सोशल प्रस्फोट!
सोशल मीडिया हा आता माणसाचा श्वास बनला आहे. केवळ तरुण पिढीच नव्हे, तर विविध वयोगटांतील सर्वच जण या मीडियाच्या मोहात कळत-नकळतपणे अलगद अडकले आहेत. सर्वात वेगवान प्रसिद्धीसाठी आणि दिलखुलास अभिव्यक्त होण्यासाठी सोशल मीडियासारखं दुसरं कोणतंच व्यासपीठ नाही. त्यामुळे साहजिकच कोट्यवधी लोक या समाजमाध्यमांकडे आकृष्ट झाले. अर्थात आजच्या माहिती तंत्रज्ञाच्या युगात सोशल मीडियाचा वापर अपरिहार्य बनला असल्याने यात काहीचं गैर नाही. परंतु, तंत्रज्ञानाचा जसा सदुपयोग होतो, तसा दुरुपयोगही होत असतो. सोशल मीडियाच्या बाबतीत ही बाब सुरवातीपासून समोर येत आहे. सोशल मीडियाच्या गैरवापराची समश्या डोके वर काढू लागली असतानाच या मीडियावरील युजर्सची खासगी माहितीही सुरक्षित नसल्यची बाब समोर आली असल्याने सोशल माध्यमांच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फेसबुकसारख्या लोकप्रिय माध्यमांवरून तब्बल ५ कोटी यूजर्सचा डेटा चोरीला गेला असून त्याचा निवडणुकीत गैरवापर करण्यात आल्याचा खुलासा झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. खुद्द फेसबुक सीईओ मार्क झुकेरबर्गने याबाबतचा खुलासा करत झालेल्या प्रकाराबद्दल क्षमायाचना करून प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. अर्थात, माफीनाम्यावर किंव्हा सुधारणा करण्याच्या आश्वासनावर दुर्लक्षित करावा असा हा मुद्दा निश्चितच नाही. लोकांच्या विश्वासाचा भंग करून त्यांच्या खासगी माहितीचा बाजार मांडला जात असेल, आणि एकाद्या देशाच्या इतिहासावर दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय या चोरलेल्या माहितीच्या आधारे होणार असतील, तर याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोशल मीडियाचं हे जग जितकं आभासी तितकंच असत्याच्या धाग्यांनी विणलेलं असल्याचं वास्तव समोर येत असल्याने भविष्यात अधिक जबाबदारीने या माध्यमाचा वापर करावा लागणार आहे.
फेसबुकच्या ग्राहकांची खासगी माहिती चोरून ब्रिटनमधील केंब्रिज अॅनालिटिका या डेटा कंपनीने त्याचा वापर ट्रम्प यांना अध्यक्षीय निवडणुका जिंकण्यात व ब्रिटनचे ‘ब्रेक्झिट’च्या बाजूने मत वळवण्यात केला असल्याचे उघड झाल्याने जगभर हलकल्लोळ उडाला असून डेटालिकचे हे लोन भारतापर्यंतही येऊन पोहचले आहे. ज्या कंपनीवर डेटालिक केल्याचा आरोप केल्या जातोय त्या कंपनीची सेवा घेण्यासाठी काँग्रेस तयारी करत असल्याचा आरोप भाजपाने केला. तर खुद्द भाजपानेच बिहार निवडणुकीत 'केंब्रिज' ची मदत घेतल्याचा पलटवार काँग्रेसने केला. केंद्रीय माहिती या तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तर थेट झुकेरबर्गलाच समन्स पाठविण्याची धमकी दिली. सरकारच्या नाकावर टिच्चून माल्या, मोदी सारखे लुटारू देशाबाहेर पळून जात असताना झुकेरबर्गला भारतात येण्यास भाग पाडण्याची भाषा करणे हास्यस्पदच म्हणावी लागेल. आणि तसेही ज्या आधार कार्डचा केंद्र सरकारने एवढा गवगवा केला त्याचीही गुप्त माहिती फुटल्याचा आरोप मध्यंतरी झाला होता. त्यामुळे डाटालिकवरून केल्या जाणाऱ्या घोषणा आणि धमक्या ह्या निव्वळ वलग्ना समजायला हरकत नाही. तसेही विज्ञान आणि तंत्रज्ञानाला खीळ घालणे किंव्हा त्यावर नियंत्रण ठेवणे आता सहजशक्य राहिले नाही. त्यामुळे उपरोक्त राजकीय आरोप- प्रत्यारोप तूर्त बाजूला ठेवले तरी निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी समाजमाध्यमांमधील माहितीचा गैरवापर केला जातोय, ही बाब आता लपून राहिलेली नाही. सोशल मीडियावरून काही विशिष्ट मते लोकांच्या मनावर बिंबविण्याचे षडयंत्र रचल्या जात असल्याचे समोर येऊ लागल्याने, आता विश्वास ठेवावा तरी कुणावर ? असा प्रश्न निर्माण होतो.
सर्वात वेगवान प्रसिद्दीसाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम म्हणून सिद्ध झाल्याने आजच्या काळात सोशल मीडियाचा प्रस्फोट झालायं..जनमत घडविण्याची आणि प्रसंगी सत्तापालट करण्याचीही क्षमता या माध्यमात असल्याची प्रचिती जगाने घेतली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाने बजावलेली भूमिका फार महत्वपूर्ण होती. त्यामुळेच तर आपणही हे तंत्र आत्मसात केलं पाहिजे, असा सूर प्रत्येक पक्षाच्या मंथन बैठकीत उमटला होता. अर्थात यात चुकीचं काहीच नाही. जनसंपर्कासाठी आणि आपले विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी या माध्यमांचा उपयोग केला जात असेल तर तो स्तुत्यचं. मात्र तंत्रज्ञान हे दुधारी तलवारी सारखं असतं. त्याचा उपयोग माणसाच्या फायद्यासाठी जसा केला जातो तसाच त्याच्या विनाशासाठीही त्याचा वापर केला जाऊ शकतो. सोशल मीडियाच्या संदर्भातही असे अनुभव अनेकदा आले आहेत. समतोल विचारांच्या भानगडीत न पडता माणसं उथळ प्रचारानं प्रभावित होत असल्याचे लक्षात आल्याने काही समाजकंटकांनी या माध्यमांचा वापर विविध गैरप्रकारसाठी केला. आत तर या माध्यमांवरील माहिती चोरून जनमत बनविण्याचा आणि बिघडविण्याचा घाट घातल्या जात आहे. त्यामुळे निश्चितच याप्रकाराकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. कुठल्याही सोशल माध्यमाचा उपयोग करताना आपली व्यक्तिगत माहिती विचारली जाते. सदर माहिती गुप्त ठेवण्याची हमीही दिलेली असते. मात्र त्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली आहे, याची माहिती वापरकर्त्याला मिळत नाही. तरीही विश्वास ठेवून यूजर आपली संपूर्ण खासगी माहिती अशा माध्यमांना देतो. कारण सोशल मीडियावरील आचार-विचार सत्य आहेत, अशी त्याची समजूत असते. मात्र फेसबुक प्रकरणाने या समजुतीवरच घाला घातला असून सोशल मीडियाचा कावेबाजपणा उघड झाला आहे.
आजच्या माहिती आणि तंत्रज्ञांच्या युगात 'माहिती' सोन्याचांदीसारखीच मौल्यवान बनली असल्याने अर्थातच या डेटालिक प्रकरणामागे एक मोठं अर्थकारण आहे. आजचे नेते राजकीय पक्ष आपला प्रभाव मतदारांवर पाडण्यासाठी असा डिजिटल प्रचार करणाऱ्या कंपन्यांच्या आहारी गेलेले दिसतात. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणे श्यक्य होईलच याची शास्वती नाही. म्हणून आपल्यालाच अधिक सावध व्हावे लागणार आहे. मुळात समतोल, सर्व बाजूंनी विचार करण्याची आपली क्षमता क्षीण होत असल्याने अशा प्रकारांचे पेव फुटले आहेत. आपल्यापर्यंत पोचणारी कुठली माहिती ही गंभीरपणे घेण्याच्या लायकीची आहे आणि कुठली नाही याचा सारासार विचार न करता आपण उथळ माहितीने प्रभावित होतो म्हणूनच आपल्या भावभावनांचा बाजार मांडला जातो, हे आता लक्षात घ्यायला हवे. "डिलिट फेसबुक' सारखी मोहीम राबवून काहीही साध्य होणार नाही. कारण सोशल मीडिया ही आता काळाची गरज बनली असल्याने, फेसबुक डिलीट केले तरी दुसऱ्या एकाद्या माध्यमातून आपली माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे विवेकी सावधानता आणि सारासार विचारचं आपल्याला या संकटातून तारू शकेल.!!!
सोशल मीडिया जपून वापरायला हवा
सोशल मीडिया जपून वापरायला हवा, सुंदर लेख
Saurabh Sawant यांच्या फेसबुक
Saurabh Sawant यांच्या फेसबुक वॉल वरुन
काल ट्विटरवर कॉंग्रेसने #DeleteNamoApp हा हॅशटॅग चालवला होता. त्याला कारणही तसेच होते.
NCC ने हे एॅप त्यांच्या देशभरातल्या सगळ्या कॅडेट्सना (जवळपास १५ लाख) इंस्टॉल करायला सांगितले आहे. या एॅप व्यतिरिक्त त्यांना त्यांचे ईमेल अड्रेस आणि फोन नंबरसुद्धा पंतप्रधान कार्यालयासोबत शेअर करायला सांगितले आहेत. कॉंग्रेसचा आक्षेप याच नमोएॅपच्या परमिशन्सवर आहे. Contacts, Microphone, Location, Camera इत्यादी परमिशन्स त्या एॅपला का हव्या आहेत हा प्रश्न कॉंग्रेसने विचारला होता.
दुसरीकडे ट्विटरवर Elliot Alderson हा फ्रांसचा एक सिक्युरिटी रिसर्चर (हॅकर्सचेच एक गोंडस नाव) आहे. काही ठिकाणी त्याने त्याचे खरे नाव रॉबर्ट बाटीस्ट असल्याचे सांगितले आहे. (हे नावही खरे आहे की नाही, त्यालाच माहीत.) तो सध्या ट्विटरवर आपल्या 'आधार'ची पोलखोल करतोय.
आधारच्या सिक्युरिटीमध्ये काय काय लुपहोल्स आहेत, आधारचा डेटा हॅक करणे किती सोपे आहे वगैरे तो सगळे प्रात्यक्षिकासहीत दाखवून देतोय. तर झाले असे, की कॉंग्रेसच्या कालच्या #DeleteNamoApp या हॅशटॅगमुळे त्याने त्याचा मोर्चा या अॅपकडे वळवला. त्याला मिळालेली माहिती, त्याच्याच शब्दात....
When you create a profile in the official Narendra Modi Android app, all your device info (OS, network type, Carrier …) and personal data (email, photo, gender, name, …) are send without your consent to a third-party domain called http://in.wzrkt.com
This domain is classified as a phishing link by the company G-Data. This website is hosted by @GoDaddy and the whois info are hidden. After a quick search, this domain belongs to an American company called @CleverTap. According to their description, “#CleverTap is the next generation app engagement platform. It enables marketers to identify, engage and retain users and provides developers"
त्याने मोदीजींना प्रश्नसुद्धा विचारलाय, "I know privacy is not your thing but any thoughts about sharing the personal data of your users without their consent to a third-party company?"
यानंतर सहजच उत्सुकता म्हणून मी या CleverTap च्या CEO चे ट्विटर हॅंडल चेक केले. त्यांच्या काही ट्विट्सवरून तर ते मोदीजींचे कट्टर फॅन दिसत आहेत.
योगायोग असू शकेल का हा ?
फेसबुक वरील माहिती लीक होईल
फेसबुक वरील माहिती लीक होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.खरंच गंभीर मुद्दा आहे.
नेटवर कुठेहि लिहिणे म्हणजे
नेटवर कुठेहि लिहिणे म्हणजे आपले सामान रस्त्यावर आणून ठेवण्या सारखे आहे. कुणि उचलून नेले तर कोण लक्ष ठेवतो का? मग आपली वैयक्तिक माहिती नेटवर का लिहावी?
सगळ्यात कुठे कायदा मोडला गेला आहे का? नसल्यास, कुणीहि काहीहि करावे - अगदी हॅकिंग च्या विरुद्ध तरी काही कायदे आहेत का? कोण त्यावर लक्ष ठेवतात? पोलिस? कोण खटला भरू शकतात माहिती चोरणार्यांवर? ते काय करताहेत?
उगाच कुणि विचारले म्हणून आपला फोन नंबर, पत्ता, इ-मेल या सारखी वैयक्तिक माहिती सार्वजनिक नेटवर लिहायची नि कुणि चोरली तर ओरडा करायचा?
मग आपली वैयक्तिक माहिती नेटवर
मग आपली वैयक्तिक माहिती नेटवर का लिहावी?
<<
इथे "खर्या नावाने येतो" म्हणून डिंग्या मारणारे लोक तुम्ही पाहिले नाहीत का, झक्की?
फेसबूकने ही माहिती विकली असेल
फेसबूकने ही माहिती विकली असेल तर त्याविरुद्ध तरी कायदा आहे का कुठे?
नुसत्या जाहिराती करून फेसबूक ला अनेक बिलियन डॉलर गोळा करता येतात का? पण असली माहिती योग्य ठिकाणी विकली तर केव्हढे प्रचंड पैसे मिळू शकतील.
कायदे असले तरी एव्हढे बिलियन डॉ. वाला माणूस त्यातून सहज सुटू शकेल. चांगले वकील देऊन खुनी माणसे पण सुटतात. या बाबतीत जे कायदे आहेत ते किती तरी वकीलांना सुद्धा नक्की कळतात का?
विषय छान पण जटिल आहे.
विषय छान पण जटिल आहे.
जगात फुकट असे काहीच नसते.... काही वेळा ते कळते आणि तुम्हाला त्याचे परिणाम मान्य असतात. काही वेळा ते कळतच नाही. जेव्हा ते कळत नाही तेव्हा तुम्हीच, तुमच्या नकळत असेल, उत्पादनाचा भाग बनलेला असता.
>>फेसबूकने ही माहिती विकली
>>फेसबूकने ही माहिती विकली असेल तर त्याविरुद्ध तरी कायदा आहे का कुठे?<<
कुठल्या प्रकारचा डेटा चोरला/विकला आहे त्यावर हे अवलंबुन आहे.
१. परवानगीशिवाय पर्सनल डेटा चोरला/विकला, तर कायदे आहेत.
२. सोशल मिडियावर तुम्ही आज काय केलं, काय खाल्लं, कुठली लिंक शेअर केली, लाइक केली हा डेटा (क्लिक्स्ट्रीम) चोरण्या/विकण्यावर अजुन तरी निर्बंध नाहित. तुम्ही जाणते असाल तर हे हि टाळु शकता...
मग आपली वैयक्तिक माहिती नेटवर
मग आपली वैयक्तिक माहिती नेटवर का लिहावी?
>>> मग फेबु, लिंकडीन वरती फेक माहिती टाकावी का?
सोशल मीडियावर जेंव्हा
सोशल मीडियावर जेंव्हा आपल्याला माहिती विचारली जाते तेंव्हा ती गुप्त ठेवण्याची हमी दिलेली असते. जर अशी माहिती विकल्या जात असेल तर तो कराराचा भंग आहे. अर्थात हा करार विश्वासाचा असल्याने आणि स्टँप पेपर वर होत नसल्याने त्याविरोधात कायदेशीर कारवाई करतांना अनेक अडचणी येतात. याचा अर्थ याविरोधात कायदे नाहीत असा होत नाही. माहितीचे स्वरूप आणि तिचा कोणत्या प्रकारे गैरवापर केला गेला यावर कारवाईचे स्वरूप अवलंबून असते.मुळात हा विषय मोठा जटील आहे.
मग फेबु, लिंकडीन वरती फेक
मग फेबु, लिंकडीन वरती फेक माहिती टाकावी का?<<
>>खोटी माहिती टाकू नये पण आपला डेटा गुप्त राहील याची काळजी घेतली पाहिजे. सोशल मीडियावर फीड केलेली वैयक्तिक माहिती अनेकांना अनेक कारणांसाठी उपयोगी पडू शकते. वय, व्यवसाय, आर्थिक स्तर, आवडीनिवडी अशा एक ना अनेक बाबींचा या माहितीत समावेश असू शकतो. त्यामुळे शक्य तितकी कमी आणि त्रोटक माहिती आपण शेयर करू शकतो. मुळात आशा गोष्टी रोखणे कुणाच्याच आवाक्यात नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे खबरदारी हाच एक चांगला उपाय यावर असु शकेल.
कायदे असले तरी एव्हढे बिलियन
कायदे असले तरी एव्हढे बिलियन डॉ. वाला माणूस त्यातून सहज सुटू शकेल. चांगले वकील देऊन खुनी माणसे पण सुटतात. या बाबतीत जे कायदे आहेत ते किती तरी वकीलांना सुद्धा नक्की कळतात का?<<
>>कायद्याने रोखता येईल असा हा विषय नक्कीच नाही. कारण यामागे मोठे अर्थकारण आहे. एखाद्या देशातील निवडणुकीवर परिणाम करण्याचा व्यवहार किती मोठा असू शकेल, आणि यात कोन कोण सहभागी असू शकेल याचा अंदाज सहजपणे लावता येईल. त्यामुळे कायदे असले आणि ते वकिलांना कळत असले किंव्हा कळत नसले तरी त्याचा काही फारसा उपयोग नाही. आर्थिक गुन्ह्यासादर्भात कितीतरी कायदे देशात आहेत.. ते वकिलांनाच नाही तर अनेकांना कळतात. पण तरीही माल्या व मोदी च काय झालं हे सर्वश्रुत आहे.
उगाच कुणि विचारले म्हणून आपला
उगाच कुणि विचारले म्हणून आपला फोन नंबर, पत्ता, इ-मेल या सारखी वैयक्तिक माहिती सार्वजनिक नेटवर लिहायची नि कुणि चोरली तर ओरडा करायचा?
>>>>>>>>
+786
आणि म्हणून ईथेच तर मी सरस आहे.
मायबोलीवर मी माझ्या खरया नावाने येत नाही. ईथे कोणाला माझ्या घरचा पत्ता माहीत नाही. लोकांना माझी कंपनी एमेनसी म्हणूनच ठाऊक आहे. ती कुठे आहे आणि तिथे काय काम चालते हे कोणाला ठाऊक नाही. माझ्या शाळा कॉलेजचे मी ईथे कैक किस्से लिहितो पण अजून कोणाला माझ्या शाळा कॉलेजचे नाव वा माझ्या शिक्षणाबद्दल खात्रीने ठाऊक नाही. लोकांना माझी गर्लफ्रेंड ठाऊक आहे पण तिचे नाव काय, ती काय करते, कुठे राहते कल्पना नाही.
माझे किस्से सारे खरे असतात. पण मी त्यातील काही तपशील याचसाठी बदलतो. मग एका किस्श्यातील तपशील दुसरयात मॅच नाही झाले तर लोकं ओरडा सुरू करतात. काही जण तर असेही असतात जे माझ्यासारखे वैयक्तिक माहिती गुप्त ठेवून वावरणारया लोकांना हिणवतात आणि आपला ईथला आयडी आणि ओळख खरी असल्याचा कसलातरी अगम्य अभिमान बाळगतात. अश्यांसाठी तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पण उद्या हिच लोकं ईथे आमची वैयक्तिक माहिती फेसबूकवर चोरीला जाते म्हणून ठणाना करत येतील. प्रत्यक्षात मात्र फेसबूकवर तुम्ही जे काही प्रायव्हसी सेटींगच्या अंतर्गत टाकता ते तसेच सुरक्षित असते असे जर कोणाला वाटत असेल तर तो निव्वळ एक भ्रम आहे. आंतरजालावर तुम्ही जे टाकलेत ते आता सर्वांसाठी खुले झाले असे समजूनच टाका. फेसबूक असो वा मायबोली वा आणखी कुठली साईट, स्वत:बद्दल किती माहिती द्यायची याची प्रत्येकाला चॉईस असते. एकदा दिल्यावर मागाहून रडण्यात अर्थ नाही.
माझ्यासारखे वैयक्तिक माहिती
माझ्यासारखे वैयक्तिक माहिती गुप्त ठेवून वावरणारया लोकांना हिणवतात आणि आपला ईथला आयडी आणि ओळख खरी असल्याचा कसलातरी अगम्य अभिमान बाळगतात.
-- खरे नाव व खरी ओळख घेऊन वावरणार्यांचा निर्णयाचा इंटरनेटच्या प्रायवसी आणि डेटाचोरीशी काहीही संबंध नाही.
इथे फोरम्स वर भांडतांना (लिहितांना) खरा चेहरा (म्हणजे खोटा अॅक्चुअली) घेऊन वावरले तर वावरावर बंधने येतात म्हणुन लोक आपली ओळख उघड करत नाहीत. स्वतःची खरी नावे घेऊन ओळख घेऊन जालावर वावरायला हिंमत लागते.
जसा ज्याचा विचार..
फेसबुक मायबोली आशा ठिकाणी
फेसबुक मायबोली आशा ठिकाणी एकाद्या दुसऱ्या नावाने वावरता येईल पण काही ठिकाणी म्हणजे व्हाट्सएप वर तर मोबाईल नंबर द्यावाच लागतो. गेल्या काही दिवसांपूर्वी आधार कार्ड ची ही माहिती फुटली होती. मग आधार वर सुद्धा खोटी माहिती द्यावी का? आज प्रत्येक परीक्षेच application फॉर्म ऑनलाइन झाला आहे त्यावर तर सर्व माहिती द्यावी लागते. आता ही माहिती ऑनलाइन असल्याने ती लीक होऊ शकते. मग अँप्लिकेशन फॉर्म ही खोटी माहिती देऊन भरावा का??
खरे नाव व खरी ओळख घेऊन
खरे नाव व खरी ओळख घेऊन वावरणार्यांचा निर्णयाचा इंटरनेटच्या प्रायवसी आणि डेटाचोरीशी काहीही संबंध नाही.>> +1
खरं तर ईथेच सारा लोचा आहे. चोरी होऊन गेली, पकडली ही गेली, पण नेमके चोरीला काय गेले हेच लोकांना कळले नाहीये. तुमचे फक्त खरे नाव गाव, पत्ता घेऊन फार काही साध्य होणार नाही आणि त्या साठी फेसबुक सारख्या कंपनी ची गरज नाही.
>>खरे नाव व खरी ओळख घेऊन
>>खरे नाव व खरी ओळख घेऊन वावरणार्यांचा निर्णयाचा इंटरनेटच्या प्रायवसी आणि डेटाचोरीशी काहीही संबंध नाही.>> सहमत. डेटा नक्की कोणाचा आणि कसा आणि कुठून चोरीला गेला आणि डेटा म्हणजे नक्की काय याची नक्की माहिती आहे का? इथे अस वाटत नाही. नाव आणि आडनाव ह्या शिवाय बराच डेटा महत्वाचा असतो. तुमच्या आवडी निवडी, तुमची तत्वे, तुमच्या प्रायॉरीटी, तुमची मतं, तुम्ही राहता तो एरिया आणि त्यानुसार तुम्हाला दिसणारा फीड आणि तुम्हालाच नाही तर तुमच्या मित्रांना दिसणारं जग जर कोणी बदलू लागलं आणि ते सगळं साईटच्या सिक्युरिटी पॉलिसी मध्ये बसणारं असेल तर किती भीतीदायक होईल याची कल्पना करवत नाही.
याला उत्तर म्हणून #deletefacebook चा काही फायदा नाही हा निष्कर्ष कशावरून काढला समजलं नाही. त्याने फेसबुक बंद होणार नाही पण अवेअरनेस वाढेल, लोकं पर्याय शोधू लागतील... पोस्ट सेव्ह करायला ब्लॉक चेनचा वापर करणाऱ्या सोशल साईटची मेंबरशिप वाढेल..
मी सोशल साईटवर खरं नाव लिहीत नाही ही लेम/फॉल्स सुरक्षा आहे.
ब्रेकझिटशी याचा संबंध नक्की
ब्रेकझिटशी याचा संबंध नक्की आहे का? लिंक प्लीज.
यावरून ऑनलाईन क्विझ देऊ नये इतपत जागृती झाली तरी पुष्कळ आहे.
याला उत्तर म्हणून
याला उत्तर म्हणून #deletefacebook चा काही फायदा नाही हा निष्कर्ष कशावरून काढला समजलं नाही. त्याने फेसबुक बंद होणार नाही पण अवेअरनेस वाढेल, लोकं पर्याय शोधू लागतील... पोस्ट सेव्ह करायला ब्लॉक चेनचा वापर करणाऱ्या सोशल साईटची मेंबरशिप वाढेल..<<
>> डेटा चोरी होतोय म्हणून जर डिलीट फेसबुक मोहीम राबबविल्या जात असेल तर याचा फारसा फायदा होणार नाही. कारण फेसबुक नाही तर अन्य एकाद्या सोशल साईटवरून आपला डेटा चोरीला जाण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किती आप्लिकेशन बंद करणार ? सोशल मीडिया चं जग हे आभासी आणि अविश्वासाचं आहे. त्यामुळे या जगाशी फारकत घेण्यापेक्षा आपण खबरदारी घ्यावी असे माझे वयक्तिक मत आहे. जसे कि, फेसबुकवर जन्मतारीख ठेवण्याची गरज नाही. तुमच्या जन्मतारखेचा वापर करून हॅकर्स अनेक प्रकारची माहिती मिळवू शकतात. पिकनिकसाठी वा कार्यालयीन कामासाठी घराबाहेर जाताना त्याबद्दलची माहिती मित्रांना देण्याचा मोह टाळा. अन्यथा, तुमच्या गैरहजेरीत तुमच्या घरी चोरी होण्याचा धोका असतो. अशा अनेक खबरदारींनी आपल्याला या आभासी जगातही सुरक्षित राहता येईल.
फेसबुकवर जन्मतारीख ठेवण्याची
फेसबुकवर जन्मतारीख ठेवण्याची गरज नाही. तुमच्या जन्मतारखेचा वापर करून हॅकर्स अनेक प्रकारची माहिती मिळवू शकतात. पिकनिकसाठी वा कार्यालयीन कामासाठी घराबाहेर जाताना त्याबद्दलची माहिती मित्रांना देण्याचा मोह टाळा. अन्यथा, तुमच्या गैरहजेरीत तुमच्या घरी चोरी होण्याचा धोका असतो. अशा अनेक खबरदारींनी आपल्याला या आभासी जगातही सुरक्षित राहता येईल.<<
>>पण ज्याठिकाणी अनिवार्य आहे त्याठिकाणी तर माहिती द्यावीच लागेल. सोशल मीडिया सोडला तरी आशा अनेक गोष्टी आहेत ज्याठिकाणी खरी आणि संपूर्ण माहिती द्यावी लागते. आधार कार्ड ची माहिती लीक होऊ शकते तर इतर ठिकाणची ही माहिती लीक होऊ शकते. मग नुसता सोशल मीडिया ला दोष देऊन काय उपयोग.
>>मी सोशल साईटवर खरं नाव
>>मी सोशल साईटवर खरं नाव लिहीत नाही ही लेम/फॉल्स सुरक्षा आहे.<<
बरोबर. त्याच धर्तिवर डेटा इन्साइट्स वापरुन केलेलं कँपेनिंग म्हणजे प्रापगंडा हा सुद्धा लेम समज आहे...
‘मोदी अॅप’चा ५० लाख लोकांच्या
‘मोदी अॅप’चा ५० लाख लोकांच्या खासगी माहितीवर दरोडा http://www.saamana.com/namo-app-created-for-narendra-modi-follwers-leaki... @Saamanaonlineद्वारे
इकडे नमो aap ने विचारलेल्या
इकडे नमो aap ने विचारलेल्या परवानग्या लिस्ट केल्या आहेत.
जर मी एखाद्या ap ला माझे contacts, लायब्ररी असेस करायची परवानगी दिली तर तो data कॉपी होऊ शकतो का?
माझा intrnet वरील वावर कसा आहे, (फक्त त्या app मधला (उदा FB वर मी काय लाईक केले इत्यादी )नाही ) हे त्या कंपनी ला कळू शकते का?
या data चा कोणाला ब्लेकमेल करायला उपयोग करता येईल का?
मुळात कोणत्याही अॅप ने
मुळात कोणत्याही अॅप ने इतक्या परवानग्या का विचाराव्यात?
अगदी साधी साधी टाईमटेबल छाप अॅप 'तुमचे फोटो, मेसेज्,कॉन्टॅक्ट्स्,व्हिडिओ' अॅक्सेस करण्याची परवानगी करतात.यातले बरेच तर एस एम एस पाठवत नाहीत किंवा फोटो अपलोड वगैरे पण नसतो ज्यासाठी कॅम किंवा मेसेज अॅक्सेस लागेल.
की आपलं 'गंपू, आताच सगळ्या खोल्यांच्या किल्ल्या घेऊन ठेव बरं.उद्या वर्हाड्यांना जागा कमी पडून झोपायला बळद वापरायला लागलं तर परत रात्री किल्ल्या मागायला नानांचा दरवाजा वाजवायला कोण जाणार?' हा 'आपल्या अॅप मध्ये अजून सुधारणा केल्यावर लागतील' वाला अप्रोच?
बळदात झोपण्यावरुन गंपू आणि नाना 'ज्यांच्यापुढे मानवी मन कोलमडून जाते, ज्यांच्या शक्तीचा प्रक्षेप हा एक अमानुष वारसा असतो' असे जीव आहेत असा धारपीय त्विस्ट डोक्यात आला.
हे नमो नावाचे अॅप आहे हेच
हे नमो नावाचे अॅप आहे हेच मुळात मला माहित नव्हते. भक्त सोडुन दुसरी लोक असली अॅप वापरतात का? त्यातले फक्त Amazon & Paytm मला माहित आहे. डिजीटल मागासलेपण....
तुम्हाला नमो app महिती नसणे
तुम्हाला नमो app महिती नसणे हा "कुठल्या कोपर्यंतले aap शोधून काढता राव" याचा पुरावा नसून , तुम्ही ignorant आहात याचा पुरावा आहे :p
https://khabar.ndtv.com/news
https://khabar.ndtv.com/news/india/fact-check-reveals-narendra-modi-app-...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की आधिकारिक मोबाइल ऐप, जिसे सिर्फ एन्ड्रॉयड पर 50 लाख से ज़्यादा बार डाउनलोड किया जा चुका है, से यूज़र डेटा को यूज़र की अनुमति लिए बिना अमेरिका स्थित कंपनी को भेज दिया गया, सुरक्षा शोधकर्ताओं ने इन दावों में सच्चाई पाई है, तथा इसकी पुष्टि NDTV ने भी की है. नरेंद्र मोदी ऐप के खिलाफ ये आरोप, जिनकी वजह से सोशल मीडिया पर हंगामा मचा हुआ है, और जिनकी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ने भी कड़ी आलोचना की है, उस समय लगे हैं, जब फेसबुक-कैम्ब्रिज एनालिटिका विवाद के चलते यूज़रों के निजी डेटा का कथित दुरुपयोग संवेदनशील मुद्दा बना हुआ है.