Submitted by शिवकन्या शशी on 6 January, 2018 - 03:56
तू फूल कुणाचे देखणे
नको उन्हात हासत थांबू ...
तू श्वास फुलांचा हलका
जा निघून तुझिया देशा!
रुजताना होईल अंत
नसेल कोणास खंत
तू जीव कुणा मायेचा
जा निघून हलक्या पायी ....
तू फूल कुणाचे देखणे
नको उन्हात हासत थांबू .....
-शिवकन्या
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे कविता ......... मंगेश
छान आहे कविता ......... मंगेश पाडगावकर आठवले वाचून...............पुलेशु
जा निघुन हलक्या पायी... <<
जा निघुन हलक्या पायी... <<<अहाहा! अगदी तरल!