वेळ असेल तर आणि वाचला नसेल तर आधी हा पहिला भाग वाचून आलात तर आवडेल
मला मिळालेला पहिला नकार ! - प्रस्तावना
_____________________________________________________
-------------------------------------------------------------------------------
बराच वेळ आम्ही दोघेही शांत होतो. मग ती अचानक म्हणाली,
"काय मग, स्कूल कॉलेज ऑफिसमध्ये कोणी गर्लफ्रेंड?"
हल्ली हा प्रश्न फार महत्वाचा झाला आहे. एकवेळ मुलगा/मुलगी काय करतो/करते हे नाही विचारले तरी चालते. पण त्याचे/तिचे काय करून झाले आहे हे जास्त महत्वाचे समजले जाते. याच्या उत्तराने निर्णयावर फरक पडतो की नाही याची मात्र कल्पना नाही.
तर मी हसलो...
"स्कूलचे आठवत नाही. वेडपटपणा असतो तो. पण कॉलेजपासून मात्र कधी कोणत्या मुलीकडे मान वर करून पाहिले नाही. एखादी मुलगी स्वत:हून समोर आली तरी अलगद पापण्या मिटतात माझ्या.."
आता ती हसली...
"वाटत नाही तसं. माझ्याकडे तर डोळे फाडून फाडून बघत होतास"
मी ओशाळलो!
कुठलेही नाते खोट्याच्या आधारावर बनवायचे नसते हे आपले तत्व. पण इथे नाते बनवायचेच नव्हते म्हणून थोडीफार फेकाफेकी चालू होती.
"ठिक आहे रे, गंमत केली मी तुझी. आपल्याकडे मान वर करून बघू न शकणारा नवरा काय कामाचा? उलट तुझ्या बघण्यातून मला तुझी पसंती कळली
पसंती!!
काहीतरी फार मोठा गैरसमज होत होता. प्रवाह उलट्या दिशेने वाहायला सुरुवात झाली होती.
"तुझा जॉब प्रोफाईल काय आहे?
म्हणजे ईंजिनीअर आहेस असे ऐकलेय, पण नेमके काय करतोस?"
"ते तर मलाही माहीत नाही, बॉस सांगेल ते सारे करतो."
ती पुन्हा गोड हसली!
"गूड, मला असाच नवरा हवा होता
.... मी आणखी फसत चाललो होतो
"पॅकेज किती आहे तुझे?"
हायला डायरेक्ट पॅकेज... आधी बाऊन्सर मग गूगली !
"तरी आहे दहा लाखाच्या आसपास.." मला या अनपेक्षित प्रश्नाने बसलेल्या झटक्यातून सावरत मी खराखुरा आकडा सांगितला.
माझ्या एक्सपिरन्सच्या मानाने चांगलाच होता. पण ती मात्र काहीशी विचारात पडलेली दिसली,
"मी काहीतरी वेगळा आकडा ऐकला होता"
अरेच्चा!
मुलगी तर सारा अर्थशास्त्राचा अभ्यास करून आलेली.
"काय ऐकलेलास?" मी कुतूहलाने विचारले.
"हेच, थर्टीन पॉईंट फाईव्ह लॅक्स!"
मलाही हा आकडा कुठेतरी ऐकल्यासारखा वाटला.
अरे हो, आठवले...
नुकताच मी माझा सीवी एके ठिकाणी पाठवला होता. त्यात हा आकडा होता. तिच्याकडे कुठून आला?
"मला माहीत नाही, तू हा आकडा कुठून ऐकलास. पण आज जो आहे तो हा आहे. आणि तू जो म्हणत आहेस तो पुढेमागे लवकरच होईलही"
"उद्या होईल रे.. पण आज नाहीये ना.. यापेक्षा माझे पॅकेज जास्त आहे. आणि उद्या तुझे ईतके होईस्तोवर माझे आणखी जास्त झाले असेल. काय माहीत पुढचे कित्येक वर्षे तू माझ्या मागेच राहशील, कदाचित शेवटपर्यंत.."
मगापासून माझ्यासाठी जी नदी उलटी वाहत होती तिच्यावर आता दहा लाखांचा बंधारा पडला होता. जे मला तिच्याकडून हवे होते तेच मला मिळत होते.. ते म्हणजे, नकार!
पण आता मला या नकाराचा त्रास होत होता. माझा पगार तुझ्या पगारापेक्षा दोनेक लाख कमी काय आहे तर तू मला लग्नासाठीच नालायक ठरवणार? हे कसलं कारण?
आजवर लाखो करोडो अब्जो मुलांनी आपल्यापेक्षा कमी पगार असलेल्या मुलींशी हसत हसत लग्ने केली ना. मग आजच्या स्त्री-पुरुष समानतेच्या युगात एखाद्या मुलाचा पगार कमी असणे मुलींनी चालवून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे?
बरे कमी म्हणजे तुलनेत कमी. अन्यथा माझ्या पोटापाण्यापुरता मी कमावतोय, तुझ्या पोटापाण्यापुरता तू कमाव. माझी सेव्हिंग मी करतो, तुझी सेव्हिंग तू कर. मला कुठे तुझ्या पैश्यावर ताजमहाल बांधायचाय..
मी तिला स्पष्ट शब्दात याचा जाब विचारला. म्हटलं हे कारण पटणारे नाही. लग्नाचे राहू दे बाजूला. या कारणामागचा तुझा विचार काय आहे?
तिने एक दिर्घ श्वास घेतला,
आणि म्हणाली, "ईगो क्लॅश!"
बायकोचा पगार नवर्यापेक्षा जास्त असल्यास हमखास होतो. आज नाही तर उद्या होणारच. मला ते नकोय. मला पैश्याची हाव नाहीये. पण मला सुखी संसार हवाय. तो मला या दोन लाखाच्या फरकात दिसत नाहीये. सॉरी .. समजून घे मला"
एवढे बोलून ती आपली पर्स उचलून चालू पडली.
आणि मी भारावलेल्या अवस्थेतच ही गूड न्यूज द्यायला गर्लफ्रेंडला फोन लावला !
- ऋन्मेऽऽष
निधी हो, ईगो क्लॅश होतो.
निधी हो, ईगो क्लॅश होतो. याच्याशी सहमत आहेच. लेख त्यामुळेच त्या नोटवर संपला आहे.
मुलीला आपला पगार जास्त असल्याने कदाचित फरक पडत नसावा पण मुलाच्या मनात हे कधीही येऊ शकते या भितीची टांगती तलवार तिच्या डोक्यावर असणारच.
स्त्री-पुरुष समानता केवळ स्त्रियांनी प्रगती करून येणार नही. पुरुषांची विचारसरणी बदलणेही तितकेच गरजेचे आहे.
बिपीनचंद्र,
बिपीनचंद्र,
आर्थिक परिस्थिती खालावताच ब्रेक अप करणारी गर्ल्फ्रेंड काय कामाची?
https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actress-deepika-paduk...
त्यापेक्षा पगार कमी आहे म्हणून आधीच लग्नाला नकार देणारी मुलगी बरी.
>>>>>>
दिपिकाचे उत्तर दिपिकाच्या धाग्यावर दिले आहेच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आत ईथले उत्तर ईथे देतो.
तुम्ही ज्या मुलीला बरी म्हणत आहात तिला मी कुठेच वाईट म्हणालेलो नाहीये. जर तुम्हाला तसे वाटले असेल तर विनम्रपणे म्हणू ईच्छितो की आपण कृपया पुन्हा दोन्ही भाग वाचून घ्यावेत
मायबोली वर तुम्ही ३-४ वर्षे
मायबोली वर तुम्ही ३-४ वर्षे आहात.. त्या आधी पासुन नोकरी आणि ग.फ्रे. आहे..
म्हणजे तुम्ही अराउंड २९-३० असाल आत्ता.. मग आता ग.फ्रे. बद्दल घरी सांगायची वेळ आलीच की..
म्हणजे कोणाशी जमतच नसेल, तर लग्नाच वय काहिही असु शकतं .. आपल्याला आवडती व्यक्ती मिळेपर्यंत..
पण आता तुम्हाला तर जॉब आहे.. मुलगी मिळाली .. मग घोडं अडलय कुठे
आनंदी, वयाचा अंदाज थोडा
आनंदी, वयाचा अंदाज थोडा चुकलाय पण अजून फार तर दोन वर्षे.. लग्न करावेच लागणार ...
घोडं म्हणाल तर नको नको तिथे अडलेय...
जात, पात, प्रांत, आर्थिक तफावत, आणि अश्या कैक गोष्टीत तफावत आहे ज्याबाबत आम्ही एकमेकांना स्विकारले असले तरी आमच्या एकमेकांच्या घरचे एकमेकांना सहज स्विकारतील हे अवघड आहे..
बरेचदा आमच्या सारख्या केसमध्ये लग्नाचे वय झाल्याझाल्या घरी सांगता येत नाही.. घरचे इमोशनल ब्लॅकमेल करत वेटींग गेम करून छळत राहतात. त्यामुळे उशीरा सांगणे फायदेशीर ठरते. म्हणजे एक घाव दोन तुकडे .. आर या पार की लढाई असते.
बरेचदा आमच्या सारख्या
बरेचदा आमच्या सारख्या केसमध्ये लग्नाचे वय झाल्याझाल्या घरी सांगता येत नाही.. घरचे इमोशनल ब्लॅकमेल करत वेटींग गेम करून छळत राहतात. त्यामुळे उशीरा सांगणे फायदेशीर ठरते. म्हणजे एक घाव दोन तुकडे .. आर या पार की लढाई असते.>>>>
बराच मोठा (!) अनुभव दिसतोय...
रच्चाकने,
दादा, ऋन्मेष' माबोकरांना लग्नाला बोलवा हं!
बरेचदा आमच्या सारख्या
बरेचदा आमच्या सारख्या केसमध्ये लग्नाचे वय झाल्याझाल्या घरी सांगता येत नाही.. घरचे इमोशनल ब्लॅकमेल करत वेटींग गेम करून छळत राहतात >> प्रत्युत्तर म्हणुन आपणही इमोशनल ब्लॅकमेल करायच
प्रत्युत्तर म्हणुन आपणही
प्रत्युत्तर म्हणुन आपणही इमोशनल ब्लॅकमेल करायच
>>>>
ते करावेच लागते. त्याला पर्याय नसतो. ओळखीतली एकदोन उदाहरणे पाहिली आहेत. पण त्यावरूनच सांगतो, फार त्रासदायक काळ असतो. तो कमीत कमी होईल हे बघावे. तसेच हा नात्यातला गोल्डन पिरीअड असतो. त्याचीही उगाच काशी होते.
झाले वाचून पूर्ण छान लिहिलय
झाले वाचून पूर्ण
छान लिहिलय !
अजून एक भाग येऊ दे. फायनल
अजून एक भाग येऊ दे. फायनल डिसीजन !
![164088860_2854385821497567_5142152013198535158_n.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u78161/164088860_2854385821497567_5142152013198535158_n.jpg)
पण आपल्यालाही त्याच घरात
पण आपल्यालाही त्याच घरात राहायला परवानगी मिळते का?
Lol ऋन्मेष !!
Lol ऋन्मेष !!
Pages