माझी मुलीची ३रि ची परीक्षा या आठवड्यात संपत आहे.
बिल्डींग मधल्या बाकीच्या मुलांच्या शाळा /परीक्षा अजून १० एप्रिल पर्यंत चालतील.
उन्हाळी शिबिरे, कॅम्प वगैरे त्या नंतर सुरु होतील
त्यामुळे एप्रिल दुसर्या आठवड्या पर्यंत बाई घरीच असतील.
सकाळ उशिरा उठणे आणि संध्याकाळ बाकी मुलांबरोबर खेळणे याने थोडी सुसह्य होईल पण प्रश्न दुपारचा आहे.
दुपारच्या वेळी तिला कशात बिझी ठेवावे हा प्रश्न आहे.
त्यावर शोधलेला एक उपाय म्हणजे दुपारचा वेळ तिला TV टाइम म्हणून देणे
वय वर्षे ७-८ ला पाहण्यासाठी साजेसे हिंदी - मराठी- इंग्रजी (याला कमी प्रेफ्रन्स, कारण अजून कोणीतरी बाजूला बसून समजवावा लागतो )
चित्रपट , सिरिअल्स, डोक्युमेंतरीज सुचवा.
साधारण कल्पना येण्यासाठी आत्ता पर्यंत पाहिलेले , कळलेले, चित्रपटांची नावे खाली देतोय.
harry potter १-२, dunkstun checks in, marley & me (१-2), अशीही बनवाबनवी, इत्यादी.
* आवर्जून वाचावी अशी पुस्तके सांगितलीत तरी चालेल.
जर असा धागा आधीच असेल तर त्याचा पत्ता द्यावा
सिम्बा, पुर्वी एक गोट्या
सिम्बा, पुर्वी एक गोट्या नावाची सिरियल यायची, त्याचे भाग बहुधा यु ट्युब वर उपलब्ध आहेत.
ते ऑफलाईन वर टाक आणि दाखव.
मालगुडी डेज चे ५० वगैरे एपिसोड आहेत ते मी स्वतः पाहिलेले आहेत. ते पण दाखव.
फास्टर फेणे वाचायला दे, वाचनाची आवड असेल तर.
फाफे वाचण्याइतकी मराठी
फाफे वाचण्याइतकी मराठी वाचनाची प्रगती नाही, पण फाफे चा एक भाग आणि चिंगी वाचून दाखवलेले, ते आवडलेले तिला
गोट्या हे तीन भागांच पुस्तक
गोट्या हे तीन भागांच पुस्तक आहे.लेखक बहुतेक गो.नी.दांडेकर आहेत.ते आवडेल तिला.
जुने चालत असेल तर ( ती
जुने चालत असेल तर ( ती कंटाळायला नको)
भागो भूत सिनेमा
विक्रम-वेताळ सिरीयल ( वेताळाच्या रूप + हसण्याला घाबरणार नसेल तर)
कच्ची धूप सिरीयल
श्यामची आई सिनेमा
दुपारी घरी सोबत कोणी असेल तर --
१. पेपरमधील शब्दकोडे सोडवणे,
२. एखाद्या चित्राची प्रिंट काढून आणा ऑफीसमधून त्यावर १० वाक्ये तिने स्वत; लिहायची / बोलायची,
३. इंग्रजी मराठी मुळाक्षरे + बाराखडी लिहीलेले पुठ्ठ्याचे तुकडे करून जुळवून त्याचे नवीन शब्द बनवणे. हे पटकन जमले तर मग वेळ लावून करायचे ( वाळूचे घड्याळ / मोबाईल स्टॉपवॉच वापरून)
४. ओरिगामी वस्तू रोजचे वर्तमानपत्र / रंगीत पुरवणी कागद वापरून
५. डाळी / हस्तकलेसाठी वापरायचे रंगीत कागद (मार्बल पेपर) नखाने लहान कपटे (मूग डाळीइतके) करून एखादे चित्र सजवणे. वरची वाक्यवाली चित्रे वापरता येतील.
६. एखादे मोठे मासिक इंग्रजी / खूप चित्रे / माहिती असलेले, तिला फक्त चित्रे समजून सांगायची तिला कळेल इतके सोपे करून. तिला कुतूहल वाटेल, मजा वाटेल इतकेच सविस्तर. इथे लायब्ररीतून विविध विषयांचे चित्रकोष आणता येतील (Time Series books etc). किंवा नॅशनल जिऑग्रफिक वगैरे.
७. आपण नाव सांगू ते शहर / नदी / पर्वत भारताच्या (भिंतीवरील मोठा) नकाशात शोधणे. क्ल्यू द्यायचा लागला तर.
८. घरच्या कामात मदत, जसे की वाणसामान भरून ठेवणे, कपडे झटकून देणे, सुकलेल्या कपड्यांच्या घड्या घालणे, रद्दी पिशवीत भरून ठेवणे.
९. आई बाबांचे कपाट आवरून घेणे यात मदत, एका ड्रेसचे भाग (सलवार-कमीज-ओढणी, साडी त्यावरचा ब्लाऊज) एकत्र गोळा करून देणे, कानातले - गळ्यातले एकत्र सेट करणे किंवा कानतले त्याच्या पुठ्ठ्यावर टोचून ठेवणे. यात बराच वेळ स्वतः नटण्यात जातो.
१०. आई बाबांसाठी केक / बिस्कीटे / शंकरपाळे / सरबत / पन्हे बनवणे. रात्रीची स्वीट डिश म्हणून जेली / आईस्क्रीम / पुडींग / कस्टर्ड बनवणे. पदार्थ असे निवडायचे की तिला खूप काही बघता / हाताळता येईल.
११. लहान / मोठे प्लेन हातरूमाल / पर्स / अहेराची कागदी पाकीटे आणून भरतकाम / फॅब्रिक पेंट / मणी-मोती-लेस-सॅटीन रिबन याने तिला जमेल अशी नक्षी करून घेणे. मग ते प्रत्येकाला १-१ गिफ्ट द्यायचे ( आई बाबा मावशी मामा काका आजी आजोबा टीचर कचरा-काका इस्त्री-काका वॉचमन इ )
डाळी / हस्तकलेसाठी वापरायचे
डाळी / हस्तकलेसाठी वापरायचे रंगीत कागद नखाने लहान कपटे (मूग डाळीइतके) करून एखादे चित्र सजवणे. <<< होय. यातही (एका जागी) दोन-अडीच तास सहज निघून जातात. शिवाय सुरक्षित उपक्रम.
असे एखादे सोपे चित्र काढून दिले तर रंगवायला आणि डाळी चिकटवायला मुलांना आवडते.
मास्क लागलाय आता मूवीज नाऊ वर
मास्क लागलाय आता मूवीज नाऊ वर
गोट्या ना धों ताम्हनकरांचं
गोट्या ना धों ताम्हनकरांचं आहे. ते जरा डेटेड आहे. शिवाय त्यातलं वातावरण वेगळं आहे.
दिलीप प्रभावळकरांचा बोक्या जास्त जवळचा वाटेल.
पण या सगळ्यात पालकांचाच जास्त वेळ जाणार.
फास्टर फेणे
फास्टर फेणे
कारवी आणि गजानन खूप छान
कारवी आणि गजानन खूप छान पोस्ट्स आहेत तुमच्या.
आपापलं रिमोट वापरणं आणि फोन,
आपापलं रिमोट वापरणं आणि फोन, व्हिडीओ गेम्स खेळणं allowed नाहिये का?
कारवी , गजानन छान उपक्रम
कारवी , गजानन छान उपक्रम सुचवलेत.
आम्ही मोकळे असतो तेव्हा यातील काही गोष्टी तर आम्ही करतोच, पण दुपारच्या २ तासात आजी आजोबा झोप आणि आई ऑफिस च्या कामात असताना नवीन कारभार न करता मुलगी बिझी राहील असा उपक्रम हवा आहे, जो सध्या tv पाशी येऊन थांबलाय.
रिमोट आपलाआपण वापरणे अलाउड आहेच पण त्या केस मध्ये गाडी न चुकता ओग्गी and कोक्रोच वर येऊन थांबते ते नकोय
आणी नेमाने रोज २ तास व्हिदिओ गेम्स नको वाटतात.
फोन /नेट रिलेटेड गोष्टी आम्ही आसपास असू तेव्हाच अलाउड आहेत.
साराभाई vs साराभाई (सि.1)
साराभाई vs साराभाई (सि.1) ,चे काही episodes निखळ करमणूक आहेत्. ते आवडत असतिल तर बघा. ््बब्योमकेश बक्शी
टिव्हीवर तिला काय बघायचं ते
टिव्हीवर तिला काय बघायचं ते बघू द्या. इतर चित्रपट इ. आपण बघायला घेतले की बघतात मुलं . हळुहळू होइल आवड डेव्हलप. तिला पण कंटाळा येइलच त्या ओग्गीचा.
तिला पण कंटाळा येइलच त्या >>
तिला पण कंटाळा येइलच त्या >> अनुभव बघता हे जरा विश्फुल थिंकिंग आहे. लक्ष दिलं नाही आणि नवं दाखवलं नसतं तर थॉमस त्या आयलंड वरून बाहेरच पडला नसता.
तू अजून चांदोबा-चंपक वाचतोस
तू अजून चांदोबा-चंपक वाचतोस की फक्त मोगलीसारख्या सिरियल्स बघतोस? मुलं मोठी होतील हे विश्फुल थिन्किन्ग आहे म्हणतोस?
शिवाय- मुलगी दुपारी एकटी असताना, खेळायला कुणी नसताना, आजी-आजोबांची झोप मोडू नये म्हणून तिचं तिला टिव्ही बघु दिला तर काही बिघडत नाही असं मी म्हणतेय. नवं काही दाखवूच नका असं नाही म्हणतेय.
ओके ओके. टीव्ही स्ट्रीम करणे
ओके ओके. टीव्ही स्ट्रीम करणे हा जन्मसिद्ध हक्क आहे यावर दुमत नाहीच.
अहो ते जोर लगाके हैशा समजत
अहो ते जोर लगाके हैशा समजत असतील, हैया नाही.
दम लगा के हैश्शा
दम लगा के हैश्शा
आणि
जोर लगा के हैय्या
हे दोन्हीही टोटली वेगळे आहेत. कन्फ्यूजन होण्याचे काहीच कारण नाही.
Stanley का डब्बा
Stanley का डब्बा
विंपी किड.. धमाल आहे
विंपी किड.. धमाल आहे
Diary of a Wimpy Kid: The Long Haul
@सिम्बा
@सिम्बा
शेवटी काय केले?
मलाही हाच प्रश्न पडला आहे.
काही पिक्चर डाउनलोड केले आहेत
काही पिक्चर डाउनलोड केले आहेत,
सुदैवाने बाकी मुलांना 10वि च्या परिक्षामुळे सुट्ट्या होत्या सो बरेच दिवस खेळायला कोणी ना कोणी तरी मिळालंय,
त्यामुळे तो स्टॉक वापरायची गरज पडली नाही
हा आठवडा त्या मुलांच्या परीक्षा आहेत त्यामुळे बहुदा हाच आठवडा पिक्चर ची गरज लागेल असे वाटते.
Two Brothers
Two Brothers
The karate kid
The karate kid
incredibles 1
incredibles 1
the incredible 2 yetoy.
डन्स्टन चेक्स इन.
डन्स्टन चेक्स इन.
बॉस बेबी एट बिलो तकदीरवाला
बॉस बेबी
एट बिलो
तकदीरवाला
moana
moana
कोको, डेस्पिकेबल मी, मोआना,
कोको, डेस्पिकेबल मी, मोआना, अप, झूटोपिया, कुंग फू पांडा, बॉस बेबी
बरेच पिक्चर येतायत,
बरेच पिक्चर येतायत,
थोडा वेळ मिळताच मी त्याची एक कॉमप्रिहेनसिव्ह लिस्ट बनवून इकडे टाकतो, आणि कोणते कोणते पाहून झालेत त्यावर टिक करतो
Pages