लागल, थांब फोन करतो त्याला आणि संध्याकाळी भेटूया म्हणून सांगतो "
"चालेल, तोपर्यंत श्री पण येईल "
-------------------------------------------------------------------------------------------------------------
"हॅलो, अरे अन्या दुकानात आहेस का ?" सदाने मित्राला विचारले
" हो, का रे ? "
" रात्री गाडीवर ये की जरा, एक काम आहे तुझ्याकडे "
" नक्की, तू बोलावले आणि मी नाही आलो असे कधी झालंय का ? " अनिस उद्गारला
" बोला, साहेब काय काम काढले गरीबाकडे " अनिस खुर्चीत बसत बोलला.
" अरे, हा कुमार. कोल्हापूरचा आहे, मित्रा आहे माझा " सदाने कुमारकडे बघत सांगितले
" अरे वा, मी अनिस. इथे मेडिकल शॉप आहे, डॉक्टर सुरेखाचा दवाखान्यासमोर. " अनिस कुमारशी हात मिळवत बोलला.
" अन्या, तुला निशाताई आणि राजूदादा आठवतात का रे ? " सदाने विचारले
" हो, का रे पण काय झाले " अनिस आश्चर्यकारक नजरेने बघत बोलला.
" मी सांगतो सविस्तरपणे.." सदा बोलला
" अरे परवा ह्या पोरांनी प्लॅनचॅट केले आणि .... .... .... "
" वाटलेच होते मला निशाताई असे कधीच वागणार नाही... बोल माझ्याकडून काय मदत पाहिजे " अनिस बोलला
" अनिस, मला एक सांग, तुला त्या दिवशीचे कांही आठवते का " कुमारने विचारले
" नक्की काय हवंय ते सांग "
" निशाताई दवाखान्यात गेली होती त्या बद्दल"
" अरे, ती जातं माझ्या दुकानावरूनच गेली त्या दिवशी. तिची औषधे संपत आली होती. माझ्याकडे पण शिल्लक नव्हती. मी दुसऱ्या दिवशी आणून ठेवतो म्हणून सांगितले. ती म्हणाली की राजूदादाना उद्या पाठवते "
"असे सांगून ती दवाखान्यात गेली. संध्याकाळी मी पण कामात होतो त्यामुळे लक्ष नव्हते माझे" अनिस उदासपणे बोलला.
" रात्री कोणती गाडी वगैरे बघितली का तू, जे आपल्याला काही दिशा देईल "
थोडा विचार करत अनिस बोलेला "गाडी नाही पण, शाम्या आला होता दुकानात. "
" कांही घेतले का त्याने दुकानातून ? " उत्सुतेने दोघांनीपण विचारले
" नक्की आठवत नाही, पण डेटॉलची एक मोठी बाटली, रूम फ्रेशनर घेतले होते "
" किती वाजता ?"
" मी दुकान बंद करताना म्हणजे रात्री साडे दहाला.... " आणि थोडे आठवत अनिस बोलला "माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते म्हणून ttmPay ने पैसे दिले त्यानी "
" काय सांगतो, पहिला कलू मिळाला आपल्याला " आनंदी होत कुमार बोलला.
" उद्या, तुझे त्या दिवशीचे ttmPay चे स्टेटमेंट डाउनलोड करून दे मला "
" नक्की " अनिस बोलला.
" नमस्कार जाधवसाहेब " जाधवच्या घरी, दरवाज्यात उभा राहून कुमार बोलला.
" बोला, आपण... ? " जाधव आठवत बोलले
" मी कुमार कुलकर्णी, इथे हिंदुस्तानच्या होस्टेलवर मित्राकडे आलोय. एक काम होते तुमच्याकडे " कुमार आत येत बोलला.
" हे बघा, स्टेशनची कामे मी घरी आणत नाही. आपण तिथे जाऊन काळेंना भेटा काही काम असेल तर" जाधवांनी उत्तर दिले.
" सर मला निशा देशमुख केस बद्दल बोलायचे होते. ते पोलीस स्टेशनला बोलणे योग्य नाही म्हणून घरी आलो " कुमारने स्पष्टीकरण दिले.
" तुमचा काय संबंध काय आहे या केसशी ? " जाधवांनी खडसावून विचारले.
" तसा म्हणाला तर काहींच नाही आणि तसा म्हणाला तर भरपूर मोठा संबंध आहे "
" काय ने स्पष्टपणे बोल " जाधवांनी संभ्रमात पडून विचारले
" सर, सांगतो सगळे. पण आम्हाला तुमची मदत लागेल " कुमार जाधवांकडे बघत बोलेला.
" काय आहे ते सांग मग मी ठरवतो मदतीचे "
" सर, तुमचा आत्मा वैगरे वर विश्वास नसेल पण ... ... ... असे आहे सगळे "
" Unbelievable, पटत नाही मला " जाधव गोंधळून म्हणाले.
" सर, मग मला सांगा, मी कोल्हापूरचा मला, तुमचे नाव, काळे, शाम्या हे सगळे कसे माहिती ? " कुमार कॉन्फिडन्सने बोलला.
" ते पण आहे, बोल काय मदत हवी आहे तुला "
" सर, मला निशाताईला न्याय मिळवून द्यायचा आहे. सर, आपण ही केस ओपन करू शकतो का ? "
" नाही, जोपर्यंत कोणी तक्रार देत नाही किंवा वरिष्ठ आदेश देत नाहीत तो पर्यंत नाही करू शकत "
" पण सर, जर यातील काही पुरावे आपण गोळा केले तर तुम्ही वरिष्ठांना सांगून ओपन नाही का करू शकत, प्लीज ? "
" पण असे काय पुरावे देणार तू "
" सर, शम्याचे स्टेटमेंट आहे की तो संध्याकाळी 9 पासून दारू पीत होता घाटात, बरोबर "
" हम्म "
" हे बघा सर, शाम्याने ttmPay वरून मेडिकलचे पेमेंट केलाय रात्री 10.30 ला "
" छान पुरावा आणला आहेस हा तू . या वरून मी घेतो आत त्याला चौकशीसाठी " जाधव उत्साहाने म्हणाले.
" जय हिंद सर, जाधव बोलतोय, एक जुन्या केस संदर्भात बोलायचे होते " जाधवांनी एस. पी. मुजुमदारना फोन केला.
" जाधव, उदय सकाळी येऊन भेटा "
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" बसा जाधव, बोला काय आहे केस ? " मुजुमदार जाधवना म्हणाले.
" सर, तीन वर्षांपूर्वी निशा देशमुखने आत्महत्या....... " जाधवनी निशा आत्मा प्रकरण बाजूला करून केस ब्रिफ केली.
" सर गवळीसाहेबानी केस बंद करायची ऑर्डर केली म्हणून नाहीतर मला हा खुनच वाटत होता "
" असू दे, मी आहे तुमच्यामागे. अकॅशन प्लॅन काय आहे ? कारण हा पुरावा इतका मोठा नाही की आबासाहेबाना आत घेऊ शकू " मुजुमदारनी शंका व्यक्त केली.
" सर मला वाटते, आपण शाम्याला आत घेऊन दम दिला तर तो जाऊन सावध करायचा प्रयत्न करेल आणि काहीतरी चूक करतील "
" ठीक आहे "
" आभारी आहे सर.. जय हिंद " म्हणत जाधवांनी कडक सॅल्युट मारला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" काय रे भाडखाऊ, खोटं बोलतो आमच्याशी. खोटे स्टेटमेंट देतो आम्हाला.. थांब थर्ड डिग्रीच घेतो " काळेंनी शम्याचे केस पकडात विचारले
" नाही खरेच बोललोय... काय तरी गैरसमज झालाय तुमचा साहेब " शाम्या गयावया करत बोलला.
" भडव्या, त्या रात्री जर 9 पासून दारू पीत बसला होता घाटात तर रात्री 10.30 ला दुकानात डेटॉल घायला तुझा बाप आला होता का रे " काळेंनी विचारले.
" नाही, मी नव्हतो गेलो तिथे "
" साल्या कॅश तरी द्यायची ttmPayने पेमेंट केलंस आणि म्हणतो की मी नव्हतो म्हणून. स्टेटमेंट आहे आमच्याकडे... बऱ्या बोलाने खरे बोल नाही तर बर्फच घालतो तुझ्या xx मध्ये " काळे जरबेत बोलले.
" साहेब, चुकलं माझे... मी घरीच होतो त्या रात्री..... " काळेंकडे बघत शाम्या बोलला.
" असा बोलणार नाहीस तू, खरे बोल नक्की काय झाले होते त्या रात्री " काळेंनी त्याच्यावर नजर रोखत विचारले.
" खरेच बोलतोय मी, जाऊ का मी ? की आबासाहेबाना फोन करू "
" साल्या आबाची धमकी देऊ नको मला, तू आणि तुझा तो आबा दोघे पण यात आहात हे माहिती आहे. सांग आबाला आता या जाधवशी गाठ आहे. " जाधव गरजले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" असं... बघितले पाहीजे जाधवला " आबासाहेब चिडून बोलले.
" शिंदे, SP ला फोन लावा. "
" मुजुमदारसाहेब, आमदारसाहेब बोलणार आहेत " असे म्हणून शिंदेंनी अबसाहेबांकडे फोन दिला.
" नमस्कार साहेब, तुम्हाला येऊन एक महिना झाला आम्हाला वेळच नाही मिळाला भेटायला... तुम्हाला वेळ असेल तर आज रात्री या आमच्या फार्म हाऊस वर .. स्वागत करू तुमचे चांगले. समजले का ? " आबासाहेब हसत बोलले.
" आहो तुम्ही निमंत्रण दिले त्यातच सगळे आले. आहो आपण सर्व जनतेचे सेवक. त्यांची सेवा करण्यामुळे आपल्याला वेळच मिळत नाही बघा . "
" बरोबर आहे बघा, आपल्याला वेळचा प्रॉब्लेम तेवढा आहे.. पण त्याबरोबर तुमचे ते जाधव जर आमच्या माणसांना त्रास देत आहेत. सांगा जर त्यांना आपल्या माणसांना त्रास देत जाऊ नका म्हणून "
" आबासाहेब, ते मात्र आपल्याला जमत नाही बघा. जर जाधव कोणाला त्रास देत असतील तर त्या मागे काहीतरी नक्की कांही तरी कारण असणार बघा. नाहीतर एवढा सिनियर माणूस असा कसा वागेल सांगा.. आणि जर तुमचा माणूस जर निर्दोष असेल तर सुटेलच की त्यातून... बरोबर आहे ना ? " मुजुमदारनी आबासाहेबाना कोड्यात टाकत विचारले.
" ते पण बरोबर आहे बघा. ठेवू का ? " उलट हसत आबासाहेबानी फोन ठेवला.
" हे बेनं काय ऐकलं असं नाही वाटत, शाम्या जरा सहन कर, तोंड उघेडलं तर तुला हार घालावा लागेल "
शाम्या शाहारला... " जी साहेब "
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" कुमार, जरा बाहेर येतो का ? " या हाकेने कुमार ताडकन उठून बाहेर आला.
बाहेर निशाची धूसर आकृती कुमारची वाट पाहत उभी होती.
" थँक् यू कुमार, केस पुन्हा सुरू केल्या बद्दल "
" ताई म्हणलंना तुला मी, आणि तू माझ्यावर विश्वास टाकलास ना.. मी नक्की प्रयत्न करणार हे तडीला लावण्याचा " कुमार विश्वासाने म्हणाला.
" हम्म, मला माहिती आहे. "
" हम्म, माझा प्लॅन तयार आहे. ? "
" बोल काय आहे ? "
" आपल्याला शाम्या आणि डॉक्टरची साक्ष महत्वाची आहे.... आता आपण असे करू.... .... ..... ...... "
--------------------------------------------------------------------------------------------------------------
" शाम्या, आज बसायचे का. माझ्या मित्राने चिवाझ रिगलची बाटली आणली आहे 12 वर्षे जुनी ? " अंनिसने फोनवर विचारले.
" कोठे बसूया ? "
" घाटात भेटू. ये 7 वाजता दुकानात "
" कुमार, येतोय तो. आता पुढेची सर्व जबाबदारी तुझी " अनिसने कुमारला फोन केला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
कुमारने घाटात दरीच्या जवळ गाडी पार्क केली आणि श्रीकांतला बोलेला " तुम्ही गाडीतच थांबा. शम्यांनी दारू पिल्यावर मी आणि सदा इथून निघून गेलो की तुम्ही प्लॅन सुरू करा. मी खूण केली की तू गाडीचे लाईट ऑन कर. हे बघ, सदा आणि अनिस पण आले बघ "
कुमारने सर्वाना प्लॅन समजावून सांगितला आणि म्हणाला " बेस्ट ऑफ लक !!! "
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" या शामराव, हा कुमार. हाच घेऊन आलाय बाटली " अनिसने कुमारची ओळ्ख करून दिली.
" नमस्कार. तुम्ही आलात बरे वाटले " कुमारने शाम्याशी हात मिळवत म्हणले
" हा दारूसाठी स्मशानात पण येईल " सदा बोलला.
" हे हे हे... " शाम्या हसला.
" ग्लास काढा रे " कुमारने पिशवीतून बाटली काढत म्हणले.
" हे घ्या शामराव " ग्लास पुढे करत कुमार बोलला.
" मस्त आहे " म्हणत शाम्याने एका घोटत ग्लास संपवला.
" अजून दे रे सदा " कुमारने सदाला खूण केली.
सदाने बोलत बोलत अर्धी बाटली पाजली शाम्याला.
" अरे कोल्ड ड्रिंक संपली, घेऊन येतो. चल रे सदा " म्हणत कुमारने गाडीला किक मारली.
ते दोघे गाडी घेऊन शम्याच्या नजरेआड गेले आणि गाडी झाडात लावून परत वर येऊन लपून बसले.
कुमारने त्याचा नाईट विजन कॅमेरा ऑन केला आणि पक्षाचा आवाज देऊन अनिसला खूण केली.
" शाम्या, मोकळं होऊन येतो एक मिनिटात " म्हणत करंगीली वर करून खूण करत तो दरीकडे गेला.
" साला 10 मिनीटे झाली कुठे गेला गेला हा अनिस " म्हणत शाम्याने त्याला हाका मारल्या
" अनिस... ए अनिस "
काहींच उत्तर येत नाही बघून, तो दरी कडे गेला.
दरीकडे गेल्यावर शम्याला दरीशेजारी दगडावर बसलेले कोणीतरी दिसले.
" जास्त झाली का रे अन्या " म्हणत शाम्या जवळ गेला.
तेवढ्यात गाडीचे लाईट ऑन झाले आणि उजेडात त्याला एक मुलगी बसलेली दिसली.
" कोण आहे ? " शाम्याने विचारले.
" मी " आणि थोडा पॉझ घेत ती मागे न बघता म्हणाली " निशा राजेंद्र देशमुख ".
" हे कसे शक्य आहे ? तुला तर आम्ही मारून, मी इथुन खाली टाकले होते " शाम्या बोलला
" तू टाकले ते माझे शरीर, माझा आत्मा तर आहे जिवंत आणि मी तुला जगू देणार नाही " ती मुलगी पाठमोरीच बोलली.
" नाही हे शक्य नाही म्हणत शाम्या पळत रस्त्याकडे आला.
" या शामराव " म्हणत जाधव समोर आले.
" ती आहे तिकडे ? " शामरावने दरीकडे बोट करत म्हणाले.
" कोण ? "
" ती.. ती निशा " घाम पुसत शाम्या बोलेला
" काळे, यांनीच तिला मारली ना ? " जाधव बोलले
" हो, आम्हीच मारले तिला, आता ती मला मरणार. वाचवा मला " हात जोडत शाम्या बोलला.
" का जा की तुझ्या आबासाहेबांकडे.. चला काळे " म्हणत जाधव जीप मध्ये बसले.
" सर, याला असे सोडले तर ती मारेल त्याला. त्या पेक्षा त्याला आत घेऊ म्हणजे पोलीस कोठडीत हा सुरक्षित राहील " काळे जाधवना बोलले.
" बरोबर आहे, जाधवसाहेब मला आत घ्या आणि कोठडीत टाका " जाधवांच्या पाया पडत शाम्या बोलला.
" नको काळे, याला आत घेतला की याचा आबा लगेच sp ना फोन करतो आणि आपल्याला ऐकावे लागते "
" नाही साहेब, मी नाही कोणाला सांगत, तुम्ही सांगाल तसे वागतो "
" मग नक्की काय झाले त्या रात्री ते सांग "
" त्या रात्री, आबासाहेबानी मला डॉक्टर सुरेखा कडे जाऊन निशाला घेऊन जैतून कडे घेऊन यायला सांगितले आणि येताना डेटॉलची मोठी बाटली घेऊन ये म्हणून सांगितले. "
" रात्री 10.30 ला गाडी घेउन डॉक्टर सुरेखाच्या दवाखान्यात गेलो "
" कोणती गाडी ? " काळेंनी विचारले.
" सुमो "
" नंबर ? "
" MH 12 XX 9999 "
" कोणाची आहे ही गाडी ? "
" आबासाहेबांची "
" बर, पुढे "
" मी मेडिकलमधून डेटॉल विकत घेतले आणि डॉक्टर कडे गेलो. त्या मला वरती बेडरूममध्ये घेऊन गेल्या. तिथे निशा बेशुद्धावस्थेत होती. मी आणि डॉक्टरांनी तिला गाडीत घेतले आणि मी तिला घेऊन जैतून कडे घेऊन गेलो. "
" कोण आहे हा जैतून आणि कोठे राहतो ? " काळेंनी विचारले.
" मांत्रिक आहे गावच्या स्मशाना मागे राहतो " शाम्याने सांगितले.
" बरं, कोण कोण होते तिथे " जाधवनी विचारले.
" आबासाहेब, शिंदे, जैतून आणि मी "
" बरं, पुढे काय झाले "
" आबासाहेबांनी हिचा बळी दिला. "
" का ? " जाधवने विचारले
" जैतून आबासाहेबाना बोलला की जर 5 महिन्याची गरोदर बाईचा बळी दिला तर तो देवीला प्रसन्न करून घेईल आणि मग तो आबासाहेबाना मुख्यमंत्री बनायला मदत करेल. "
" एव्हढ्या कारणासाठी बळी, शी . पुढे बोल " जाधव बोलले.
" पुढे मी आणि शिंदेंनी तिची बॉडी गाडीत घालून इथे आणून खाली दरीत फेकून दिली. गाडी डेटॉलने पूर्ण धुतली आणि पोलिसांना फोन करून सांगितले की हिने आत्महत्या केली म्हणून.... मला माफ करा....मला वाचवा तिच्यापासून "
" माफी माझ्याकडे नाही निशाकडे माग " जाधव बोलले.
" हो " रडत शाम्या बोलला.
" हे सगळे स्टेटमेंट लिहून देशील " जाधव बोलले.
" हो... " शाम्या हात जोडत म्हणाला.
जाधवनी कुमारला खूण केली आणि कुमारने सुद्धा हाताचा अंगठा वर करून रेकॉर्डिंग ठीक आहे असे सांगितले.
" काळे, घ्या याला आत "
-------------------------------------------------------------------------------------------------------------
पोलिस स्टेशन मध्ये गेल्यावर जाधवनी शाम्याला थर्ड डिग्री रूम मध्ये नेण्यास सांगितले.
त्याला रूममध्ये बसवून काळेंनी बाहरन दार बंद केले.
" काय, झाले का तुमचे आबासाहेब मुख्यमंत्री ? " खिडकीतून आवाज आला
शाम्याने दचकून खिडकीत बघितले तर पाठमोरी मुलगी..
" साहेब मला वाचवा साहेब.." असे ओरडत शाम्या दरवाजा वाजवू लागला.
" काय झाले ? " काळेंनी आत येत विचारले.
" ती.. ती निशा आहे तिकडे खिडकीत "
" कोठे कोण आहे ? " काळेंनी खिडकीतुन बाहेर बघत विचारले.
" ती.. ती मला सोडणार नाही साहेब " रडत शाम्या बोलला.
" हे बघ, ती आली की सांग तिला की तू गुन्हा मान्य केला आहेस आणि आम्हाला स्टेटमेंट पण देतो आहेस म्हणजे ती शांत होईल " त्याला समजावत काळे बोलले
" काय, झाले का तुमचे आबासाहेब मुख्यमंत्री ? " खिडकीतून आवाज आला
" मला माफ कर निशा, मी माझा गुन्हा मान्य करतो आणि पोलिसाना तसे स्टेटमेंट पण देतो. " खिडकीकडे हात जोडत शाम्या बोलला.
" जर नंतर बदललास तर मी परत येईन आणि त्या वेळी मी स्वतः तुझा जीव घेईन" खिडकीतून आवाज आला
" नाही, मी सर्व खरे खरे सांगेन आणि नाही बदलणार " शाम्या रडत बोलला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" कुमार, मस्त प्लॅन जमला, आणि साक्षीने पण मस्त ऐकटिंग केली " जाधव कुमार आणि साक्षीकडे बघत बोलले.
" सर, निशाताईला न्याय मिळण्यासाठी मी काहीही करेन. कुमारने या प्लॅनची कल्पना दिली तेंव्हा मला वाटले की हा निशाताई आणि जिजुना न्याय मिळवून देणार. आणि आम्ही सख्या बहिणी असल्यामुळे आमच्यातले साम्य येथे उपयोगी पडेल. "
" हम्म, आता याची दारू उतरली की मी याचे स्टेटमेंट जज समोर घेतो.. आता डॉक्टरचे स्टेटमेंट "
" ते आम्ही बघतो " कुमार बोलला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" मॅडम, येऊ का आत ? " अनिसने डॉक्टर सुरेखाना विचारले.
" अरे ये की "
" मॅडम, एक बोलायचे आहे " खुर्चीत बसत अनिस बोलला.
" बोल "
" मॅडम, काल रात्री मी तुमच्या बाल्कनीत एका बाईला बघितले. "
" काय ? "
" हो मॅडम, तुम्हाला पटणार नाही पण ती निशा देशमुख होती "
" कांही पण बडबडु नको "
" हो मॅडम, नक्की तीच होती "
" कसे शक्य आहे, ती तर जाऊ 2 वर्षे झाली "
" माहिती आहे मॅडम मला, पण जे बघितले ते सांगितले मी. येतो मी. लक्ष ठेवा " म्हणत अनिस खुर्चीतून उठला
" आणि मॅडम, आज अमावस्या आहे तेंव्हा जपून "
" मॅडम, माझी आणि माझ्या बाळाची काय चूक होती ? " बाल्कनीतून आवाज आला त्यासरशी सुरेखा दचकून उठली.
" तू.. तू इथे " घाबरत सुरेखाने विचारले.
" हो ना, तुम्ही इंजेक्शन दिले आणि मी झोपी गेले इथे .. का अश्या का वागलात मॅडम तुम्ही "
" निशा, माफ कर मला. मी चुकले. मी एका केस मध्ये अडकले होते, त्यातुन सुटण्यासाठी मी हे सगळे केले. माफ कर मला. " हात जोडत सुरेखा बोलली.
" मला मारणाऱ्या सर्वांना शिक्षा होईल तेंव्हाच मी माफ करेन तुम्हाला. तो पर्यंत मी इथेच आहे "
" माफ कर मला, माफ कर " सुरेखा रडू लागली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" बसा डॉक्टर, काय काम काढलात ? " हातातील फाईल बाजूला ठेवत जाधवनी विचारले.
" साहेब, मला एक गुन्ह्याची कबुली द्यायची आहे "
" काय ? "
" हो, निशा देशमुख हिची आत्महत्या नव्हती तर तो एक खून होता. " सुरेखाने सांगितले.
" काळे, मॅडमचे स्टेटमेंट घ्या "
-------------------------------------------------------------------------------------------------------------
"जय हिंद सर, जाधव बोलतोय "
" बोला जाधव, काय प्रोग्रेस " मुजुमदारनी विचारले.
" सर, शाम्याने प्रत्यक्षदर्शी आणि डॉक्टर सुरेखानी खुनाला मदत केली म्हणून रेकॉडेड स्टेटमेंट दिलय."
" वेल डन जाधव आता पुढे ? "
" आता आबासाहेबाना आह घायची वेळ आली आहे "
" येस, गो अहेड "
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" आबासाहेब तुम्हाला आमच्यासोबत यावे लागेल चौकशीसाठी " जाधव बोलले
" कशासाठी ? " आबासाहेब गराजले.
" आवाज खाली. निशा देशमुख केससाठी "
" माझा काय संबंध त्या केसशी ? "
" संबंध ? आय विटनेस आहे आमच्याकडे. चला आता "
" कोण ? "
" सगळे सांगतो... चला आता" जाधव म्हणाले
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" नाईक, आम्ही बाहेर आलो पाहिजे. तुम्हाला वकील म्हणून काय बसून खायला पैसे देतो का आम्ही ? "
" साहेब, शाम्या आय विटनेस झालाय. डॉक्टर सुरेखानेपण स्टेटमेंट दिलंय. जैतून पण बोललाय. कठीण आहे जमीन. एक काम करा, कोर्टात हार्ट अटॅक चे नाटक करा. तुम्हाला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करू. सध्या एकच मार्ग दिसतोय "
" बोला आबासाहेब, तुम्हाला काय म्हणायचे आहे " जजनी विचारले.
" मी निर्दोष आहे. हे सगळे कट करत आहेत माझ्या विरुद्ध " आबासाहेब बोलले.
" जाधवना पैसे नाही दिले मी म्हणून मला अडकवत आहेत... मी निर्दोष आहे.... आई ग... " छातीवर हात ठेऊन आबा खाली कोसळले.
" आबांना हार्ट अटॅक आला " नाईक आबांकडे धावत जात बोलले.
" जाधव, यांना ऍडमिट करा " जजनी सांगितले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" नाईक, आता काय ? " आबांनी नाईकांना विचारले.
" साहेब, बघतो शाम्या आणि डॉक्टर फूटतात का ते "
" हम्म, बघा . आम्ही आत गेलो तर तुमचे काही खरे नाही " आबा जरबेने बोलले.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
" आबा, मी काय गुन्हा केला होता म्हणून तुम्ही माझा बळी दिला ? " धूसर आकृतीतून आवाज आला.
आबासाहेब दचकून उठले. समोर निशाची धूसर आकृती उभी होती.
" आता मला तुमचा बळी हवाय " असे म्हणत निशा हळू हळू आबासाहेबांकडे येऊ लागली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळी पेपरला बातमी होती "आमदार आबासाहेब इनामदार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन. ते निशा देशमुख यांच्या खुनाच्या आरोपाखाली अटकेत होते. "
" कुमार मी तुझे कसे आभार मानू हे मला समजत नाही " निशा कुमारला बोलली.
" ताई ते माझे कर्तव्य होते. मला बरे वाटले की आम्ही तुला न्याय मिळवून दिला "
" मी तुम्ही सर्वांची आभारी आहे माझी सुटका केल्याबद्दल " म्हणत निशाची आकृती हवेत विरून गेली.
लेखक, संकुल
चांगली लिहीलीत ही गोष्ट.
चांगली लिहीलीत ही गोष्ट. धागे दोरे व्यवस्थीत जमवलेत. कारण पहिलाच प्रयत्न असुनही वाचतांना लिंक तुटली नाही कुठेही. पुढील लेखनाकरता शुभेच्छा. लिहीत रहा.
छान लिहिली आहे कथा.पुढील
छान लिहिली आहे कथा.पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
छान आहे कथा.. आवडली. पुलेशु !
छान आहे कथा.. आवडली.
पुलेशु !
छान जमलीय कथा. पुलेशु.
छान जमलीय कथा. पुलेशु.
चांगले लिहिलेत
चांगले लिहिलेत
छान आहे कथा.. आवडली.
छान आहे कथा.. आवडली.
पुलेशु ! +१
छान लिहिली आहे कथा.पुढील
छान लिहिली आहे कथा.पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
मस्तच.... पण गाडी डेटॉलने
मस्तच.... पण गाडी डेटॉलने पूर्ण धुतली ????
छान लिहीली आहे.
छान लिहीली आहे.
पहिल्याच प्रयत्नात छान
पहिल्याच प्रयत्नात छान जमलीये कथा! पुलेशु
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी
प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे..
@L - निशाची बॉडी गाडीतून नेऊन दरीत टाकल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी गाडी डेटॉलने धुतली. डेटॉलच्या उग्र वासाने गाडीतील वास पण जाईल ना..
पहिलाच प्रयत्न असुनही छान
पहिलाच प्रयत्न असुनही छान जमली आहे कथा. आवडली .