माझी मुलीची ३रि ची परीक्षा या आठवड्यात संपत आहे.
बिल्डींग मधल्या बाकीच्या मुलांच्या शाळा /परीक्षा अजून १० एप्रिल पर्यंत चालतील.
उन्हाळी शिबिरे, कॅम्प वगैरे त्या नंतर सुरु होतील
त्यामुळे एप्रिल दुसर्या आठवड्या पर्यंत बाई घरीच असतील.
सकाळ उशिरा उठणे आणि संध्याकाळ बाकी मुलांबरोबर खेळणे याने थोडी सुसह्य होईल पण प्रश्न दुपारचा आहे.
दुपारच्या वेळी तिला कशात बिझी ठेवावे हा प्रश्न आहे.
त्यावर शोधलेला एक उपाय म्हणजे दुपारचा वेळ तिला TV टाइम म्हणून देणे
वय वर्षे ७-८ ला पाहण्यासाठी साजेसे हिंदी - मराठी- इंग्रजी (याला कमी प्रेफ्रन्स, कारण अजून कोणीतरी बाजूला बसून समजवावा लागतो )
चित्रपट , सिरिअल्स, डोक्युमेंतरीज सुचवा.
साधारण कल्पना येण्यासाठी आत्ता पर्यंत पाहिलेले , कळलेले, चित्रपटांची नावे खाली देतोय.
harry potter १-२, dunkstun checks in, marley & me (१-2), अशीही बनवाबनवी, इत्यादी.
* आवर्जून वाचावी अशी पुस्तके सांगितलीत तरी चालेल.
जर असा धागा आधीच असेल तर त्याचा पत्ता द्यावा
I am kalam
I am kalam
U Tube वर खूप सुंदर छोटा हिंदी चित्रपट आहे . प्रेरणादायी आहे . कदाचित तुम्हाला माहितही असेल .
परवा रात्री टीव्हीवर होम अलोन
परवा रात्री टीव्हीवर होम अलोन लागला होता तो मुलांनी पाहिला. आवडला. त्यातली खेळण्यातल्या कारवरून घसरून पडण्याची आयडिया धाकट्याला नको तितकी आवडली
नंतर बराच वेळ हे घसरून पडण्याचे प्रयोग चालू होते
अजुन एक मुव्ही : फर्डीनांड
अजुन एक मुव्ही : फर्डीनांड (अ बुल)
हॉटस्टार 2 दिवसांपासून
हॉटस्टार 2 दिवसांपासून हॉटस्टार डीझनी झालं. और अपुन खुश हुवा.
डीझनी चे लायन किंग वगैरे तर आलेतच. पण पिक्सार चे फार न गाजलेले मुव्हीज पण दिसताहेत.
माझे 'अ बग्ज लाइफ' आणि 'द लॉस्ट वर्ल्ड ऑफ अटलांटिस' बघून झाले. पैकी बग्ज लाईफ ने फार मजा आणली.
कोको बघा / दाखवा नक्की.
कोको बघा / दाखवा नक्की.
काल मुलांना नेटफ्लिक्सवर
काल मुलांना नेटफ्लिक्सवर 'लगान' दाखवला. (मीही तसा सलग सगळा प्रथमच पाहिला ). मोठ्याला कळला आणि आवडला. धाकट्याला फक्त गाणी आणि आमिर खान (बम् बम् बोले ) ओळखीचं होतं. पण चलता है.
यामुळे 'स्वदेस' पण दाखवावा असं वाटतंय.
मी "मकडी " दाखवला मध्यंतरी
मी "मकडी " दाखवला मध्यंतरी
लेकाने जाम enjoy केला.
हो खरंच, मकडी मस्त आहे.
हो खरंच, मकडी मस्त आहे. दाखवायला हवा
Wall-E
Wall-E
Home alone series
Up
Good dinosaur
Narnia series
Recess series
Jumanji
Cinderella
Beauty and the beast
Harry Potter series
Doremon movies
Disney brave
snow White
Chiller party
Bhoot uncle
Bhoot and friends
Bhoot nath
Koi mil gaya
Peter pan
हे सगळे खूप छान movies आहेत. लहानांपासून मोठयानाही नक्कीच आवडतील
नेटफ्लिक्सवर Our Planet
नेटफ्लिक्सवर Our Planet नावाची एक छान सीरीज आहे. जंगलं, वाळवंटं, समुद्र, गवताळ प्रदेश अशा विविध ठिकाणचे विविध पक्षी, प्राणी, झाडं , इतर वनस्पती दाखवतात आणि छान माहिती सांगतात. खूप सुंदर चित्रण आहे. डोळे निवतात. शिवाय प्रत्येक भागात माणसाने केलेल्या नुकसानाबद्दलही आवर्जून सांगतात. उदा. दरवर्षी सुमारे १०० मिलियन शार्क हे शार्क फिन सूपसाठी मारले जातात
मुलांना कळण्यासारखी आणि आवडण्यासारखी आहे ही सीरीज. सध्या रोज रात्री एक एपिसोड आम्ही सगळेच एकत्र बसून बघतोय.
Pages