Submitted by बाबा कामदेव on 25 December, 2017 - 00:39
Trump admin plans to end rule that allows spouses of H1-B visa holders to work in US
https://economictimes.indiatimes.com/nri/visa-and-immigration/us-plans-t...
कृपया हि लिंक पहावी.
हे काय आहे? याचे परिणाम काय ? एकूणच भारतीय तंत्रज्ञांबाबत धोरण काय आहे.
नात्यातले एक मुलगी अमेरिकन जॉग होल्डरशी लग्न करून तिथे जॉब करण्याच्या विचारात आहे. हे प्लॅनिण्ग करताना वरील निर्णयाचा काय परिणाम संभवतो. ? सद्या निर्णय झाला नसला तरी ट्रम्प यांची शैली पाहता काहीही होउ शकते.
तसेच एच १ बी विसाबद्दल धोरण काय राहील?
माहीतगारानी , विशेषतः स्टेट्समधील मित्रांनी सद्यःस्थिती काय आहे, भविश्यात काय राहू शकते याबाबत मार्गदर्शन करावे ही विनन्ती...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त निर्णय
मस्त निर्णय
अत्यंत योग्य वेळी घेतलेला निंर्णय आहे.
स्थानिकांना रोजगार आधी दिला पाहिजे. ट्रम्प ला जोरदार पाठिंबा
बरेच आहे हे एका अर्थी.
बरेच आहे हे एका अर्थी.
ते खोटे रेझुमी बनवून, भाड्याने कोणाला तरी मुलाखत द्यायला सांगून खूप झाले एका विशिष्ट जमातीकडून आणि भारतीय लोक भरपूर होते त्यात, हो हो तीच गुलटी कंपनी ज्यास्त.
त्याला आळा बसेल जरातरी...
एच४ येणार्यांनी नक्कीच विचार करून यावे. नाहितर “पीरपीर” करावी की मी कसा त्याग करून आले, माझी मोठ्या पैशाची नोकरी सोडली तुझ्यासाठी , मी जेवण बनवते घरात राहून म्हणोन तुला मिळतेय, माझी किंमत कमी झालीय. संसार माझ्यामुळेच होतिय वगैरे वगैरे..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
असे म्हणत नवर्याचा( जर त्याच्या जीवावर अमेरीकेत आला असाल तर) जीव खावा रोज.
( ह्यावरून आठवले,कुंडलकरांनी हे सुद्धा आजच्या काळातील उदाहरण द्यायला हवे होते. अश्या महिला/ मुली भेटल्या की माझी सुद्धा लेख पाडावा ह्या विचारात चिडचिड होते. असो हा धाग्याचा विषय नाही).
गुल्टीम्चे जाउ द्या हो, जे
गुल्टीम्चे जाउ द्या हो, जे जेन्युइन आहेत त्याम्चे काय ?
जे जेन्युइन आहेत त्याम्चे काय
जे जेन्युइन आहेत त्याम्चे काय>>>
जे जेन्युइन आहेत त्यांनी आधी स्वतःचा एच१ मिळवून अमेरिकेत जावे आणि तिथल्या एच१ जोडीदाराशी लग्न करावे.
ट्रंपकाकांचं काही चुकलं नाही. डिपेंडंट व्हिसावर अमेरिकेत येऊन जॉब करणे हे एच१ प्रोग्रॅमच्या स्पिरिटचे व्हायोलेशन आहे.
काका आठ वर्षं राहोत.
>>>एच४ येणार्यांनी नक्कीच विचार करून यावे. नाहितर “पीरपीर” करावी की मी कसा त्याग करून आले, माझी मोठ्या पैशाची नोकरी सोडली तुझ्यासाठी , मी जेवण बनवते घरात राहून म्हणोन तुला मिळतेय, माझी किंमत कमी झालीय. संसार माझ्यामुळेच होतिय वगैरे वगैरे..
असे म्हणत नवर्याचा( जर त्याच्या जीवावर अमेरीकेत आला असाल तर) जीव खावा रोज. Wink
( ह्यावरून आठवले,कुंडलकरांनी हे सुद्धा आजच्या काळातील उदाहरण द्यायला हवे होते. अश्या महिला/ मुली भेटल्या की माझी सुद्धा लेख पाडावा ह्या विचारात चिडचिड होते>>>![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
https://www.maayboli.com/node/64749?page=4 इथली माझी चिडचिड वाचा
>>ट्रम्प काकांचा नवा बॉम्ब...
>>ट्रम्प काकांचा नवा बॉम्ब... या पुढे एच १ बी धारकांच्या जोडीदारास जॉब नाही<<
ओबामापूर्व काळातहि डिपेंडंट विजा (एच-४) वर नोकरी करता येत नव्हती. ट्रंपसाहेबांनी तो जुना नियम रिइंस्टेट केलेला आहे. एच- १/४ विजाचा गैरवापर केला गेला हे जगजाहिर आहे, आणि यात एखाद्या विशिष्ट समाजापेक्षा टीसीएस, इन्फोसिस इ. भारतीय कंपन्यांचा सहभाग जास्त आहे...
यापुढे एच-१ विजा वर अजुन जास्त रेस्ट्रिक्शन्स येणार आहेत. कोडिंग, टेस्टिंग, टेक-रायटिंग, पीएम, ऑप सपोर्ट इ. जॉब्स जे जगात कुठेहि बसुन करण्यासारखे आहेत ते एच-१ विजातुन मोठ्याप्रमाणात वगळले जाण्याची शक्यता आहे...
सहन न होणे व सांगताही न येणे.
सहन न होणे व सांगताही न येणे.
मिठाची गुळणी धरणे.
मूग गिळून गप्प बसणे.
कॅट ने टंग गॉटणे.
इ. म्हणींचा प्रत्यय सं'बा'धितांकडून येथे येईलच.
मज्जाय.
>>ओबामापूर्व काळातहि डिपेंडंट
>>ओबामापूर्व काळातहि डिपेंडंट विजा (एच-४) वर नोकरी करता येत नव्हती. ट्रंपसाहेबांनी तो जुना नियम रिइंस्टेट केलेला आहे.>> +१
<<<स्थानिकांना रोजगार आधी
<<<स्थानिकांना रोजगार आधी दिला पाहिजे. ट्रम्प ला जोरदार पाठिंबा>>>
पण एच वन किंवा अन्य परकीयांना नोकर्या देणार्या कंपन्यांना तसे वाटते का?
भारतीय नि अमेरिकन नागरिक हे सारखेच सक्षम असतील, नि भारतीय स्वस्त असतील (असतातच), तर कंपन्या खर्च वाचवण्यासाठी त्यांनाच नोकर्या देते, त्यांच्या सोयीसाठी, त्यांनी इथे रहावे व स्वस्तात काम करून कंपनीचा खर्च वाचवावा यासाठी ते काँग्रेसमन, सिनेटर नि चालू प्रेसिडेंटला भरपूर लाच देऊन हवे तसे कायदे करून घेतात. ही इथली पद्धत आहे!
शिवाय या कंपन्यांच्या स्टॉकची किंमत वाढते, डिव्हिडंड वाढतात त्यामुळे इतर लोकहि खूष.
गरीब,मध्यमवर्गीय ज्यांना याचा फायदा होत नाही ते देश प्रेम इ. ढोंग करतात.
एक गोष्ट लक्षात ठेवा - लायकी असल्याखेरीज केवळ स्वस्त म्हणून कुणालाहि या अत्यंत यशस्वी, जगभर पसरलेल्या कंपन्यांमधे, किंवा संशोधन, नॅसा इ. ठिकाणी नोकरी मिळणार नाही - मिळायला लागली तर लवकरच ती कंपनी बुडेल किंवा कुणितरी त्यांना विकत घेईल, नि त्यातून होणारे घोटाळे निस्तरण्यासाठी आणखीन परदेशी लोक बोलावतील.
भारतीय लोक निर्विवादपणे हुषार, प्रामाणिक नि अल्पसंतुष्ट आहेत -- थोडक्यात आदर्श नोकर!
थोडाफार काळ परिणाम होईल, पण पुनः ये रे माझ्या मागल्या! सरकार, देशप्रेम वगैरे पेक्षा पैसे मिळवणे महत्वाचे - या देशात.
एच -१ बी व्हीसा सुरु
एच -१ बी व्हीसा सुरु झाल्यापासून (म्हणजे गेले काही दशके), एच -४ (एच -१ बी डीपेंडंट) व्हीसा असलेल्यांना कुठलेही काम करायला परवानगी नव्हती. त्यांना त्यांचा स्वतंत्र प्रायोजक मिळाला तरच काम करता यायचे. नुकतेच (२-३ वर्षांपूर्वी असेल) ओबामाने नवीन बदल आणून ही परवानगी दिली होती. ट्रंपने पुन्हा जुन्याच नियमांकडे जाणार असे जाहिर केले आहे.
एच -४ व्हीसा च्या नवीन नियमांचा गैरफायदा घेतला गेला हे सत्य असले तरी तसा गैरफायदा काही कंपन्यांनी एच -१ बी चा ही घेतला आहे. त्यामुळे ओबामाच्या नियमांमुळे गैरफायदे घेण्याचे प्रमाण वाढले असे नाही.
एच -४ (डिपेंड्ट ) वर आलेल्यांचे अनुभव या दोन टोकांपैकी एक (किंवा मधे कुठेतरी) असतात.
१) नवीन लग्न झाल्यावर नवीन देशात येणार. इथे कोणाशी ओळखी नाहीत. सुरुवातीला सहसा एकच कार असल्यामुळे (आणि ती ज्याची नोकरी आहे तो/ती घेऊन गेल्याने) दिवसभर घरात कोंडून पडल्यासारखे वाटणार. त्यातून थंडी असलेल्या राज्यात असलात तर बाहेर पायी पडणेही अवघड होणार. त्यात जर स्वभाव इन्ट्रोवर्ट असेल तर जोडीदार सोडून दिवसेंदिवस कुठल्याही मनुष्याशी संपर्क येणार नाही. सततची थंडी, नैसर्गिक सूर्यप्रकाश नाही , कंटाळा येईल असे वातावरण त्यामुळे मन स्थीर राहणे अवघड (कुणाचेही). नैसर्गिक सूर्यप्रकाश दिवसोंदिवस मिळाला नाही , थंडीमुळे दररोज घरातच बसून रहावे लागले तर मनावर काय परिणाम होतो याची कल्पना भारतात राहून कधीच येत नाही. त्यातून सतत जोडीदाराशी भांडणे.
त्यातून मूल झाले तर , दिवस भर कुठल्याही प्रौढ व्यक्तीशी संपर्क नाही. फक्त त्या मुलाची शी/शू/खाणे/पीणे/झोपणे यात वेळ जाणार. ते मूल रात्री झोपत नसेल तर झोप पूर्ण होणार नाही. त्यातून चीडचीड. कशाला या अमेरिकेत आलो अशी सततची भावना.
२) भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात आलात तर, भारतापेक्षा कितितरी छान उत्साहवर्धक हवा. अजिबात प्रदूषण नाही. एकदा जोडीदार कामाला बाहेर पडला, तर दिवसभर बाहेर पडून करण्यासारखे हजारो छंद. आजूबाजूला भरपूर भारतीय. स्वभाव एक्स्ट्रोवर्ट असेल तर फक्त भारतीयच नाही तर जगभरातल्या अनेक देशातल्या लोकांशी ओळखी. त्यातून मिळणारी विचारांची समृद्धी. इतर देशांपेक्षा आपण किती नशीबवान आहोत याची जाणीव. सुरुवातीला आपल्याला नोकरी करता येत नाही याचा खट्टूपणा जाऊन , एक मोठी सुट्टी आणि ती ही अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात आपल्याला मिळाली आहे याची जाणीव. स्वतःला नव्याने शोधून नवीन सुरुवात/ शिक्षण/ स्वयंसेवी काम. त्यातून मूल झाले तर , आपण या नियमांमुळे का होईना , मुलांबरोबर वेळ काढतो आहे जो आयुष्यात परत कधी मिळणार नाही हे लक्षात येणे. आजूबाजूला सतत आरोग्याकडे लक्ष देण्याचे वातावरण असल्यामुळे आपोआप स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, जीम जॉईम करणे. आरोग्य सुधारल्याने अधिक वाढलेला उत्साह. अमेरिकेमुळे आपल्याला किती चांगली संधी मिळाली आहे आणि त्याचा जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल ही भावना.
दोन्हीही अनुभव एकाच देशात, त्याच नियमांमुळे. पण हे तुमच्या स्वभावावर, तुमच्या जोडीदारावर आणि कुठल्या भौगोलिक प्रदेशात येणार त्यावर खूप अवलंबून आहे. हे दोन टोकाचे अनुभव आहेत. बहुतेकांचा अनुभव यात कुठेतरी मधला असतो.
मला तर एच ४ वाल्याना वर्क
मला तर एच ४ वाल्याना वर्क पर्मिट मिळायला लागल्याचे आत्ता आत्ताच कळले होते. मी इथे आले तेव्हा नव्हतेच मिळत पर्मिट. आता इतक्या वर्षांनंतर एच वन आणि एच फोर च्या नियमांशी (खरं तर या व्हिसावर असलेल्या जनतेशीही) काही संबंध उरला नाही. पण खोटे रेस्युमे, खोटे रेफरन्सेस, फेक इंट्रव्ह्यू वगैरे प्रकार करणारे इतके नमुने पाहिल्यावर रेस्ट्रिक्शन्स आणली तर बरेच असे वाटते.
<<<पण खोटे रेस्युमे, खोटे
<<<पण खोटे रेस्युमे, खोटे रेफरन्सेस, फेक इंट्रव्ह्यू वगैरे प्रकार करणारे इतके नमुने >>>
हे असले धंदे अमेरिकन पण मोठ्या प्रमाणावर करतात. पण एकदा नोकरी लागल्यावर काम निभावून नेता आले तर बाकीचे कुणि इथे बघत नाहीत. तसेहि ग्रॅज्यूएट आहे का? पहिला नंबर आला होता का? मार्क किती मिळाले वगैरे कुणि बघत नाहीत. नि असले ग्रॅज्युएट, खूप मार्क मिळवलेले असले तरी काम जमले नाही तर सरळ हा़कलून देतात!
ट्रंप नि कायदे करणारे यांनी काहीही मुक्ताफळे उधळली तरी भरपूर लाच देऊन उद्योगधंदे स्वतःला फायदेशीर कायदे करून घेतातच. फक्त गुपचूप, जाहिरात न करता.
एच-४ विजापेक्षाहि एक जाचक
एच-४ विजापेक्षाहि एक जाचक नियम होता, जीसी झालेल्यासाठी; अजुन तो आहे का क्ल्पना नाहि.
त्या काळात एफ-१ -> एच-१ -> जीसी प्रवास २-३ वर्षात आटपायचा. २५-२६ वर्षाचे होई पर्यंत तरुणांना जीसी मिळुन जायचं. पण त्यामुळे लग्न न झालेल्या तरुणांची गोची व्हायची कारण "त्या" नियमानुसार स्पाउजला जीसी अप्रुव होण्याकरता ५ वर्षं सक्तिने थांबावं लागायचं. म्हणजे पुढची ५ वर्ष ती/तो अमेरिकेत पाय ठेऊ शकत नसे. धिस वाज ब्रुटल फॉर लिगल इमिग्रंट्स अँड टोटली अनअमेरिकन...
>>स्पाउजला जीसी अप्रुव
>>स्पाउजला जीसी अप्रुव होण्याकरता ५ वर्षं सक्तिने थांबावं लागायचं.>> ५ वर्ष थांबा अशी सक्ती नव्हती. पण जीसी चा प्रत्येक देशाचा कोटा आणि त्या त्या देशातुन असलेली अर्जांची गर्दी बघता त्या कॅटेगरीत डेट करंट व्हायला चायना, इंडीयातल्या लोकांना तेवढा वेळ जायचा.
>>इंडीयातल्या लोकांना तेवढा
>>इंडीयातल्या लोकांना तेवढा वेळ जायचा.<<
खरं आहे. पण त्याच्यावर सुद्धा काहि मित्रांनी तोडगा काढला होता - सिटिझन्शीप आधी घेऊन मग बायकोला स्पाँसर करुन ६ महिन्यांच्या आत अमेरिकेत आणणे. माझा पॉइंट हा होता कि स्पाउझल जीसी प्रोसेस करताना सिटिझन्सचा क्रायटेरिया जीसी होल्डरना हि लावला गेला असता तर बर्याच जणांनी अंकल सॅमचे आभार मानले असते...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किंवा स्पाऊसला स्टुडंट विसावर
किंवा स्पाऊसला स्टुडंट विसावर काही ना काही कोर्स करायला लावणे.
मग आता जावई शोधताना काय
मग आता जावई शोधताना काय स्टेटस पहावे? जीसीच का? जीसी ची स्कॅन कॉपी पाठवल्याशिवाय फोटो पत्रिका देउ नये?!
>>>मग आता जावई शोधताना काय
>>>मग आता जावई शोधताना काय स्टेटस पहावे? जीसीच का? जीसी ची स्कॅन कॉपी पाठवल्याशिवाय फोटो पत्रिका देउविचाराल्ल्म्<<<![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मुलीलाच. स्पष्ट विचारावे की , तित्ये अमेरीकेत जावून आपणच घरचे काम करायचे की गृह्स्थांना कामाला लावायचेय आणि त्यानुसार जीसी वाला की नॉन जीसी वाला हवा तो शोधावा.
जीसीवाला करूनही घरीच बसावे लागेल. शिकलेल्या मुलींनी अमेरीकेचे नियम वाचावे व यावे.
>>>https://www.maayboli.com
>>>https://www.maayboli.com/node/64749?page=4 इथली माझी चिडचिड वाचा Wink<<<
टीटी( नक्की आयडी कळत नाहिये), मी मम म्हणेन तुमच्या त्या मतावर. तरीही तिथे अजून माझी पिंक टाकायची राहिलीय ते आठव्ले व टाकतेच.
तर आता ह्या बीबीच्या मुद्द्याला धरून,
अजय, ह्यांचे १) आणि २) पाँईट मध्ये इतकं लिहिलय की इथे नवीन लग्न होवून आलेल्यांना असा, तसा त्रास होतो. पण जाणून्/समजून निर्णय घेतलेल्यांना इतकी भुतदया कशाला ती? लग्न करणारी व्यक्ती हि सर्व माहीती मिळवू शकते आणि तो "तिचा" स्वतःचा खाजगी निर्णय आहे आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयावर सतत रडत इतरांची सहान्भूती घ्या, नवर्याला त्रास द्या पीरपीर करून हे कशाला?
यु चोझ इट, सो बी प्रीपेर्ड.
अमेरीकेत असताना, पॉटलक असताना अश्या बर्याच बायका भेटल्यात, त्या अगदी हिरिरीने सांगायच्या/रडायच्या की, त्या कश्या भारतात मॅनेजर होतो, आम्ही य पैशाचा पगार घेत होतो आम्हाला फ्रीडम नाही वगैरे वगैरे .. अरे मग कोणी सांगितले यायला इथे? हे फक्त नवीन लग्न झालेल्या मुलींनाच ज्यास्त लागो होतो तरीही, कुटुंबासाठी बर्याच वर्षांनतर नवर्याची बदली झालेली महिला सुद्धा तसेच करतात. हा निर्णय मिळून घेतलाय ना आणि तेव्हा नंतर तक्रार कशाला?
---
ओबामाने'च' सुरु केले त्यांच्या काळात की एच४ वरील बायांनी काम करावे.
त्यामुळे, अगदी भारतात टीचर असलेल्या बायांनी सुद्धा खोटा रेझ्युमी बनवून नवर्याच्याच कंपनीत जॉब घेवून , त्याच्याच वेंडर कंपनीकडून पगाराचा मासिक हिस्सा देवून मुलाखती देवून असे काम केलेले पाहिले आहे. अश्या केसेस्ना आळा बसेलच. कारण हे असले कँडिडेट खूपच कमी पगारात काम करतात. ...
मग स्वःकष्टावर आलेले, जेन्युन असलेल्यांनी, त्यांनी का घरी बसावे हा मुद्दा येतोच. करा ना कष्ट आणि खर्च इथे येण्याचा, मग कळेल इतरांची कथा.
ह्याच्यात देशप्रेम कुठून घुसले? ज्यांना मिळत नाही , त्यांना द्राक्षे आंबटच असतात.
आणि इथे भारतीय असल्याने( एच१ आणि एच४ विसा लागतो अश्या देशातील लोकांविषयी चर्चा), त्यांनी केलेल्या अश्या गैरवापराचा मुद्दा आहे. अमेरीकन काय करतात आणि काय नाही असा नाहीये. तसे करायला काय कोणीही करतोच हेराफेरी, त्याचा देशाशी सबंध नाहीय. अमेरेकन लोकांना( जे तिथलेच नागरीक आहेत) ते हेराफेरी करतात का नाही हा वेगळा मुद्दा होइल.
अजय यांचा प्रतिसाद पटला.
अजय यांचा प्रतिसाद पटला.
आता या परिस्थिती ची लग्न करणार्या मुली व बापांना कल्पना असते.इन्टर्नेट वरुन करण्या सारखे पुष्कळ टाइमपास आणि फ्रीलान्स कामेही असतात.
यामुळे हा सिनारिओ बराच कमी झाला असेल.
जीसीवाला करूनही घरीच बसावे
जीसीवाला करूनही घरीच बसावे लागेल
>>>हाच निष्कर्ष फायनल समजायचा का मग ?
२) भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या
२) भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागात आलात तर, भारतापेक्षा कितितरी छान उत्साहवर्धक हवा. अजिबात प्रदूषण नाही. एकदा जोडीदार कामाला बाहेर पडला, तर दिवसभर बाहेर पडून करण्यासारखे हजारो छंद. आजूबाजूला भरपूर भारतीय. स्वभाव एक्स्ट्रोवर्ट असेल तर फक्त भारतीयच नाही तर जगभरातल्या अनेक देशातल्या लोकांशी ओळखी. त्यातून मिळणारी विचारांची समृद्धी. इतर देशांपेक्षा आपण किती नशीबवान आहोत याची जाणीव. सुरुवातीला आपल्याला नोकरी करता येत नाही याचा खट्टूपणा जाऊन , एक मोठी सुट्टी आणि ती ही अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात आपल्याला मिळाली आहे याची जाणीव. स्वतःला नव्याने शोधून नवीन सुरुवात/ शिक्षण/ स्वयंसेवी काम. त्यातून मूल झाले तर , आपण या नियमांमुळे का होईना , मुलांबरोबर वेळ काढतो आहे जो आयुष्यात परत कधी मिळणार नाही हे लक्षात येणे. आजूबाजूला सतत आरोग्याकडे लक्ष देण्याचे वातावरण असल्यामुळे आपोआप स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, जीम जॉईम करणे. आरोग्य सुधारल्याने अधिक वाढलेला उत्साह. अमेरिकेमुळे आपल्याला किती चांगली संधी मिळाली आहे आणि त्याचा जास्तीत जास्त कसा उपयोग करता येईल ही भावना>>>>>>>>>>>>>> अगदी खुप मस्त पॉझीटिव्ह प्रतिसाद आणि माझ्याशी खूप रिलेट झाला म्हणूनही आवडला.
बाकी वेळ मिळेल तसं लिहिते.
भरपूर सूर्यप्रकाश नसलेले भाग
भरपूर सूर्यप्रकाश नसलेले भाग कोणते?
https://www.theroute-66.com
https://www.theroute-66.com/weather.html
या पानावर विंटर या भागात पहा. जानेवारी हा सगळ्यात थंड महिना. नकाशातले आकडे फॅरनहीट मधे आहे हे लक्षात असू द्या. जिथे खूप थंडी तिथे सूर्यप्रकाश तुलनेने कमी आणि मिळाला तरी घराबाहेर पायी पडणे अवघड. नकाशात एक राज्य नाही , अलास्का. तिथे हिवाळ्यात सगळ्यात कमी सूर्यप्रकाश.
H4 ead रुल हा executive
H4 ead रुल हा executive action वाला रुल नाही आहे. जो रुल यायला 4 वर्षे लागली, तो असा सहजासहजी बंद नाही होणार. Lawsuits, appeals होतील आणि कमीत कमी 2 वर्षे लागतील बंद वायला रुल.( माझा अंदाज )
एच४ वर आजही काम करता येत नाही
एच४ वर आजही काम करता येत नाही. ज्यांच्या स्पाउसचे ग्रीन कार्ड अॅप्प्लाय झाले आहे व ते एका पर्टिक्युलर स्टेजला पोचले आहे त्यांना इएडी (एम्प्लॉयमेंट ऑथोरायझेशन) मिळते ज्यावर त्यांना काम करता येते. जर स्पाउसचे ग्रीन कार्ड अॅप्लायच झाले नसेल तर एच४ विसाधारकाला काम करता येत नाही.
>>![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
जानेवारी हा सगळ्यात थंड महिना. नकाशातले आकडे फॅरनहीट मधे आहे हे लक्षात असू द्या. जिथे खूप थंडी तिथे सूर्यप्रकाश तुलनेने कमी आणि मिळाला तरी घराबाहेर पायी पडणे अवघड. >
>>
आत्ता या क्षणाला दाराबाहेर -१० फॅरनहाइट तापमान आहे. ज्यांनी इस्नुलेशन तंत्रज्ञानावर काम केले त्यांना स्मरून पोस्ट लिहितो आहे
<<<<<
<<<<<
यापुढे एच-१ विजा वर अजुन जास्त रेस्ट्रिक्शन्स येणार आहेत. कोडिंग, टेस्टिंग, टेक-रायटिंग, पीएम, ऑप सपोर्ट इ. जॉब्स जे जगात कुठेहि बसुन करण्यासारखे आहेत ते एच-१ विजातुन मोठ्याप्रमाणात वगळले जाण्याची शक्यता आहे...>>>>
पीएम जॉब जगात कुठेही बसून करता येतों ? ऐकावे ते नवलच
बातम्या देताना, जेवढे
बातम्या देताना, जेवढे सनसनाटी करुन देता येइल तेवढे देतात. सरसकटीकरणही होते.
नुसते २-३ वर्षाच्या प्रोजेक्टवर आलेले आणि ग्रीन कार्ड प्रोसेसमधे नसलेले बरेच H-1B नोकरदार आहेत. त्यांच्या जोडीदाराच्या बाबतीत हा वर्क परमिट नियम नाही. त्या मंडळींना घरी बसणे ( H4 हा डिपेंडंट विसा आहे) , किंवा योग्य कागदपत्रे , परीक्षा वगैरे पूर्तता करुन इथे विद्यार्थी म्हणून अॅडमिशन , नंतर नोकरी शोधून स्वतःचा H-1B हा पर्याय आहे. तसेच भारतातून डिपेंडंट म्हणून न येता स्वतःच्या H-1B वर अमेरीकेत येण्याचा पर्याय स्पाउजला उपलब्ध आहेच.
पूर्वी ग्रीन कार्ड प्रोसेस एका विशिष्ठ स्टेजला पोहोचली की पुढला काळ फारतर दीड -दोन वर्षांचा असे. हळूहळू बॅकलॉग साठत जावून तो काळ खूप वाढलाय. हे नुसतेच रांगेत उभे रहाणे सुरु असताना H-1B च्या जोडीदाराला काम करु देण्याचा नियम ओबामांच्या काळात केला गेला.
इथे लग्न करुन येताना आपला जोडीदार कुठल्या विसा कॅटेगरीत आहे, काय पेपरवर्क झाले आहे, कशा स्वरुपाचे काम आहे वगैरे माहीती घ्यावी. किती म्हटले तरी वर्क विसा झाला तरी एक प्रकारचा पाहुणे गटातला विसा आहे. हे पाहुणे सोबत जी मंडळी घेवून येणार त्यांच्या वास्तव्याबाबत नियम आहेत. सिटीझन असलेल्या, ग्रीन कार्ड असलेल्या व्यक्तीला देखील जोडीदाराला इथे आणताना त्या त्या कॅटेगिरीनुसार नियम लागू होतात. लग्नासारखा निर्णय घेताना या बाबतच्या नियमांची माहीती असणे आवश्यक .
https://travel.state.gov/content/travel/en/us-visas.html या संस्थळावर सर्व माहिती उपलब्ध आहे.
>>हे नुसतेच रांगेत उभे रहाणे
>>हे नुसतेच रांगेत उभे रहाणे सुरु असताना H-1B च्या जोडीदाराला काम करु देण्याचा नियम ओबामांच्या काळात केला गेला.<<
आय्ला, हा नियम (एच-४ वाल्यांकरता इएडि वर काम करण्यास मुभा) तर ओबामा अमेरिकन राजकारणात येण्या आधीपासुन होता. मग ओबामाने २०१५ मध्ये नेमका कोणता नियम नविन आणला?..
राज, ते इएडी मिळायचे ते वेगळे
राज, ते इएडी मिळायचे ते वेगळे हा नियम वेगळा. ही माहिती इथे नविन मंडळी आली त्यांनी दिली.
आय्ला, हा नियम (एच-४
आय्ला, हा नियम (एच-४ वाल्यांकरता इएडि वर काम करण्यास मुभा) तर ओबामा अमेरिकन राजकारणात येण्या आधीपासुन होता. मग ओबामाने २०१५ मध्ये नेमका कोणता नियम नविन आणला?>>>>
आधी काय नियम होता माहिती नाही पण एच4 स्पऊसला इएडीवर काम करायला मिळणे 2015मध्ये सुरू झाले. हे वाचा: https://www.immihelp.com/h4-visa-ead/
>> एच4 स्पऊसला इएडीवर काम
>> एच4 स्पऊसला इएडीवर काम करायला मिळणे 2015मध्ये सुरू झाले.<<
इंटरेस्टिंग. माझ्या आणि माझ्या आधिच्या बॅचच्या सगळ्यांच्या बायकांना आय-१४० नंतर इएडि मिळाले होते...
टीटी( नक्की आयडी कळत नाहिये),
टीटी( नक्की आयडी कळत नाहिये),
>>>
ते टी टी नसून ग्रीक पाय आहे . २२/७
हो इएडी आले की फार
हो इएडी आले की फार पूर्वीपासूनच मिळायचे की वर्क पर्मिट.
नुस्त्या एच४ ला नव्हते.
इएडी आले की फार पूर्वीपासूनच
इएडी आले की फार पूर्वीपासूनच मिळायचे की वर्क पर्मिट>> बरोबर. पण नवे लोकं म्हणाले की मधल्या काळात ते लगेच मिळत नव्हते. मग हा रुल आला असे काहीतरी.
मुळात एच१-बी विसा मिळणेच आता
मुळात एच-१-बी विसा मिळणेच आता कठीण होणार आहे.
House Committee Unites to Clamp Down on Indian Firms’ Use of H-1B Visas
"पूर्वी ग्रीन कार्ड प्रोसेस
"पूर्वी ग्रीन कार्ड प्रोसेस एका विशिष्ठ स्टेजला पोहोचली की पुढला काळ फारतर दीड -दोन वर्षांचा असे. हळूहळू बॅकलॉग साठत जावून तो काळ खूप वाढलाय. हे नुसतेच रांगेत उभे रहाणे सुरु असताना H-1B च्या जोडीदाराला काम करु देण्याचा नियम ओबामांच्या काळात केला गेला." - हा निर्णय माझ्या मते लॉजिकल आहे. ह्या निर्णयाचा जेन्युइनली उपयोग केलेल्या / झालेल्या बर्याच केसेस पहाण्यात आहेत. हा निर्णय बदलू नये असं माझं मत आहे. ग्रीन कार्ड च्या ह्या स्टेज ला येणार्यांनी अधले मधले बरेच अडथळे पार केलेले आहेत आणी आता ते केवळ वाट बघताहेत.
च्रप्स ने लिहिल्याप्रमाणे, निदान सहजासहजी तरी बदलू नये अशी आशा आहे.
नाही बदलणार... आणि या असल्या
नाही बदलणार... आणि या असल्या न्युज फक्त भारतीय वर्तमानपत्रात असतात.. पराचा कावळा करायची सवय आहे त्यांना.
समजा बदलले तरी काय करू शकणार?
समजा बदलले तरी काय करू शकणार? fait accompli म्हणून पुढे सरकायचे.
या असल्या न्युज फक्त भारतीय
या असल्या न्युज फक्त भारतीय वर्तमानपत्रात असतात.. पराचा कावळा करायची सवय आहे त्यांना.>>> ही बातमी अतिरंजित आहे असे आहे का?
https://maharashtratimes
https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/proposed-...
इतके दिवस या ग्रूप मधे
इतके दिवस या ग्रूप मधे नसल्याने हे दिसलेच नव्हते.
>>हे नुसतेच रांगेत उभे रहाणे सुरु असताना H-1B च्या जोडीदाराला काम करु देण्याचा नियम ओबामांच्या काळात केला गेला.<<
आय्ला, हा नियम (एच-४ वाल्यांकरता इएडि वर काम करण्यास मुभा) तर ओबामा अमेरिकन राजकारणात येण्या आधीपासुन होता. मग ओबामाने २०१५ मध्ये नेमका कोणता नियम नविन आणला?..
>>> हे मलाही अजून नक्की कळाले नाही नक्की कोणत्या स्टेज मधे नोकरी करणे होउ शकत होते, जे त्या बुश च्या काळातील ४८५ स्टेज मधे इएडी घेउन नोकरी करता येण्यापेक्षा वेगळे आहे.
labor certification->I-450->I-485 यापैकी तिसर्या स्टेजमधे प्रोसेसिंग असताना (बहुधा अॅप्लाय करून सहा महिने उलटल्यावर) ईएडी घेउन नोकरी करता येणे हे बुश च्या काळात कधीतरी सुरू झाले होते इतके लक्षात आहे. मग हा मधला बदल जो आता रद्द होईल, तो कोणत्या स्टेजकरता होता?
I 140 approve वाल्यांसाठी..
I 140 approve वाल्यांसाठी..
नवीन नियमानुसार १४० अप्रुव्ह
नवीन नियमानुसार १४० अप्रुव्ह झाल्यावर लगेच एच४ विसाधारक वर्क परमिटसाठी अर्ज करू शकते/तो. आधीचा जो नियम होता त्यानुसार ४८५ झाल्यावर स्टेटस अॅडज्स्टमेन्ट होइपर्यंत इएडी आणि अॅडवान्स परोल दोन्ही अॅप्लिकन्ट्सना एकत्रच मिळायचं. पण ती स्टेज पोचेपर्यंत सुद्धा बराच वेळ लागतो आजकाल. वर इमिहेल्पची जी लिन्क आहे त्यावर पण हीच माहिती दिसते आहे.
आणि एक एसी-२१ रूल बद्दल काही माहिती आहे तिथे, हे मला आधी माहिती नव्हतं.
ओके थॅन्क्स.
ओके थॅन्क्स.
http://www.esakal.com
http://www.esakal.com/pailateer/vilas-savargaonkar-article-91073
स्वप्नांच्या देशातली 'इमिग्रेशन' वाट
http://www.esakal.com/global
http://www.esakal.com/global/atul-gopal-article-91076
हा तर ‘ब्रेन ड्रेन’वरचा उपाय!
आज ट्रम्प काकांचे काही
आज ट्रम्प काकांचे काही स्टेटमेन्ट आहे. काही रिलॅक्सेशन देत आहेत म्हणे. कोणाकडे काही अपडेट आहेत का?
डाका ड्रीमर्सना amnesty आहे.
डाका ड्रीमर्सना amnesty आहे. लीगल लोकांना काही नाही.
>>आज ट्रम्प काकांचे काही
>>आज ट्रम्प काकांचे काही स्टेटमेन्ट आहे.<<
स्टेटमेंट नाहि काल सोटु मध्ये इमिग्रेशन ते नॉर्थ कोरिया आणि मधले बरेच काहि इशुज अॅड्रेस केले...
पॉलिटिको मधल्या बातमीत तर
पॉलिटिको मधल्या बातमीत तर डाका ड्रीमर्स बद्दलही काही बदल दिसत नाही. सोटु बघितले नाही अजून.
Pages