लोकमान्य टिळकांची सुप्रसिद्ध गोष्ट आपण ऐकली असेलच. "मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" हे ज्या बाणेदारपणे त्यांनी निक्षून (बाणेदारपणे हे नेहमी निक्षूनच असते किंवा जे निक्षून असते ते बाणेदारच असते) सांगितले तो बाणेदारपणा आजकाल कमी होत चालला आहे असे निरीक्षणात आले आहे. पूर्वी मराठी हिंदी सिनेमात तो बाणेदारपणा अगदी ठासून भरलेला असे उदा. विश्वासराव सरपोतदार कसे आठवणीने सत्तर रुपये परत मागतात किंवा जब तक बैठने के लिए ना कहा जाए चुपचाप खडे रहो ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही - आठवलं तरी वाटतं की नंतर प्राण एकटा असतानाही खुर्चीवर बसत नसेल. तर सांगायचा मुद्दा हा की हा बाणेदारपणा हरवत चालला आहे.
आज आपल्याला व्हॉट्सॅपवर कितीतरी प्रकारचे मेसेजेस येत असतात आणि त्यावर मला "मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" असे निक्षून सांगावेसे वाटते पण धीर होत नाही कारण सामजिक हितसंबंध! लोकमान्य टिळकांनी या हितसंबंधांचे काय केले हे कळाल्याशिवाय काही खरे नाही. म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागेपण.. सहन करतो न खाल्लेल्या शेंगांची टरफले.. हे विधात्या! तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्याला आम्ही मेसेज करतो ते आम्हाला रिप्लाय करत नाही आणि दुसर्या बाजूला जे आम्हाला मेसेज करतात त्यांना आम्हाला रिप्लाय करवत नाही.. मग हे करुणाकरा... भरकटलेल्या व्हॉटसॅपचे मेसेजेस घेऊन आम्ही कुणाच्या इनबॉक्स्मधे डोके आदळायचे? कुणाच्या.. कुणाच्या कुणाच्या!!
पुरेसा मेलोड्रामा झालेला आहे असे समजून आता मंडळ पुढील चौकात सरकत आहे. भाविकांना नम्र विनंती की त्यांनी शांतता व संयम राखावा. रांगेचा फायदा सर्वांना. ३२ लोकांनी बसावे व १८ लोकांनी उभे रहावे. तर असे शेंगा टरफलवाले मेसेजेस कोणते ते पाहू.
१. कुणीतरी ट्रीपला किंवा घरगुती कार्यक्रमाला गेलेले असते. तिथले किमान ७ तरी फोटो अशा गृपवर टाकतात जिथला एकही माणूस तिथे हजर नसतो. हेच लोक जितक्या गृपवर तुमच्यासोबत असतात त्या सगळ्या गृपमधे हे फोटो आदळतात. - मी ट्रीप/ कार्यक्रमाला आले नाही, मी एवढे फोटो डाऊनलोड करुन वा वा छान लिहीणार नाही. (पण हा बाणेदारपणा मनातलाच).
२. अचानक आलेले ज्ञान! मेसेजेस - यात आरोग्यापासून ते खगोलशास्त्रापर्यंत सगळे शोध कसे आपल्या पुराणांत, वेदांमधे आधीच लागून गेलेले आहेत आणि नासा, अमेरीका कसे लेट करंट आहेत प्रकारचे #थोरभारतीय संस्कृती मेसेजेस. - यांना 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म' म्हणायची जाम खुमखुमी येते पण ही म्हातारपणापर्यंत थोपवून धरली आहे कारण तेव्हा जगण्यात 'राम' हवा!
३. फळे आणि भाज्यांचे उपयोग - हे आम्हाला शिक्षण मंडळाने शिकवायचा खूप प्रयत्न केला. तरी डब्यात पडवळ, नवलकोल, सुरण इ भाज्यांना प्रवेश नव्हता आणि आता आमच्या मुलांच्याही डब्यात नसतो. शिवाय रामानंद सागरांनीही आम्हाला (निक्षूनच!) सांगितले आहे की 'होनी को कोई नही टाल सकता'- मग भले आम्ही व्हिटॅमिन डेफिशियन्सीत जगू (एवढंच ना!) पण शेवग्याच्या सालांची चटणी खाणार नाही. (पण हा बाणेदारपणा मनातलाच).
४. राजकीय मेसेजेस - याबददल आपण सोडून सर्वांना सर्वच माहीत असते. त्यामुळे शेंगा आणि टरफलांचा उपयोग नाही. इथे टिळकच पाहिजेत. (पण तेवढं ते बोल्डमधे लिहायचं कमी कराल का? राजकीय घडमोडींबद्दल तुम्ही एवढं भरभरुन लिहीताय यातच काय ते बोल्ड आलं असं मानू.)
५. आज काय स्पेशल फोटो - रोज घरी बनवल्या जाणार्या पदार्थांचे फोटो. हल्ली यात आजूबाजूला पसारा चालत नाही म्हणे. म्हणजे तीही काळजी घेणं आलं. पण यात अगदी शेंगा आणि टरफल पोटेन्शियल आहे! म्हणजे घटक पदार्थ म्हणूनही आणि आपल्याला ज्याची चवही मिळणार नाही ते पाहून रोज ते जीभ बाहेर आलेले स्मायली का बरं टाकायचे म्हणूनही!
6. कोडी सोडवा - हे मेसेजेस म्हणजे वावटळीला निमंत्रण. एकदम 53 मेसेजेस कशामुळे बघायला जावं तर जनता जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखं कोडी सोडवत असते. चित्रं डीकोड करून उत्तर शोधण्याचा हा खेळ आपल्या पूर्वजांनी पूर्वीच खेळून ठेवला आहे.यावर मला स्वतःलाच मुद्दा क्र. 2 टाईप मेसेज लिहायची खुमखुमी येते पण पुन्हा खुमखुमी - म्हातारपण - राम आहेच. (हे चित्रलिपीत द्यायला पाहिजे डिकोड करायला.)
याव्यतिरिक्त रोजचे सुप्रभात, शुभरात्री मेसेजेस, नात्यांचे महत्व मेसेजेस किंवा मुलगी आणि वडीलांमधलं प्रेम सांगणार्या कविता, घरकाम श्रेष्ठ्काम कविता, प्रेरणादायी भाषणांचे व्हिडीओ, इस्कॉन, साईबाबा, कोल्हापूर आणि हजारो देवळांमधली आजची पूजा फोटो अशा विविधतेने नटलेल्या व्हॉटसॅपचा मला मुळीच अभिमान नाही. या परंपरेची पाई'प' होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी मुळीच प्रयत्न करणार नाही. मी माझ्या पालकांचा आणि गुरुजनांचा मान ठेवीन पण प्रत्येकाशी सौजन्याने वागणे अवघड आहे. माझा देश आणि देशबांधव यांचे कल्याण तर होतच आहे समृद्धीही होत राहो कारण त्यातच माझे सौख्य सामावलेले आहे. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय शेंगा. जय टरफले.
भारी लिहिलंय.
भारी लिहिलंय.
या परंपरेची पाई'प' >> पाईप च्या पुढे द्राक्षं लावून सगळे नल देवाच्या (आपलं डेव्हनलाच्या) चरणी वाहून टाक.
खत्रा! पाईप ची उपमा भन्नाट!
खत्रा! पाईप ची उपमा भन्नाट! तरी अजून यात रोज येणार्या शेकडो फुले, उद्गारचिन्हे व कधीकधी जणू शब्दांत लिहीलेले आपल्याला कळणार नाही म्हणून जो शब्द आहे त्याचा स्माइली - अशा प्रकारांची दखल घेतलेली नाहीस. तसेच स्वतःची किंवा वपुंची पकाउ वाक्ये पुलंच्या नावावर, इतर कोणाची तरी इंग्रजी वाक्ये अब्राहम लिन्कन च्या नावावर, स्थानिक विचारवंताचे वाक्य स्वामी विवेकानंदांच्या नावावर असले प्रकार, किंवा सिगरेट ओढणारे नेहरू, नाचणारे गांधी असली "विविधता" - यांची पण
नल देवाच्या (आपलं डेव्हनलाच्या) >>> हे जरा झेपायला काही सेकंद लागले.
पाई'प' >> डेव्हनलाच्या >>
पाई'प' >>
डेव्हनलाच्या >>
(No subject)
परफेक्ट लिहीलंय, आशूडी
परफेक्ट लिहीलंय, आशूडी
सॉलिड
सॉलिड
सही लिहीलय..
सही लिहीलय..
एक अतीशय चीड आणणारा प्रकार म्हणजे आपलेच ओळखीचे, नात्यातील अगदी शिकले सवरलेले जेव्हा काही फॉर्वर्ड्स पाठवतात- जसे की अमुक तमुक महाराज म्हणे पूजा करताना त्यांचे साक्षात गुरू हजर... आणि ती क्लिप विडिईयो वा तत्सम मुद्रण यंत्रणा भारतात येण्या आधीची असते. किंवा कुठलिही शहानीशा न करता अक्षरशः काहिही बातमी वा घटना पाठवतात.. अगदी मॉर्फ व्हिडीयो पाठवणे...
यावर जर तुम्ही प्रतीप्रश्ण केलात तर- "मला माहित नाही.. आले तसे पुढे ढकलले आहे"... तुम्ही अगदीच आक्षेप घेतलात किंवा पाठवणार्याला त्याच्या जबादारीची जाणीव वगैरे करून द्यायला गेलात तर- 'अरे सोड ना फॉर्वर्ड आहे.. नाही पटले तर ईग्नोर कर' असाही सला देतात. (तर मग आधी पाठलेच का? असा प्रश्ण आपण मनातल्या मनात गिळून टाकतो!). आणि एरवी अफवा ऊठल्या म्हणून दुसर्यांना दोष देण्यात हेच लोकं पुढे असतात.
सगळ्यात वाईट्ट प्रकार तर कधि कधी एखाद्या वॅप गृप वर तुम्ही सभासद असाल तर अनुभवास येऊ शकतो. जिथे सर्व तुमचे मित्र, मैत्रिणी वा नातेवाईक असतात... पण त्यांची व्यक्त होण्याची ऊर्मी ईतकी प्रखर असते की त्यांच्या असंस्ख्य वायफळ बडबडीला तुम्ही एकही ऊत्तर दिले नाहीत तरी तुमच्यावर नाके मुरडली जातात... च्यामारी वॅप ने जितके 'वर्चुअल' संबंध निर्माण केले आहेत तितके ब्रह्म्देवाला देखिल सुचले नसतील.
असो... आपलेच वॅप आणि आपलेच व्हिप (whips!)
पाई'प चा जोक कळला नाही...
पाई'प चा जोक कळला नाही...
पाई'प चा जोक कळला नाही...>
पाई'प चा जोक कळला नाही...>>मलाही
sahi pakadlay ekdum
sahi pakadlay ekdum
>> लोकमान्य टिळकांनी या हितसंबंधांचे काय केले हे कळाल्याशिवाय काही खरे नाहीत.
Agdi agdi tenwha te lahan hote ho he pan ahe
भन्नाट!
भन्नाट!
सगळेच हासतंयत... मलाच एकही
सगळेच हासतंयत... मलाच एकही जोक कळला नाही या लेखात
(No subject)
धमाल लिहीलंयस !!!
धमाल लिहीलंयस !!!
सगळेच पंचेस कोट करावे लागतील.
मुद्दा ३ अगदी कळवळून पटला.
यात 'अ स्टिच इन टाईम सेव्ह्ज नाईन' पासून ते 'पळसाला पाने तीन' पर्यंत कोणतेही वचन विश्वास नांगरे पाटील यांच्या नावावर खपवणे हाही मुद्दा अॅड करा.
मस्त
मस्त
भारी लिहिलंय!
भारी लिहिलंय!
सही पकडे है आशुडी!
सही पकडे है आशुडी!
पाई'प>>>> भारी.
मी अनु, विश्वास नांगरे पाटील ला +१००००
काय वाट्टेल ते खपवतात कुणाच्याही नावावर.
पण मला एक कळत नाही. आपण सगळेच किंवा माझ्या आजुबाजुचे सगळेच अशा मेसेजबद्दल बोंब मारतात. मग हे असे फॉरवर्ड्स बनवतं कोण?
धन्यवाद सगळ्यांना! अमितव, फा
धन्यवाद सगळ्यांना! अमितव, फा
संपादकाच्या डुलकीतल्या चुका दुरूस्त करून मुद्दा क्र. 6 ची भर घातली आहे. जुना दागिना मोडला की नवीन करताना भर घालावी असा परवाच एक मेसेज आला होता.
मस्त लिहीले आहे नेहमीप्रमाणेच
मस्त लिहीले आहे नेहमीप्रमाणेच. टोटली अॅग्री.
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय.
मस्त लिहिलय. 'मी शेंगा खाल्या
मस्त लिहिलय. 'मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही' असा बाणेदार पणा सद्ध्या अंगी आला आहे.. तुझ्या नावासकट शेअर करु का? थोडक्यात अजुन एक फॉर्वर्ड. पण हा आ व श्य क आहे गः-)
छान लिहीलंय!
छान लिहीलंय!
मस्त
मस्त
पण मला एक कळत नाही. आपण सगळेच किंवा माझ्या आजुबाजुचे सगळेच अशा मेसेजबद्दल बोंब मारतात. मग हे असे फॉरवर्ड्स बनवतं कोण?>>> ज्याना ते विद्वान आहेत असा गैरसमज असतो ते.
भारीच! जाम आवड्या पाई'प' >>
भारीच! जाम आवड्या
पाई'प' >>
मला पण त्या गुडमॉर्निंग
मला पण त्या गुडमॉर्निंग मेसेजचा, उपदेशाच्या मेसेजचा जाम कंटाळा येतो.
एक नंबर लिहिले आहे
एक नंबर लिहिले आहे
भारीच
भारीच
अजून एक जनरल मत असतं लोकांचं.. "मला मी तुम्हाला पाठवलेल्या मेसेजची (मग तो काहीही असू शकतो.. गुड मॉर्निंग, गुड नाईट पासून संकष्टीच्या शुभेच्छा काहीही असू शकतं), डबल नीळी टीक दिसली तरी तुमचं काही उत्तर नाही !!"
(No subject)
पण मला एक कळत नाही. आपण सगळेच
पण मला एक कळत नाही. आपण सगळेच किंवा माझ्या आजुबाजुचे सगळेच अशा मेसेजबद्दल बोंब मारतात. मग हे असे फॉरवर्ड्स बनवतं कोण? >> अरे इथे मायबोलीवर समोर दिसेल त्या वस्तू वर लिहिणारे लोकं काय कमी आहेत का? आता हेच घ्या! सध्या मला समोर दिसतोय माझा हात. पाडा ललित... जन्मल्यावर दुधाच्या बाटली पासून आज पर्यंत त्या हाताने काय काय पकडलं याची सनावळीत उजळणी. मग बापाचा हात, आईचा हात, ताईचा हात, मास्तरांचा हात, प्रियकराचा हात, याचकाचा हात, सीमेवरील जवानांचा हात, (आम्रविकेत आहात हे सांगायला ट्रंपचा छोटा हात) भगवंताचा हात, काळाचा हात... हायला हात दाखवून अवलक्षण!
हातावरच्या रेघा काढणाऱ्या विधात्याच्या हातावरच्या रेघा कुणी काढल्या असतील! असा शेवटी एक रिकार्सिव्ह प्रश्न.
मस्त लेख. मी तर निरुपयोगी
मस्त लेख. मी तर निरुपयोगी सगळं इग्नोर करते. जर कुणी जाब विचारण्याचं धाडस केलंच, तर मग आहेच शेंगा/टरफलं असा बाणेदारपणा. पण मी तो बाणेदारपणा दाखवीन अशी सगळ्यांना खात्री असल्यामुळे कोणी विचारायला येत नाही.
Pages