लहान मुलांना बघण्यासारखे चित्रपट सुचवा

Submitted by सिम्बा on 13 March, 2018 - 07:07

माझी मुलीची ३रि ची परीक्षा या आठवड्यात संपत आहे.
बिल्डींग मधल्या बाकीच्या मुलांच्या शाळा /परीक्षा अजून १० एप्रिल पर्यंत चालतील.
उन्हाळी शिबिरे, कॅम्प वगैरे त्या नंतर सुरु होतील
त्यामुळे एप्रिल दुसर्या आठवड्या पर्यंत बाई घरीच असतील.
सकाळ उशिरा उठणे आणि संध्याकाळ बाकी मुलांबरोबर खेळणे याने थोडी सुसह्य होईल पण प्रश्न दुपारचा आहे.
दुपारच्या वेळी तिला कशात बिझी ठेवावे हा प्रश्न आहे.

त्यावर शोधलेला एक उपाय म्हणजे दुपारचा वेळ तिला TV टाइम म्हणून देणे

वय वर्षे ७-८ ला पाहण्यासाठी साजेसे हिंदी - मराठी- इंग्रजी (याला कमी प्रेफ्रन्स, कारण अजून कोणीतरी बाजूला बसून समजवावा लागतो )
चित्रपट , सिरिअल्स, डोक्युमेंतरीज सुचवा.

साधारण कल्पना येण्यासाठी आत्ता पर्यंत पाहिलेले , कळलेले, चित्रपटांची नावे खाली देतोय.
harry potter १-२, dunkstun checks in, marley & me (१-2), अशीही बनवाबनवी, इत्यादी.

* आवर्जून वाचावी अशी पुस्तके सांगितलीत तरी चालेल.

जर असा धागा आधीच असेल तर त्याचा पत्ता द्यावा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डिस्ने /पिक्सार चे सिनेमे पाहिले आहेत का? निखळ करमणूक असते अगदी. आणि बहुधा फारसे समजावून सांगण्यासारखे नसते काही. ७-८ एज ग्रुप ला हे बेस्ट आहेतः
Mosters Inc
Toy Story 1,2,3
Cars 1,2,3
Tangled
Frozen
Finding nemo
Finding Dory
The Incredibles
Ratatouille
Ice Age १,२,३,४
Tinker bell series

  1. स्मर्फ द लॉस्ट व्हिलेज
  2. झूटोपिआ
  3. माटिल्डा
  4. स्पाय किड्स
  5. जोर लगा के हैय्या
  6. आय अ‍ॅम कलाम
  7. नन्हे जैसलमेर

नवनीतच चित्ररामायणाच पुस्तक मिळत.महाभारताच पण असत.बाकी अकबर-बिरबल, अल्लाउद्दीन; टारझन वगैरे खूप पुस्तकं मिळतात.अनमोल प्रकाशन किंवा अमोल प्रकाशनाची अनेक पुस्तकं अनेक ठिकाणी उपलब्ध असतात.बाकी सुट्टीतले पण अंक असतात.तुम्ही ज्या भाषेत तिला गोष्टी सांगता त्याच भाषेतली पुस्तकं आणा.शक्यतो मराठी प्रीफर करा.कारण वाचायला मस्त वाटत.किशोरचे अंक किंवा साने गुरूजींच्या लहान मुलांच्या खूप गोष्टी आहेत.ती पुस्तक आणा.जमल्यास 'श्यामची आई' तुम्ही तीला वाचून दाखवा. मी आणि माझ्या भावाने दुसरी-तिसरीत हीच पुस्तकं वाचलेली.

एलिजाबेथ एकादशी
आनंदाच झाड
स्टॅन्ली का डब्बा
सिक्रेट सुपरस्टार

पटकन आठवलेले काही-
'मोआना' - फार फार क्युट मुव्ही आहे.
सिंग (इन्ग्लिश)
मायलो/मिलो अ‍ॅन्ड ओटिस
डम्बो - हा पण क्युट आहे मुव्ही. अर्ध्या डझन वेळा बघितलाय.
अ‍ॅरिस्टोकॅट्स - मांजरी एवढ्या गोड आहेत. मी कमीत कमी एक डझनवेळा बघितला आहे सिनेमा.
अपोलो १३
चक दे इंडिया
मेरी कोम
दंगल
पहेली

प्राणी आवडत असतील तर 'बॉर्न फ्री' आणि 'लिविन्ग फ्री' नक्की दाखवा.

मटिल्डा बघताना भिती वाटते बर्‍याच मुलांना आणि 'जोर लगा के हैय्या' आत्ता एवढ्यात आलेला?

माझ्या मुलाने "अंदाज अपना अपना" फार एन्जॉय केला गेल्या आठवड्यात. सध्या सगळ्यांना "तुम पुरुष ही नही, महापुरुष हो" म्हणणं चालू आहे Rofl

मुलांकरीता निखळ करमणून देणारे इंग्रजी चित्रपट सुचवा
https://www.maayboli.com/node/60984
यात सगळे इंग्रजी चित्रपट आहेत मुलांसाठी. मी हिंदी srt शोधून ती घालून दाखवते हे चित्रपट मुलांना.

अरभाट चिल्ड्रन फिल्म क्लब
https://www.maayboli.com/node/50538
याचे पुढे काय झाले माहीत नाही, बघा काही मिळते का ते!

March of the Penguins नावाची एक documentary cum feature film आहे.
Inside out
चक दे इंडिया
दंगल
कोको
इंग्लिश विंग्लिश
दहावी फ
कास्ट अवे
इक्बाल
बनवाबनवी आवडला असेल तर धोबीपछाड दाखवून पहा Happy

परवाच बादशाह पाहिला लहान पोरांसोबत.. ईयत्ता पहिली ते चौथी.. फुल्ल धमाल.
अंदाज अपना अपना, हेराफेरी या टाईपचे विनोदी चित्रपट ट्राय करा.

जॅकीचंदचे चित्रपट शोधा. भाषा नाही कळली तरी चालते. फुल्ल कॉमेडी एक्शन. माझे बालपण आणि उन्हाळी सुट्ट्या यावरच गेल्या.

शोले दाखवा..
मी याच वयात पाच सहा वेळा पाहिला होता..
डिडिएलजे सुद्धा ट्राय करू शकता..

अरे हो आणि जिम कॅरी.. मिस्टर बीन.. हे सुद्धा टाईमपास आहेत.
जिम कॅरीचा मास्क तर त्या वयातील ऑल टाईम फेवरेट..

सिम्बा कल्पना छान आहे. पण कुठे दाखवणार? टॅब, मोबाईल वर दाखवलेत तर मोबाईल /टॅब वापरायची सवय/चटक लागणार नाही याची दक्षता घ्या.

डस्पिकेबल मी १-२-३
सिंग
बाकी बरेच वर आलेत. इंग्रजी असले तरी समजवायला नाही लागणार बहुतेक. मुलं पिक्चरची पारायणं करतात बघून मला जाम आवडतं.

Moana
Jungle Book
वर आदिसिद्धीने लिहिलंय तशी पुस्तकं देता येतील- चंपक , ठकठक

वर लिस्टीत चार्ली ॲंड चॉकलेट फॅक्टरी आलाय का? आमच्याकडे तो पण आवडतो.

वरच्या लिस्टीशिवाय घरात आवडलेले होम अलोन आणि चिंटू. ( होम अलोन बघताना काही मुलांना मज्जा येते पण काहीजण घाबरतातसुद्धा. पुतणीला आता माझ्या घरात पण चोर येतिल अशी भिती वाटली होती )

These are the some which are entertaining as well as, also can help with building up the wisdom, imagination and creative power.

Star Wars Episode I to VIII
Star Trek (Both Old series and New films)
Back to the Future Part I, II & III (MUST WATCH, NICE AND SIMPLE FILM ON TIME TRAVEL)
The Incredibles
Zootopia
Cars I, II & III
Spider Man: Homecoming (You can always show other films of Marvel's MCU like Thor, Captain America, Iron Man but Spider Man especially is nice for kids)
Guardians of the Galaxy 1st and Vol 2 (Guardians of the Galaxy Vol 2 Must watch)
Doctor Strange (2016)
दशावतार (2008 animated movie which tells the story of all 10 incarnations of Lord Vishnu. Really Awesome and songs in it are good too!)
हरिश्चंद्राची फॅक्टरी, संत तुकाराम (1936 movie of Vishnupant Pagnis) , संत ज्ञानेश्वर (1940). These are my top most favourite Marathi movies and easily available on youtube. Must watch!
सगळीकडे बोंबाबोंब, गम्मत जम्मत, एकापेक्षा एक, आमच्यासारखे आम्हीच, माझा पती करोडपती. (All are classic comedy Marathi movies)
लोकमान्य: एक युगपुरुष
1) Batman Begins 2)The Dark Knight and 3)The Dark Knight Rises (inspiring trilogy)
Valerian and The City of Thousand Planets (2016)

Spirited away
My Neighbour Totoro
Kiki's Delivery Service
The Lion King
Sound Of Music
Its wonderful life
Spiderman

वरती दोन जणांनी शंका व्यक्त केलीय पण माझ्या पाहण्यात तरी ह्या चित्रपटात एकही अ‍ॅडल्ट सीन दिसलेला नाहीये.

https://goo.gl/PjdEA4

हा खास लहान मुलांकरिताच बनविलेला "पर्यावरण वाचवा" असा संदेश देणारा चित्रपट आहे.

बार्बी चे सगळे सिनेमे
बार्बी अ‍ॅण्ड सम्थिंग समथिंग अशी नावं असतात.
आमच्याकडे आताही (१२ वर्ष) आवडीने बघितले जातात.

पुस्तके:
Malgudi Schooldays
Thank You, Amelia Bedelia (book series)
Goldfish don't take bubble baths
Ronald Dahl: (book series)
- James and the Giant Peach,
- Matilda,
- Charlie and the Chocolate Factory

यूट्युब/इंटरनेटची परवानगी असेल तर:
Emanuella च्या कॉमेडीज्, Mister Rogers' Neighborhood, Masha and the bear

पाहता पाहता बरीच मोठी लिस्ट झाली कि,

यु ट्यूब किंवा इंटरनेट वर पिक्चर पाहणे हे फक्त देखरेख असेल तरच अलाउड आहे, नॉर्मली पेन drive वर मुव्ही घेऊन tv वर पाहिले जातात
तो इंग्रजी चित्रपटांचा धागा अजून पहायचा आहे, नंतर सावकाशीने पाहतो.

हि पुस्तके आमच्या इकडच्या लोकल लायब्ररी मध्ये आहेत का तपासतो.
सर्वांना धन्यवाद

Honey I shrunk the kids आणि God must be crazy… न चुकवण्यासारखे आहेत...

Pages