आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065
स्वित्झर्लंड भाग ७ - सुरसी http://www.maayboli.com/node/53248
स्वित्झर्लंड भाग ८ - अर्नीसी ! http://www.maayboli.com/node/53359
स्वित्झर्लंड भाग ९ - आईनसिडऽन आणि इन्नरथाल http://www.maayboli.com/node/54499
स्वित्झर्लंड भाग १० - रिगी http://www.maayboli.com/node/54543
स्वित्झर्लंड भाग ११ - मेन्झबर्ग ! http://www.maayboli.com/node/55213
स्वित्झर्लंड भाग १२ - ले प्लेएत्स्झ http://www.maayboli.com/node/55284
स्वित्झर्लंड भाग १३ - बेल्लीकॉन इन विंटर http://www.maayboli.com/node/55334
स्वित्झर्लंड भाग १४ - ओबरअॅगेरी http://www.maayboli.com/node/55487
शिक्षणासाठी ईटीएच, झुरीक ला जायचा योग आला , तेव्हा विश्वासच बसत नव्हता. जगात ९ नंबर ला असलेली प्रचंड अशी शैक्षणिक संस्था, कित्तीतरी जण अॅप्प्लाय करतात, त्यात माझा नंबर कुठे बसायला असं धरुन चाल्लेलो! जेव्हा न्युज कळली तो क्षण आत्तापण आठवतोय! भिमाण्णांचा पुरीयाधनश्री ऐकत होतो आणि ईटीएच ची वेबसाईट बघितलं तर सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांत मोरे कुलोत्पन्न आमचे पण नाव! आणि मग जी सफर स्वित्झर्लंड ची घडली ती बेस्ट होती!
आतापर्यंत अनेक ठिकांणांचे फोटोज टाकले इथे, पण आज जे फोटो विशेष टॉपिकच्या आभावी नाही टाकता आले ते टाकतोय! मिसेलॅनिअस म्हणता येईल!
मार्थाच्या घरी आल्या आल्या छोटासा देव्हारा तयार केला! आणि शेजारी कप आहे त्यात साखर आहे बरं का, प्रसाद!
ETH चा कॅम्पस भव्य होता. झुरीक मध्येच त्याचे तीन कॅम्पसेस! एक शहरातला जिथे मी काम करत होतो आणि एक इर्खेल चा! इर्खेल ला माझा इन्टर्व्ह्यु होता तेव्हा इमारतीतला हा स्पायरल जिना प्रचंड आवडला. पुर्ण चारही मजल्यांच्या मधुन हा फिरतो!
मी ज्या इमारतीत काम करत होतो तिचा तर पुर्ण फोटो घेणं माझ्या कॅमेर्याच्या आवाक्याबाहेरचं होतं! ही मेन दरवाज्याची इमारत!
त्या इमारतीत बसुन मी सुक्ष्मजीव वाढवत होतो, वेगवेगळे, असे-
इथे फक्त पीएच्डी करणार्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असं एक टेरेस आहे. तिथुन दिसतात ते हे नजारे!
हे टॉप ओफ दी ईटीएच
इकडे आल्यावर पहिल्यांदाच मॅक वापरायला मिळाला! त्याचं केव्हढं अप्रुप!
मार्थाकडे आल्यानंतर पहिल्या रात्री मसालेभात आणि संत्रे खाल्ले! मम्मीला दाखवायला काढलेला हा फोटो!
दुसर्यादिवशी अंदाज न आल्याने झालेली भरमसाठ पोहे!
फायनली चपाती जमली आणि फुगली पण!
र्हाईनफॉल हा युरोपातला सगळ्यात मोठा धबधबा र्हाईन नदीवरचा, तो शाफहौजेन या स्विस्स कॅन्टॉन मध्ये!तिथे गेल्यावर जरा हसायलाच आलं. आपल्याकडे फार मोठे उंच धबधबे बघितल्याने, हा होय युरोपातला मोठ्ठा धबधबा असं झालं! पण सौंदर्य अप्रतिम!
हे भलं मोठ्ठं आइसक्रीम तिथे घेतलं!
माझ्या बरोबर एक मैत्रीण तिथे होती. ति आणि मी नदीच्या कडेने चलत चालत तिथल्या गावाला गेलो! वाटेत झालेलं नदीच दर्शन अतिशय मनमोहक! पाचुसारखं हिरवट निळं पाणी! नितळ!
आख्खं गावच अशा सुंदर जागी वसलेलं!
मध्येच १० ऑगस्ट ला माझा वाढदिवस! माझी लॅब मॅनेजर एला आणि तिचा नवरा या दोघानी माझ्या साठी केक बनवला! आणि एला ने पोलिश स्वीट डिश बनवली माझ्यासाठी!
माझा २३ वा वाढदिवस. पण पोलिश पद्धतीत तिन आकडा अशुभ! म्हणुन २४-१ !
एलाची मांजर रीयिश्का सुद्ध होती मला शुभेछा द्यायला!
त्याच रात्री मार्था, तिचा मित्र हंस रुवेदी, तिचा मोठा मुलगा स्टीव्ह, त्याची मैत्रीण जेनी (दोघांचे लग्न झाले मागच्या आठवड्यात. आमांत्रण आले होते!), डॅनी यानी मला रोष्टी फार्म मध्ये पार्टी दिली!
हीच ती, लुसलुशीत, कुरकुरीत, स्वादिष्ट, गरमागरम सेक्सी रोष्टी!
त्याच्याबरोबर हीच ती बुडबुडीत ( ), डार्क ब्राऊन, मदिरेला लाजवणारी रिवेल्ला!
आणि मग आम्ही प्रत्येकाने वेगवेगळी आईसक्रीम घेतली!
परदेशात इतका सुंदर वाढदिवस साजरा होईल असं वाटलं पण नव्हतं!
नंतर एकदा ज्याला युरोपचा माथा म्हणतात त्य युंगफ्रौ ला गेलो! बर्फ बर्फ आणि बर्फ आणि त्याच्याशी लडिवाळपणे खेळणारा सुर्य! तिथुन एक हिमनदी खाली प्रवाहित होते!
तिथे एक चॉकोलेट म्युजिअम पण आहे. तिथले चॉकोलेट लिक्वीड्स आणि ते करायचा लिंड्ट च मशीन!
जाता जाता मला त्या नगाधिराजाने एक सुंदर सुर्यास्त दाखवला! ठेवणीतले सगळे रंग त्याने उधळुन टाकले होते!
आर्वो नावाच्या संस्थेत डॅनी रोज जायचा. गतिमंद लोकांसाठी असलेल्या या संस्थेत त्यांच्यासाठी कामं पुरवली जातात आणि त्यातुन येणारा पैसा त्यांनाच परत दिला जातो! त्यांचा स्वाभिमान असा जपला जातो! तिथे ओपन डे होता तेव्हा मी तिथे गेलो होतो!
हे शर्ट प्रिंटींग
हे कागदी पिशव्या बनवण्याचं काम!
लाकडी सुर्यफुले!
आणि हे मेणबत्त्या बनविण्याचा ठिकाण!
आणि थक्क होऊन बाहेर पडलो. गतिमंद हा शब्द कित्ती चुकीचा आहे हे जाणवलं तिथे गेल्यावर!
ज्या शहरात एक वर्षभर राहिलो त्या शहराचे काही फोटोज आता!
झुरीकचे सुंदर तळे एका सोनसळी दिवशी!
एका तळ्यात होती....
झुर्कात सेख्सलॉयटेन असा एक इव्हेंट असतो! वसंताच आगमन करण्यासाठी आपल्यासारखी होळी करुन त्यात स्नो मॅन चा पुतळा जाळतात!
त्यदिवशी विविध पोशाख घालुन एक मिरवणुक निघते! सगळीकडे मजा मजा सुरु असते!
हे झुरीकचं ऑपरा थिएटर!
या शहराने मला एक खुप मोठी गोष्ट दिली! माझी सतारीची आवड! आपल्या संगीताचा टच हरवायला नको म्हणुन मी एखाद वाद्य शिकावं म्हणतो काय, तिथे मला एक सतारवादक शिक्षक सापडतो काय, आणि सतार आयुष्याचा अविभाज्य घटक ठरतो काय! थॉमस ने ज्या तळमळीने मला सतार शिकवली ते मी कधीच विसरु शकणार नाही!
निद्राधीन झुरीक!
या स्वित्झर्लंडने मला भरभरुन निसर्ग दाखवला, आपल्यातलाच एक अशी माया केली, कुठे माझी गैरसोय होऊ दिली नाही कि कुठे मला परकेपणाची जाणिव होऊन दिली नाही!
एखादी मैफल अगदी रंगते, तानपुरे नीट जुळतात, तबला सुंदर लागतो, गायकाचा आवाज मनाच्या खोल गाभार्यातुन येतो, रागाचा भाव सगळ्यांवर हावी होतो! आणि शेवटी भैरवी होता होता डोळ्यांत पाणी येतं - सुंदर अनुभवल्याचं! स्विस वास्तव्य तसंच काहीसं झालं!
जाता जाता विमानातुन नमस्कार केला. येतो रे बाबा परत!
प्रदीपा, रायगड, मी नताशा खुप
प्रदीपा, रायगड, मी नताशा खुप खुप धन्यवाद!
गेले दोन तास तुझे पंधरा भाग तल्लिनतेने वाचले.
खर तर गेले दोन तास स्वित्झर्लंड्ला जाउन आले असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.
तुस्सी ग्रेट हो! कोल्हापुरी थाटात भरपुर पोटभर जेवा म्हन्टल्यागत जणु ही फोटोची मेजवानी वाटली. त्या बरोबर सुश्राव्य संगीत असावे तसे तुझे कथन होतेच. त्यात केलेल्या अनेक कोट्या, काव्य ह्याला देखील मनापसुन दाद
>>>>>>>>>>UMAK या भरभरुन दिलेल्या प्रतिसादाला मी काय म्हणायचं कळत नाही. भरुन पावलो! ज्यासाठी लिहीलं होतं ते सार्थक झालं याची खात्री पटली तुमचा प्रतिसाद वाचल्यावर!
अरे हे पाहीलंच नव्हतं!
अरे हे पाहीलंच नव्हतं!
UMAK च्या प्रतिसादाला +१००
फार सुरेख शब्दांकित आणि चित्रा़ंकित केले आहेत अनुभव....फार फार आवडलं!
प्रकाश काळेल जी खुप खुप
प्रकाश काळेल जी खुप खुप धन्यवाद! खरंच सुंदर अनुभव होता तो !
कुलु काय अप्रतीम झाली भैरवी!
कुलु काय अप्रतीम झाली भैरवी! सगळे सूर उत्तम लागले होते!
तुला पुढील प्रवासाठी खूप शुभेच्छा!
तुला पुढील प्रवासाठी खूप
तुला पुढील प्रवासाठी खूप शुभेच्छा!>>>> मानुषी खुप खुप धन्यवाद!
Pages