Submitted by मॅगी on 23 March, 2018 - 00:00
हळुवार पावलांनी, हात मागे बांधून
हळूच गुरफटून येतो सावळा संधिकाल..
तेव्हाच होते मऊ निळसर उधळण,
काळ्या तप्त डांबरी सडकेशेजारी
त्या मग्न उभ्या, फुलोरल्या जॅकरांडाखाली..
आठवांचे मळभ साचते कणाकणाने
नेणिवेत उमलू पाहणारा रजनी गंध..
चोरट्या इवल्या भेटीतून सजलेला मधुमास,
तप्त श्वासांची तरंगती गुलाबी कुजबुज
त्या मग्न उभ्या, फुलोरल्या जॅकरांडाखाली..
मी टक लावून पहाते अंधाराच्या पलीकडे
मळलेली जुन्या ओळखीची वाट..
कदाचित तूही येशील असाच अवचित,
मी मलाच उधळून दिल्यानंतर
त्या मग्न उभ्या, फुलोरल्या जॅकरांडाखाली..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच जमलीए मॅगी..चित्रसुद्धा
छानच जमलीए मॅगी..चित्रसुद्धा मस्त..
जॅकरांदा माझा आवडता म्हणुन लगेच डोकावली..
मॅगी खुप छान.
मॅगी खुप छान.
मी जॅकरांदा फोटोतच पाहीलाय. अजून प्रत्यक्ष पहायचा आहे.
खूप सुरेख कविता व चित्र!!!!
खूप सुरेख कविता व चित्र!!!!
छान.
छान.
जॅकरांदा माझा आवडता म्हणुन लगेच डोकावली..>>+१
धन्यवाद टीना, जागू, साधना आणि
धन्यवाद टीना, जागू, साधना आणि सोनाली
जकरांडा म्हणजे काय?
जकरांडा म्हणजे काय?
Jacaranda
Jacaranda
धन्यवाद maggi.. नवीन माहिती
धन्यवाद maggi.. नवीन माहिती मिळाली !
सहीये !
सहीये !
नवीन माहिती मिळाली>>+१ jacaranda माहीत नव्हता !
अहाहा !!!!
अहाहा !!!!
रंगभरे शब्द-चित्र!
रंगभरे शब्द-चित्र!
This has come in right season
This has come in right season...Bangalore has many trees wearing full blue around this time. Good one!
सुंदर चित्रकाव्य !
सुंदर चित्रकाव्य !
वाह, सुरेख. कविता आणि चित्र
वाह, सुरेख. कविता आणि चित्र दोन्ही अप्रतिम.
खुप छान कविता आणि चित्र देखिल
खुप छान कविता आणि चित्र देखिल.
रंगभरे शब्द-चित्र! >>>> + 999
रंगभरे शब्द-चित्र! >>>> + 999
सुंदर ! चित्र आणि कविता
सुंदर ! चित्र आणि कविता दोन्ही ही.
आवडलंय
आवडलंय
सुंदर ! या चित्रकवितेतून
सुंदर ! या चित्रकवितेतून निघणारी रंगमुलायम वाट निळुल्या स्वनात जाऊन गुडूपलीय.