आमच्या घराबाहेरच्या हिरव्या परिसरात अनेक पक्षी आपल्या उदरनिर्वाहासाठी, बागडण्यासाठी येत असतात.त्या सगळ्यात एक लक्षवेधी पक्षी येतो जो आला की घरातल्या व्यक्तींना/बच्चे कंपनीला हाका मारून तो दाखवण्यासाठी जमवले जायचे. माझी कॅमेरा घेऊन फोटो काढण्यासाठी धडपड चालू असायची. पिवळा धम्मक रंग व त्या पिवळ्यावर तितकाच शोभणारा भडक काळा रंग पंखांवर असणारा, लाल-गुलाबी सुबक चोच, पाणीदार डोळ्यांचा लावण्यवान असा हा हळद्या याचे क्वचित होणारे आगमन आमच्यासाठी एखाद्या सेलिब्रेटी प्रमाणे असायचे. सुरुवातीला हा हळद्या फोटो काढायला जाम भाव खायचा. कॅमेरा धरला की लगेच दुसऱ्या फांदीवर, पानाआड नाहीतर सरळ दुसऱ्या झाडावर आड जाऊन बसायचा. पण हळू हळू त्याला आमच्या पेरू, आंबा जांभळाच्या झाडांचा की आमचाच कोण जाणे! लळा लागला आणि तो वारंवार येऊ लागला. समाधानकारक अन्न व निश्चिंत निवाराही त्याचे मुख्य कारण असणार. आता आम्ही एकमेकांना परिचित होत गेल्याने तो फोटो साठी मला चांगल्या पोझही देऊ लागला. अगदी मन भरेपर्यंत फोटो काढून देतो हल्ली. मला तर वाटू लागलं की हा फोटो काढण्यासाठी नटून थटून येतो की काय इतका रुबाबदार आणि देखणा दिसतो. हिरव्या पानांमध्ये हळदी रंग अजून उठावदार दिसतो. एक दिवस तर आमच्या बेडरूमच्या खिडकीजवळ असलेल्या पेरू च्या झाडावर संध्याकाळी निवांत बसलेला दिसला. काढ गं बाई हवे तेवढे तुला फोटो अशा आविर्भावात वाटला मला. मी ही संधी साधून बरेच फोटो काढून घेतले आणि स्वयंपाकाला लागले. उरकून वर गेले आणि सवयीप्रमाणे सहजच झाडावर पाहील तर त्या पेरूच्या झाडावर मला पिवळा टेनिसचा बॉल अडकल्याचा भास झाला. उत्सुकतेपोटी मी टॉर्च घेतली आणि पाहिलं तर हळद्या साहेबच आपल्या शरीराचा चेंडूसारखा आकार करून गाढ झोपी गेलेत. नंतर वाचनात आलं की पक्षी असे चेंडू करून झोपतात. त्या दिवशी हळद्या आपल्या झाडावर वस्तीला आहे ह्याचा एखादा आवडता पाहुणा आपल्या घरी राहायला आलाय असा आनंद झाला होता. माझ्या मुलीही मधून मधून टॉर्च घेऊन हळद्या झोपलाय की उडाला हे मधून मधून पाहायच्या. पण हवेतल्या गारवेने तो छान निद्रिस्त झाला होता. सकाळी मात्र तो आपल्या दिनचर्येसाठी लवकर उठून गायब झाला होता. पण ती संध्याकाळ आणि ती रात्र आमच्यासाठी अविस्मरणीय ठरली. अजूनही तो अधून मधून हजेरी लावतो. आता तर मादीही दिसू लागली आहे. कदाचित त्याचंच कुटुंबही असेल ते.
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
जागू, मस्त लिहिलं आहेस आणि
जागू, मस्त लिहिलं आहेस आणि फोटो पण सुंदरच आहेत.
मस्तच गं जागू, फार गोड सर्व.
मस्तच गं जागू, फार गोड सर्व.
मस्त लिहिलंय.... फोटो तर
मस्त लिहिलंय.... फोटो तर ग्रेटच...
मस्त लिहिलंय. फोटो पण सुंदर !
मस्त लिहिलंय. फोटो पण सुंदर !
फोटो दिसत नाहीत
फोटो दिसत नाहीत
वॉव, किती मस्त,
वॉव, किती मस्त,
छान लिहीलेय, अन हळद्या पण किती सुंदर दिसतोय...
मस्त !
मस्त !
हेमाताई, अन्जू, शशांकदा, मित,
हेमाताई, अन्जू, शशांकदा, मित, वर्षा, प्रकाश धन्यवाद.
निर्झरा फोटो क्रोमवरून दिसतील.
लेख आणि फोटो... दोन्ही सुंदर.
लेख आणि फोटो... दोन्ही सुंदर..
काय मस्त आहे हा..
काय मस्त आहे हा..
तुझ्यासाठी बरे पोझ देऊन बसतात..
धनवन्ती धन्यवाद.
धनवन्ती धन्यवाद.
तुझ्यासाठी बरे पोझ देऊन बसतात..
पहिल्या फोटोत बघ कसा टवकारून पहातोय तो.
मस्त फोटो. आणि वर्णनही!
मस्त फोटो. आणि वर्णनही!
तुझ्यासाठी बरे पोझ देऊन बसतात..>>>>>>तिचे मित्र-मैत्रीणीच आहेत ते.
सुंदर फोटोज..आणि हळद्या
सुंदर फोटोज..आणि हळद्या सुद्धा.. पण थोडे लहान दिसत आहेत फोटोज...
शोभा
शोभा
उनाड पप्पू मला जमतच नाही साईज नक्की कशी ठेवायची ते. पिकासा गेल्यामुळे खुप प्रॉब्लेम झाला आहे.
पिकासा गेल्यामुळे खुप
पिकासा गेल्यामुळे खुप प्रॉब्लेम झाला आहे.>>>>>>>>>>हो ग. मलाही फोटो अपलोड करता येत नाहीत.
मल एकही चित्र दिसत नाहीये!
मल एकही चित्र दिसत नाहीये!
कृष्णा क्रोम मधून दिसतील फोटो
कृष्णा क्रोम मधून दिसतील फोटो.
फार आवडला लेख आणी फोटो ही
फार आवडला लेख आणी फोटो ही एकापेक्षा एक..मस्तच
जागू.... विपू बघा..
जागू.... विपू बघा..
दिसले दिसले !!
दिसले दिसले !!
मस्तच!! पिवळा धम्मक रंग किती सुरेख दिसतोय!
आणि हे पक्षी पोज देतात का तुम्हाला फोटो काढताना पाहून!?
एकदम मस्त!
वर्षू धन्यवाद.
वर्षू धन्यवाद.
उनाड पप्पू पहाते विपू.
कृष्णा ते कुतुहलाने पहातत ही बया काय करतेय ते. धन्यवाद.
सुन्दर ....
सुन्दर ....
मस्त फोटो आणि लेख!
मस्त फोटो आणि लेख!
धन्यवाद गिरीश सावंत, स्वाती२.
धन्यवाद गिरीश सावंत, स्वाती२.
मला एकही फोटो दिसत नाही
मला एकही फोटो दिसत नाही
अंकु गुगल क्रोम वरून दिसतील.
अंकु गुगल क्रोम वरून दिसतील.
Kiti mast lihilay.
Kiti mast lihilay.
कीत्ती छान लिहीलयस ग जागु...
कीत्ती छान लिहीलयस ग जागु.... हळद्या खरच खुपच लोभस पक्षी आहे..:)
फोटो ही खासच आले आहेत..
चेंडु हळद्याचा ही फोटो काढायचा प्रयत्न् कर ना जागु..:)