'असंभव..!!' :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>भाग-1

Submitted by अन्नू on 15 October, 2011 - 15:52

NOTE ::(ही कथा पुर्णपणे काल्पनिक असुन यातील घटना, स्थल, प्रकाशचित्रे आणि व्यक्ती यांचा संबंध कोणत्याही मृत अथवा जिवित व्यक्तीशी नाही. याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद!)

Suspense-Thriller.jpg

असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)
.
.
.
.भाग=>1

..............................................."एक मिसिंग केस"......................................
रात्रीचा ८ चा सुमार असावा माटुंगा स्टेशनवर नेहमीपेक्षा आज लोकांची वर्दळ कमी असल्याकारणाने स्टेशनवर जरा जास्तच शांतता पसरलेली होती. स्टेशनवरील पाच-सहा प्रवासी आणि काही स्टॉल्स सोडले तर पुर्ण प्लॅटफॉर्म रिकामा होता. ऊन्हाळ्याचे- (मे महिन्याचे) दिवस असल्याने बहुतेक लोक सुट्टी टाकुन एकतर आपापल्या गावी गेलेले होते- नाहीतर आपल्या नातेवाई़कांकडे गेलेले होते त्यामुळे साहजिकच ट्रेनने प्रवास करणारा मोठ्ठा प्रवासी नोकरवर्ग कमी होता; त्यात शनिवार असल्याने स्टेशनवर येणार्‍या गाड्या मापकच प्रवासी घेऊन येत होत्या.

प्लॅटफॉर्म च्या डाव्या बाजुला -चर्चगेटच्या दिशेने- एका कोपर्‍यात, अंधुकशा दिव्याखाली, सिमेंटच्या बेंचवर एक जोडपं बसलेलं होतं. रात्रीच्या त्या शांत वातावरणात आपल्या सोनेरी स्वप्नांच्या दुनियेत हरवून जाऊन ते दोघेजण एकमेकांना चिटकुन बसले होते. पुर्ण जगाला विसरुन डोळे मिटुन ती त्याच्या मजबूत खांध्यावर विसावली होती- एखादी वेल जशी वटवृक्षाला बिलगावी ना तशी!! एकप्रकारचा मोठ्ठा आधार-एक सुरक्षितता तिला त्या मिठीत जाणवत होती. त्यानेही आपल्या डाव्या हाताने तिला आपल्या कणखर बाहुपाशात सामावुन घेतले होते.
सर्व कसं कालच घडल्यासारख वाटत होतं, कॉलेजमध्ये झालेली ती अपघाती भेट- दोघांमध्ये वाढत गेलेली ओळ्ख, कमी होणारा दुरावा; कधी एकत्र आलो, कधी प्रेमात पडलो कळलेच नाही. मग सततचे भेटणे, बोलणे, फिरणे सुरु झाले. या ना त्या कारणाने सतत भेटू लागलो. तिचे ते हसणे, बोलणे, तिच्या त्या नखरेल सवई, अगदी तिच्या घार्‍या डोळ्यांनीसुद्धा त्याला घायाळ केले होते.१४ फेब्रुवारी एक अविस्मणीय क्षण! तिला प्रपोज करुन, हातात हात घेऊन एकत्र साथ देण्याची वचने दिली.....सगळ कस सुरळीत चालल होत काही दिवसांतच आपण तिच्या वडिलांकडे़ तिचा हात मागण्यासाठी जाणार होतो आणि मग अचानक.......................................
भुतकाळातला एक-एक क्षण त्याच्या डोळ्यांसमोर झरझर-झरझर येऊ लागला.

"प्लॅटफॉर्म क्र. एक पे आई हुई लोकल...." स्टेशनवरच्या त्या अनाऊन्समेंटने तो भानावर आला. आपल्या डोळ्यातील तरळणारे पाणी त्याने एका हाताने पुसले. ती मात्र अजुनही त्याच्या बाहुत डोळे मिटुन तशीच होती. त्याचे लक्ष तिच्याकडे गेले, गोड मंद स्मित हास्य तिच्या गुलाबी ओठावर होते, गोर्‍या पिठुर रंगाच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे समाधान दिसत होते- जसे एखाद्या लहान मुलाच्या चेहर्‍यावर त्याची आवडती वस्तु मिळाल्यावर भाव ऊमटावेत तसे! वेळ बदलला, काळ बदलला, बाजुची परिस्थिती बदलली पण तिच्यात मात्र काहीएक बदल झाला नव्हता, तशीच गोड, सुंदर, लाजरी, एखाद्या निर्मळ र्‍हुदयाच्या बालकासारखी. हवेच्या एका झुळुकीने चंद्रावर श्रावणी काळे ढग पसरावे तसा तिचा चेहरा तिच्या काळ्याभोर केसांनी अलगद झाकला गेला. त्याने हळूच ते केस ऊजव्या हाताच्या बोटांनी बाजुला सारले पण त्यातुनही त्याची तिला जाणिव झाली. "हूँ $ $.." तिने साखरझोपेत असणार्‍या एखाद्या लहान मुलासारखे तोंड केले.तिचे ते तोंड पाहून त्याला हसू आले.

"अरे क्या हुआ? रुका क्यू है?" घाईघाईने पुढे जाणारा एक २० शीतला लुकड्या मुलगा पाठीमागे वळत, मागे ऊभ्या असलेल्या त्याच्या काळ्या मित्राला म्हणाला.

"ऊधर तो देख जरा.." त्या जोडप्याच्या दिशेने बोट दाखवत तो हसून म्हणाला.

"अरे जाने दे नं..!! सब पागल हैं। तु चल, जल्दी घर पोहोचना हैं" असे म्हणत त्याच्याकडे बघतच तो लुकड्या त्याच्या काळ्या मित्राला एका हाताने ओढतच तेथून निघून गेला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

"शांत राहा..!!!!!"- पवार जवळजवळ ओरडलेच. तसा तिथे ऊभ्या असणार्‍या सर्व बायकांचे आवाज एकदमच बंद झाले. ईन्सपेक्टर पवारांच्या या करड्या आवाजाने पुर्ण पोलिस स्टेशन हादरुन गेले, त्या आवाजासरशी तेथिल इतर कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल-गोडबोले इतकेच काय पण सब. सन्स्पेक्टर जाधव आणि असि. भोसलेसुद्धा जाग्यावरच थिजले. पवार याआधी असे कधीच तापले नव्हते किंबहुना ते अतिशय शांत स्वभावाचे होते. त्यांचे हे भयानक रुप आज प्रथमच सर्वांना दिसत होते. ते बटाट्यासारखे मोठे आणि लालभडक झालेले डोळे पाहून भोसले आणि जाधवांच्या कपाळावर धर्मबिंदूच जमा झाले.

"जाधव या सगळ्याना बाहेर काढा अगोदर." पवार पुन्हा एकवार खेकसले. तसे जाधव आणि गोड्बोले आपल्या दोन-तिन कॉन्स्टेबलसह पुढे सरसावले. काहि वेळातच पोलिस स्टेशनची निम्मी अर्धी भरलेली रुम मोकळी झाली. आता रुम मध्ये पवारांच्या पुढे फक्त महाजन बसले होते.

"हं, बोला- काय प्रोब्लेम आहे तुमचा?" डोळे मिटुन, तापलेल्या डोक्यावरुन हात फिरवत, शक्य तितके शांत होत पवार उद्गरले.

"मी महाजन, 'महाजन अ‍ॅन्ड ग्रुप' कंपनीचा मॅनेजिंग डिरेक्टर.."

"हं मग?" त्यांचे बोलणे मधेच तोडत पवार बोलले. त्यांचे डोळे अजूनही झाकलेलेच होते.

"पवार साहेब माझी मुलगी संन्वरी, गेले १० दिवस बेपत्ता आहे; आंम्ही तिला शोधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले, आमच्या इतर सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली, पण ती कुठेच गेलेली नाही, शिवाय तिच्या सर्व मित्र-मैत्रिणींना सुद्धा भेटलो पण तिचा कुठेच काही पत्ता नाही. शेवटी तिच्या मिसिंगची तक्रार इथे नोंदवली पण इथे सुद्धा आमची टोलवाटोलवीच केली मग तुंम्हीच सांगा साहेब, आंम्ही आता काय करायच??" महाजननी सर्व माहीती थोडक्यात पवारांपुढे स्पष्ट केली. त्यासरशी पवारांनी डोळे ऊघडुन त्यांच्या मागे ऊभ्या असलेल्या भोसलेवर एकवार प्रश्नार्थक आणि संतप्त नजर टाकली. भोसलेंनी काही न बोलता फक्त खाली मुंडी घातली.

"डोंन्ट वरी मि. महाजन, तुमच्या केसकडे मी स्वतः जातीनं लक्ष घालतो. तुमची मुलगी तुंम्हाला लवकरच मिळेल" पवारांचे हे वाक्य ऐकून महाजनच्या चेहर्‍यावर समाधान पसरले.

थोडा वेळ थांबून विचार करत... "महाजनजी, तुमचा कोणी शत्रु... किंवा तुंम्हाला याबाबत कोणावर संशय..वगैरे??"

"नाही- नाही पवार साहेब, माझा असा कोणीएक शत्रु नाही."

"तुम्हाला कोणाचा फोन वगैरे आला नाही ना म्हणजे खंडणीसाठी.."

"नाही अद्याप तरी नाही."

"हुं,..... याचाच अर्थ तिच्या गायब होण्यामागे कुठल्याही भुरट्या चोरांचा किंवा गैंगचा हात तरी नाही."- पवार तोंडातल्या तोंडातच पुटपुटले.

"बरं, तिचं कोणावर प्रेम होत का? किंवा तिचा कोणी प्रियकर??"

अचानक आलेल्या या प्रश्नाने बेसावध महाजन मध्येच अडखळले पण काही वेळातच स्वत:ला सावरत-
"............हो..$$....... ओ ......अहो! संन्वरी चांगल्या घराण्यातली मुलगी आहे. आणि ती आमच्या घराण्याच्या नावाला असा कधीच काळीमा फासणार नाही!!"

महाजनच्या बोलण्यातील रोख आणि चेहर्‍यावरील होणारे बदल पवारांनी बरोबर टिपले. कसेही असले तरी शेवटि या प्रश्नाने महाजनच्या मर्मावरच त्यांनी बोट ठेवले होते.

"इट्स ओके महाजन, मी असंच कॅज्युअली विचारत होतो. आफ्टर ऑल आंम्हाला सर्व शक्यता पडताळुन पहाव्या लागतात..... तुमच्या मुलीची १ फोटो प्रत बाहेर जमा करा; तिचा शोध लवकरच केला जाईल."

"ओके थ्यॅक्स अ लॉट ऑफिसर"- असे म्हणत महाजन भराभर पाऊले टाकत बाहेर पडले.
पवार मात्र त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत स्मित हास्य करत होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

"क्षितिज.... क्षिति.$.$..ज....." त्याला आपल्या दोंन्ही हातांनी हलवत तिने आवाज दिला.

"अं..$" भुतकाळातील कुठल्याशा कोपर्‍यातून त्याचे चित्त वास्तविक जगात परत धावत आले ते तिच्या आवाजाने!

"काय रे,,,,,,, तु पण ना किती अनरोमँटिक आहेस. मी तुला भेटण्यासाठी इतक्या दुरवरुन इथं आले आहे आणि तु असा रुडली बसला आहेस, माझ्याशी बोलत पण नाहीस. मला एकदातरी विचारलस का कि, तु कशी आहेस?, इतके दिवस कुठे होतीस? मी नसताना काय केलस? ते जाऊ दे रे पण निदान तु जेवलीस तरी का......."

बोलता बोलता अचानक तिचे डोळे पाण्याने डबडबले.

"हे शोनु, रडायला काय झालं? अगं तुला जेवणच हवंय ना, तर चल आपण एका छानशा रेस्टॉरंट मध्ये जऊया ओके नाऊ?" तिचा मुड नीट करत तो म्हणाला.

"नको आता, मला भुख नाहीये." डोळ्यात आलेलं आसू आपल्या नाजुक बोटांच्या टोकांनी टिपत ती म्हणाली.

"पण मला तर जाम भुक लागलेय ना..$$.." तिला आपल्या बाहुपाशात घट्ट आवळत तो म्हणाला.

"चल हट्ट..!!!" त्याच्या बोलण्यातील अर्थ समजुन लाजेने गोरीमोरी होत तिने त्याला दुर लोटले.

"अहो मिस्टर..... काय चाललय??" हातातील दांडकं जमिनीवर आपटत एक राट चेहर्‍याचा काळाकुट्ट हवलदार त्याच्या रोखाने प्रश्नार्थक मुद्रेने पाह्त होता.

"काही नाही साहेब.."

"काही नही??"- पुन्हा तिच प्रश्नार्थक मुद्रा.

"कापडावरनं तर चांगल्या घराण्याचा वाटतोयसं.." त्याच्याकडे निरखुन पाहत हवलदार म्हणाला.

त्याने एकवार तिच्याकडे बघितले. "चल इथून.." अशा अविर्भावात तिने आपले टपोरे घारे डोळे फिरवले.
त्यानेसुद्धा तिच्याकडे पाहून मानेनेच होकार दिला. आत्तापर्यंत त्याच्यासमोर ऊभा असलेला हवलदार मात्र त्याच्याकडेच पाहत होता. त्यानंतर ती जेथे बसली होती त्या दिशेला त्याने नजर फिरवली त्याची तिच्यावर रोखलेली नजर तिला अस्वस्थ करत होती.

"चला ऊठा इथनं.." अचानक तो हवलदार खेकसला. तशी ती दोघं तिथुन चटकन ऊठुन गेली.

दोघं दुरवर जाईपर्यंत तो हवलदार तिथेच ऊभा राहुन दोघांकडेही पाह्त होता पण त्याच्या चेहर्‍यावर मात्र वेगळेच भाव उमटले होते.

तो मात्र कोठेही न थांबता तिच्या बरोबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडत होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

"सर...!" पवारांच्या केबीनमध्ये आत येत असि. पो. ईन्स्पेक्टर भोसले यांनी एक सॅल्युट मारला.

"हं, बोला भोसले केसमध्ये काही प्रगती?" हातातील फाईली चाळत पवारांनी प्रश्न केला.

"हो सर, तुम्ही सांगीतल्याप्रमाणे आंम्ही संन्वरीचे फोटो जवळपासच्या सर्व पोलिस स्टे. आणि संबंधित चौकीवर पाठवले आहेत............"

"भोसले, तुमची प्रगती सांगा..!!" भोसलेचे वाक्य मध्येच तोडत पवार म्हणाले.

"सर,!! आमची एक टीम संन्वरीच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीं व प्रोफेसर्सकडे तर दुसरी टीम तिच्या संबंधित नातेवाईकांकडे चौकशीसाठी गेली होती.
५ मे च्या दिवशी ती शेवटचीच घरात दिसली. त्याअगोदर ती फोनवर बोलताना दिसली होती. घरच्यांच्या मते ती कोणा तिच्या मैत्रिणीशीच बोलत होती खास करुन रिद्धी.
एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे सर, ती बेपत्ता व्हायच्या आधि चार-पाच दिवस तरी खुप टेंन्शनमधे होती.शिवाय कॉलेजमध्येही ती फारशी मिसळत नव्हती. तिच्या मित्रांच्या मते, ती गेल्या काही महीन्यांपासून कोणाच्यातरी प्रेमात पडली होती..... "

"एस्स.. आय न्यु इट!!" आपसूकच पवारांच्या तोंडुन शब्द बाहेर पडले.

"भोसले हा तीचा प्रियकरच तिच्या गायब होण्याच कारण आहे, सून फाईंड हीम!"

"हो सर, पण..."

"आता पण काय??"

"सर, एक वेळ जर आपण असं गृहीत धरलं कि संन्वरीला तिच्या प्रियकरानेच पळवून नेले तर मग बाकीच्यांच काय??"

"बाकीचे??...... भोसले जे सांगायच ते स्पष्ट सांगा.."

"सर,......(काहिसे अडखळत)....स र त्याच कॉलेज मधले कमीत कमी दहा ते बारा विद्यार्थी गेले सात दिवस झाले अचानक गायब झालेत........ आणि गायब होण्याआधी त्यांनाही असाच एक कॉल आला होता...!!!!" -भोसले.

"काय.................????????" दुसर्‍याच क्षणी विजेचा जोरदार झटका बसावा तसे पवार ताड़कन आपल्या खुर्चीतून उठुन ऊभे राहीले होते.....................................................................................................

क्रमशः

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

असंभव :--(एक चित्तथरारक प्रेमकथा)::=>>भाग=>2पुढे़ वाचा...

गुलमोहर: 

हं...मधेमधे लिंक लागायला वेळ लागला जरा पण कथा पकड घेतीये...पुढचे भाग पटापटा नाहीतर आधीचं विसरुन गेल्यावर पुन्हा पुन्हा वाचावं लागतं.

पुढील भाग येउद्या....

वाचतोय....

आणि कृपया क्रमशः कथा/लेखनाला क्रमांक द्या....

.

प्रतिसादा बद्दल प्रथम सर्वांचे मनापासुन शतः आभार!
हि कथा, मला ऑन द स्पॉट सुचलेली एक शॉर्ट स्टोरी होती. खरंतर, याच्या पुढ़च्या घटनांचा किंवा भागाचा मी विचादेखिल केलेला नव्हता, पण गेले दोन-तिन दिवस येणार्‍या तुमच्या कमेंट मुळे मला या कथेचा फेरविचार करण्यास भाग पाड़ले.!
आणि त्यामुळेच मी ही कथा तुंम्हाला आवडेल अशी अगदी झणझणीत करण्याचा निर्णय केला.
कथेच्या पुढच्या भागांमध्ये, सस्पेंन्स, थ्रिलर, हॉरर्, रोमांस अशा अनेक अविलक्षणीय आणि अनाकलनिय दागिण्यांचा खजिना मी साठवुन ठेवलाय . तो २ र्‍या भागानंतर तुंम्हाला भेटेलच.!
++++++++
तुंम्ही माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडीन
अन् ही कथा नक्कीच तुंमच्या मनात एक आठवण ठेऊन जाईल....

Aanu mam mala sanga purn katha kuthe sapdel ya link varche mazhe sagle bhag vachun zhale ahet .Ek vinnati ahe 4thya bhagachya pudhil bhaganchya link dyavayat khup upkar hotil

@VB >> कथा दोन दिवसांत पुन्हा चालू होईल. >>>> वाह मस्तचं की मग

मी ही कथा , मी माबो जॉईन करायच्या आधी वाचली होती, खुप छान आहे पण अर्धवट

तुम्ही खरच घ्या मनावर ही कथा पुर्ण करायचे

@VB >> कथा दोन दिवसांत पुन्हा चालू होईल.
वाह !! चांगली बातमी.
मी खुप वर्षांपुर्वी सेव्ह करून ठेवली होती.