हळद्या
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 22 November, 2017 - 13:43
आमच्या घराबाहेरच्या हिरव्या परिसरात अनेक पक्षी आपल्या उदरनिर्वाहासाठी, बागडण्यासाठी येत असतात.त्या सगळ्यात एक लक्षवेधी पक्षी येतो जो आला की घरातल्या व्यक्तींना/बच्चे कंपनीला हाका मारून तो दाखवण्यासाठी जमवले जायचे. माझी कॅमेरा घेऊन फोटो काढण्यासाठी धडपड चालू असायची. पिवळा धम्मक रंग व त्या पिवळ्यावर तितकाच शोभणारा भडक काळा रंग पंखांवर असणारा, लाल-गुलाबी सुबक चोच, पाणीदार डोळ्यांचा लावण्यवान असा हा हळद्या याचे क्वचित होणारे आगमन आमच्यासाठी एखाद्या सेलिब्रेटी प्रमाणे असायचे. सुरुवातीला हा हळद्या फोटो काढायला जाम भाव खायचा.
विषय:
शब्दखुणा: