तुझ्यानंतर..
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
13
तुझ्यानंतर..
आता उतरेल सांज पापण्यांवर
केशरी किरणे जरा काजळतील
हृदयकमळ आनंदाने फुलून
पाय तळ्याकाठी निघतील
आणि तिथे तू मला भेटशील...
संथ पाण्यावर तरंग उठताना,
कमळदेठ वार्यावर डहुळताना,
पांखरांचे सूर मंद होत जाताना,
काळोखाची साय दाटत जाताना,
चंद्र मध्यावर येता मला शोधताना
माझ्या प्रिया.... राजस भूता!
- बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
माझ्या
माझ्या प्रिया.... राजस भूता!...? भूत राजस असते?
प्रेयसीला
प्रेयसीला प्रियकर राजस वाटतो.. म्हणून ती, तो निवर्तल्यानंतर त्याला राजस भूता म्हणते. असा अर्थ अभिप्रेत आहे.
बी, रागवू
बी, रागवू नकोस, पण सगळ्या ओळी तरल म्हणाव्यात अश्या झाल्या असताना शेवटचा 'राजस भुता' म्हणजे चांगली स्मूदी पिताना बचकन एखाद्या फळाचा देठ घशात अडकावा असं काहीसं वाटतं.
फारच
फारच भितीदायक आहे!
बरोबर आहे
बरोबर आहे हवाहवाई, मला या कवितेत थोडे भितीचे भाव निर्माण करायचे होते.
मृ आणि सर्वांचेच आभार.
अतुल सुन्द
अतुल
सुन्दर आहे !!!! तुझ्यनन्तर
याच
याच सिंहिणीने त्या प्रियकराला खाल्ले का ?
***
माटी कहै कुम्हार को तू क्या रूँदै मोहि
एक दिन ऐसा होयगा मैं रूँदूँगी तोहि
याच
याच सिंहिणीने त्या प्रियकराला खाल्ले का ? >>>

हे राम
हे राम देवा नारायणा..
>>मला या
>>मला या कवितेत थोडे भितीचे भाव निर्माण करायचे होते
तुझी कविता वाचायची म्हणजे आधीच मनात भीतीचे भाव निर्माण होतात. पुन्हा कवितेत कशाला ते?
शेवटची ओळ सोडली तर कविता चांगली आहे..
राजस
राजस भुता.....
आता 'राणी हडळ' या आशयाची एक कविता लिही ना...
भीतीच्या
भीतीच्या भावांबरोबर विनोदाचेही भाव निर्माण झालेत आपोआप. सोपे नसते हे शृंगार, भय आणि हास्य तिन्ही रस एकत्र आणणे.
बाय द वे, ती ओळ सोडली तर बाकी कविता सुंदर आहे.
आणि शेवटी राजस भूताना असं केलं असतं तर यमक जुळलं असतंना
अहो अशी
अहो अशी मधे चित्रे टाकु नका हो..आम्हाला कन्फ्युझ व्हायला होते.
मला वाटले की सिंहीण तिच्या सिंहासाठी हे गाणे म्हणतेय. तो मारला गेल्यावर..
सगळ्या प्राणीमात्राना सुद्धा भूतच म्हणतात ना?
(पहा:भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे - संत ज्ञानेश्वर)