मी एक दुसर्या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.
पुस्तकाबद्दल- गोष्ट आहे दोन मेसेंजर रायडर्सची. दुसर्या महायुद्धा दरम्यान हे दोघे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आपाल्या बाइक्सवर पळ काढतात. जवळ थोडी फार सामग्री असते. पळुन जाउन शत्रु राष्ट्राच्या हद्दीत पोहोचायचे असते. हेतु हा कि पकडले गेल्यास युद्धकैदी म्हणुन राहवे लागेल पण जीव वाचेल. मायभुमीत अर्थातच देशद्रोही म्हणुन जीवे मारतील. त्यांना वाटेत आलेली संकटे आणि शेवटी त्यातला एकच आपले उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होतो ह्याची ही गोष्ट आहे.
.
तेव्हा मला हे पुस्तक खुपच आवडले होते. अगदी खिळवुन ठेवते. तर तुम्ही कोणि हे वाचले असल्यास किंवा काहि माहिती असल्यास कृपया इथे पोस्टा. धन्यवाद !!!!
पुस्तक माहिती आहे का ?
Submitted by तृप्ती आवटी on 26 June, 2008 - 14:57
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
The Deserter
The Deserter असणार. अनुवाद विजय देवधर.
असामी, खुप
असामी, खुप खुप धन्यवाद. गुगल केल्यावर ही माहीती मिळाली -
Based on English true story 'I Deserted Romel' by German soldier Gunther Bahnhaman who fled away from German Army and crossed 3000 miles through African continent when British and German armies, both running after to kill him.
होय. हे
होय. हे डेझर्टरच.. गुंथर बान्हमानचे.. त्याच्या शेवटी , गुंथर इंग्रजांची टॉमी गन बघुन खुश होतो.. रोमेल आणि मॉंटेग्युमेरीच्या युद्धाची पार्श्वभूमी आहे ह्या पुस्तकाला...
येस, अतिशय
येस, अतिशय मस्त पुस्तक हे! अनुवाद सुन्दर जमलाय! मी वाचलय हे पुस्तक!

...;
आपला, लिम्बुटिम्बु
गुंथर
गुंथर इंग्रजांची टॉमी गन बघुन खुश होतो >>> गन बघुन की भाषा ऐकुन ? तो झोपेत असताना त्याच्या कानावर इंग्रजांचे बोलणे पडते असा शेवट आहे ना ? ह्म्म्म्म्...आणुन वाचले पाहिजे परत एकदा
शेवट
शेवट बहुतेक असा आहे.. तो झोपलेला असतो आणि दोन इंग्रज सैनिक त्याला बंदुकीने ढोसतात.. आणि पहिली गोष्ट त्याच्या डोक्यात येते ती म्हणजे टॉमी गन.. मला पण नक्की आठवत नाहिये.. १०-१२ वर्ष झाली वाचुन.. शाळेत असताना वाचले होते..
मी मागवले
मी मागवले आहे भारतातुन्...वाचुन झाले की सांगते नक्की शेवट
इथेच वाचून
इथेच वाचून मी आणले आहे ग्रंथालयातून. सध्या वाचत आहे. झाले की शेवट सांगेन.. पकड घेतली आहे पुस्तकाने. धन्स सिंडरेला

------------------------------
झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
शेवट
शेवट बहुतेक असा आहे.. तो झोपलेला असतो आणि दोन इंग्रज सैनिक त्याला बंदुकीने ढोसतात.>> हो हाच शेवट आहे.
हो, शेवट
हो, शेवट हाच आहे पण प्रश्न असा आहे, आधी त्याला इंग्रजी कानावर पडते कि आधी टॉमी गन दिसते ?
.
पुनम, झाले की नाही पुर्ण ?
आधी त्याला
आधी त्याला इंग्रजी कानावर पडते कि आधी टॉमी गन दिसते ?>>काय फरक पडतो त्याने ग ?
फरक नाही
फरक नाही पडत. फक्त शेवट नक्की काय झाला अस प्रांजळ वाद सुरु आहे इथे
डेझर्टर
डेझर्टर सारखेच Papillon पण सुन्दर पुस्तक आहे. ते कुणी वाचले आहे का?
Papillon पण
Papillon पण सुन्दर पुस्तक आहे. ते कुणी वाचले आहे का >>>> लई वेळा. आधी मराठी अनुवाद वाचला नंतर मुळ पुस्तक वाचले. दोन्ही आवडले.
बरं,
बरं, त्याला टॉमी गननी ढोसून उठवतात, त्यामुळे आधी टॉमीगन दिसते, मग एक 'अगम्य' भाषा कानावर येते- इंग्रजी
पुढे आठ वर्ष तो युद्धकैदी म्हणून ब्रिटिश तुरुंगात राहिला, इंग्रजी शिकला आणि हे पुस्तक इंग्रजीतूनच लिहिले अशी त.टी आहे..
------------------------------

झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
विदुषक आणि
विदुषक आणि सेरिपी एस्किलार एली ह्या कथा कुठल्या कथासंग्रहात आहेत?
जी. ऐ.
जी. ऐ. कुलकर्णींची विदुषक म्हणतो आहेस का बेडेकर? ती काजळमाया मधे पान क्रमांक २४२ वर आहे. सर्वात शेवटची कथा. दुसर्या कथेचे नाव मी कधीच ऐकले नाही. नावावरून ईंग्रजी कथा वाटते आहे.
सेरिपी
सेरिपी एस्किलार (इस्किलार) एली हे शब्द "इस्किलार" ह्या कथेमधे येतात जी "रमलखुणा" ह्या संग्रहामधे आहे.
बी, असामी..
बी, असामी.. दोघांनाही धन्यवाद..
लई वेळा.
लई वेळा. आधी मराठी अनुवाद वाचला नंतर मुळ पुस्तक वाचले. दोन्ही आवडले. >>> मला तर मराठी अनुवादच अधिक आवडला.....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
"मुक्ता
"मुक्ता मामी" ही कथा कुठल्या पुस्तकात आहे ? त्याच पुस्तकात एक गुढकथा पण आहे ज्यात खलनायकाचा भयंकर दरीत कोसळुन अपघाती मृत्यु होतो.
पॅपिलॉनचा
पॅपिलॉनचा पुढचा भाग म्हणजे बँको.. हे अगदीच सुमार पुस्तक आहे..
ही दोन्ही
ही दोन्ही मूळात फ्रेंच मधे लिहिली गेलीत असं आठवतंय. बरोबर का? सिनेमामुळे पॅपिलॉन जास्त लोकप्रिय झालं.
'पॅपिलॉन'चा
'पॅपिलॉन'चा इंग्रजी तसंच मराठी अनुवाद कोणी केला आहे? समजले तर ग्रंथालयात विचारता येईल..
--------------------------------------
जगात मागितल्याशिवाय एकच गोष्ट मिळते- सल्ला!
पूनम,
पूनम,
'पॅपिलॉन'चा इंग्रजी अनुवाद Patrick O'Brian ह्यांनी केला आहे.
'पॅपिलॉन'चा मराठी अनुवाद रविंद्र गुर्जर ह्यांनी केला आहे.
बर एक सांग, तू अक्षरांच्या डोक्यावर अर्धा चंद्र कसा काढतेस?
धन्स
धन्स बी.
अर्धचंद्र E वापरून द्यायचा pEpilOn= पॅपिलॉन
--------------------------------------
जगात मागितल्याशिवाय एकच गोष्ट मिळते- सल्ला!
प्यापिलोन
प्यापिलोन आणि त्या पुढचं ब्यांको, दोन्ही छान आहेत. त्या वरचा चित्रपट तेवढा आवडला नाही.
मायबोलीच्या प्रगतीचा मार्ग म्हणजे अधिकाधिक मराठी मंडळींना मराठीत बोलत करणं. चला, कामाला लागुया!
कुणी
कुणी सांगेल का जी. ऐ. कुलकर्णी यांची 'काना' की 'कान्हा' ही कथा त्यांच्या कुठल्या पुस्तकात आहे? धन्यवाद.
अरे किती
अरे किती वेगवेगळ्या बीबीवर हा प्रश्ण पोस्टला आहेस!!! आता जीए स्वर्गातून खाली उतरुन तुला तो कथासंग्रहच देतील..
अरे टण्या,
अरे टण्या, खूप तातडीने ती माहिती हवी आहे म्हणून विचारलं आहे. इथे सिंगापूरमधे गणेशोत्सवात आम्ही वाचनाचा एक कार्यक्रम करतो आहे. एकाला जी. ऐ. कुलकर्णी यांची हीच कथा वाचायची आहे. मग ते पुस्तकं मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे. पण त्याला त्या पुस्तकाच नाव आठवतं नाही. मी जी. ऐ. फार वाचले नाही. चार बीबींवर एकच प्रश्न लिहून देखील ही माहिती मिळू शकेल की नाही असे तुझ्या उत्तरावरून आता वाटते आहे
Pages