Submitted by Nikhil. on 8 February, 2018 - 05:40
ड्युआयडीज हल्ली
दिसतात येथे खुप
चेहरा तोच तरीही
असतो नवा हुरुप
वेमांनी केली जरी
सडकुन हकालपट्टी
परतुन लगेच येती
त्यांचेच ते रुप
एखाद्यास छळण्याची
हि भारीच कल्पना
भाषा इतकी मुलायम्
जसे पतंजलीचे तुप
प्रत्येक ड्युआयडीच्या
येथे दोन ड्यु आयडी
जसे भगवान श्रीकृष्ण
ह्यांचेच तीर्थस्वरुप
आयडी जरी बदलला
तरी विचार तोच अस्तो
पुन्हा उडुन जातील
जसा अगरबत्तीचा धुर
वावरतातही इतके सहज
खरा आयडीही घाबरावा
जणु खऱ्या आयडीने वावरुन
आम्हीच मारतो .....
तरीही माबोकरांनो
चिंतित नका होवु
संयोजकात आहे फक्त
खऱ्या आयडींना स्कोप
- निखिल - ०८/०२/२०१८
टिप- वरील कविता ड्युआयडिंना समर्पित
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला अगदि पटली कविता..
मला अगदि पटली कविता.. सुळसुळाट झालाय ड्यु आयडींचा..
ड्युआयडी-मामी
ड्युआयडी-मामी
>>ड्युआयडी-मामी<<
>>ड्युआयडी-मामी<<
अफलातुन धागा आहे तो. २०११ मध्ये मामींनी लिहिलेले ट्रेट्स, युक्त्या वापरुन, इंस्पायर होऊन संबंधितांनी डु आय्डी प्रोसेसचं इंडस्ट्रलायझेशन केलेलं आहे अशी केवळ शंका नाहि, तर खात्रीच आहे...
@राज, आपला प्रतिसाद मला
@राज, आपला प्रतिसाद मला उद्देशून असेल तर...
मी 'तितका' मुरलेला नाही हो ! उगाच चोर सोडून संन्याशाला शिक्षा देण्यात काय पॉईंटेय?.. असो.
तो धम्माल धागा असाच उड्या मारत मारत सापडलेला अन् मग जपून ठेवलेला. मामींच्या विनोदबुद्धीला शिरसाष्टांग दंडवत घालायला हवा..
@मधुसुदन, छान प्रयत्न करता आपण लिहीण्याचा.
अवांतराबद्दल माफी असावी.
मला ओळखून दाखवा.
मला ओळखून दाखवा.
>>@राज, आपला प्रतिसाद मला
>>@राज, आपला प्रतिसाद मला उद्देशून असेल तर...<<
नाहि हो, उलट तुमचे आणि मधुसुदनरावांचे आभार मानायल हवेत. या निमित्ताने तो धागा परत वाचायला मिळाला. तुमची कामेंट मी कोट केली म्हणुन गैरसमज झाला असावा. नो वरीज, वी आर गुड...
ड्युआयडीवरच्या कवितेवर
ड्युआयडीवरच्या कवितेवर सगळ्यात जास्त प्रतिसाद (संशयित) ड्यु आयडीचे असावेत, हे अगदी सयुक्तिक आहे.
ड्युआयडीवरच्या कवितेवर
ड्युआयडीवरच्या कवितेवर सगळ्यात जास्त प्रतिसाद (संशयित) ड्यु आयडीचे असावेत, हे अगदी सयुक्तिक आहे. >>> भरत जी +११११११
हल्ली लोकं काहीही खरडत असतात माबोवर
<<<<टिप- वरील कविता ड्युआयडिंना समर्पित>>>>> ह्यात थोडा बदल हवा करायला हवाय का असा
>>> टिप- वरील ड्यु आयडीने लिहिलेली कविता ड्युआयडिंना समर्पित <<<
धन्यवाद
धन्यवाद
आनंद वरची लिंक धमाल आहे
समाधी मी ड्यु नाही
त्यांचे नामांतर झालेय
त्यांचे नामांतर झालेय
त्यांचे नामांतर झालेय >> हो
त्यांचे नामांतर झालेय >> हो
समाधी मी ड्यु नाही >>> हो का,
समाधी मी ड्यु नाही >>> हो का, खरेच वाटले हो मला
काही अपवाद वगळता कोण मान्य करतो की आहे मी ड्यु आयडी
मग एक सांगा, मला कश्यावरून ड्यु आयडी बोललात, म्हणजे मला समर्पित केली होती ना हि तुमची काहींच्या काही कविता, तुमच्या त्या उडालेल्या कवितेच्या प्रतिसादमध्ये
मग
कसेय ना, एक मुलगी सरळ सरळ माझ्या कविता आवडल्या नाही बोलतेय हे मुळात सहनच झाले नाही तुम्हाला, म्हणून मग इतका उपद्व्याप
पण ह्यात तुमचाही दोष म्हणणार नाही मी कारण, बहुतांशी पुरुषांचा प्रॉब्लेम आहे हा, त्यांचा पुरुषी अहंकार लगेच दुखवतो
मग आरोप प्रत्यारोप चालू होतात
तुम्ही तर लगेच कविता केलीत
मस्तच
अहो समाधी ताई उगाच गैरसमज
अहो समाधी ताई उगाच गैरसमज करुन घेताय मी फक्त् तुम्हाला आवडते का पहा ? अश्या भावनेने विचारलेले तरीही सॊरी गैरसमज नसावा.
उगाच ड्यु असल्यासारखे रागावताय
अहो पंडित , गैरसमज माझा
अहो पंडित , गैरसमज माझा नाही तुमचा झालाय, मी कशाला तुमच्यावर रागावू, नका हो देऊ इतकी किम्मत स्वतःला माझ्यालेखी
अन जरी असेन मी ड्यु किंवा काहिही त्याने तुम्हाला का फरक पडावा, म्हणजे माझे असे काय घोडे मारलेत तुम्ही कि मी तुमच्यावर सूड घ्यायला ड्यु आयडी घ्यावा
मी फक्त् तुम्हाला आवडते का पहा ? अश्या भावनेने विचारलेले तरीही सॊरी गैरसमज नसावा. >>>> आता उडालाय तुमचा धागा अन सोबत प्रतिसाद नाहीतर म्हटले असते की परत एकदा वाचून बघा तुमची भाषा किती साळसूद होती
आता परत नाही लिहीणार इथे काही, कशाला उगाच TRP वाढवायचा तुमचा
माझे असे काय घोडे मारलेत
माझे असे काय घोडे मारलेत तुम्ही >>> एक्झॅक्टली मी ही हाच विचार करतोय तुमच्याबद्दल
अर्रे लोकहो, भांडू नका.
अर्रे लोकहो, भांडू नका.
@भरत,
'संशयित' ड्यू??? कुणाचा बरं? >>>
@सिम्बा,सॉरी. आपलं नाव चुकून घेतलं गेलतं.
धम्माल आहे कविता
धम्माल आहे कविता
असाच एक धम्माल लेखनाचासुद्धा एक सॉलिड धागा आहे https://www.maayboli.com/node/36820
कविता ठीक आहे.
कविता ठीक आहे.
पण ड्यु आयड्यांच्या कवितेवर आयड्यांमधे भांडणं
हे आपला कटाप्पा वाले आहेत ना सगळे
(No subject)
पंडित दादा भारीच की... मी
पंडित दादा भारीच की... मी शेवटच्या दोन ओळींवर भर देते. आपला संयोजक बनयला होप आहे.
पुढच्या गणपतीत मीही बनणार
पुढच्या गणपतीत मीही बनणार संयोजक संधी दिलीत तर !
(No subject)
समजा एक आय डी उडवल्यावर दुसर्
समजा जसे एका वेळी एकच नवरा/बायको, फक्त दहा बारा घटस्फोट घेऊन दहा बारा निरनिराळे नवरे/ बायका केल्या तसे एक आय डी उडवल्यावर दुसर्या आय डी ने येऊन लिहायला सुरुवात केली, तर ड्यू आय डी घेतल्याचा आरोप येईल का?
इथे काय लिहीले आहे, त्याचा अर्थ काय वगैरे चा विचार न करता केवळ आय डी बघूनच शिव्या घालणे/स्तुति करणे असे चालते. म्हणून मी माझा अनेक वर्षांचा आय डी उडवून नव्या आय डी ने लिहायला सुरुवात केली.
आता लोक शिव्या द्यायची पण तसदी घेत नाहीत. मी आपला हवे ते लिहितो.