Submitted by सायु on 27 November, 2017 - 06:34
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१. मोड आलेले मेथी दाणे = १ वाटी
२. कीसमीस = पाव वाटी
३. एक कांदा, उभा चिरलेला
४. लसुण ५,६ पाकळ्या, बारिक चिरलेल्या
५. तेल २ ते ३ चमचे
६. बारिक चिरलेली कोथोंबीर
६. मोहरी,तिखट, हळद, मिठ अंदाजे
क्रमवार पाककृती:
कढईत दोन चमचे तेल तापवुन ,मोहरी घाला, मोहरी तडतडली की कांदा आणि लसुण घाला.. गुलाबीसर परतुन घ्या.. मग किसमीस घालुन पाच सात मिनटे पुन्हा परतायचे.. हळद, तिखट घालायचे, मग मेथ्या घालुन पुन्हा परतायचे.. मिठ घालुन एक वाफ काढुन घ्या..
बारिक कोथींबीर घालुन सर्व्ह करा.
हिवाळ्यात मेथी खाल्ली की कंबर दुखणे, हात पाय दुखणे अशा तक्रारी येत नाहीत. म्हणुन ही भाजी / उसळ आठवड्यातुन एकदा तरी होतेच..
पौष्टीक आणि जरा वेगळ्या चवीची आहे त्यामुळे एकदा करुन पहा.
वाढणी/प्रमाण:
दोन जणांना पुरेशी आहे.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा! वेगळा प्रकार आहे.
अरे वा! वेगळा प्रकार आहे.
आई मेथीदाणे भिजवून झुणका टाईप भाजी करते. तीही मस्तच होते.
पहिल्या वहिल्या प्रतिसादा
पहिल्या वहिल्या प्रतिसादा साठी धन्यवाद योकु..
आई मेथीदाणे भिजवून झुणका टाईप भाजी करते. तीही मस्तच होते.++ येस्स ती ही खुप छान लागते..
मस्त! माझ्या सासूबाई करायच्या
मस्त! माझ्या सासूबाई करायच्या अशी भाजी.
>>मेथीदाणे भिजवून झुणका टाईप भाजी>>
योकु, ही पण रेसीपी येऊ दे.
मस्त आहे सायु ही रेसिपी. मी
मस्त आहे सायु ही रेसिपी. मी एकदा केली होती तर भाजी कच्च्या मोड आलेल्या मेथ्या पेक्षा कडू लागत होती. आता किसमिस घालून करून बघते.
योकु, त्या झुणक्याची रेसिपी ही द्या वेगळा धागा काढून .
मस्त आहे
मस्त आहे
मी केली नाही मेथी दाण्यांची
मी केली नाही मेथी दाण्यांची भाजी. एकदा करेनच पण आता.
आईच्या पद्धतीत ती मेथ्या रात्रभर भिजवून सकाळी पाणी बदलून उकळून घ्यायची आणि मग त्या निथळून पुढे भाजी करायची अशी पद्धत आठवतेय. यामुळे कडवटपणा बराच कमी होतो (तरीही गुणधर्मानुसार जरासा कडूपणा राहाणारच). तीला विचारून फटूसकट टाकेन मग इथे...
मोड आलेल्या मेथ्याच लोणचही
मोड आलेल्या मेथ्याच लोणचही छान होत. मी करते नेहमी.
वा मस्तच...healthy आहे नक्कीच
वा मस्तच...healthy आहे नक्कीच..
ही कडू लागत नाही का?
गूळ किंवासाखर नाही घालायची का??
मस्त दिसतेय. ह्याची आमटीपण
मस्त दिसतेय. ह्याची आमटीपण करतात, अर्थात असं ऐकून आहे. प्रत्यक्ष बघितली नाही.
दोन्ही बाळंतपणात खाल्लीये ;),
दोन्ही बाळंतपणात खाल्लीये छान लागते.
छान सायु. थंडीत एकदातरी
छान सायु. थंडीत एकदातरी मेथीदाण्याची भाजी मी करते. खिचडीही करतात.
मी एक दोनदा मेथीला मोड आणायचा
मी एक दोनदा मेथीला मोड आणायचा प्रयत्न केला पण ती बुळबुळीत होते. काय चुकत असावे?
सगळ्यांचे आभार..:) --------/\
सगळ्यांचे आभार..:) --------/\--------
येस्स! झुणका पण मस्तच लागतो.. कांदे ,टोमाटो , मेथ्या आणि बेसन पीठ घालुन..
मोड आलेल्या मेथ्याच लोणचही छान होत. मी करते नेहमी.++ पा कृ द्या..
खिचडीही करतात.++ अच्छा.:)
ही कडू लागत नाही का?++ विशेष नाही.. कारल्याची लागते ना तेवढीच..
गूळ किंवासाखर नाही घालायची का??++ घालु शकतो.. पण मी नाही घालत.
मी एक दोनदा मेथीला मोड आणायचा प्रयत्न केला पण ती बुळबुळीत होते. काय चुकत असावे?++ पाणी नीट उपसुन मग फडक्यात बांधुन ठेवायची. मेथी दाणे जास्त वेळ पाण्यात ठेवण्यात आलेत का?
दोन्ही बाळंतपणात खाल्लीये Proud छान लागते.
तुम्हा सगळ्यांमुळे कीत्ती तरी प्रकार कळलेत..
झुणका, लोणचं, आमटी, खिचडी..
कडवट पणा बद्दल खात्री नसेल तर
कडवट पणा बद्दल खात्री नसेल तर अर्धे मेथी दाणे (मोड आलेले) आणि बाकी अर्धे इतर कोणतेतरी मोड आलेले कडधान्य वापरून उसळ केलेली चालेल का?
मेथी सोबत कोणते कडधान्य जाईल?
>>मेथी सोबत कोणते कडधान्य
>>मेथी सोबत कोणते कडधान्य जाईल?<<
मूग , मटकी
कळत नाही की मेथी आहे त्यात.
मीही वरणात थोडे मोडमेथीदाणे
मीही वरणात थोडे मोडमेथीदाणे कधीकधी घालते. छान कृती, मनुकांची आयडिया जोरदार आहे. करुन पहाते.
इंटरेस्टिंग पाकृ. करुन बघेन.
इंटरेस्टिंग पाकृ.
करुन बघेन.
सायु मोड कसे आणले ते लिही ना.
सायु मोड कसे आणले ते लिही ना. मी आता भिजत घातले.
दक्षिणा, खुप कडु नाही लागत..
दक्षिणा, खुप कडु नाही लागत.. एकदा मुठ भर मेथीची करुन तर बघ.. कोशिंबीरी सारखी.
>मेथी सोबत कोणते कडधान्य जाईल?<< मथी, मटकी, मसुर..
अनघा , मानव आभार.. करुन बघा आणि प्र.ची द्या!
सायु मोड कसे आणले ते लिही ना. मी आता भिजत घातले.++ सकाळी मेथी दाणे भीजवायचे. ७, ८ तास भिजल्यावर, रोळीत ठेवुन उपसुन घ्यायचे.. मग रात्री, एका स्वच्छ सुती फडक्यात बांधुन ठेवायचे .(श्रीखंडा चा चक्का बांधतो ना तसे) सकाळ पर्यंत छान मोड येतील.:)
सायु नक्की बघते करून. आजच
सायु नक्की बघते करून. आजच आणते मेथी दाणे.
आहा... मस्त दिसतेय गं...
आहा... मस्त दिसतेय गं...
मी नाही केली कधीच.. आता घरी गेली कि करुन बघणार
हिवाळ्यात करायला आणखीनच छान नाही का..
येस्स टीना, हिवाळ्यात मस्त
येस्स टीना, हिवाळ्यात मस्त लागते.. नक्की करुन बघ!
परवा या पाकृची आठवण झाली आणि
परवा या पाकृची आठवण झाली आणि वाचून आज केली. आवडली.
घरी सगळ्यांना आवडली ही वेगळ्या चवीची भाजी.
मोड आलेले मूग सुद्धा होते घरात तेव्हा ते सुद्धा घालून केली.
वाह...मस्त फोटो. तोंडाला पाणी
वाह...मस्त फोटो. तोंडाला पाणी सुटले
बेदाणे घातले आहेत का उसळीत?
बेदाणे घातले आहेत का उसळीत? गूळाला पर्याय म्हणून की चिवड्यात घालतात काहे लोकं तसं?
हो सशल, गुळाला पर्याय म्हणून,
हो सशल, गुळाला पर्याय म्हणून, मेथीचा कडवटपणा कमी करण्यास.
वा मानव! खुप भारी दिसतेय उसळ!
वा मानव! खुप भारी दिसतेय उसळ!
मानव मस्त च दिसतेय उसळ. मला
मानव मस्त च दिसतेय उसळ. मला पटकन मटकी उसळीचा भास झाला..
लय भारी झाली ओ, मज्जा आली
लय भारी झाली ओ, मज्जा आली वेगळ्या चवीची भाजी. फक्त लसूण नाही घातला. ॲधि नवरा बघुन खाणार नाही म्हणाला. पन चव घेउन आवडीने खाल्ली. किसमिस ची चव चांगली लागली.
(No subject)
Pages