मी एक दुसर्या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.
पुस्तकाबद्दल- गोष्ट आहे दोन मेसेंजर रायडर्सची. दुसर्या महायुद्धा दरम्यान हे दोघे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आपाल्या बाइक्सवर पळ काढतात. जवळ थोडी फार सामग्री असते. पळुन जाउन शत्रु राष्ट्राच्या हद्दीत पोहोचायचे असते. हेतु हा कि पकडले गेल्यास युद्धकैदी म्हणुन राहवे लागेल पण जीव वाचेल. मायभुमीत अर्थातच देशद्रोही म्हणुन जीवे मारतील. त्यांना वाटेत आलेली संकटे आणि शेवटी त्यातला एकच आपले उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होतो ह्याची ही गोष्ट आहे.
.
तेव्हा मला हे पुस्तक खुपच आवडले होते. अगदी खिळवुन ठेवते. तर तुम्ही कोणि हे वाचले असल्यास किंवा काहि माहिती असल्यास कृपया इथे पोस्टा. धन्यवाद !!!!
पुस्तक माहिती आहे का ?
Submitted by तृप्ती आवटी on 26 June, 2008 - 14:57
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आ ह साळुंखे लिखित
आ ह साळुंखे लिखित अस्तिकशिरोमणी चार्वाक हे पुस्तक अमेरिकेत कसे मागवता येइल ?
डॉ.श्रीखंडेंच्या पुस्तकाचं
डॉ.श्रीखंडेंच्या पुस्तकाचं नाव आहे - आणि दोन हात - ( पॉप्युलर प्रकाशन ).
एका लहान मुलांच्या english
एका लहान मुलांच्या english पुस्तकाचा भा. रा. भागवतांनी केलेला अनुवाद मी खुप पुर्वी वाचला होता. मला त्या original english पुस्तकाचे नाव हवे होते. त्यामधे एका लहान मुलीची गोष्ट आहे. तिचे घर वादळाने उडुन खुप दुरवर एका जादुगाराच्य प्रदेशत जाउन पडते. आणि मग तीला घरी पोचवण्यासठी एक सिंह , पत्र्याचा माणुस, एक जादुगार आणि एक आगीचा गोळा असे सगळे मदत करतात.
मूळ इंग्लिश पुस्तक आहे: The
मूळ इंग्लिश पुस्तक आहे: The Wonderful Wizard of Oz by L. Frank Baum.
गणपतराव पाटलांच्या
गणपतराव पाटलांच्या आत्मचरित्राचं नाव कोणी सांगू शकेल का? मी बरेच दिवस शोध घेतो आहे..
गणपतराव पाटलांच्या
गणपतराव पाटलांच्या आत्मचरित्राचं नाव आहे 'रंग नटेश्वराचं'. या पुस्तकाबद्दल आणखी माहिती इथे मिळेलः http://www.loksatta.com/old/daily/20040523/rvvru12.htm
१९८४ चा मराठी अनुवाद कुणी
१९८४ चा मराठी अनुवाद कुणी केला आहे माहिती आहे का? मी पहिल्यांदा हे पुस्तक हाती घेतले तेव्हा काहीच माहिती नव्हते.. १०च्या सुट्टीत बहुतेक असेल.. मला पहिले वाटले थरारकथा असेल.. पण निघाले भलतेच आणि जबरदस्त.. फारच चांगला अनुवाद केलेला आहे.. पण अनुवादकाचे नाव आठवत नाहिये..
मी चारेक वर्षांपूर्वी "ओल्गा
मी चारेक वर्षांपूर्वी "ओल्गा ते गंगा" या नावाचं किंवा अशासारख्याच नावाचं एक पुस्तक वाचलं होतं. कुणाला माहितेय का? लेखकाचं नाव वैगरे काहीच आठवत नाहीये.
अल्पना तू राहुल
अल्पना तू राहुल संस्करितायनच्या 'वोल्गा से गंगा' बद्द्ल विचारते आहेस का?
हो.. राहुल सांकृत्यायनचे
हो.. राहुल सांकृत्यायनचे व्होल्गा ते गंगा असे पुस्तक आहे ते..
व्होल्गावरुन वाळिंब्यांचे (की अरुण साधूचे?) व्होल्गा जेव्हा लाल होते हे रशियन साम्यवादी क्रांतीवरचे पुस्तक आहे.
हो हो. तेच. मला नावंच आठवत
हो हो. तेच. मला नावंच आठवत नव्हतं. ते अनुवादित आहे का पुस्तक? (मी आपलं मुळ मराठी समजत होते :))
भारतिय विवाहसंस्थेचा इतिहास वाचल्यावर एकदम आठवलं हे पुस्तक. सकाळपासून नाव आठवत होते मी.
टण्या ते व्होल्गा जेंव्हा लाल होते वाळिंब्यांचंच आहे.
बहुतेक अनुवादित नसावं असा
बहुतेक अनुवादित नसावं असा माझा अंदाज.
टण्या, १९८४ चा अनुवाद मराठीत आहे? बिग ब्रदर वगैरेचा अनुवाद कसा असेल ते पाहिलं पाहिजे.
In communion with
In communion with consciousness | Dr. Ramesh Jani | English | SHAKILAM FOUNDATION |125
हे पुस्तक मी कधीपास्न शोधतोय मिळत नाहीये
मी नुकतच पॅपिलॉन वाचल, Banco
मी नुकतच पॅपिलॉन वाचल, Banco नावाच्या त्याच लेखकच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे का ? कोणी केला आहे ?
बँकोचा मराठी अनुवाद आहे..
बँकोचा मराठी अनुवाद आहे.. माझ्या आठवणीनुसार विजय देवधरांनी बँकोचा अनुवाद केलेला आहे..
माझ्या आठवणीनुसार विजय
माझ्या आठवणीनुसार विजय देवधरांनी बँकोचा अनुवाद केलेला आहे..>>रविंद्र गुर्जर.
ओके , मी लायब्ररी मधे बघते ,
ओके , मी लायब्ररी मधे बघते , धन्यवाद
अंताजीची बखर् किंवा
अंताजीची बखर् किंवा नांगरल्यावीण भुई ही पुस्तके कुठे मिळू शकतील ?
पुण्यात अप्पा बळवंत चौकात बर्याच दुकानात आऊट ऑफ प्रिंट आहेत असं सांगितलं. कोणाला माहित आहे का की कुठे मिळतय म्हणून ? ह्या आठवड्यात मिळाल्यास बरं पडेल.. माहितीसाठी आगाऊ धन्यवाद..
एलिझाबेथ एड्वर्डस यांचे
एलिझाबेथ एड्वर्डस यांचे रेझिलिअन्स नावाचे पुस्तक अमेरिकेत प्रसिद्ध झाले आहे. ते अमेझॉन वर असले तर भारतात मिळते का? कुठे तुमच्या घराजवळील दुकानात आहे का ते पुस्तक? काय कीमत आहे डॉलर मध्ये
क्रुपया कळवा.
अश्विनीमामी http://www.amazon
अश्विनीमामी
http://www.amazon.com/Resilience-Reflections-Burdens-Facing-Adversities/...
वर दिलेली लिंक बघा. $१५ किंमत आहे पेपर बॅक साठी. सध्या डिस्काउंट मध्ये मिळतय.
बार्न्स अॅन्ड नोबेल मध्ये पण आहे. तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांच्या जवळ हे दुकान असेल.
http://search.barnesandnoble.com/Resilience/Elizabeth-Edwards/e/97807679...
येसूबाईंच्या जीवनावर आधारीत
येसूबाईंच्या जीवनावर आधारीत एखादी कादंबरी/पुस्तक सूचवा ना कुणाच्या वाचनात आले असेल तर. मला जाम उत्सुकता वाटतेय की संभाजीराजांच्या आकस्मिक धरपकडी आणि मृत्युनंतर तिने स्वराज्याची धुरा कशी पेलली असेल? राजारामांना गादीवर बसवले इतकेच त्रोटकरित्या माहीत आहे, पण पुढचा संघर्ष जाणून घ्यायची जाम इच्छा आहे

इथे ही टाका + माझ्या विपूतही लिहा प्लीज
बरं झालं हा बीबी सापडला......
बरं झालं हा बीबी सापडला...... केव्हाचं विचारायचं होतं.....
मी बर्याच वर्षांपूर्वी इंग्लिश मधून एक पुस्तक वाचलं होतं. त्यात ५-६ विवेचनात्मक लेख होते. आणि विषय अतिशय वेगळेच होते.
पहिला की दुसराच लेख होता छापील पुस्तकांच्या भविष्याबद्दल. त्यात लेखकाने अतिशय सुंदररित्या या कॉम्प्युटरच्या युगातही छापील पुस्तकं कशी टिकून राहतील याचं एक एक मुद्दा घेऊन विश्लेषण केलं होतं.
दुसर्या एका लेखात सुर्यावर आधारित कालगणनेपेक्षा चंद्राच्या कलेवर आधारीत कालगणना कशी अधिक सुटसुटीत आणि योग्य आहे हे समजावून सांगितलं होतं.
बाकीचे विषय आठवत नाहित. कोणीतरी विज्ञान कथालेखक होता असं वाटतयं. बहुधा Isac Asimov होता का? पण नेट वर किंवा दुकानांतून शोधूनही मला हे पुस्तक अजून सापडलेले नाही.
कोणी वाचलयं का हे पुस्तक?
अरे कोणी माझे पुस्तक मला
अरे कोणी माझे पुस्तक मला भेटवा रे ..........
भेटीलागी जीवा, लागलीसे आस!
राहुल सांकृत्यायनचे मराठीत
राहुल सांकृत्यायनचे मराठीत अनुवाद झालेले आणखी एक पुस्तक मी फार वर्षांपुर्वी वाचले होते. त्याचे नावः जय यौधेय.
चिकन सुप फॉर द वुमन सोल -
चिकन सुप फॉर द वुमन सोल - ह्याचे अजुन किती भाग आहेत त्यांची नावे द्या.
मला एका मराठी पुस्तका बद्दल
मला एका मराठी पुस्तका बद्दल विचारायचे आहे. कथासरित्सागर हे पुस्तक मी ४५ वर्षांपुर्वी वाचले होते. गूगुल वर पाहिले पण मराठीत नाही मिळाले. त्या बद्दल माहिती हवी आहे. कुणी सांगाल का?
म्हणजे ओन लाइन कुठे आहे का?
किन्डल वर मराठी पुस्तके येतात
किन्डल वर मराठी पुस्तके येतात का?
नाही. अजून तरी किन्डल वर फक्त
नाही. अजून तरी किन्डल वर फक्त इंग्रजीच पुस्तकं आहेत.
ग. दि. माडगूळकरांचं एक पुस्तक
ग. दि. माडगूळकरांचं एक पुस्तक शोधत आहे. मला नावच माहीत. मंजिरी नावाच्या राजकुमारीची गोष्ट/काव्य आहे त्यात. कृपया माहिती असल्यास सांगा.
गजानन, 'शशांक-मंजिरी' नावाची
गजानन, 'शशांक-मंजिरी' नावाची संगीतिका होती ती. त्यातील एक उतारा - 'दिला शब्द मोडू नये' नावाचा, आम्हाला पाचवीला बालभारतीला होता. सुंदर नाट्यरचना. आजही मला ठळकपणे आठवते.
Pages