Submitted by संपदा on 15 November, 2017 - 03:02
कलर्स मराठी वर १३ नोव्हेंबरपासून "सूर नवा ध्यास नवा" हा कार्यक्रम सुरू झाला आहे. शाल्मली खोलगडे, महेश काळे आणि अवधूत गुप्ते परीक्षक आहेत तर तेजश्री प्रधान आणि पुष्कराज चिरपुटकर सूत्र संचालन करत आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाचे लेखन मायबोलीकर वैभव जोशींसह पूनम छत्रे करते आहे.
चला तर चर्चा सुरू करूया.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मला प्रसनजीत समहाऊ नाराजच
मला प्रसनजीत समहाऊ नाराजच वाटतो, बळंबळं हसतो, काहीवेळा केविलवाणं. काय प्रॉब्लेम आहे काय माहीत.
<,
एकदम अचूक निरिक्षण संपदा.
Btw , त्या मधुरा कुंभारला पाहून नेहमी सैराटच्या आर्ची ची आठवण येते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संपदा, डीजे दोघींनाही मोदक!!
संपदा, डीजे दोघींनाही मोदक!! सेम माझ्याच मनातले.
मधुरा, जुइ आणी शरयुचे ड्युएट
मधुरा, जुइ आणी शरयुचे ड्युएट गाणे म्हणतानाचे हावभाव फार छान लोभस होते. महेश काळे म्हणाला तसे स्पर्धा न वाटता कार्यक्रम वाटला.
मला शरयू प्रसनजीत आणि मधुरा
मला शरयू प्रसनजीत आणि मधुरा जुईलीची ड्युएट्स आवडली. विश्वजीतची एंट्री दणदणीत. जरा मजा येईल आता, होपफुली.
मला ड्युएट्स मधे जयदीपचं पण
मला ड्युएट्स मधे जयदीपचं पण आवडलं हयावेळी.
बाकी सर्वांची ड्युएट्स पण छान झाली. शमिकाचं फक्त जरा दमदार नाही वाटलं.
लोकसंगीत गायचं म्हणजे इला
लोकसंगीत गायचं म्हणजे इला अरुण चावल्यासारखे आवाज का काढले बहुतेक मुलींनी? या रावजी मध्ये उगाच लाडीगोडी घुसवली होती.
काल जांणवलं की यातले गायक थोडेफार नाव मिळालेले आहेत. ही स्पर्धा जिंकल्याने त्यांच्या आयुष्यात आणि गानकरियरमध्ये फार फरक पडणार नाही. त्यामुळे पूर्णतः नवे गायक जितकं जीव तोडून गातील तितके हे गात नाहीत. शिवाय यातले बहुतेक स्टेज पर्फॉर्मर असल्यामुळे थोडी मॅचयुरिटीही आली आहे.
पण रियलिटी शोजचे बहुतेक विनर्स प्लेबॅक सिंगर किंवा अल्बम काढणारे सिंगर्स होत नाहीत असं वाटतं. सुनीधी, श्रेया अपवाद. वैशालीला काही गाणी मिळालीत (होणार सून, पिंगा, येणारा दिवस....). शिवाय आजकाल गायक , संगीतकारांचं अमाप पीक आलंय. गायकाचा गळा हे वाद्यवृंदातलं एक वाद्य होऊन राहतंय. अलीकडच्या गाजलेल्या गाण्यांत गायकापेक्षा संगीतकाराच्याच कलाकारीचा बोलबाला असतो. गायक इम्मटेरियल होत चाललाय. नगाला नग चालेल असा. (हे माझं मत झालं. वेगळं मत असेल, तर ऐकायला आवडेलच).
यानिमित्ताने लिहितो, सुरेश भटांची एक गझल श्रीधर फडकेंनी वैशालीकडून गाऊन घेतलीय.
येणारा दिवस मला येताना हसणारच
ती फक्त रेडियोवरच ऐकलीय. नेटवर शोधूनही मिळाली नाही. सुरेश भटांच्या आवाजात मिळाली.
पण शब्द, संगीत आणि गायकी यांचा समसमा संयोग म्हणावा अशी ही गझल आहे.
आज एल्पी स्पेशल मधे वादक
आज एल्पी स्पेशल मधे वादक जास्तं भाव खाऊन गेले.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
जुइली सोडून बाकी सगळे ओके गायले.
निहिराचं भोर भए पनघटपे आवडलं, जजेसनी फार कौतुक नाही केलं.
विश्वजीत चांगलाच गायला पण खूप जास्तं स्तुति झाली त्याची, त्यानी गाण्याचा चॉइस छान केला पण !
वैशाली असा का चॉइस करतेय गाण्यांचा
एल्पी स्पेशल मधे तिनी किंवा निहिरानी ‘सोला बरसकी बाली उमर को सलाम ‘ गावं असं वाटत होतं, हे गाणं रिअॅलिटी शोज मधे फार गात नाहीत स्पर्धक, कदाचित झेपत नसावं ?
आज एल्पी स्पेशल मधे वादक
आज एल्पी स्पेशल मधे वादक जास्तं भाव खाऊन गेले. >>>> +१ वादक खरच चांगले आहेत
अनिरुद्धचं बेइमान मला
अनिरुद्धचं बेइमान मला प्रत्येक वेळी.बेमान ऐकू आलं.
त्याचं आणि विश्वजीतचं गाणं ऐकून रफी किशोरच्या आवाजाची किंमत परत कळली.
त्याचं आणि विश्वजीतचं गाणं
त्याचं आणि विश्वजीतचं गाणं ऐकून रफी किशोरच्या आवाजाची किंमत परत कळली.
<,
+१
ओरिजनल गाणी आठवली !
बेइमान उच्चार अगदीच विचित्रं होता अनिरुद्धचा.
विश्वजीतने प्रयत्न केला पण ओरिजनल गाण्यात किशोर कुमारच्या आवाजाची डेप्थ , स्टोरी टेलिंग अफलातून आहे.
बेइमान उच्चार अगदीच विचित्रं
बेइमान उच्चार अगदीच विचित्रं होता अनिरुद्धचा. >>>> हो. बेइमान मधील इ थोडा स्ट्रेच केला आहे ओरिजिनल गाण्यात. इथे तो खाल्ला होता.
या धाग्यावर अवांतर आहे, पण
या धाग्यावर अवांतर आहे, पण राहवले नाहे म्हणून :
कुणीतरी कलर्सच्या इतर मालिकांवरही धागा काढा . निदान पिसे काढण्यासाठीतरी काढाच. संक्रांतीच्या मागेपुढे जवळजवळ दोन तीन आठवडे कलर्स आणि झी/युवा दोन्हीकडे नुसते मंगळसूत्र, खरा दागिना, वाढवणे, नवीन करून पुन्हा समारंभाने गळ्यात घालणे, नवरा, सौभाग्य नुसते दळण चालले होते. अहेवपणाचे, सौभाग्याचे इतके कौतुक बघून विषण्ण वाटले. बायकांना हे समारंभ आणि रीतिरिवाज खरोखरच आवडत आहेत का? पण बाहेरही सर्वत्र गेले आठदहा दिवस बायका (सरकारी बँका, पोस्ट ऑफिसे वगैरे ठिकाणी) अगदी नटून थटून वावरत आहेत. आमच्याइथे तर काही स्थानिक महिलागटांना 'जाओ ऐश करो' म्हणून पाच पाच हजार रुपये वाटले गेले.
ही कुठली संस्कृती रुजतेय?
अगदी अगदी. कलर्स च्या मालिका
अगदी अगदी. कलर्स च्या मालिका बर्याच बर्या आहेत झी पेक्षा सध्या. वासरात लंगडी गाय शहाणी. हीरा काढून टाक धागा कलर्स चा.
एल.पी. स्पेशल एपिसोडमध्ये
एल.पी. स्पेशल एपिसोडमध्ये निहीराचं गाणं छान वाटलं. अनिरुद्धचा वर कोणीतरी म्हणालं तसं ‘बेईमान’ चा उच्चार अगदीच खटकत होता. प्रसेनजीतचं गाणं (कधी नव्हे ते) आवडलं. पण बाकीच्यांची गाणी मला तरी सो सो च वाटली. शरयूने म्हटलं चांगलं पण मला का कोण जाणे त्या गाण्यासाठी तिचा आवाज कोवळा वाटत होता.
विश्वजीत स्टाईलभाईच वाटतोय मला.
शमिकाच्या गाण्याला पासच. जयदीपच्या गाण्याची जितकी स्तुती झाली तितका खरंच तो छान गायला कां??? ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
ड्युएटमधलं पहिलंच गाणंसुद्धा नाही आवड्लं.
आडो+१
आडो+१![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
जयदीप का सारखी किशोर कुमारची गाणी गातो, नाही जमत त्याला , अज्जिबात नाही आवडलं त्याचं गाणं , उच्चार काहीच ! त्याच्यापेक्षा तुपे खूप चांगला गायचा.
कालच सोलाह बरसकी ची आठवण काढली, आज शरयुने गायलं, वैशालीने घ्यायला हवं होतं ते गाण.
मधुरा विश्वजीत डुएट अगदीच अॅव्हरेज झालं, मधुराचा आवाज चिरकत होता आणि विश्वजीत ऑर्केष्ट्रॉ छाप गात होता, त्याला सगळे भारी परफॉर्मर आहे वगैरे म्हणतात पण काहीतरी विचित्रं गुडघ्यात वाकत पाय मारतो परफॉरमन्सच्या नावाखाली.
प्रसेनजीत ठिक गायला पण ‘शिर्डीवाले साईबाबा’ हा काय गाण्याचा चॉइस
सोलो गाण्यात मला तरी निहिराच आवडली.
पण काहीतरी विचित्रं गुडघ्यात
पण काहीतरी विचित्रं गुडघ्यात वाकत पाय मारतो परफॉरमन्सच्या नावाखाली. >>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
प्रसेनजीत ठिक गायला पण
प्रसेनजीत ठिक गायला पण ‘शिर्डीवाले साईबाबा’ हा काय गाण्याचा चॉइस >> अगदी अगदी....गेलाबाजार परदा है परदा तरी म्हणायचं असं काल आम्ही बोलत होतो पण मग नंतर लक्षात आलं की ते आधी एकदा झालय![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
वर आणि २ जिनिअस...यावेळी कटार प्रसेन ला द्यायची असावी.
शरयु ने नक्कीच जयदीप पेक्षा चांगलं गायलं पण तरी तिला कमी मार्क्स का...मला वाटतय की तिला बारावी परीक्षा म्हणुन लवकर बाय बाय करायचा प्लॅन दिसतोय..
जुईली चं गाणं नाही ऐकलं काय गायली ?
विश्वजीत ऑर्केष्ट्रॉ छाप गात होता > +१११११११११११११
जयदीपच गाणं सुरू झाल्या क्षणी
जयदीपच गाणं सुरू झाल्या क्षणी मी टीव्ही म्यूट केला.
प्रसेनजीतचं छान झालं. शिर्डीवालेत शेवटच्या दोन बॉलवर सिक्सर्स मारायला स्कोप होता,त्या मारल्या त्याने.
जुईली चं गाणं नाही ऐकलं काय
जुईली चं गाणं नाही ऐकलं काय गायली ?
<<
आ जानेजा, फसलं एकदम ! जजेसचे स्कोअर्स आणि कॉमेंट्स चांगल्या नाही मिळाल्या.
बॉटम मधे असणार आहे ती नक्की.
वरच्या कमेंट वाचून अस वाटतय
वरच्या कमेंट वाचून अस वाटतय की गुलमोहर मुळे २ दिवस नाही बघितल तरी काही बिघडल नाही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तो बोरगावकर नावचा कुणी नवा अ
तो बोरगावकर नावचा कुणी नवा अॅड झालाय तो भाग बघितला.
अरे, किती ते शायनिंग, किती तो इंग्रजी बोलायचा सोस, किती ते रॉकस्टार असल्यासारखे हावभाव. उगाचच वाटलं सगळं. बाकीचे चांगले गातात. खरं सांगायचं तर, शाल्मली खोलगाडे जज म्हणुन आजिबात पटली नाही.
प्यारेलालजी थोडे तापट
प्यारेलालजी थोडे तापट स्वभावाचे होते असे ऐकले होते. गेले २ एपिसोड त्यांच्या संयमाची परिक्षाच बघत आहेत! एक दोनदा त्यांनी सांगायचा प्रयत्न केला, पण शेवटी शेवटी नाद सोडून दिला असे वाटले..
झी सा रे ग म प मध्ये गाण्यांचे सिलेक्षन जास्ती चांगले होते आणि व्हरायटी सुध्धा. सुनध्यान ची गाणी जजेस निवडतात की काय? ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण काहीतरी विचित्रं गुडघ्यात
पण काहीतरी विचित्रं गुडघ्यात वाकत पाय मारतो परफॉरमन्सच्या नावाखाली. >>>
असंच करतो का अजून, कित्ती वर्षापूर्वी हीच स्टाईल मारायचा, तेव्हाही कंटाळा आला होता बघायला.
शल्मली खोलगडे तर खूपच इंग्लीश
शल्मली खोलगडे तर खूपच इंग्लीश झाडते. जज म्हणून नाहीच पटत. आणि जान्हवी च्या लाडीक, नाटकी बोलण्याचा तर फारच वैताग आलाय.
आत्त्ताच निहिरा आणि
निहिरा आणि प्रसेनजीतच "मेघा रे मेघा" ड्युएट आवडल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथले वाचून काल परवाचे भाग
इथले वाचून काल परवाचे भाग पाहिले. विश्वजीत हिंदी सारगामा मधे असला येडपट नव्हता वाटत. तिथे खूप चांगले परफॉर्मन्सेस दिलेत त्याने. इथे मात्र अगदी ऑर्केस्ट्रा छाप अतिसामान्य गात आहे
एक हसीना थी - ऑल टाइम सुपरहिट साँग कसले सुमार गायले त्याने!! काय उगीच अवधूत डोक्यावर चढवत होता त्याला?!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
गाण्याचे टुकार चॉइसेस याला +१११
‘शिर्डीवाले साईबाबा’
एल्पीं च्या इतक्या शेकडो सुपरहिट गाण्यांमधून या लोकांना हीच गाणी आठवावी याचे नवल वाटले!!
निहिरा आणि प्रसेनजीतच "मेघा
निहिरा आणि प्रसेनजीतच "मेघा रे मेघा" ड्युएट आवडल. +१
आणि
एल्पी स्पेशल ३ एपिसोडस मधे हे एकच गाणं आवडलं खरं तर !
या तीन एपिसोड्स मधे अजून दोन गोष्टी आवडल्या..
एक म्हणजे कालचं शमिकाचं एलिमिनेशन
दुसरं म्हणजे परवा अवधूतने महेशच्या अलंकारिक भाषे वरुन मारलेला टॉन्ट.. "तुमचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेचा, तर आमचा शिमग्याचा"
शीशा हो या दिल मध्ये खरंच
शीशा हो या दिल मध्ये खरंच जादू झाली, प्यारेलालजींच्या कानगोष्टींनंतर. पण पुन्हा ते सस्पेन्स ड्रामावालं पार्श्वसंगीत.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
हो कालच्या ड्युएट्मधलं मेघा
हो कालच्या ड्युएट्मधलं मेघा रे मेघा रे च आवडलं फक्त. प्रसेनजीतचा आवाज त्या गाण्यासाठी चपखल वाटला.
शमिकाला जायचंच होतं तसंही. अब जयदीप की बारी
मधुरा कुंभार राजगायिका होती म्हणून वाचलीये कालच्या भागात.
शीशा हो या दिल मध्ये खरंच
शीशा हो या दिल मध्ये खरंच जादू झाली, प्यारेलालजींच्या कानगोष्टींनंतर >>>>> खरच. किती वेगळं गायली ती.
Pages