मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - अर्थ माझा वेगळा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 22:58

अर्थ माझा वेगळा

नदी वाहताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्या भागात नवी लय धारण करते.उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात. एकचं शब्द पण वाक्यागणिक अर्थ बदलू शकतो.

जसे,
१. तेथे कर माझे जुळती !
२. करावे तसे भरावे.

तर मंडळी, खेळ अगदी सोपा आहे. तुम्हाला प्रतिसादात असेच शब्द असलेली वाक्यं लिहायची आहेत ज्या शब्दांचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात. निवडलेला शब्द हा नाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण इ. कोणत्याही रूपात चालू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला लोणच्याची फोड नको खार वाढ.
स्वतः ला अजिबात खार लावून न घेणारी खूप असतात.
झाडावरून खार चपळतेने खाली उतरली.
ही मदत माझ्याकडून. कमी आहे पण तेवढाच खारीचा वाटा.
ती माझ्यावर एवढा खार का खाते तेच कळत नाही.

एकदा सूरसागरात सूर मारला, की पुन्हा तीर गाठता येवो वा न येवो.
तो तीर गळ्यास लागल्याशी मतलब.

सूर नोहे तीर कंठी लागलेला शापसा.

ज्याची हार होईल त्यानेच जिंकलेल्याच्या गळ्यात हार घालावा, ही आमची प्रथा आहे, ज्यांना मान्य आहे त्यांनीच भाग घ्यावा.

वाट लागली
वेलाला द्राक्ष लागली

दिव्याची वात
वात आनलाय या मेल्याने

त्याने दरवाजा लावला आत येऊन दिवा लावला आणि
खनावळीत लावलेला डबा वेळेवर आला नाही म्हणून त्या मावशीशी डोके लावले आणि वैतागुन शेवटी कुकर लावला

ज्यांनी तुझ्याजवळच्या भोपळ्याची शकले केली ते तुला मारुही शकले असते हे कळतेय ना?
कोपर्‍यावरचा दुकानदार! आहे वाणीच, पण वाणी किती गोड! अगदी साखरेवाणी बोलतो!
वडाचे झाड शोधण्या साठी किती ती वडवड गं!
धरा, नीट ठेवा हा मोलाचा ठेवा!
रमा, केळीच्या बागेत रमा जरा घटकाभर, मग या परत!

एक डाव डाव मांडून तर बघ.

त्या पळीचा स्वयंपाकातला वाढलेला वापर पाहून डावाला अगदी डावलल्यासारखे वाटत होते.

जोश्यांच्या जमिनीची केस कोर्टात लढता लढता कुलकर्णी वकिलांचे केस पार विरळ झाले.

Pages