Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58
अर्थ माझा वेगळा
नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.
जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.
तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सिम्बा, पणन करा.
सिम्बा, पणन करा.
निरोप घेऊन जाणाऱ्या जलदाने
निरोप घेऊन जाणाऱ्या जलदाने ,जलद गतीने प्रवास केला
त्या सुमधुर नादाचा मला नाद
त्या सुमधुर नादाचा मला नाद लागला.
ती सु-मनांची सभा पाहून
ती सु-मनांची सभा पाहून देवांनीं सुमनांची वृष्टी केली
सुरापान गृहात, सुरामारीच्या
सुरापान गृहात, सुरामारीच्या घटना नेहेमीच्याच होत्या
मला लोणच्याची फोड नको खार वाढ
मला लोणच्याची फोड नको खार वाढ.
स्वतः ला अजिबात खार लावून न घेणारी खूप असतात.
झाडावरून खार चपळतेने खाली उतरली.
ही मदत माझ्याकडून. कमी आहे पण तेवढाच खारीचा वाटा.
ती माझ्यावर एवढा खार का खाते तेच कळत नाही.
माज घरातील मंद दिव्याची
माज घरातील मंद दिव्याची वात
माज करू नको
माजावर आलेलं जनावर
एकदा सूरसागरात सूर मारला, की
एकदा सूरसागरात सूर मारला, की पुन्हा तीर गाठता येवो वा न येवो.
तो तीर गळ्यास लागल्याशी मतलब.
सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा.
ज्याची हार होईल त्यानेच
ज्याची हार होईल त्यानेच जिंकलेल्याच्या गळ्यात हार घालावा, ही आमची प्रथा आहे, ज्यांना मान्य आहे त्यांनीच भाग घ्यावा.
मान देणे मान अडकणे.
मान देणे
मान अडकणे.
वाट बघून बघून तुझी, माझी पार
वाट बघून बघून तुझी, माझी पार वाट लागली.
वाट लागली
वाट लागली
वेलाला द्राक्ष लागली
वाट लावली शेतात भाजी लावली
वाट लावली
शेतात भाजी लावली
दिव्याची वात
दिव्याची वात
वात आनलाय या मेल्याने
माया ची बाबांवर इतकी माया की
माया ची बाबांवर इतकी माया की त्यांच्याकडे माया नसतानाही ती त्यांची सेवा करते!
दरवाजा लावणे
त्याने दरवाजा लावला आत येऊन दिवा लावला आणि
खनावळीत लावलेला डबा वेळेवर आला नाही म्हणून त्या मावशीशी डोके लावले आणि वैतागुन शेवटी कुकर लावला
कर जोडूनी नमस्कार कर . नाहीतर
कर जोडूनी नमस्कार कर . नाहीतर कर भर!
तिने आणलेले पातळ फारच पातळ
तिने आणलेले पातळ फारच पातळ होते.
शिर धरून बसू नको, शीरेत
शिर धरून बसू नको, शीरेत इंजक्शन द्यायचे आहे. गपचूप अंथरूणात शीर!
कानात शिरत नाही का? अजून एक
कानात शिरत नाही का? अजून एक काना दे .
सुमनने , सुमनांचा सुंदर हार
सुमनने , सुमनांचा सुंदर हार करून देवाला वाहिला.
अग, तो चिमटा इकडे दे , नाहीतर
अग, तो चिमटा इकडे दे , नाहीतर चिमटा काढेन!
ज्यांनी तुझ्याजवळच्या
ज्यांनी तुझ्याजवळच्या भोपळ्याची शकले केली ते तुला मारुही शकले असते हे कळतेय ना?
कोपर्यावरचा दुकानदार! आहे वाणीच, पण वाणी किती गोड! अगदी साखरेवाणी बोलतो!
वडाचे झाड शोधण्या साठी किती ती वडवड गं!
धरा, नीट ठेवा हा मोलाचा ठेवा!
रमा, केळीच्या बागेत रमा जरा घटकाभर, मग या परत!
तुझ्या नावे बँकेत काहीतरी ठेव
तुझ्या नावे बँकेत काहीतरी ठेव ठेव.
सदरा घाल व मला त्या सदराचा
सदरा घाल व मला त्या सदराचा अर्थ सांग .
छान लिहीतायत सगळे. मजा येतीये
छान लिहीतायत सगळे. मजा येतीये वाचायला.
एक डाव डाव मांडून तर बघ.
एक डाव डाव मांडून तर बघ.
त्या पळीचा स्वयंपाकातला वाढलेला वापर पाहून डावाला अगदी डावलल्यासारखे वाटत होते.
रचनाने केलेली पुष्परचना मला
रचनाने केलेली पुष्परचना मला आवडली.
जोश्यांच्या जमिनीची केस
जोश्यांच्या जमिनीची केस कोर्टात लढता लढता कुलकर्णी वकिलांचे केस पार विरळ झाले.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.
आणि आमरस करताना पायरी आंबा विसरू नये.
Pages