Submitted by अजय चव्हाण on 3 February, 2018 - 21:18
रोज पडणारी स्वप्ने आता पडत नाही..
व्हायच्या आधी गाठी भेटी खुप..
हल्ली त्या घडत नाही..
कित्येक वचने आणि कित्येक तुझे बोलणे.
आता सहसा आठवत नाही..
यावसं वाटतं पुन्हा फिरून तुझ्यात..
पण मन माझं पाठवतं नाही..
मृगजळ का भास असावं तुझ प्रेम..
अजुनही मला माहीत नाही...
आधीही करत होतो प्रेम तुझ्यावर
हल्ली मात्र झेपत नाही..
भावना माझ्या रद्दीत जमा झाल्यात..
रद्दीला त्या किंमत नाही...
विकावीशी वाटते ती कधीतरी
पण माझ्यात तितकी हिंमत नाही..
गेलाबाजार प्रेम कवडीमोल झालंय..
हल्ली कुणी साठवत नाही..
असं वाटतं एकटाच मी असा आहे..
ज्याला ते सोडवत नाही..
हसूच्या आड लपवले मी अश्रू खुप. ..
सहसा मी दाखवत नाही..
सांगायंचं काय ते नेहमीचचं..
ज्याला ते समजत नाही..
पुढे मी आलोय खुप..
तिचे पाऊल पुढे पडत नाही..
अन् माझेच पाऊल खिळले असे की,
मागे ते फिरत नाही..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आवडली
मस्त आवडली
मस्त!
मस्त!
छान..
छान..
मस्त
मस्त
धन्यवाद मधुसुदन,अक्षय दुधाळ
धन्यवाद मधुसुदन,अक्षय दुधाळ,सायुरी,मीरा.
छान!
छान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मेघा.
धन्यवाद मेघा.
Great... Very beautiful
Great... Very beautiful