मानस...

Submitted by Nikhil. on 3 April, 2018 - 05:49

उगाचच नेहमी वाटत राहत
आणि दु:ख साठत राहत
मन भुलते फसव्या सुखास
इथे न तिथे घुटमळत राहत...

कधी शोधते शांत निवारा
कधी सुसाट भिरभिर वारा
कधी अगदी लहान मुलापरी
गावभर उंडारत राहत...

मग कधी ठेचकळुन पडते
थोडे इथे थॊडे तिथे खरचटते
मोठ्याने भोकाड पसरुन तेव्हा
त्यालाही थोड रडाव वाटतं...

पण नाही येत त्याला रडता
कणखरपणाचा आव आणत
येऊन पुन्हा आपल्या जागी
जखमांना त्या गोंजारत राहत...

उगाचच नेहमी वाटत राहत
पुन्हा दु:ख साठत राहत...
- निखिल ०३-०४-२०१८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान, आवडली कविता

पण नाही येत त्याला रडता
कणखरपणाचा आव आणत
येऊन पुन्हा आपल्या जागी
जखमांना त्या गोंजारत राहत... >>>> हे मात्र खरेयं