ओह जॅकरांडा!

Submitted by मॅगी on 23 March, 2018 - 00:00

हळुवार पावलांनी, हात मागे बांधून
हळूच गुरफटून येतो सावळा संधिकाल..

तेव्हाच होते मऊ निळसर उधळण,
काळ्या तप्त डांबरी सडकेशेजारी
त्या मग्न उभ्या, फुलोरल्या जॅकरांडाखाली..

आठवांचे मळभ साचते कणाकणाने
नेणिवेत उमलू पाहणारा रजनी गंध..

चोरट्या इवल्या भेटीतून सजलेला मधुमास,
तप्त श्वासांची तरंगती गुलाबी कुजबुज
त्या मग्न उभ्या, फुलोरल्या जॅकरांडाखाली..

मी टक लावून पहाते अंधाराच्या पलीकडे
मळलेली जुन्या ओळखीची वाट..

कदाचित तूही येशील असाच अवचित,
मी मलाच उधळून दिल्यानंतर
त्या मग्न उभ्या, फुलोरल्या जॅकरांडाखाली..

IMG_20180318_104313.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅगी खुप छान.

मी जॅकरांदा फोटोतच पाहीलाय. अजून प्रत्यक्ष पहायचा आहे.

छान.

जॅकरांदा माझा आवडता म्हणुन लगेच डोकावली..>>+१

सहीये !
नवीन माहिती मिळाली>>+१ jacaranda माहीत नव्हता !

This has come in right season...Bangalore has many trees wearing full blue around this time. Good one!