प्रकरण ९, १० आणि ११ ची लिंक:
https://www.maayboli.com/node/65222
----
प्रकरण 12
संध्याकाळी साडेसात वाजता दोघे बेडवर एकमेकांच्या पायात पाय अडकवून बाहुपाशात बसलेले होते.
न बोलता.
शांत. निवांत.
“मी कॉफी बनवून आणते!”, रागिणीने शांतता भंग केली.
“थांब. बैस अजून! अशीच मला चिटकून बाहुपाशात बसून रहा! तुला क्षणभरसुद्धा दूर होऊ द्यावेसे वाटत नाही!” सूरज तिला आणखी छातीशी ओढत म्हणाला.
“मिस्टर सूरज सिंग! आता प्रेम बास झालं! थोडं प्रेम उद्यासाठी राहू द्या!”, असे म्हणत तिने जवळ पडलेली ब्रा उचली आणि घालायला सुरुवात केली.
“ओके रागिणी जी! जशी आपली मर्जी!”, असे म्हणून त्यानेही एकेक कपडे अंगावर चढवायला सुरुवात केली.
तो पुढे म्हणाला, “रागिणी, मला तुला काहीतरी सांगायचे आहे!”
रागिणीने टॉप घातला आणि म्हणाली,” कॉफी पितांना बोलू! ये बैस डायनिंग टेबलवर. मी ऑमलेट आणि कॉफी बनवून आणते.”
डायनिंग टेबलवर ऑमलेट आणि कॉफी घेतांना सूरजने म्हटले-
“तू माझ्याकडे नेहमीकरता फ्लॅटवरच राहायला ये रागिणी!”
तिच्या पूर्वायुष्यातील सगळ्या घटना त्याला अजून सांगायच्या की नाही याबद्दल तिची द्विधा मनस्थिती होत होती. तसे तिनेही त्याला त्याच्या भूतकाळाबद्दल जास्त विचारले नव्हते आणि आता हा फ्लॅटवर राहायला ये म्हणतो आहे?
ती विचारात पडली.
“यावं का याचेसोबत रहायला? सोबत राहून एकमेकांना आणखी काही वर्षे ओळखून मग पुढचा विचार करता येईल.
पण हा माझा विचार झाला. त्याच्या मनात नेमके काय आहे? पण मनातले नेमके सगळेच एकदम एकमेकांना आताच एकमेकांना सांगितले पाहीजे का?
हळूहळू एकमेकांबद्दल माहिती होण्यात जी मजा आहे ती एकदम सगळे पूर्वायुष्य एकमेकांना भराभर सांगून मोकळे होण्यात नाही!
अशाने आयुष्य बेचव होतं! आणि भूतकाळाला महत्व तरी किती द्यायचं?
मेंदूत भूतकाळ एक स्मृती म्हणून साठवलेला असतो, बाकी भूतकाळाचे अस्तित्व असते तरी कुठे?
जास्तीत जास्त फोटो आणि व्हिडिओद्वारे भूतकाळाचे क्षण आपल्याकडे असतात पण तेही काय असतं? एक मेमेरीच!
आता मी जे सुख अनुभवले ते कधी रोहन सोबत अनुभवलेच नव्हते. अनुभवणार होते त्या आधीच रोहनचा अपघात झाला आणि राहूल तर या सुखासाठी माझ्यावर टपूनच बसला होता आणि आता तर तो फोनवरून...!”
नंतर तिला आठवला, सोहमचंद्र, तिचा नवरा! नावालाच नवरा होता तो!!
त्याचे सोबत लग्न झाल्यानंतरचे एकेक दिवस आणि एकेक रात्री नरकात असल्यासारखे ती जगली होती. कुठे सोहम सोबत अनुभवलेले ते किळसवाणे आणि तिच्याकडून त्याने फक्त सुख ओरबाडून घेण्याचे ते सेक्सचे क्षण आणि कुठे हा आजचा सूरजने तिला दिलेला हळुवार तरल अत्युच्च सुखाचा अनुभव!!
काही तुलनाच होऊ शकणार नाही! सोहमसोबत तिने फक्त आणि फक्त दु:खच अनुभवले होते. पण सूरजने आज ज्या सफाईदारपणे प्रेमाक्रीडा केली त्यावरून तो या खेळात नवखा वाटत नव्हता.
कॉलेजमध्ये मैत्रिणींसोबत हसत खिदळत या विषयावर चर्चा केल्याचे तिला आठवत होते, पुरुषाने असे केले तर ओळखायचे की त्याने आधी “अनुभव” घेतलाय आणि तसे केले तर ओळखायचे की तो “हे” प्रथमच करतोय वगैरे वगैरे!! ...
पण आताच या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची आवश्यकता आहे का? राहूलच्या ब्लॅकमेलिंगबद्दल सूरजला आता सांगावे का? असे एक ना अनेक विचार तिच्या मनात चालले होते.
“अरे, हे काय? एका चांगल्या क्षणी मी हा कसला भूतकाळाचा विचार काय बसलेय? आताच हे सगळे आवश्यक आहे का?” रागिणी मनात म्हणाली.
ती अचानक गहन विचारांत गढली आहे हे पाहून सूरजने चुटकी वाजवून तिला विचारले, “मॅडम! मी फक्त विचारले की माझ्याकडे राहायला येतेस का, तेवढ्यावर एवढा मोठा विचार करतेस?”
“अं, हो हो, म्हणजे न न नाही!”
“अगं, काय हो आणि काय नाही?”
ती भानावर येऊन हसली आणि म्हणाली, “नाही यासाठी की मी कोणताच मोठा विचार करत नाही आहे आणि हो यासाठी की मी तयार आहे, तुझ्यासोबत राहायला!”
तिने स्वतःच्या नकळत होकार कळवला. आता तिच्या मनात थोड्यावेळापूर्वीचा त्यांचा बाथरूम मधील प्रेम प्रसंग रेंगाळत होता. तिच्या आयुष्यातला पहिला “खरा सुख देणारा” तो सेक्स होता पण मग सूरजचाही हा पहिलाच सेक्स असेल का? तिला पुन्हा असे वाटून गेले पण मग तिने विचारांची दिशा बदलवली.
तिच्या होकारामुळे सूरज खुश दिसला, म्हणाला, “चला बाहेर डिनर करूया! कमऑन गेट रेडी! तू लवकरच शिफ्ट हो इकडे! आता नो मोअर लेडिज होस्टेल. नो मोअर लोकल ट्रेन, नो मोअर बेस्ट बसेस!”
“म्हणजे?”
“म्हणजे मी तुझ्यासाठी एक कार घेतली आहे. खाली उभी आहे! ही त्याची चाबी!” टेबलावरची एक चाबी उचलून तिला देत तो म्हणाला.
तिने आश्चर्याने दोन्ही हात तोंडावर नेले. तिचे डोळे विस्फारले गेले.
“ओह माय गॉड! म्हणजे आपण सोबत राहाण्याबद्दलचा माझा होकार गृहीत धरला होतास तर! यु रिड माय माइंड, नॉटी! पण गाडीची आवश्यकता नव्हती, म्हणजे मी काही काळानंतर घेणारच होते रे! आणि मी समजा सोबत राहायला नाही म्हटलं असतं तर?”
“पण परंतु ची ही वेळ नाही. मी तुझं काहीच ऎकणार नाही, मॅडम! आय नो यु वेल. तू नाही म्हटलं नसतंच. टेक युर कार अँड लेट अस एन्जॉय अवर लाईफ अहेड टुगेदर!” हसत हसत सूरज म्हणाला.
“यु आर सिम्पली ग्रेट सूरज!”
“आठ दिवसांनी कारच्या सगळ्या फॉरमॅलिटिज आणि डॉक्युमेंट्स पूर्ण होतील. तोपर्यत येथेच राहा. ऑफिसला जातांना मी माटुंग्याला तुला सोडून देत जाईन माझ्या कारने! मग त्यानंतर नव्या कारनेच जा होस्टेलमध्ये तुझा सामान घ्यायला. सरप्राईज दे तुझ्या दोन्ही रूम पार्टनर्सला!”
(क्रमश:)
छान !
छान !
चांगली चाललेय कथा
चांगली चाललेय कथा