अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. वास्तविक, शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अस्मितेच्या मुद्द्यवरून सामाजिक तेढ निर्माण करत आपला हेतू साध्य करण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. भीमा कोरेगावच्या निमित्तानेही असाच एकादा डाव मांडल्या जात नाही ना ? याचा शोध घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. शौर्यदिनाला पार्श्वभूमीवर जातीय विद्वेष निर्माण करण्याची सुरवात अगोदरच झाली होती. त्यातच दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन नंतर हिंसाचारात झाले. भीमा-कोरेगाव येथे हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. मात्र दोन गटातील वादाचे पर्यवसान भीमा-कोरेगाव येथे मानवंदना देऊन परतीच्या मार्गावर असलेल्यांना मारहाण करण्यात झाले. असेही आता सांगण्यात येत आहे. अर्थात, प्रकरण काहीही असले तरी हिंसाचाराचे समर्थन करताच येणार नाही. सोबतच या हिंसाचारामागे जातीय द्वेष वाढविण्याचा हेतू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.
भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर क्रियेची प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटली. गेले दोन दिवस महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहे. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत.
मी आधी म्हणल्याप्रमाणे, -
मी आधी म्हणल्याप्रमाणे, - व्यवस्थित पद्धतीने वीष पसरवले जात आहे समाजात. लोकांनी डोळे उघडावे आणी पक्ष आणी व्यक्ती पुजा करण्यापेक्षा लोकशाहि कशी टिकेल याची काळजी घ्यावी
>>व्यवस्थित पद्धतीने वीष
>>व्यवस्थित पद्धतीने वीष पसरवले जात आहे समाजात.
अगदी अगदी, पण कोण करत असेल हो हे असले ?
अगदी अगदी, पण कोण करत असेल हो
अगदी अगदी, पण कोण करत असेल हो हे असले ?
नवीन Submitted by महेश on 4 January, 2018 - 15:18
<<
नेहमी सत्तेत राहण्याची सवय असणारे व आता सत्ता हातातून निघून गेल्याने राजकीय बेरोजगार बनून महाराष्ट्रभर रिकामटेकड्याप्रमाणे हिंडणारे, यासर्व घडामोडी पाठी असावेत असा एक अंदाज आहे.
आता गेल्या चार दिवसाच्या
आता गेल्या चार दिवसाच्या धुमाकूळातून
कोणाला नक्की काय फायदा होतोय ते बघा.
ज्याला फायदा होईल तोच सूत्रधार.
बाकी ग्लासाला ग्लास भिडत असतील आता...
तुम्ही-आम्ही बसतोय किबोर्डी-हाणामार्या करत....
काहि लोक असे प्रश्न विचारतात
काहि लोक असे प्रश्न विचारतात कि काहि राजकारणी नेते देवमाणसेच आहेत ( तसेहि मंदिर उभारली गेलीच आहेत त्यांची .. आणी भक्त हि म्हणतातच त्यांच्या शिष्यांना ). त्यांच्या प्रश्नावरुनच लक्षात येते कि वीष कसे पसरवले गेले आहे.
नेहमी सत्तेत राहण्याची सवय
नेहमी सत्तेत राहण्याची सवय असणारे व आता सत्ता हातातून निघून गेल्याने राजकीय बेरोजगार बनून महाराष्ट्रभर रिकामटेकड्याप्रमाणे हिंडणारे, यासर्व घडामोडी पाठी असावेत असा एक अंदाज आहे.<<
>> यांच्या मागे डोकं सत्तेत असणाऱयांच आहे की सत्तेत नासणाऱयांच, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. पण इतिहास बघितला तर दोन समाजात भांडण लावून कुणाला फायदा झालाय हे लक्षात येऊ शकेलं!
"...ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या
"...ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले..."
"...२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी.."
"...आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील.."
"...इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो..."
"...फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही...."
हे आणी असे सर्व विसरून आपल्या सर्वजण 'भारतीय' म्हणून नव्याने सुरुवात करू यात..!!
, पण कोण करत असेल हो हे असले
, पण कोण करत असेल हो हे असले ?<<
>>असलं करून राजकारणात आपली पोळी भाजणाऱयांची संख्या कमी नाही.. दोघांचे भांडण लावून आपले अस्तित्व टिकवण्याचा माईंड गेम याआधीही खेळला गेला आहे.
हे आणी असे सर्व विसरून आपल्या
हे आणी असे सर्व विसरून आपल्या सर्वजण 'भारतीय' म्हणून नव्याने सुरुवात करू यात..!!<<
>> बरोबर, इतकं झालं तरी सुद्धा आपल्याला भारतीय म्हणून मानवतावाद वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.. कारण जे सर्व दंगलीत सामील होते ते कट्टर द्वेषातूनच सामील होते असे म्हणता येणार नाही.. सामाजिक अस्मितेच्या नावावर त्यांना भडकविण्यात आले होते.. तात्कालिक रोष व्यक्त झाला.. अर्थात हा रोष तात्कालीकच समजायला हवा.. कारण भावना भडकवणारी डोकी दहा पाच असतात त्यासाठी तमाम भारतीय समाजामध्ये फूट पडणे आपल्याला परवडणार नाही.
हे आणी असे सर्व विसरून आपल्या
हे आणी असे सर्व विसरून आपल्या सर्वजण 'भारतीय' म्हणून नव्याने सुरुवात करू यात..!! >>>>
त्यावरच तर पोळ्या भाजल्या जात आहेत. या पुढील काळात त्यांना मते देउ नका -- मग ते कांग्रेस असो, भाजपा, डावे, समाजवादी, निळे, भगवे, हिरवे, पांढरे कोणीहि असो. जोपर्यत हे होत नाहि तो पर्यत नव्याने सुरवात होणार नाहि आणी परत परत हेच प्रसंग दिसतील
>>असलं करून राजकारणात आपली
>>असलं करून राजकारणात आपली पोळी भाजणाऱयांची संख्या कमी नाही.. दोघांचे भांडण लावून आपले अस्तित्व टिकवण्याचा माईंड गेम याआधीही खेळला गेला आहे.
नवीन Submitted by अँड. हरिदास on 4 January, 2018 - 16:51
<<
अगदी !
याआधी देखील ११ जुलै ११९७ मध्ये युतीसरकार सत्तेवर असताना घाटकोपरच्या रमाबाई आंबडेकर नगरात, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती व त्यानंतर झालेल्या हिंसाचारात, पोलीस गोळीबारात १० दलित आंदोलनकारी मारले गेले होते. आता हा योगायोग समजावा का ज्या-ज्यावेळी युतीसरकार सत्तेवर असते त्याचवेळी अश्या घटना का घडतात व या घडवण्यापाठी कोण असते.
१९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात युतीला ४८ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या. परंतु वरिल घटनेनंतर १९९८ मध्ये झालेल्या लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीत युतीला जेमतेम १० जागा मिळाल्या. यावरुन वरिल घटनां घडवण्यामागे कोण असावा हे लगेच लक्षात येते.
मग ते कांग्रेस असो, भाजपा,
मग ते कांग्रेस असो, भाजपा, डावे, समाजवादी, निळे, भगवे, हिरवे, पांढरे कोणीहि असो. <<
>> मग व्यवस्था कुणी चालवायची??
आता हा योगायोग समजावा का ज्या
आता हा योगायोग समजावा का ज्या-ज्यावेळी युतीसरकार सत्तेवर असते त्याचवेळी अश्या घटना का घडतात व या घडवण्यापाठी कोण असते.
--- युतीसरकार असे सत्तेत कितीवेळा होते?
अश्या घटना म्हणजे बाबरीविध्वंस सुद्धा हिशोबात धरा की राव.
मग व्यवस्था कुणी चालवायची??
मग व्यवस्था कुणी चालवायची?? >>>>> चांगले लोक असतातच हो व्यवस्था चालवायला. मत तर द्या ना आधी !
आपल्या शहीद सैनिकांना
आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. >> +१
अश्या घटना म्हणजे
अश्या घटना म्हणजे बाबरीविध्वंस सुद्धा हिशोबात धरा की राव.
नवीन Submitted by मेघपाल on 4 January, 2018 - 17:54
<<
बाबरी विध्वंस घडला ६ डिंसेबर १९९२ ला,
भाजपाला सत्ता मिळाली १० मार्च १९९८ मध्ये, मग बाबरीविध्वंसाचा फायदा कुणाला झाला ?
पातीदारांनी नाक खाली आणले
पातीदारांनी नाक खाली आणले होते त्यामुळे सत्ताधारी हादरले तोच धागा मराठा मोर्चे करणाऱ्यांनी महाराष्टात करायचे ठरवले. मोर्चा ची घोषणा केली सरकारला आरक्षणा बाबत आवाहन केले . गुजरात होम टाऊन असल्याने थोडक्यात वाचलेले सत्ताधारची या घोषणेने अवसान गळले तसेच या मोर्चाला दलित वगैरे सगळ्यांनी आधी पाठिंबा दिलेला होता . आता पाटीदारसारखी स्थिती महाराष्ट्रात उद्भवू नये म्हणून कोरेगावाचे निमित्त करून डोकी भडकवली गेली दोन समाजात फूट पाडली की ताकद कमी होणार आणि सत्ते वर आलेले संकट दूर होईल हे "चाय-णक्या"ने अचूक ताडले..
त्याप्रमाणे स्तंभावर आलेल्या लोकं वर दगडफेक वगैरे केली गेली .
असेही हे फूट पाडण्याची कामे काही संघटनांना फार उत्कृष्ट येते. कार्य संपन्न पण करायचे आणि नामानिराळे पण राहायचे यात अशांचा हात कोणी उभ्या भारतात कोणी धरू शकत नाही हे या घटनेने पुन्हा स्पष्ट झाले.
शरद पवारांनी अचूक तो डाव ओळखला. उगीच त्यांना जाणता राजा म्हणत नाही.
भाजपाला सत्ता मिळाली १० मार्च
भाजपाला सत्ता मिळाली १० मार्च १९९८ मध्ये, मग बाबरीविध्वंसाचा फायदा कुणाला झाला ?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
--- तुम्हीच सांगा
1996 ला पाकिस्तानात सत्ता
1996 ला पाकिस्तानात सत्ता मिळाली का?
6 डिसेंबर ला एक जुनी पडकी
6 डिसेंबर ला एक जुनी पडकी वास्तू पाडून ही लोक शौर्य दिवस साजरा करतात एवढाच यांचा काय तो पराक्रम![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सध्या कॉंग्रेसचे एक अजबच
सध्या कॉंग्रेसचे एक अजबच तर्कट दिसून येत आहे.
कॉंग्रेस तिकडे कर्नाटकात टिपू सुलतान इंग्रजांविरुध्द लढला म्हणून कॉंग्रेस त्याची जंयती अगदी धूमधडाक्यात साजरी करत आहे व इथे महाराष्ट्रात महार सैन्य इंग्रजातर्फे मराठा सैन्याशी लढले व त्यात त्यांनी मराठ्यांचा पराभव केला तर त्यांना मानवंदना देत आहे.
महार त्यांच्यावर केलेल्या
महार त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराविरुद्ध लढले हे आधी संघीष्टांनी लक्षात घ्यावे. आणि पराभव मराठ्यांचा नव्हे तर पेशव्यांचा केलेला होता हे ही कायम स्वरूपी लक्षात ठेवावे
ते अत्याचार खासकरून दुसर्या बाजीरावाच्या काळात अधिक आणि जास्त वाढले होते त्याविरुद्ध आवाज उठवला गेला. आणि तो आवाज असा काही उठवला की तो इतिहासच बनला.
खोटे आणि सोयीचा इतिहास काही संघटना पसरवत आहे. ती कोण आहे हे स्पष्ट झाले
इथे महाराष्ट्रात महार सैन्य
इथे महाराष्ट्रात महार सैन्य इंग्रजातर्फे मराठा सैन्याशी लढले व त्यात त्यांनी मराठ्यांचा पराभव केला तर त्यांना मानवंदना देत आहे.
--- काँग्रेस??? महाराष्ट्रात कोणाचे सरकार आहे? काँग्रेसचे? सरकारने मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित केला होता.
महार त्यांच्यावर केलेल्या
महार त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराविरुद्ध लढले हे आधी संघीष्टांनी लक्षात घ्यावे. आणि पराभव मराठ्यांचा नव्हे तर पेशव्यांचा केलेला होता हे ही कायम स्वरूपी लक्षात ठेवावे
नवीन Submitted by प्रदीपके on 4 January, 2018 - 19:05
<<
हा वरिल इतिहास बहुतेक कुणा बिग्रेडी इतिहासकारांने नव्याने लिहिलेला दिसतोय.
मुळ ऐतिहासिक कागदपत्रे काय सांगतात तर,
===
१ डिसेंबर १८१७ च्या रात्री ८ वाजता बॉम्बे नेटीव्ह आर्मीची एक बटालियन (सुमारे हजार सैनिक), मद्रास आर्टिलरीच्या दोन ६ पाउंडर तोफा व त्यावरील अधिकारी, आणि २५० घोडेस्वार घेऊन कॅप्टन स्टॉन्टन शिरूरकडून पुण्याकडे निघाला होता. रात्रभर प्रवास करून १ जानेवारी १८१८ रोजी हे सगळे कोरेगावपासून दोन मैलांवर पोहोचले होते तेव्हा त्यांना अचानक नदीपलीकडील पेशव्याचे सैन्य दिसले. पेशव्याचे सैन्य फुलशहराकडून येत होते. त्यांच्या सैन्यात खुद्द दुसरा बाजीराव पेशवा, बापू गोखले आणि त्रिंबकजी डेंगळेंसारखी मातब्बर मंडळी तसेच सुमारे २०००० घोडेस्वार, आठ हजार पायदळ आणि दोन तोफा होत्या. ह्याचबरोबर अरब पालटणीही होत्या.
दुवा:
===
तर मुळ इतिहासात लिहिल्याप्रमाणे बाजीराव पेशवा बरोबर २०००० घोडेस्वार, आठ हजार पायदळ आणि दोन तोफा होत्या. ह्याचबरोबर अरब पालटणीही होत्या तर मग पराभव फक्त पेशवांचा कसा काय झाला? की भिमा-कोरेगाव या एका युद्धासाठी पेशव्यांच्या सैन्यात फक्त ब्राम्हण सैनिकांचा भरणा केला होता?
ब्रिटिश गेले, परंतु त्यांची
ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. >> सुरु केला असल्याचा नाही, हा वारसा घेवूनच ब्रिटीश गेल्यापासून सत्ताधार्यांनी राज्यकारभार चालू ठेवलाय. कारण सत्ता टिकवायला म्हणा अथवा गेलेली परत मिळवायला फार काही करायला लागत नाही. फकस्त एक ठिणगी बास... मॉबला अक्कल नसते.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बायदवे, कालच न्यूज वाचली, कालचा 'शांततापूर्ण' बंद 'यशस्वीपणे' पार पाडल्यामुळे प्रकाशसाहेबांचे वजन ( जे फक्त विदर्भातच उरले होते) ते अख्खा महाराष्ट्रभर वाढले.
एकीकडे 28000 सैन्य नव्हतेच
एकीकडे 28000 सैन्य नव्हतेच म्हणत फेसबुक वर कुठल्यातरी कुलकर्णीचा लेख फिरवायचे तर दुसरी कडे लिहायचे की स्वतः पेशवा 20000 हुन जास्त फौज घेऊन उतरला होता. सैन्यात कोणी असले तरी खुद्द पेशवे लढाईत उतरले होते मग पराभव कुणाचा झाला म्हणणार ? पाकिस्तान चा
काय खोटे नाटे लिहायला लागले की संघीष्टांचा असा गोंधळ उडतो![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मग पराभव फक्त पेशवांचा कसा
मग पराभव फक्त पेशवांचा कसा काय झाला? की भिमा-कोरेगाव या एका युद्धासाठी पेशव्यांच्या सैन्यात फक्त ब्राम्हण सैनिकांचा भरणा केला होता?
>> हाय मेरे लाल. मरजावांमिटजावा इस अदांपें. आपण काय प्रश्न विचारतोय हेसुद्धा कळूं नयें?
मुळ ऐतिहासिक कागदपत्रे काय
मुळ ऐतिहासिक कागदपत्रे काय सांगतात तर,
--- हाये, ही मूळ ऐतिहासिक कागदपत्रे दुव्यावर मिळाली नाही, बहुतेक डाव्यांचा काही कट असेल. नक्शलवाद्यांचा?
सैन्यात कोणी असले तरी खुद्द
सैन्यात कोणी असले तरी खुद्द पेशवे लढाईत उतरले होते मग पराभव कुणाचा झाला म्हणणार ? पाकिस्तान चा Wink
काय खोटे नाटे लिहायला लागले की संघीष्टांचा असा गोंधळ उडतो Wink
नवीन Submitted by प्रदीपके on 4 January, 2018 - 19:38
<<
बिग्रेडी इतिहास वाचून असा गोंधळ उडतो कधी-कधी!
दुसर्या बाजीराव पेशव्यांनी त्यावेळी स्वत:ला मराठी राज्याचा छत्रपती घोषीत केले होते का ? की दुसरे बाजीराव पेशवे त्यावेळी सातरकर छत्रपती शाहू महाराजांचे पंतप्रधान म्हणून कारभार पाहत होते? आता मराठा साम्रज्याचे छत्रपती शाहू महाराज होते तर मग पेशव्यांच्या नेतृत्वात झालेल्या युध्दात पराभव वैयक्तिक पेशव्यांचा कसा काय होईल?
या न्यायाने शिवरायांच्या काळात असलेल्या कोकण, काहीप्रमाणात पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, वर्हाड व मध्य महाराष्ट्र पर्यंत असणार्या हिंदवी स्वराज्याच्या सीमा थोरल्या बाजीरावांच्या काळात थेट 'अटके' पर्यंत भिडल्या मग त्याला मराठा साम्रज्य म्हणतात की पेशव्यांचे साम्राज्य?
पेशव्यांच्या सैन्याचा पराभव
पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला. सैन्यात सगळे येतात. मग पेशव्यांच्या सैन्यात फक्त ब्राह्मणच होते हे कोणी सांगितले? की हे असे फक्त नागपुरी शाळेत शिकवले गेले?
भीमा कोरेगाव लढाईत अवघ्या 500 ते 800 महार रेजिमेंट ने पेशव्यांच्या 28k सैन्याचा पराभव केला. या वाक्यात काही संघीष्ट लोकांना फक्त विशिष्ट जात दिसत असेल तर त्यांनी मानसिकता आणि डोळे दोनही तपासून घ्यावी ही नम्र विनंती करतो.
Pages