मी एक दुसर्या महौद्धातील एका कथेवर पुस्तक वाचले होते. सहसा काही चांगले वाचले कि पुस्तकाचे, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था लिहुन ठेवण्याची सवय आहे. परंतु नेमकी ह्या पुस्तकाची माहिती माझ्या वहित नाही. मी वाचले ते नासिकच्या ग्रंथालयातुन आणुन. ती कॉपी इतकी जुनी होती कि पान उलटताना तुकडे पडत होते.
.
पुस्तकाबद्दल- गोष्ट आहे दोन मेसेंजर रायडर्सची. दुसर्या महायुद्धा दरम्यान हे दोघे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळुन आपाल्या बाइक्सवर पळ काढतात. जवळ थोडी फार सामग्री असते. पळुन जाउन शत्रु राष्ट्राच्या हद्दीत पोहोचायचे असते. हेतु हा कि पकडले गेल्यास युद्धकैदी म्हणुन राहवे लागेल पण जीव वाचेल. मायभुमीत अर्थातच देशद्रोही म्हणुन जीवे मारतील. त्यांना वाटेत आलेली संकटे आणि शेवटी त्यातला एकच आपले उद्दीष्ट गाठण्यात यशस्वी होतो ह्याची ही गोष्ट आहे.
.
तेव्हा मला हे पुस्तक खुपच आवडले होते. अगदी खिळवुन ठेवते. तर तुम्ही कोणि हे वाचले असल्यास किंवा काहि माहिती असल्यास कृपया इथे पोस्टा. धन्यवाद !!!!
पुस्तक माहिती आहे का ?
Submitted by तृप्ती आवटी on 26 June, 2008 - 14:57
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धारा, धन्यवाद. मलापण पाचवीला
धारा, धन्यवाद. मलापण पाचवीला होतं ते आठवतंय. आता इतक्या वर्षांनंतर ते वाचायची पुन्हा तीव्र इच्छा झाली, म्हणून पुस्तक शोध चालू केला.
पुस्तकाचं नाव माहीत आहे का? की शशांक मंजिरी हेच नाव आहे? माझी 'गदिमा डॉट कॉम'ची सीडी सापडलीय, त्यात बघतो आहे का.
नमस्कार .. मला हिंदु
नमस्कार .. मला हिंदु धर्माविषयी book वाचायचे आहे .. ज्यामधेय उअनिशदे वेदांगे व इतर माहिती असेल ..
मला खरच कळत नाही आहे की मी नक्कि काय वाचु...
हिंदू धर्म असे इथे च माबोवर
हिंदू धर्म असे इथे च माबोवर सर्च मधे लिहा. भरपूर मटेरिअल मिळेल.
रक्तरेखा : शशी भागवत यांचे
रक्तरेखा : शशी भागवत यांचे रक्तरेखा कुठे मिळेल ??
रक्तरेखा out of print झाले
रक्तरेखा out of print झाले आहे. पुण्यात आप्पा बळवंत चौकातल्या एखाद्या पुराण्या पुस्तकाच्या दुकानात चुकुन सापडले तरच! पुण्यातच शगुन चौकात एक पुस्तकांचं दुकान आहे ( नाव विसरले ) त्यांच्याकडे विचारून पहा. कधीकधी अशी मौल्यवान पुस्तके सापडतात त्यांच्याकडे.
इब्लिस चालेल .. धन्यवाद...
इब्लिस चालेल .. धन्यवाद...
शाहिर.... "रक्तरेखा" चा
शाहिर....
"रक्तरेखा" चा उल्लेख केल्याबद्दल तुमचे खास अभिनंदन. फार 'जादू' आहे शशी भागवत या नामात. असो.
वर आरएमडी म्हणतात तसे हे पुस्तक या क्षणी तरी सापडणे कोहिनूर शोधण्यासारखेच आहे म्हणा, तरीही तुम्ही
वरदा प्रकाशन;
३९७/१ सेनापती बापट मार्ग , वेताळबाबा चौक पुणे, इथेही प्रत्यक्ष चौकशी करा, अर्थात अगोदर फोन करून वेळ मागून घ्या. काहीवेळा इथली थोर थोर चाकर मंडळी चौकशीसाठी आलेल्या वाचकाला कपाटे दाखवून तुम्हीच शोधा असेही सांगतात.... अर्थात दुर्मिळ असलेल्या पुस्तकाबाबत.
फोन नंबर २५६५५६५४
अशोक पाटील
'शशांक-मंजिरी' नावाची
'शशांक-मंजिरी' नावाची संगीतिका होती ती.>>> धारा, काय सांगतेस?? फारच मोठा योगायोग आहे हा...
'दिला शब्द मोडू नये' नावाचा>>> हेही सांगितल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आता योग्य ठिकाणी योग्य वेळेला ह्या सर्व तपशीलांचा वापर करण्यात येईल.
मी शाळेत असताना जगाच्या
मी शाळेत असताना जगाच्या इतिहासांवर परिणाम करणार्या ७ हत्यांबद्दल एक पुस्तक वाचले होते.. ज्यात जे.एफ.के, युनोचे कोणी अध्यक्ष आणि नारायणराव पेशवे ही होते.स्टॅलिनही असेल बहुतेक.. पण बाकी काहीच आठवत नाहीये. इथे कोणाला काही माहीत आहे का?
मंजूडी,
मंजूडी,
धारा, काय सांगतेस?? फारच मोठा
धारा, काय सांगतेस?? फारच मोठा योगायोग आहे हा... >> मंजूडी,
अनेक वर्षे झाली. आईला एक
अनेक वर्षे झाली. आईला एक पुस्तक जुने पुस्तक पुन्हा वाचयचेय. श्री मो घैसास यांचे श्रीकृष्ण चरित्र. कोणाला माहिती आहे का? साधारण १९५० सालचे ते पुस्तक असावे.
यात अनेक गोष्टींचे छान विवेचन केले आहे. उदा. सुदर्शन चक्राबद्दल : वसुदेव, देवकी यांची पहिली सहा मुलं मारली गेली नाहीत तर त्यांना गुप्तपणे वाढवले गेले, त्यांना उत्तम शिक्षण दिले गेले. त्यांची फौज = सुदर्शन चक्र.
जे.के उपाध्ये नामक कवी/गीतकार
जे.के उपाध्ये नामक कवी/गीतकार होऊन गेले. अतिशय सुंदर गीतं जशी लिहिली तसच "चाल्-चलाऊ गीता" म्हणून गीतेचं विडंबन म्हणता येणार नाही... पण विनोदी लिहिलं होतं. त्यातले काही श्लोक (??) हाती आले आहेत.
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी
बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही !
कृष्ण म्हणे 'रे अर्जुना! | हा कोठला बे! बायलेपणा?
पहिल्याने तर टणाटणा | उडत होतास लढाया
अहाहारे! भागूबाई! | म्हणे मी लढणार नाही;
बांगड्या भरा की रडूबाई | आणि बसा दळत!
नव्हते पाहिले मैदान | तोंवरी उगाच करी टुणटुण;
म्हणे यँव करीन त्यँव करीन | आताच जिरली कशाने?
अर्जुन म्हणे 'गा हरी! आता कटकट पुरे करी;
दहादा सांगितले तरी | हेका का तुझा असला?
ऐसे बोलोनि अर्जुन | दूर फेकूनि धनुष्य-बाण,
खेटरावाणी तोंड करून | मटकन खाली बैसला
इ.
ह्याचं पुस्तक किंवा कोणत्याही स्वरूपात कोठे किंवा कुणाकडे उपलब्धं आहे का?
खूप वर्षांपूर्वी फर्ग्युसन
खूप वर्षांपूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या लायब्ररीत मराठीतल्या विडंबन काव्याचं संकलन असलेलं एक जुनं पुस्तक वाचलेलं आठवतंय. त्यात ही कविता होती तशीच 'बेगमेच्या पत्रास शिवाजीचं उत्तर' ही माधव ज्युलियनांच्या बेगमेचे शिवाजीस पत्र किंवा अशाच नावाच्या उर्दूचा सुळसुळाट असलेल्या कवितेला दिलेलं एक भन्नाट उत्तर ('....तरी फारसी मराठी मज कोश पाठवावा') असलेली कविताही होती... अर्थातच आता संपादक वगैरे आठवत नाहीये.
मला वाटतं या चाल-चलाऊ भगवद्गीतेचा उल्लेख झेंडूच्या फुलांना स. गं. मालशेंनी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यातही आहे. तेव्हा तिथे मूळ पुस्तकाचा/प्रकाशनाचा संदर्भ सापडावा.
कुणी ज्योती देवधरांचं बुटक्या
कुणी ज्योती देवधरांचं बुटक्या सावल्या वाचलंय का? कसं आहे??
इथे बर्याच बुक्स बद्दल चर्चा
इथे बर्याच बुक्स बद्दल चर्चा झालेली आहे .. साहित्य अकॅड्मी विजेत्या २००० च्या नंतरच्या बुक्स ची त्या मानाने कमी किंवा चर्चाच झालेली नाही .. जसे मी उत्सुकत्ने झोअलो.. महर्शी विट्ठल रमजी शिन्दे ,,,,वार्याने हललेले रान ,,,सदांनंद देश्मुख चे baromas ,,,,,राजन गवस चे tanakat....रंगनाथ ह्यांचे Tamraat ... etc ..
अधिक माहिती मिळाल्यास वाचतांना समजण्यास EASY होइल .. धन्यवाद ...
@ दाद.... काहीतरी टायपोचा
@ दाद....
काहीतरी टायपोचा गोंधळ झाल्यासारखे वाटते. तुम्ही जे नाव टंकले आहे "जे.के.उपाध्ये"....त्यामुळे 'जे.के.' इंग्लिश आद्याक्षराने कविता लिहिणार्या कवीचे लिखाण होते काय असा भास होतो. वास्तविक हे कवी आपल्या उदाहरणातील भन्नाट कविता 'ज.के. उपाध्ये' या नावाने लिहित..... जयकृष्ण केशव उपाध्ये.
खरेतर आचार्य अत्रे यांच्यासारख्या विडंबन कायप्रकाराची जबरदस्त क्षमता असलेल्या पत्रकार लेखकाची शोधक नजर समकालीन उपाध्ये यांच्याकडे कशी गेली नाही याचे आश्चर्य वाटते. अत्र्यांनी जसे दत्तू बांदेकरांना आपल्याकडे मोकळे मैदान उपलब्ध करून दिले होते, किंबहुना तसेच ते ज.के.उपाध्य यांच्यासाठीही झाले असते तर उपध्ये यांच्या विलक्षण अशा मिश्किल निरिक्षणक्षमतेला विशेष खाद्य मिळाले असते असे वाटते.
महाराष्ट्र राज्य प्रशासनातील एक ज्येष्ठ अधिकारी श्रीमती लीना मेहंदळे यांच्या ब्लॉगवर मला ही कविता पूर्ण स्वरुपात मिळाली होती....तिथे असेही समजले की ज.के.उपाध्ये यानी "चाल-चलाऊ" चक्क वर्हाडी भाषेतही लिहिले आहे, ते जर वाचायला मिळाले तर आगळ्यावेगळ्या वाचनाची बहारच उडून जाईल यात शंका नाही.
"विसरशील खास मला...." सारखं हळवं भावगीत लिहिणार्या उपाध्यांनी विडंबनाचा असला प्रकार हाताळला असेल यावर कित्येकांचा विश्वासही बसणार नाही.
अशोक पाटील
खूप आभारी आहे वरदा, अशोक
खूप आभारी आहे वरदा, अशोक काका.
लीना मेहेंदळेंना संपर्कात विचारते.
"...लीना मेहेंदळेंना संपर्कात
"...लीना मेहेंदळेंना संपर्कात विचारते...."
जरूर. त्यानाही ते भावेल. त्यांच्याकडून वर्हाडी भाषेतील चाल चलाऊ जर तुम्हाला मिळाले तर [त्यांच्या परवानगीने] इथे कृपया नक्की द्यावे. मला शोधूनही ते अजुनी मिळालेले नाही.
अशोक पाटील
अमृता प्रितम ह्यांचे आत्मकथन
अमृता प्रितम ह्यांचे आत्मकथन 'रसिदी तिकिट' मराठी, हिंदी किंवा इंग्रजीमधून उपलब्ध आहे का?
मी फ्लिपकार्टवर पाहिलं तर हिंदी वर्जन आऊट ऑफ प्रिंट दाखवतं. मूळ पुस्तक पंजाबीमधून आहे बहुतेक.
मराठीत कोणी अनुवाद केला आहे का? अर्थात हिंदी किंवा इंग्रजीमधून वाचायला जास्त आवडेल.
कोणाला काही माहित आहे का?
मराठीत आहे रशिदी तिकीट, मी
मराठीत आहे रशिदी तिकीट, मी कॉलेजात असतांना मराठीतूनच वाचले होते. आत्ता आठवत नाही कोणी अनुवाद केला होता ते. अमृता प्रितमच्या बर्याच पुस्तकांचा मराठी अनुवाद मी वाचला आहे.
ज के उपाध्ये ! कविते ! करीन
ज के उपाध्ये !
कविते ! करीन तुला मी ठार .....
ही कविता आम्हाला एस एस सी ला होती. त्यात त्यांनी ट ला ट लावनार्या 'कवड्यां ' ची चांगलीच रेवडी उडवली होती.
रस बीस आता तुला न कधी मिळणार ...
शाहीरांचा फर्स्ट क्लास सरदार वगैरे शब्द आठवतात...
धन्यवाद रुनी पॉटर. पण आता कसे
धन्यवाद रुनी पॉटर. पण आता कसे आणि कुठे शोधू ते पुस्तक?
माधवी.... डॉ.हेमा जावडेकर
माधवी....
डॉ.हेमा जावडेकर {पूर्वाश्रमीच्या हेमा कर्णिक} यानी रसिदी...सह जवळपास अमृता प्रीतम यांचे सारे साहित्य मराठीत अनुवादित केले आहे. पुण्यातील रसिक साहित्य तसेच बूकगंगावरून तुम्ही ते थेट मागवून घेऊ शकता.
"रसिदी तिकिट" मूळ [अर्थातच] पंजाबीमध्ये आहे आणि नॅशनल बूक ट्रस्टतर्फे Stamp Receipt या शीर्षकाने कृष्णा गोरोवाला यानी ते इंग्लिशमध्ये अनुवादित केले आहे.
हिंदीत नक्कीच अनुवादित झाले असणार पण त्या लेखक्/लेखिकेविषयी सध्यातरी माझ्याकडे माहिती नाही. उपलब्ध झाल्यास जरूर कळवितो.
अशोक पाटील
अशोककाका, धन्यवाद
अशोककाका, धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
बुकगंगावर दिसले नाही. अमृता प्रितम ह्यांची मराठीत अनुवाद झालेली दोनचं पुस्तके आहेत तिथे.
तरी परत बघते. 'रसिक' मधेही बघते.
बुकगंगाची घरपोच सेवा आहे का? की स्पीड्पोस्ट वगैरे करतात?
बुकगंगाची घरपोच सेवा आहेच,
बुकगंगाची घरपोच सेवा आहेच, स्पीडपोस्ट चार्जेस ते पुस्तकाच्या किंमतीत गृहित धरलेले असते {अर्थात हे मी भारतातील सेवेबद्दल लिहित्योय...तुम्ही जर अंकल सॅमच्या गावात असाल तर भरभक्कम चार्जेस ते लावतीलच.]
जाताजाता :
तुम्ही इंग्लिश अनुवादाच्या शोधात असाल तर Stamp Receipt तुम्ही खालील पत्त्यावरूनही मागवू शकता....त्यांची तशी सेवा आहे.
विकास पब्लिशिंग हाऊस,
५७६, मस्जिद रोड, जंगपुरा,
नवी दिल्ली-११००१४
अशोक पाटील
मीठ हे अतिशय छान पुस्तक आहे.
मीठ हे अतिशय छान पुस्तक आहे. माझ्याकडे आहे.
रसिदी तिकिट हिंदी आणि मराठी
रसिदी तिकिट हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आहे. मी शाळेत असताना मराठी अनुवाद वाचला होता आणि गेल्या वर्षीच जावेला हिंदी अनुवाद भेट दिला होता. (आत्ताच फ्लिपकार्टवर चेक केलं, तर हिंदी अनुवाद आउट ऑफ प्रिंट दिसतोय)
http://pustak.org/home.php?bookid=6535 इथे आहे बहूतेक हिंदी.
धन्यवाद अल्पना. मलाही हिंदी
धन्यवाद अल्पना. मलाही हिंदी अनुवाद आऊट ऑफ प्रिंट दाखवलं फ्लिपकार्टने.
'रसिक' वरही 'रसिदी..' सोडून, हेमा जावडेकर ह्यांनी अनुवाद केलेली काही पुस्तके दिसली.
Don Quixote चे मराठी चित्रमय
Don Quixote चे मराठी चित्रमय भाषान्तर खूप वर्षांपूर्वी वाचनात आले होत्ते. मात्र लेखक / प्रकाशक अजिबात आठवत नाहित. कोणि वाचले आहे का?
Pages