भाग 1 - https://www.maayboli.com/node/64901
12 जानेवारी 2010.
सचिन आपल्या सायबर कॅफेत त्याच्या एका कस्टमरला पीडीएफ बनवण्यासाठी हेल्प करत होता.इतक्यातच एक व्हाईट टी शर्ट, ब्लू हाफ पँट, एका हातात लेदर बॅग व दुसर्या हातात महागडा मोबाईल असलेली मुलगी आत आली.
"एक्सुमी मी??? व्हू ईज द इंचार्ज हिअर?? - ती.
" येस?" सचिनने अपेक्षापेक्षा जरा जास्तच उशिराने रिप्लाय दिला.
"ओह... आय नीड पीसी फाॅर अन हाअर...कॅन पाॅसिबल धिस टाईम..ईटस सो अर्जंट. " हातातली बॅग समोरच्या टेबलावर ठेवत ती म्हणाली.
" वेल...यु कॅन सी ऑल आर फुल्ली ऑक्वीफाईड..कॅन बी अवालबेल विथिन 10 मिनटस...यु हॅव टु वेट.."
सचिनने नेहमीच्याच सूरात तिला सांगितलं.
"ओके..नो प्राॅब्लेम..कॅन आय सिट हिअर.." समोरच असलेली खुर्ची ओढत तिने विचारलं.
"ओफकोर्स..यु कॅन..बाय द टाईम..प्लीज फिल युअर डिटेल्स इन धिस रजिस्टर अन्ड आय नीड आयडेंटेटी प्रुफ."
जवळच असलेलं रजिस्टर पुढे करत सचिन बोलला.
वहीत असलेला पेन घेत ती भराभर डिटेल्स लिहू लागली.
इकडे सचिन तिचा चेहरा पाहण्यात गुंग झाला.
चाॅकलेटी मोठे डोळे.. गोरा रंग..भध्यम बांधा.. हलकासा डोळ्याच्या पापणीवर असलेला छोटासा तीळ, मऊ रेशमी कमरेपर्यत असलेला केससांभार आणि त्यातल्या त्यात एकदम स्टाईलीश अॅन्ड रिच.
सचिनने मनातल्या मनात ठरवूनच टाकलं.हिलाच पटवायचं.
यथावकाश तिला एकदाचा पीसी मिळाला...ती तिकडे काम करण्यात बिझी असताना सचिन वहीत तिचे डिटेल्स चोरून चोरून पाहू लागला.
नाव : डाॅली देसाई.
पत्ता : हिरानंदानी मिडोज्स, पवारनगर ठाणे (प)
पत्ता वाचताच सचिन आवासून बघतच राहीला.
"हिरानंदानी...बापरे...करोडपती तर नक्कीच असणार ...
ही काय आपल्याला पटणार नाय आणि पटली तरी हिचा खर्च काय मला झेपणार नाय...नकोच... त्यापेक्षा दुसरी बघू"
मनातल्या मनात सचिनने निर्णय घेऊन टाकला.
सचिनने त्याच मन तात्पुरत वळवून कामात गुंतवून घेतलं.
मध्ये बराच वेळ गेल्यानंतर " एक्सुज मीऽऽ" पुन्हा एकदा तिने आवाज दिला.
सचिनही सावकाश जसा इतर कस्टमरकडे जायचा तसाच गेला.हिरानंदानी आड नसत आलं तर कदाचित तो धावतच गेला असता.
"येस मिस ..अॅनी प्रोब्लेम?" सचिनने परत नेहमीच्या सुरात विचारलं.
"याह..अॅक्चुली आय डोन्ट नो हाऊ टू युझ वीलुकअप, एचलुकअप..एक्सेल फाॅर्मुलास..कॅन यु जस्ट हेल्प मी इन दॅट..."
पंखाच्या वार्याने गालावर आलेले केस एका हाताने हळूच मागे सारत ती म्हणाली.
एक्सेल फाॅर्मुला म्हटल्यानंतर सचिनच्या चेहर्यावर तेज आलं.
कारण एक्सेलच्याबाबतीत ज्याने एक्सेल बनवलंय त्याच्यानंतर सचिनचाच नंबर होता..त्याला ए टु झेड त्यातलं नाॅलेज होतं.
जस कामावाल्याबाईचं पहिल प्रेम सर्फ एक्सेल असतं तसं सचिनच पहिल प्रेम एम.एस एक्सेल होतं.
सचिनला त्याचमुळे गरीबांचा चार्लस सिमोन्यी ह्या टोपणनावाने ओळखलं जायचं असो सचिनने नेमकं काय हवय नि कसं हवयं हे विचारलं आणि भराभर किबोर्डवर टाकटाक करून दहा - वीस सेकंदात फाईल करून दिली.
सचिनच्या ह्या सुपर डुप्पर स्पीडला पाहून ती अवाकच झाली.
थॅन्क यु मि.ऽऽऽऽऽ
"सच ईन...."
सचिनने तिच्यात काडीचाही रस नसलेल्या अर्विभावात तिला आपलं नावं सांगितलं.
त्यादिवसानंतर ती रंडोमली येत राहीली ईनफॅक्ट तिच्याकडे लॅपटाॅप होता.तिला सायबरमध्ये यायची काहीच गरज नव्हती.
त्यादिवशी ऐनवेळी लॅपटाॅप बंद पडला म्हणून ती आली होती.
तरीही ती यायची कारण सचिनच्या त्या फाॅर्मुलाने वीलुकअपबरोबर तिच मनही लाॅक केल होतं.
ती यायची.नुसतीच बसायची.सचिनच बारीक निरीक्षण करायची.सचिन हॅन्डसम होता त्यात नो डाऊट पण त्याच्यात अजुन काहीतरी ती शोधत होती.
ती सचिनकडे बघत असायची आणि तिच्या बाजुला बसलेली पोरं तिला बघायची.
दिवस सरत राहीले.सचिनने तिचा नाद कधीच सोडला होता.
शक्यतो तो तिच्यापासून लांबच राहायचा कारण त्याला वाटायचं त्याची लायकी नव्हती तिच्यासमोर.
कित्येक महिने कित्येक दिवस ती येत राहीली आता तर सचिन तिला मनापासून आवडायला लागला होता.
त्याला कारणही तसंच होतं.
तो इतर मुलांसारखा तिच्याकडे कधीच बघत नव्हता की, पुढे पाठीमागे लाळ गाळत नव्हता.त्याच्या रजिस्टरमध्ये तिचा नंबर, नाव होतं.कधी मॅसेज, फोन केला नाही की, कधी फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली नाही की, इतर मुले करतात तशी लगट करण्याचा प्रयत्नही केला नाही.त्यामुळेच तिला खुप आवडत होता तो पण त्याला कसं कळणार??
ती जाणुनबुजुण येत राहीली.त्याच्याशी बोलू लागली.हसु लागली
पण दुनिया चंद्रावर पोहचली तरी हा आपला हिरानंदनीवरच.
कदाचित त्याने अगोदर डिटेल्स बघितले नसते तर आज सिच्युएशन खुप वेगळी असती.
सचिनला तर ती दिसताच क्षणी आवडली होती.
त्यानंतर तिचं डाऊन टु अर्थ असणं,बोलण्यातून वागण्यातुन कधीच तिने तिचा मोठेपणा,अॅटिट्युड दाखवला नव्हता.
स्वतःहून बोलायला लागली त्यामुळे सचिनला ती आणखीनच आवडू लागली होती पण ह्याचबरोबर त्याला वास्तवाच भान होतं.
हिंदी चित्रपटात दाखवतात तसं..."खानदानकी इज्जत, शोहरत, तुम्हारी हिम्मत कैसी हुई मेरी बेटी का हाथ मागनेकी,
आपने आप को देखा है कभी...यु बास्टर्ड ....गंधी नाली के
किडे ....
असले बरेच डायलाॅग व अनेक प्रश्न त्याच्या मनात फिरत असतं.
कधी कधी तिचा न बघितलेला बाप प्रेम चोप्राच्या गेटअपमध्ये त्याच्या स्वप्नात येऊन..
" लो ये पैसा पुरे एक करोड है...
( त्याचवेळी एक काळी बॅग त्याच्याजवळ येऊन पडते)
और दफा हो जाओ मेरी बेटी की जिंदगीसे हमेशा हमेशा के लिए.." असे डायलाॅग मारून धमकावयचा.
दोघांच्याही मनात प्रेम होतं पण पुढाकार घ्यायला कुणीच तयार नव्हतं.सचिनचा तर प्रश्नच नव्हता.त्याने खिंड न लढवताच सपशेल माघार घेतली होती आणि डाॅलिनेही गनिमी काव्याद्वारे सचिनला बरेच हिंट दिले होते पण सचिन तर सचिनच होता.त्याला कसलं कळतय??
एव्हाना वेळ निघून गेली होती.तिच तिथे येण आता थांबलं होतं.तब्बल तीन महिन्यानंतर ती पुन्हा आली पण आता ती डाॅली देसाई नव्हती.तिच्या नावापुढे सौ.लागलं होतं.
तिच्या गळ्यातल मंगळसूत्र पाहील्यानंतर सचिनला मेल्याहून मेल्यासारखे झाले.आयुष्यातली कुठलीतरी अमूल्य वस्तू हरवल्यानंतर जीव कसा कासावीस होतो तसा त्याचा जीव कासावीस होत होता.दुर कुठेतरी स्वच्छ सुर्यप्रकाश असताना अचानक काळे ढग जमा व्हावेत आणि क्षणात प्रसन्न असणारं वातावरण अचानक उदासिन व्हावं अशीच काहीशी त्याच्या मनाची अवस्था झाली होती.
तिला पाहील्यानंतर मनातल्या भावना दडपून सचिनने गोड स्माईल दिलं.तिनेही त्याला तसंच एक स्माईल दिलं..
थोडीशी विचारपुस झाल्यानंतर धडधडत्या,घाबर्या छातीने सचिनने पहिल्यांदाच आयुष्यात कुठल्यातरी मुलीला काॅफीसाठी विचारलं.तिनेही मुक होकार दर्शवला.
दोघेही सीसीडीत अगदी उदास भावनेने बसले होते. सीसीडीतला तो मोहक काॅफीचा वास आजुबाजुचं वातावरण तजेलदार जरी करत असला तरी सचिनचं ह्रदय कॅफीच्या उकाळत्या पाण्यासारखं विरहाच्या आचेने उकळत होतं.
बर्याच वेळतली शांतता भंग करत सचिनने जरास मोकळं व्हायच्या प्रयत्नात तिला विचारलचं.
"लग्नाला का नाही बोलवलसं??"
भावनेला आवर घालण्याची चांगलीच सवय तिला झाली होती.तीही खोटच हसत बोलली.
"अरे हे सगळं इतकं गडबडीत झालं की, बर्याच जणाना बोलवायच राहूनच गेलं बघ.."
हे सांगताना तिला आलेला अदृश्य हुंदका सचिनच्या नजरेतून सुटला नाही.सचिनने तिच्या डोळ्यात खोलवर पाहीलं.
तिच्या चाॅकलेटी मोठे डोळ्यांत एक दुखरी छटा दिसली.त्या छटेत प्रेमाचे, प्रेमाला गमावल्याचे कित्येक रंग ठसठसून भरले होते.
सचिनला आता तिच्या डोळ्यातील भाव कळत होते.
तिच मन कळालं होतं.उशिरा का होईना तिच प्रेम आता त्याला दिसलं होतं.
तिलाही सचिनच मन कळतं होतं.मंगळसूत्र पाहून त्याचा उडालेला रंग, डोळ्याच्या कडेला लोटलेले अश्रू मोठ्या कष्टाने लपवणं,काॅफीला नेणं,डायरेक्ट विचारणं हे सगळं तिच्याही नजरेतून सुटलं नव्हतं...
शेवटी एक दिर्घ उसासा टाकून ती म्हणाली.
"हीच तुझ्या मनात तु लपवलेली ओढ हीच प्रीत अगोदर थोडीशी हिंमत करून एकदा फक्त व्यक्त केली असतीस तर तुला मी लग्नाला बोलवलं असतं आणि..."
इतकचं बोलून काॅफीचा सिप घेण्याच्या बहाण्याने थांबली.
सचिनला तिच्या बोलण्याचा रोख कळला होता.त्याला पुढे अजून ऐकायचं होतं म्हणूनच अत्यंत तीव्र ओढीने त्याने विचारलं.
"आणि काय हं ???"
काॅफीचा मग खाली ठेवत थंड सुरात ती उतरली.
"तुझ्याशी लग्न केलं असतं."
सचिनला आता स्वतःचाच राग आला होता.पश्चाताप करायलाही तिने त्याला वेळ दिला नव्हता.
कधीपासून रोखलेले अश्रू त्याच्या डोळ्यावाटे बाहेर पडले.
" आय अॅम साॅरी... " इतकचं कसाबसा तो पुढे म्हणू शकला.
दोघंच्याही डोळ्यात अश्रू जमा झाले होते जणू काही अश्रूवाटे दोघंही एकमेकांना प्रेम वाटत होते.
गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही आणि आजची वेळही कधीच येणार नाही हे एव्हाना सचिनला उशिराने का होईना कळलं होतं.
त्यादिवशी तिनेही फक्त त्याच्यावरचं मनमुराद प्रेम केलं त्यानेही तिच्यावर तितकचं प्रेम केलं.
दिवस सरला तशी ती जायला निघाली.परत ती कधीच येणार नव्हती.
तिचा नवरा लगेचच लग्नानंतर अमेरिकेला गेला होता.
एका बड्या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर होता तो.
कामच्या धबगड्यात हनीमूनही झाला नव्हता.
उद्या तो तिला घ्यायला येणार होता अगोदर हनीमून स्विर्झलॅन्डला मग अमेरिका असा एकंदरीत बेत होता पण त्या अगोदर ज्यावर फक्त त्याचाच अधिकार होता तो अधिकार त्याला ती द्यायला आली होती. तिच अधुर राहीलेलं प्रेम पुर्ण करायला आली होती.
त्यानंतर...
ती गेली कायमचीच...
............................................................................
सचिन अर्ध्या झालेल्या बाॅटलकडे पाहून यू..बास्टर्ड ...गंधी नाली का किडा...असं काहीतरी आवेगात बडबडत होता....
थोडी जरी प्यायली तरी सचिनला लगेच चढली होती...
तो स्वतःलाच कोसत होता...वेड्यासारखा...स्वतःला आय अॅम लुझर...अ बिग लुझर...असं काहीतरी बोलत..स्वतःचा तोल जाऊ देत होता...
विश्वासने त्याला वेळीच सावरलं म्हणून नशीब..नाहीतर तो आता त्या तलावातच कोसळला होता...
जयेशभोवती इतकं सगळं घडत असताना...
त्याच्या लक्षात काही येत नव्हतं.तो एकटाच आपल्या लुकलुकणार्या तार्यांकडे बघत कुठेतरी हरवला होता...
.........................................................................................................................................................
क्रमशः
अजय छान!
अजय छान!
दोनतीन वर्षांपूर्वीच वाचलेली आठवतेय...
धन्यवाद आनंद.
धन्यवाद आनंद.
हो माझ्या फेसबुक पेजवर प्रकाशित केली होती..
हा ही भाग छान जमलाय पुलेशु
हा ही भाग छान जमलाय
पुलेशु
हा ही भाग छान जमलाय पुलेशु
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
छान! पुढील भागाच्या
छान! पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
धन्यवाद nik pawar
धन्यवाद nik pawar
धन्यवाद अक्षय दुधाळ
धन्यवाद अक्षय दुधाळ
छान
छान
धन्यवाद मीरा बावनकर
धन्यवाद मीरा बावनकर
वा!! सुंदर जमलाय हा भागदेखील.
वा!! सुंदर जमलाय हा भागदेखील.
>>>> हलकासा डोळ्याच्या पापणीवर असलेला छोटासा तीळ>>> सुंदरच असणार मग!! पापणी वरच्या तीळाच्या उदाहरणामुळे 'साउंड ऑफ म्युझिक' मधील पुढील गाण्याच्या ओळी आठवल्या.
.........Girls in white dresses with blue satin sashes
Snowflakes that stay on my nose and eyelashes
Silver white winters that melt into springs
These are a few of my favorite things .............