अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!
एकविसाव्या शतकातील दोन दशकं पूर्ण होत असताना एकूणच राज्याच्या पारंपरिक राजकारणाचे स्वरूप बदलत चालले असून त्यामुळे जातीय, सांप्रदायिक, वांशिक समीकरणे कालबाह्य होत असल्याचा जो समज करून घेतला जात होता, त्या धारणे ला भीमा कोरेगाव घटनेने तडा दिला आहे. ज्याप्रकारे शौर्यदिनाच्या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लावण्यात आले. सामाजिक तेढ कायम राहावी, जातीय द्वेषाच्या ज्वाला भडकत्या राहाव्यात, यासाठी काहींनी पद्धतशीरपणे प्रयन्त केले, हा सारा प्रकार जितका धक्कादायक तितकाच चिंताजनकही आहे. वास्तविक, शांतात आणि सलोखा हा महाराष्ट्रातील जनमाणसाचा स्थायीभाव आहे. उपद्रव निर्माण करण्यात सामान्य माणसाला कुठलीच गोडी वाटत नाही, तर उपद्रवाबद्दल त्यांच्या मनात घृणेची भावना आढळते. परंतु, काही समाजविघातक शक्ती जनतेच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. अस्मितेच्या मुद्द्यवरून सामाजिक तेढ निर्माण करत आपला हेतू साध्य करण्याचा खेळ याअगोदरही अनेकवेळा खेळण्यात आलायं. भीमा कोरेगावच्या निमित्तानेही असाच एकादा डाव मांडल्या जात नाही ना ? याचा शोध घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
२०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मातीत एक युद्ध लढल्या गेले..ब्रिटिश अमलाखालील महार रेजिमेंटने पराक्रमाची शर्थ करत पेशव्यांच्या सैन्याला धूळ चारली. या पराक्रमाची यशोगाथा पुढील पिढीला कळावी म्हणून पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथ विजयस्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १ जानेवारी रोजी त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. आपल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी समाजबांधव शांततेच्या मार्गाणे एकत्र येत असतील, तर त्यात कुणाच्या पोटात दुखण्याचे काहीच कारण नव्हते. मात्र, काहींना महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पाहवल्या गेला नाही. द्विशतकपूर्तीच्या मुहूर्तावर लाखो अभिवादनकर्ते जमले असताना गर्दीचा फायदा घेऊन हिंसाचार घडविण्यात आला. या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. शौर्यदिनाला पार्श्वभूमीवर जातीय विद्वेष निर्माण करण्याची सुरवात अगोदरच झाली होती. त्यातच दोन गटात वाद निर्माण झाला आणि त्याचे पर्यावसन नंतर हिंसाचारात झाले. भीमा-कोरेगाव येथे हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. मात्र दोन गटातील वादाचे पर्यवसान भीमा-कोरेगाव येथे मानवंदना देऊन परतीच्या मार्गावर असलेल्यांना मारहाण करण्यात झाले. असेही आता सांगण्यात येत आहे. अर्थात, प्रकरण काहीही असले तरी हिंसाचाराचे समर्थन करताच येणार नाही. सोबतच या हिंसाचारामागे जातीय द्वेष वाढविण्याचा हेतू आहे, हे सत्यही नाकारता येणार नाही.
भीमा कोरेगावच्या प्रकरणानंतर क्रियेची प्रतिक्रिया संबंध महाराष्ट्रभर उमटली. गेले दोन दिवस महाराष्ट्र द्वेषाच्या आगीत होरपळून निघत आहे. दगडफेक, जाळपोळ, बंद आदींमुळे जनजीवन विस्कळीत झाले. भीमा कोरेगावचा हिंसाचार हाताळण्यात अपयशी ठरलेले प्रशासन महराष्ट्र पेटल्यानंतर खडबडून जागे झाले असून, कारवायांचा सपाटा सुरू झाला आहे. दंगलीच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले आहेत. त्यामुळे, ही घटना कशी घडली, त्यात दोषी कोण, यावर प्रकाश पडेल. मात्र, राज्याचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट रचणाऱया या प्रकरणामागचा नेमका सूत्रधार कोण, याचा शोध लागेल का? हा प्रश्न आहे. तदवतच, दंगल घडविण्यामागच्या कारणांचाही शोध घ्यावा लागेल. भीमा कोरेगावच्या प्रकरणाने सामाजिक परिस्थिती आजही किती संवेदनशील आणि चिंताजनक आहे याचे प्रत्यंतर आले आहे. इतिहासातील प्रतीकांचा हवा तसा वापर करून, इतिहासाची मोडतोड करून जनमत प्रक्षुब्ध करत आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न राजकारणात सर्रासपणे केला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
भेदाभेदांना तिलांजली देत समाजातील दुभंगलेपण कमी करण्यासाठी संत-माहात्म्यांणी महाराष्ट्राच्या भूमीत आपले आयुष्य खर्च केले. परंतु या महापुरुषांचे सर्वसमावेशक विचार जनमानसात रुजू द्यायचे नाहीत, असा चंग काही जातीयवादी शक्तींनी बांधलेला दिसतो. त्यामुळे सामान्य माणसांनी सतर्क होऊन प्रत्येक घटनेकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. जाती-जातींतील दऱ्या रुंदावून सत्तेच्या शिड्या चढण्याचे मनसुबे रचणाऱ्या प्रवृत्तीचे मनसुबे उधळून लावण्यासाठी आपल्याला समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून ब्रिटीशानी दीडशे वर्ष आपल्या देशावर राज्य केले. ब्रिटिश गेले, परंतु त्यांची नीती संपली नाही. आपल्या फायद्यासाठी काहींनी याच नीतीचा वापर सुरु केला असल्याचा संशय सध्याच्या घटनांवरून बळावू लागला आहे. दोन समाजांना सामोरा-समोर उभे करायचे आणि त्यातून आपले इसिप्त साध्य करून घ्यायचा गोरखधंदा कुणी करत असेल तर त्यांचा डाव उधळून लावल्या गेला पाहिजे. यासाठी सर्वांचेच प्रयत्न आवश्यक आहेत. सर्वत्र असलेले अविश्वासाचे आणि संशयाचे वातवरण पाहून 'उषःकाल होता होता काळरात्र झाली' ही कवी सुरेश भटांची कविता आठवते..'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली' या शब्दातून सुरेश भटांनी अविचाराविरुद्ध पेटून उठण्याचा दुर्दम्य आशावाद मांडला आहे. हा आशावाद आज जगण्यात उतरविण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसा-माणसात वाढलेली जातीभेदाची दरी मिटवून "चला पुन्हा 'समते' च्या पेटवू मशाली!" म्हणत सामाजिक समता आणि परस्परांमधील विश्वास कायम ठेवण्यासाठी सकारात्मक पावले उचलावी लागणार आहेत.
नक्की तारीख सांगता येणार नाही
नक्की तारीख सांगता येणार नाही पण या वर्षभरात हे न्यायपीठ नियुक्त केले असावे >> निरंजन टकलेंनी प्रसिध्ह केल्यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली. त्या याचिकेला शह देण्यासाठी १ दिवसात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली. उच्च न्यायालयात हि केस अस्ल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात हि केस घेउ नये अशी विनेंती केली गेली. ती इग्नोर करत दिपक मिश्रा याणी फेवरिट ज्युनियर बेंच कडे हि केस सोपवली ज्या बेंच कडे मोदी आणी कंपनी संदर्भात केसेस सोपवल्या जात आहेत ३/४ महिन्यांपासुन , जे खात्री करतात कि ह्या केस रफाटफा होतील. तेव्हा हे गेल्या २ महिन्यातील गोष्टि आहेत.
Submitted by राहुलका on 14
Submitted by राहुलका on 14 January, 2018 - 10:३०<<
>>खरी माहिती आहे..
मेडिकल कोलेज मेस - केस दिली
मेडिकल कोलेज मेस - केस दिली अरुण मिश्रा कडे
सहारा बिर्ला केस - केस दिली अरुण मिश्रा कडे
क्रांती चिदंबरम - केस दिली अरुण मिश्रा कडे
जस्टिस लोया - केस दिली अरुण मिश्रा कडे
संजीव भट्ट प्ली गुजरात दंगली अमित शहा विरुध्ह - केस दिली अरुण मिश्रा कडे
आधार केस - बोबडे, चेलामेश्वर यांना काढुन केस दिली अरुण मिश्रा कडे
आणी वर म्हणायचे नाहि की लोकशाहि खतरे मै है - वा रे भक्ताड
राहुलगा, असे झाले होय, अरेरे
राहुलगा, असे झाले होय, अरेरे
त्या आधीच्या त्यांनी काय वाटेल ते कितीही मोठे मोठे घोटाळे केले ते चालत होते का तेव्हा ?
{असे झाले होय, अरेरे Sad
{असे झाले होय, अरेरे Sad
त्या आधीच्या त्यांनी काय वाटेल ते कितीही मोठे मोठे घोटाळे केले ते चालत होते का तेव्हा ? Uhoh}
महेश यांच्याकडून संतुलित प्रतिसादच अपेक्षित होता.
अधिच्यांनी जे मोठ्ठे मोठ्ठे घोटाळे केले त्यांचे घोटाळे सिद्ध होऊन ते सगळे तुरुंगात गेले ना. की त्यांनी घोटाळे केले म्हणून तुम्ही पण त्यांच्यापेक्षा जास्त करणार?
गुजरात २००२ दंगल हत्याकांड ही
गुजरात २००२ दंगल हत्याकांड ही गोध्राकांडाची स्वाभाविक प्रतिक्रिया होती असे मानणारे संघी भाजपे ३ तारखेचा महाराष्ट्र बंद मात्र १ तारखेच्या सुनियोजित हल्ल्याची प्रतिक्रिया आहे हे मानायला तयार नाहीत. तुम करो तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढिला?
त्या आधीच्या त्यांनी काय
त्या आधीच्या त्यांनी काय वाटेल ते कितीही मोठे मोठे घोटाळे केले ते चालत होते का तेव्हा ? >>>>>>>> आले का ६० वर्ष परत. अहो त्यांनी घोटाळे केले म्हणुन तर तुम्हाला निवडुन दिले ना ३ वर्षापुर्वी, पण काय केले ३ वर्षात ? गेला का वडरा तुरंगात ?? ऊल्ट राजा बाहेर आला, कांगेस च्या कालात झालेला २ जी घोटाळा भाजपाच्या काळात स्च्च्छ झाला.
आम्हाला त्यांचेहि घोटाळे चालत नाहित आणी तुमचेहि. आंहि तेव्हा हि त्यांना बोललो होतो आणी आता तुम्हालाहि बोलत आहोत.
भाजप्यानीं घोटाळ्यावर बोलूच
भाजप्यानीं घोटाळ्यावर बोलूच नये. गाडीच्या मागे पळणारी आहेत.. गाडी थांबली की उलट्या पावलाने पळून जातात.
घोटाळा आहे तर सिध्द करा टाका तुरुंगात.. फुकटचे बोंबलू नका
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/pm-modi-visits-haifa-pays-homa...
"This is the final resting place for 44 of the Indian soldiers who sacrificed their lives during World War I to liberate the city," Modi had said before visiting the site.
The Indian Army commemorates September 23 every year as Haifa Day to pay its respects to the two Indian Cavalry Regiments that helped liberate the city.
१९१८ साली जी सेना लढली ती भारतीय सेना, पण १८१८ साली जी सेना लढली ती मात्र व्रिटिश सेना. वा वा !
भक्ताड करणार का निषेध मोदींचा आता ??
भक्तांचे आद्यगुरू प्रवीण
भक्तांचे आद्यगुरू प्रवीण तोगडिया ढसाढास रडला म्हणे..
माझा एन्काऊंटर करणार आहे. देशात राज्यात यांचीच सरकार की काँग्रेस ची सरकार? की आता पोलीस पण भाजपाचे ऐकत नाही? की भाजपाला आता तोगडिया डोईजड होऊ लागले? अडवाणी, सिन्हा, जोशी ज्या लायनीत तोगडिया आले. ज्याला स्कुटर वरून फिरले त्यानेच विश्वासघात केला रे
यालाच म्हणतात जैसी करनी वैसी भरनी
"गढूळा चं पाणी कशाला ढवळील
नागाच्या पिल्लाला तू का ग जवळील"
इथे बरेच दिवस गलिच्छ भाषेत
इथे बरेच दिवस गलिच्छ भाषेत काय काय चाललेले आहे.
भक्ताड पेक्षा कमीच आहे की
गलिच्छ ? अर्थात ज्यांच्या मनात जसे असते तसेच दिसते म्हणा
मायबोलीचे स्वयंघोषित पोलीस
इथे बरेच दिवस गलिच्छ भाषेत
इथे बरेच दिवस गलिच्छ भाषेत काय काय चाललेले आहे>> +१
सध्या तरी इथे प्रवाहाच्या विरुद्ध कोणी काहीही मत मांडल्यास वैयक्तीक टीकेवर आल्याचे जाणवू लागलेय. असो. थोडीफार मजाही येतेय कधी कधी वाचायला!
माझ्या त्या प्रतिसादावर अगदी
माझ्या त्या प्रतिसादावर अगदी अपेक्षित असेच प्रतिसाद आलेले आहेत, आश्चर्य नाही.
भाजपचे सर्वच चांगले आहे असे नाही, मला वैयक्तिकरित्या काही गोष्टी पटत नाहीत, पण तरी त्या आधीच्यांपेक्षा बरेच बरे.
असे नाही का वाटत ? नव-इब्लिस, नव-जामोप्या, आणि अजुन कोणी नव-हे, नव-ते, इ.
पण तरी त्या आधीच्यांपेक्षा
पण तरी त्या आधीच्यांपेक्षा बरेच बरे. असे नाही का वाटत ? >>>>>>>>>>
तुम्हि काय बरे ते सांगतच नाहि आहात. तुम्हाला आधीच्या पेक्षा काय बरे वाटते ते सांगा. मग ते आधीच्या पेक्षा कसे बरे नाहि अथवा कसे सेमच आहे हे आकडेवारी देउन मी सांगेन. उत्तराच्या प्रतिक्षेत आहे.
>>तुम्हाला आधीच्या पेक्षा काय
>>तुम्हाला आधीच्या पेक्षा काय बरे वाटते ते सांगा.
पक्ष
>>तुम्हाला आधीच्या पेक्षा काय
एकच प्रतिसाद टंकला होता, तो दोनदा दिसू लागल्याने एडिटत आहे.
पक्ष > >>> म्हणजे काय ??
पक्ष > >>> म्हणजे काय ?? ???????????? माणुस ?? माणसे ? पक्ष म्हणजे काय हो ?? आणी एकच शब्द लिहु नका.
आधीच्यांपेक्षा बरेच बरे काय वाटते ते सांगा. मग तुलना करु.
व-इब्लिस, नव-जामोप्या, आणि
व-इब्लिस, नव-जामोप्या, आणि अजुन कोणी नव-हे, नव-ते, इ >>>>>
अभी_नव चालतील का या लीस्टीत
नव-कागाळे, नव-कोकणस्थ, इ.इ.इ.
नव-कागाळे, नव-कोकणस्थ, इ.इ.इ.
भक्तांचे आद्यगुरू प्रवीण
भक्तांचे आद्यगुरू प्रवीण तोगडिया ढसाढास रडला म्हणे..
<<
प्रवीण तोगडिया यांच्यावर २००२ च्या दंगलीबद्दल दिवस-रात्र आरोप करणारे पुरोगामी, निधर्मांध वगैरे ढोंगी
आता तोगडीया यांनी श्री मोदींवर टिका केली म्हणून त्यांचे कौतुक करत आहेत. तो हार्पिक पटेल वगैरे त्यांना हॉस्पिटल मध्ये जाऊन स्वत: भेटला अशी बातमी आहे.
त्याच हरपिक ने गुजरातचे
त्याच हरपिक ने गुजरातचे किटाणू ची संख्या 150 वरून 99 वर आणली
तोगडिया प्रकरण (हरवले,
तोगडिया प्रकरण (हरवले, बेशुद्ध अवस्थेत सापडले, अटककरण्यासाठ्ठी राजस्थानातुन सुरक्षा दल आले...) मला अजुन झेपत नाही आहे. कुठेतरी जनतेची दिशाभुल करण्यासाठी असावे.
भीमा - कोरेगावात हिन्सेच्या
भीमा - कोरेगावात हिन्सेच्या घटनेचा आणि कृत्याचा निषेध. सुरक्षा पुरवणे राज्य सरकारचे काम आहे, त्यात ते कमी पडले. स्वार्थाची पोळी भाजण्यासाठी समाजातल्या विविध घटकात अविश्वासाचे, द्वेषाचे वातावरण निर्माण करणे, त्याला खतपाणी घालणे हे थाम्बायला हवेच.
काल भीडे गुरुजींनी पतंगराव
काल भीडे गुरुजींनी पतंगराव कदम, जयंत पाटील, आबा पाटील यांचे कौतुक केले. मग भक्ताडांची मते पुण्यात कदमांना का काय !
त्याच हरपिक ने गुजरातचे
त्याच हरपिक ने गुजरातचे किटाणू ची संख्या 150 वरून 99 वर आणली >>>
आधीच्यांपेक्षा बरेच बरे काय
आधीच्यांपेक्षा बरेच बरे काय वाटते ते सांगा. अजुनहि प्रतिक्षेत आहे.
राहुलका. वाडा पडका का असेना,
राहुलका. वाडा पडका का असेना, त्याच्या किल्ल्या सवतीच्या हाती नको. माझ्या कंबरेला असतील तर बरेच बरे वाटते.
सर्वांची परवानगी असल्यास
सर्वांची परवानगी असल्यास थोडेसे धाग्याच्या विषयावर लिहू का?
भीमा कोरेगाव प्रकरण पेटवण्यात नक्षलवादींचा हात आहे असे गुप्तचर विभागाच्या चौकशीत आढळून आले आहे. एक दोघांना अटकही झाली आहे. मुंबईत ह्या नक्षलवादींच्या म्हणे अनेक मीटिंग्ज झाल्या होत्या हे प्रकरण यंदाच्या वर्षी पेटवायचे म्हणून.
भीमा कोरेगाव प्रकरण पेटवण्यात
भीमा कोरेगाव प्रकरण पेटवण्यात नक्षलवादींचा हात आहे असे गुप्तचर विभागाच्या चौकशीत आढळून आले आहे >>>>
." A sitting high court judge will head the inquiry," Fadnavis said.
गुप्तचर विभाग कोठुन आला ???
आणी नक्षलवादीं किंवा दहशतवादी आहेत या मागे हा आरोप सगळेच करत होते. त्यांच्या हातात कोणते झेंडे होते ते महत्वाचे.
Pages