Submitted by सेन्साय on 5 December, 2017 - 05:24
.
.
हसणे आणि रूसणे
ह्यातील फरक
जेंव्हापासून
कळायला लागला
तेव्हा पासून
आयुष्याचं गणित
विस्कटायला लागलं
आठवणीतले दिवस
आठवणीतच विरून गेलें
साठवावे जेवढे तेही
कमीच वाटू लागले
संगतीने जर कोणाच्या
माणूस घडत जातो
तर निसर्गाच्या संगतीत
मी कविता करायला लागलो
विसरलो होतो
जो स्वत:ला
पुन्हा मिळायला लागलो
तुझ्या संगतीने गं प्रिये
ठेवला हळूच मनावर हात
अन् हृदयात तुझ्या... मी
कायमचा रूजायला लागलो.
― अंबज्ञ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम
अप्रतिम
ठेवला हळूच मनावर हात
अन् हृदयात तुझ्या... मी
कायमचा रूजायला लागलो.>> मस्तच
खुप सुंदर
खुप सुंदर
छान...
छान...
अक्षय , वर्षा आणि सायुरी
अक्षय , वर्षा आणि सायुरी
सर्वांचे मनःपूर्वक आभार
भारी अंबज्ञ पुलेशु
भारी अंबज्ञ
पुलेशु