प्राणी नव्हे सदस्य

Submitted by pintee on 26 January, 2018 - 02:43

आपण काही वेळा उपयोगी पडतील म्हणून तर कधी लहानग्यांचा हट्ट म्हणून घरी एक नवा पाहुणा आणतो.अल्पावधीतच तो घरात इतका मिसळून जातो की घराचा अविभाज्य भाग बनतो.त्याच्या शिवाय घराची आपण कल्पनाच करू शकत नाही.
त्याचे लाड एका बाळा सारखेच करतो आपण. आणि त्याच्या जाण्याने सैरभैर होतो आपण.अशा काही आठवणी येथे share करूयात.
फोटो टाकलेत तर दुधात साखरच

Group content visibility: 
Use group defaults

आमचा टारझन....

20180114_182151.jpg

जेव्हा आमच्या बाजूला म्हाडाच्या बिल्डींगच काम चालू होतं.तेव्हा तिथे काही puppies होते.
त्यातले तीन आमच्या बिल्डिंगमधलेच झाले.
लहान पोरांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला त्यांचा लळा लागलेला.
शेवटी एकच कुत्री राहिली...
फटाके वाजले की ती घरात येऊन बसायची.
तेव्हा काढलेले pic आहेत.
२ महिन्याआधी ती गायब झाली...
कशी ते माहित नाही.
पण तिची आठवण मात्र फोटोस्वरुपात अजूनही आहे..